हिंदी सक्ती - मुख्यमत्र्यांना खुले पत्र
श्री० देवेन्द्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र
स० न० वि० वि०
सध्या हिंदी १ली पासून शिकवली या मुद्द्यावरून बरेच चर्वितचर्वण चालू आहे. यात होणारा विरोध हा भावनिक आणि राजकीय अंगाने होत आहे असे वाटते. याशिवाय आणखी एका अंगाचा विचार व्हायला हवा, तो म्ह० चेताविज्ञान म्ह० न्युरोसायन्स.
मी चेताविज्ञानातील प्रशिक्षित तज्ज्ञ नसलो तरी याविषयातील ताजे संशोधन भरपूर वाचत असल्याने काही मुद्दे पुढे ठेवावेसे वाटतात. या मुद्द्यांचा प्रशिक्षित तज्ज्ञ साक्षेपाने विचार करतील याची खात्री आहे -