नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा फ्लेक्सच्या भव्य प्रदर्शनाची यशस्वी सांगता!
पुणे - बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालन मध्ये नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित ६० फ्लेक्सचे भव्य प्रदर्शन ४ आणि ५ जानेवारी २०२५ या दिवशी मिलिटरी कमांडरांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. इतिहास तज्ज्ञ, गड आणि किल्ले संवर्धन प्रेमी,राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाला मिळालेल्या ४०० जणांच्या प्रतिसादातून विंग कमांडर शशिकांत ओक यांनी समाधान व्यक्त केले.
सौ अलका ओक, सौ व मेजर जनरल शिशिर महाजन आणि नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे भेट देताना...
लष्करी बाजूने विचार करायला लावणारी प्रदर्शने शाळा, कॉलेज मधे दाखवणे नितांत आवश्यक आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले. यासाठी दोन शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला आहे. पालक आपल्या मुलांना स्लाईड्स समजावून सांगताना पाहून ओक यांनी आनंद व्यक्त केला.
ॲडमिरल नाडकर्णी, एयर मार्शल प्रदीप बापट, मेजर जनरल शिशिर महाजन, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, प्रा. नामदेवराव जाधव यांच्या सह अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
एयर मार्शल प्रदीप बापट आपला अभिप्राय नोंदवताना...
डी राम यांनी काढलेल्या शिवाजी महाराजांच्या मुद्रांचे चित्रण प्रदर्शनात एक विशेष आकर्षण होते.
शिवाय विंग कमांडर ओकांचे पोर्ट्रेट त्यांनी चितारले.
प्रतिक्रिया
7 Jan 2025 - 12:58 am | शशिकांत ओक
शाहीर जाधवरावांनी आधुनिक पोवाडा म्हणून बहार आणली.
7 Jan 2025 - 1:03 am | शशिकांत ओक
प्रिव्ह्यू मधे ठीक दिसते काय करावे...