आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही
“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे,
“मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं.
जीवनाचा उद्देश काय आहे असा प्रश्न बहुतेकांना पडतो.जेव्हा मी वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो.