मुक्तक

समाजरचना घडताना

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
31 Jul 2018 - 1:43 pm

काल पर्यंत
हेच समजत
होतो की अमुक समाजाने
तमुकांना वाळीत टकले.
इथे एकदा समता आली
की पुढे आदर्श समाज रचना असेल

पण आज बघीतले पुन्हा कुणाला तरी
संशयावरुन वाळीत टाकले जाताना
नव्या अस्पृश्यतेची समाजरचना घडताना

रतीबाच्या कवितामुक्तक

आभाळाची छत्री

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
29 Jul 2018 - 10:18 pm

आभाळाची छत्री

माझ्या कड़े आभाळाची छत्री आहे. गुलाबी रंगाची लांब दाण्डयाची. रंग बऱ्या पैकी मळलेला आहे. गंजलेल्या तारांच्या गंजा च्या छटा त्यावर उमटल्या आहेत. कधी कधी तारा सुटतात. त्या मी परत बसवून घेतो. पाऊस सुरू व्हायच्या आधीपासून म्हणजे में पासून ते पाऊस सम्पायच्या नंतर नंतर अगदी ऑक्टोबर पर्यन्त मी त्या आभाळा च्या छत्रीला अंतर देत नाही. विसरत नाही म्हटले तरी दोन तीन दा तरी असेल छत्री दुकानात खानावळीत विसरून आलोय पण तितक्या च प्रयत्नने ती शोधूनही आणालिये. छत्री ला मी जसा विसंबत नाही तशी छत्री सुद्धा मला कधी विसम्बत नाही.

मुक्तकप्रकटन

मैत्र..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
17 Jul 2018 - 6:59 pm

अगदी अचानक काहीच न कळवता आपण मित्राच्या घरी धडकावं.
त्याने दरवाजा उघडताच त्याला बाजूला सारून आत शिरावं.
चपला पर्स फेकून खिडकीजवळच्या मऊ गुबगुबीत माऊसारख्या खुर्चीवर धप्पकन बसावं.
आपलं अगडबंब वाढलेलं वजन, परीटघडीच्या ड्रेसला पडणा-या चुन्या, खांद्यावरून डोकावत असलेला किंवा नसलेला चुकार पट्टा कसला कसला विचार मनात येऊ देऊ नये तेव्हा.
"तुझीच आठवण काढली होती मी आज बघ डेविलिणबाई" म्हणत हसत त्यानं ग्लुकोज बिस्किटं आणि पाण्याचा ग्लास पुढे करावा.
खरंतर मनात खुश होत पण वरवर "चल् काहीही खोटं" म्हणत त्याला उडवून लावावं.

कवितामुक्तक

सुखाचं मृगजळ

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जनातलं, मनातलं
27 Jun 2018 - 11:54 am

काही दिवसांपूर्वी एका मित्राची भेट झाली. थोडासा दुःखी वाटत होता. मी विचारलं काय झालं? तर म्हणाला बायकोशी पटत नाही. मी परत विचारलं, अरे हे काय अचानक? तर म्हणाला अचानक वगैरे काही नाही. तसं लग्न झाल्यापासूनच आमचं बऱ्याच गोष्टींवर पटत नाहीये. पण आता जरा त्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे. त्याला म्हटलं अरे एकदा का कळलं ज्या गोष्टींवर पटत नाही की मग त्या गोष्टी उगाळा कशाला? ज्या गोष्टींवर तुमचं पटतं तेच बोलत जा ना तिच्याशी. तर मला म्हणाला ‘अरे तुला काय माहित आमचं कुठल्या गोष्टींवर पटतं ते.

मुक्तकलेख

प्रकाश

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
23 Jun 2018 - 4:14 am

त्या हातांचे मेहंदीभरले तळवे
तळव्यांमध्ये दिवा
दिव्यात तेल
तेलावर वात
वातीचा प्रकाश
अन् प्रकाश थेट चेहर्‍यावर
.
.
.
प्रकाशाचा वेगच अफाट

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२२/०६/२०१८)

प्रेमकाव्यमुक्तक

कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Jun 2018 - 9:58 am

(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी)

कमिटेड टू हूम
कमिटेड टू व्हॉट

पुरोगामी पुरोगामी
कितीसा पुरोगामी आहेस ?

तुझ्यासाठी
आपले कुणीच नाही

तूला तू त्यांचा आहेस असे वाटते
तेही फसवे नसते का ?

आपल्यातल्या आपल्यांचा
होऊ शकला नाहीस

त्यांचाही होऊन रहाणे
खरेच जमेल का तूला ?

आणि तूही कुणाचाच नाहीस
हेच खरे नसते का ?

त्यागी आहेस
हे बरे आहे एका अर्थाने

आपल्या अंगच्या वस्त्रांचाही
त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे
जंगलात जाऊन कायमचा
एकांतवास अनुभवून पहाशील का ?

dive aagareggsgholmiss you!अनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआता मला वाटते भितीकखगकविता माझीकालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीविठ्ठलमुक्तकमराठी पाककृतीव्यक्तिचित्रणगुंतवणूकचित्रपटस्थिरचित्र

गूढ अंधारातील जग -९ पुढे

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
16 Jun 2018 - 11:24 am

गूढ अंधारातील जग -९ पुढे

पाणबुडीतील सैनिकांचे मानसिक प्रश्न

हे सामान्य सैनिकांपेक्षा वेगळे असतात.

मुक्तकप्रकटन