मौजमजा

कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
10 Feb 2015 - 6:14 am

प्रिय मिपाकरांनो,

पुणेकरांचे कशेळी कट्ट्याचे आयोजन झाले देखील.

पण अद्याप मुंबईकरांचे कुठलेच आयोजन नसल्याने, हा विषय मांडत आहे.

कालच माझे आणि कंजूस ह्यांचे बोलणे झाले.

शनिवारी १४-०२-२०१५ला, सकाळी ९-२०ची कर्जत लोकल ते डोंबिवलीहून पकडणार आहेत.

मी पण तीच लोकल पकडणार आहे.

माझ्या बायकोची जर्मनची परिक्षा त्याच सुमारास असल्याने, ती येणार नाही.

कळावे,

आपलाच मुवि.

मौजमजाप्रकटनबातमी

गलित आहे गात्र अजुनी

चिमिचांगा's picture
चिमिचांगा in जनातलं, मनातलं
7 Feb 2015 - 11:37 pm

कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर...

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?

सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे ?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?

उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे ?

धोरणकविताप्रेमकाव्यगझलक्रीडामौजमजा

automatic प्राणायाम :-डोक्यातली हवा काढणारी पीन

पिनुराव's picture
पिनुराव in काथ्याकूट
7 Feb 2015 - 4:34 pm

अनुलोम-विलोम वगैरे प्राणायाम करतांना नाकातून शेंबूड वगैरे सामग्री बाहेर येण्याच्या तक्रारी असतात . श्वास वर ओढताना नाकपुडीत मच्छर वा चाचनही जाण्याची शक्यता असते. शिवाय आमच्या तरुण पिढीला, स्मार्ट (आजोबा-आजीना,काका ,मामा ,मावश्या, आई बाबा वगैरे) वडिलधार्यांना खाली बसून नाकाला हात लाऊन प्राणायाम करण्याची लाज वाटते . याकरिता automatic प्राणायामाच गणित मांडतोय .

(पहिल्याच दिवशी काही तुम्ही 'कुठे' हि प्राणायाम करू शकणार नाही त्यासाठी आधी घरी रिकाम्या वेळेत practice करा )

Wrong Number

NiluMP's picture
NiluMP in जनातलं, मनातलं
6 Feb 2015 - 3:02 pm

लँडलाईनच्या काळात राॅंग नंबर म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी होती. टेलेकम्युनिकेशन आणि मोबाईल क्रांतीमुळे त्यातुन सुटका झाली. पण मार्केटिक काॅलमुळे नवीन डोकेदुखी सुरु झाली पण राॅंग नंबर व मार्केटिक काॅलमुळे करमणूकही होते कशी याचेच काही किस्से मी सांगाणार आहे

किस्सा 1.

सर्वसाधारणपणे आपण ज्याला फोन करतो त्याची खात्री करुन आपल्याला ज्याच्याशी बोलयचे आहे त्याचे नाव सांगतो. फोन वाजला नंबर पाहून अंदाज आला अनओळखी नंबर आहे.

मौजमजाविरंगुळा

पहिलेवहिले मराठी चावटसाहित्य संमेलन पुण्यात संपन्न

चिमिचांगा's picture
चिमिचांगा in जनातलं, मनातलं
4 Feb 2015 - 10:51 pm

पहिले अखिल वैश्विक मराठी चावटसाहित्य संमेलन कालच पुणे येथे संपन्न झाले त्याचा वृत्तांत...

मौजमजा

डेथ ऐप्लिकेशन

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in जनातलं, मनातलं
1 Feb 2015 - 10:21 pm

सर - ह्यालो
मी - हं सर बोलाना ?
सर - आरं आईक की. .
मी - हं
सर - त्यो आपला ह्यो हाय का.. गणू ?
मी - म्हणजे डॉ. गणेश ना? त्याचं काय?
सर - हा त्योच, त्याचा बा म्येलाय तर त्यो गेलाय सुट्टीवर
मी - अरेरे. . वाईट झालं.
सर - तर त्याला लिहायचय डेथ ऐप्लिकेशन.
मी - सर, लीव ऐप्लिकेशन
सर - त्येच, मी सुरुवात करून दिलीये फुडच्या दोन ओळी जरा सांगचिल का ?
मी - हो सर, काय लिहिलंत?
सर - Dear Sir, आता सांग.
मी - Dear Sir, I am sorry to inform…
सर - Sorry? Sorry कशाला? बा मेलाय ही काय चूक हाय का?

मौजमजाविरंगुळा

अगा जे घडलेची नाही...अर्थात न उडालेले वैदीक विमान !

स्वप्नांची राणी's picture
स्वप्नांची राणी in जनातलं, मनातलं
31 Jan 2015 - 4:36 pm

सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्‍या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अ‍ॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही!

विनोदसमाजमौजमजाचित्रपटआस्वादसमीक्षामाध्यमवेधअनुभवमतमाहितीविरंगुळा

टोपणनाव

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
30 Jan 2015 - 12:39 pm

नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात. काय कारण असावे ?

गुपित- एक गुढ रहस्यमय रुपक कथा -एकाच भागात संपुर्ण

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
26 Jan 2015 - 4:24 pm

"कस होणार या पोराच !." पार्थचे बाबा ,पार्थाच्या आईकडे पहात म्हणाले.
"जाऊ द्या हो, अजुन लहान आहे आणी काही वाईट तर करत नाही ना!." पार्थची आई.

पार्थ मात्र स्वतः मध्येच मग्न होता.पार्थ लहान असताना हातात उदबत्ती घेऊन बोबड्या भाषेत देवापुढे..जय..जय..करायचा
तेंव्हा सगळ्यांना त्याचे कौतुक वाटायच, पण पार्थ आता आठ वर्षाचा झालता.सुट्टीच्या दिवशी त्याच आवडत काम
म्हणजे,देवाची पुजा करणे..देवपुजे मध्ये तो तास-दोन तास सहज रमुन जायचा.देवांना स्नान घालणे,वस्त्रानीं पुसणे.
त्यांना गंध लावुन जागे वर ठेवणे हे मन लावुन करायचा.नंतर पाच-दहा मिनीट हात जोडुन प्रार्थना करायचा.

कथाबालकथाविनोदमौजमजालेखविरंगुळा

पोरगीपटाव शास्त्रानंतर...

जेम्स बॉन्ड ००७'s picture
जेम्स बॉन्ड ००७ in काथ्याकूट
22 Jan 2015 - 3:49 pm

पोरगीपटाव शास्त्र शिकुन पोरगी पटवली कि पटावपोरगीटिकाव शास्त्राचा अभ्यास सुरु होतो. कितीही कंटाळा आला तरी ओपन मार्केट काँपिटीशन असल्याने या शास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. पटलेली पोरगी टिकवण्यासाठी आपण तसेही प्रयत्न करतोच; पण जेव्हा पोरगी A किंवा B कॅटेगरीतली असेल तेव्हा पोरगी पटलेली असुनही आउटसाईड काँपिटीशनला तोंड द्यावे लागते. आपण जरी तिला कितीही खुश ठेवत असलो, तिच्यावर विश्वास असला तरीही जेव्हा आपल्या समोरच कोणीतरी तिच्याशी फ्लर्ट करत असेल तर आपल्या अंगाचा तिळ्पापड होतोच.. तर अशा वेळी काय करावे?