मुक्तक

हतबल

शब्दसखी's picture
शब्दसखी in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 10:53 pm

खरं तर टक्क जागा आहे मी. घरच्यांना वाटतंय की झोपलोय मी अजून, पण जागा आहे मी.
डोक्यावरचा पंखा मंद फिरतोय. तोही सहन नाही होत आहे मला. पण उठून बंद नाही करू शकत मी.
हतबल आहे मी.

खिडकीचा पडदा जरासा उघडा राहिलाय आणि सकाळच्या उन्हाची कोवळी तिरीप नेमकी डोळ्यावर पडतेय.
तो बंद करता आला असता उठून तर किती बरं झालं असतं.... पण नाही जमत आहे मला.
हतबल आहे मी.

लाव जोर आणि उठ, कर पुन्हा एकदा प्रयत्न, जमेल तुला.... असा माझ्या स्वतःच्या मनातून आवाज येतोय..
पण नाहीच जमत आहे.
खरंच हतबल झालोय मी.

मुक्तकप्रकटनलेख

मन्या व्हर्सेस अंबानी..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
6 Jan 2020 - 5:48 pm

आमच्या मन्यानी नवीन वर्षाचा संकल्प वगैरे करणं कधीच सोडलं आहे. वारंवार संकल्प करून तो पूर्ण न करणं, मग त्याची लाज वाटणं,मग स्वतःला दोष देणं आणि ह्यातून हळूहळू निगरगट्ट होण्याकडे झुकणं अन फायनली निगरगट्ट होणं ह्या सगळ्या स्टेजेस मन्याने पार केल्या आहेत. आता त्याच्यासमोर कोणी न्यू इयर रिझोल्युशन वगैरे गोष्टी सुरु केल्या की मन्या मनातल्या मनात हसतो. तरीसुद्धा खूप वर्षांपासून मनात असलेला पण कधीही पूर्णत्वास न गेलेला, सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे लवकर उठण्याचा निर्णय यंदा मन्याने घेतला होता.

मुक्तकलेख

पंखा

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
3 Jan 2020 - 11:34 pm

।। पंखा ।।

एप्रिल- मे मधील दहावीचे सुट्टीतले वर्ग सुरू होते. गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा लागलेले विद्यार्थी , त्या धारांशी रुमालांनी लढत होते. मधेच वहीच्या पुठ्ठ्यांनी वारा घ्यायचा फुका प्रयत्न. आजकालचे पुठ्ठेही तसे तकलादूच. मुलंमुली भिजलेल्या चोळामोळा झालेल्या रुमालाने कसेबसे स्वतःला गोळा करत करत अभ्यासाकडे नेत होते. एरवी तसाही गणिताने घाम फुटतोच त्यात उन्हाळ्याच्या नवीन समीकरणांची भर पडली होती!

मुक्तकसाहित्यिकजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवविरंगुळा

कविता: शब्द

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
26 Dec 2019 - 12:13 pm

शब्दांनी केला शब्दांवर घाव
विसरलो शब्द राहिला नाही ठाव

माणसांनी केला शब्दांचाच खेळ
आता कसा घालू शब्दांना मेळ

अवधानांनेे झाला शब्दांवरच वार
कशी लावू आता शब्दांना धार

अविश्वासाने केला शब्दांचाच घात
शब्दांनी करायची अविश्वासा वर मात

शब्दांनी केला नात्यातच बुद्धिभेद
एकत्र येऊन सारू नात्यातील मनभेद

( flying Kiss )कविता माझीरौद्ररसकवितामुक्तकशब्दक्रीडा

उरलो आता भिंतीवरल्या ...  

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
25 Nov 2019 - 5:11 am

तुका म्हणाला 
उरलो आता 
उपकारापुरता ... 

मी म्हणालो
उरलो आता 
भिंतीवरल्या
फोटोपुरता.

नुरली शक्ती
विरली काया 
शिथिली गात्रे 
आटली माया ...

उरलो आता 
भिंतीवरल्या
फोटोपुरता.

खपलो झिजलो 
कोड चोचले 
देहाचे पुरवाया ...

उरलो आता 
भिंतीवरल्या
फोटोपुरता.

वाटले -
जिंकेन जग. 
लोळेन - 
सुखात मग. 
धडपडलो - कडमडलो 
नको तिथे अन गेलो वाया ...

उरलो आता 
भिंतीवरल्या
फोटोपुरता.  

कालगंगाकैच्याकैकविताप्रेरणात्मकभावकवितामनमेघमाझी कवितामुक्त कविताअद्भुतरससंस्कृतीकलाकविताप्रेमकाव्यमुक्तकजीवनमानव्यक्तिचित्रणरेखाटन

मुंबईचे धडे - ४

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
18 Nov 2019 - 4:07 pm

मुंबईचे धडे - ४
मुंबईचे धडे - १ http://misalpav.com/node/43794
मुंबईचे धडे - २ http://misalpav.com/node/43805
मुंबईचे धडे - ३ http://misalpav.com/node/43868

मुक्तकअनुभव

सिक्रेट धंद्याचे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
12 Nov 2019 - 10:16 am

एक बारडान्स गर्ल दुसरीला विचारी
का ग तर्रन्नूम, तु घरी दिसत होती दिवसा दुपारी

गेल्या आठवड्यापासून आता तर ते ही नाही
काही आजारी आहे का? का इतर काही?

"क्या बोलू निलूराणी तुझे, - बोले तर्रन्नूम
आजकल मै हू बडी बिज्जी," - गाली गोड हासून

रात भर सोनेच नै देते लोगां, निस्ती डुटी करती
वहाँ से मै आती और दिन में ओवरटाईम करती

निलू बोले, "मजा है बै तुझी काम मे बिज्जी
माझा तर धंदा नै कै, मी घरातच फसी"

तर्रन्नूमने सांगितले सिक्रेट धंद्याचे
आधी होते तिचे वांधे खायचे

काहीच्या काही कविताकैच्याकैकविताहास्यनृत्यकवितामुक्तकविनोदमौजमजा

मी पुन्हा येईन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 Nov 2019 - 2:06 pm

कच्चा माल

घेतले तू उधार पैसे
आता देत नसशील
करण्यास ते वसूल
मी पुन्हा येईन

जात असले मी माहेरी
करू नका तुमची थेरं
पाहण्या ते सारं
मी पुन्हा येईन

नाही लिहीता येत पेपर
कॉपी जरी करशील
काय ते तपासण्यास
मी पुन्हा येईन

मला न दाखवता
व्हाटस अप मेसेज पाहता
काय ते पाहता ते पाहण्यास
मी पुन्हा येईन

लेख वगैरे लिहीता येथे भारी
पण या कवीतेला
प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या
मी पुन्हा येईन

काहीच्या काही कविताकैच्याकैकविताकवितामुक्तकविडंबनविनोदमौजमजा