शेख चिल्ली !
कुणीही अजाणता अथवा बावळटपणे स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागत असेल तर सहसा ज्या चित्राची पटकन आठवण येते त्यातील एक म्हणजे शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय, झाडाची फांदी कापून झाली की तो आपोआप झाडावरून फांदी सहीत खाली पडणार हे सुज्ञांच्या लक्षात येतच. या शेख चिल्लीच्या इतर बर्याच कथा असल्या तरीही या धाग्याचा उद्देश अजाणता अथवा अज्ञानातून स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, तर्क मांडणे या संदर्भाने आहे.
