जसजसे जगणे सुखासिन होत आहे..
जसजसे जगणे सुखासिन होत आहे
दु:ख अधिकाधीक नमकिन होत आहे
सोसले मी जे,मला ना खंत त्याची
पण पहा दुनिया उदासिन होत आहे
केवढी शहरात आता शिस्त आहे
बोलणे अपराध संगिन होत आहे
घेतला आश्रय जिथे कोठे मिळाला
देवही आता पराधिन होत आहे
तू किती सांभाळ आता तावदाने
ते पहा वादळ दिशाहिन होत आहे
पांढरे काळे प्रतीदिन होत आहे
अन तुझे भवितव्य रंगिन होत आहे
डॉ.सुनील अहिरराव