ते...

सटक's picture
सटक in जनातलं, मनातलं
23 Feb 2016 - 3:14 am

शेवटी तो गावी पोचला होता. बरोब्बर २३ वर्षांनी. त्याच्या मनातला ध्यास आता पूर्णत्वाकडे जाण्याची चिन्हे त्याला स्पष्ट दिसू लागली होती. तेरा वर्षात अफ्रिकेच्या जंगलातून त्याने जी विद्या घासून पुसून आणली तिच्या वापराने त्याचा सूड पूर्ण होणार होता.
लहान चणीचा तो तरूण आपल्याच विचारात हरवून वेशीपर्यंत पोहोचला. त्याच्या लहानपणी चांगली धडधाकट असणारी वेस आता मोडकळीला आली होती. पण अजून होती. वाटेतल्या बर्‍याच गावातल्या वेशींसारखी पार पुसली गेली नव्हती. त्याने शांतपणे जवळच्या थैलीतून राख काढली आणि वेस बांधून घेतली. मग त्या राखेचे दोन फटकारे दोन दिशांना मारून तो तेथून निघाला. अजून बरेच अंतर कापायचे होते. तो आल्याची वर्दी गावात जायच्या आत. दक्षिणेतला भुत्याचा टिळा, उत्तरेतली वाघजाईची गुहा आणि पश्चिमेतली जाईची कोंड अशीच बांधून घेतल्यावर तो गावात प्रवेश करता झाला.

तो पारावर पोहोचला तेव्हा चंद्र हातभर वर आला होता. पारावर चार नेहमीची तोंडे सोडली तर गावात फक्त भांड्यांचे आवाज आणि गायी म्हशींचे हंबरणे ऐकू येत होते. मध्येच कुठेतरी नांगराच्या फाळाची ठोकाठोक. चुलींवर धगधगत्या कालवणांच्या वासांचे अर्थ लावत तो त्याच्या मोडकळीला आलेल्या घरात तसाच बसून राहिला. अन्नपाण्याची शुद्ध आली तेव्हा लक्षात आले की आता त्यालाच काहीतरी करावे लागेल. अकाली कॅप्लाटा झालेल्या त्याला दिमतीला कुणी नसायची सवयचं नव्हती. त्याच्या दिमतीला नेहमीच झाँबी असायचे. आता मात्र तो उठून स्मशानाकडे चालू लागला. तिथे आज कुणीच नव्हते. पण तो पोचता पोचता त्याला एक चुकार कुत्रे दिसले. त्याने झटक्यात त्याच्या पोतडीतून पुन्हा राख काढली आणि त्या कुत्र्यावर टाकली. कुत्रे निमूट बसले...त्याने बाजूनी लाकडे रचून ते भाजेपर्यंत!

दुसर्‍या दिवशी सकाळी तो चावडीवर गेला. रात्री त्याला भेटलेल्यांनी तो आल्याची वर्दी फिरवलेलीच होती. चार वाकड्या तोंडांशिवाय त्याला काही पहायला मिळणारही नव्हते. पण तिथे त्याने सांगितले की तो आजपासून माळावर जाऊन रहाणार आहे. येवढे गावात सांगणे त्याला बास होते.
भर दुपारी तो माळावर पोचला तेव्हा ऊन चांगले तापले होते. पायातल्या सावलीकडे क्षणभर बघत त्याने माळाच्या मधोमध खड्डा खणायला सुरुवात केली. ३ फूट खडडा खणून झाल्यावर तो तिथे जाऊन बसला. मग त्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली..

पक्षी अचानक किंचाळून उडाले. टिटव्यांनी ओरडायला सुरुवात केली. दूर..जंगलात भर दुपारी कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. माकडे बुभु:कार करू लागली. पडलेल्या वार्‍याने अचानक जोर धरला. येवढा की त्या वार्‍याच्या आवाजात सगळे बुडून गेले. आणि अचानक, एक क्षण तिथे सगळीकडे भयाण शांतता पसरली...क्षणभरच..आसमंत सगळा अंधारून आला..गवताची पाती तशीच लवलेली थांबली होती..पाण्यावरच्या लहरीसुद्धा...

ते आलं होतं..........

त्यानी बोलावल्याप्रमाणे. आदिम, प्राचीन! आपल्या मितीतलं नसलेलं. त्याच्या हाकेला ओ देऊन स्वतःची आणि त्याची रक्ताची तहान भागवायला. पहिला बळी नेहमी बोलावणार्‍याचा अशी रीत असणार्‍या त्या विखारी अस्तित्वापासून स्वतःचे संरक्षण करायचे म्हणूनच त्याने स्वतःचे स्थान सुरक्षित करून घेतले होते. रोंरावत, घोंघावत तो हिडीस आकार सगळ्या गावकुसाला धडका देऊन आला. पण सर्व दिशा त्याने आधीच बांधून ठेवल्या होत्या. आता ते त्याच्यासमोर उभं राहिलं...त्याच्या आदेशाची वाट बघत! त्याने शांतपणे त्याच्या स्वतःच्या रक्ताची वाटी समोर केली..एक कानाच्या पडद्यांवर ओरखडे आणणारा मिटक्या मारण्याचा आवाज करून ते त्या वाटीवर झेपावलं.
त्याच्या मंत्रचक्षूंना जरी ते दिसत असलं तरी तो सतत काही त्या स्थितीत राहू शकत नव्हता. त्याने त्याला पहिली आज्ञा केली...रूप घे!
त्याच्यासमोर एक मत्त गवा उभा राहिला..पण तो गवा साधा नव्हता! त्याच्या आकारात सतत बदलणारे असे काहीतरी होते..त्याच्या सीमा जणू प्रकाश शोषणार्‍या अंधाराने बनल्या होत्या. हे बघूनच कळत होते की हा आकार फसवा आहे. नजर ठरू न देणारा आहे. धडकी भरवणारा आहे.
ठीक! असे त्याने म्हणताक्षणी त्या माळरानावर अचानक एक आगीचा डोंब उसळला. सर्व दिशा थोड्याश्या अंधारल्या. गावातल्या देवळाचा पहिला पायरीचा दगड तडकला!
सगळे शांत झाले तरी वादळात सापडल्या प्रमाणे आसमंत धुमसायला लागले. अचानक त्याच्या लहान, पण काळजाचे पाणी पाणी करणार्‍या हास्याची एक किनरी लकेर उमटली! तो जिंकला होता. आता त्याला कुणीच थांबवू शकणार नव्हते! नरांजोच्या तावडीतून कुणीचं सुटत नसे!

ध्यानात मग्न असलेल्या परशुरामशास्त्र्यांचे डोळे खाडकन उघडले.. ते घामाघूम झाले होते! कपाळावरची शीर ताड ताड उडत होती! अंग घामाने डंवरून आले होते..येणारा काळ बरेच अमंगळ घेऊन येणार आहे ह्या जाणिवेने ते अस्वस्थ झाले होते..

क्रमशः

हे ठिकाण

प्रतिक्रिया

विद्यार्थी's picture

23 Feb 2016 - 4:13 am | विद्यार्थी

मस्त, पुढचे लवकर लवकर लिहा :-)

मस्त वातावरण निर्मिती। लवकर टाका पुढचा भाग

उगा काहितरीच's picture

23 Feb 2016 - 2:34 pm | उगा काहितरीच

काहितरी भन्नाट वाचायला मिळणार तर ! सुरूवात तर अगदीच झकास झालीए. आता पुभाप्र ... काही प्रश्न ... १)सर्व भाग आधी लिहून झालेत की लिहायचेत ? २) अंदाजे किती भागाची मालिका असणार आहे ? ३) याआधी कुठे प्रकाशीत झाली आहे का ?

प्राची अश्विनी's picture

23 Feb 2016 - 2:39 pm | प्राची अश्विनी

आवडले. पुढला भाग लवकर लिहा.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Feb 2016 - 2:44 pm | अत्रुप्त आत्मा

पांडू कथा

उत्तरार्ध!

सुरुवात जबराट झाल्याली आहे .
लवकर टाका पुढचे भाग आता

एस's picture

23 Feb 2016 - 3:11 pm | एस

पुभाप्र.

राजाभाउ's picture

23 Feb 2016 - 4:41 pm | राजाभाउ

जबराट . सुष्ट आणि दुष्ट शक्तिंचे प्रतिनिधी आलेले आहेत. होउन जाउद्यात

सर्वांचे प्रतिसादांबद्दल आभार!
उगा काहीतरीच..
भाग आधी लिहिलेले नाहीत. आराखडे तयार आहेत. आत्ता ४ भाग डोक्यात आहेत. पूर्वप्रकाशित नाही. खरे तर दीर्घकथा लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. आपण सगळे सांभाळून घ्याल अशी आशा आहे.

उगा काहितरीच's picture

23 Feb 2016 - 8:47 pm | उगा काहितरीच

धन्यवाद ! आणी शुभेच्छा !

विजय पुरोहित's picture

23 Feb 2016 - 8:51 pm | विजय पुरोहित

खतरनाक!!!!!
लिहा हो लिहा पुढचा भाग!!!!

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2016 - 9:49 pm | टवाळ कार्टा

स्पाचा नवीन अवतार का?? स्पालापण त्याचे "ते" पूर्ण करायला लावा कोणीतरी

बोका-ए-आझम's picture

23 Feb 2016 - 9:54 pm | बोका-ए-आझम

छान वातावरण निर्मिती!

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Feb 2016 - 9:58 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

मुक्त विहारि's picture

23 Feb 2016 - 9:58 pm | मुक्त विहारि

रोचक सुरुवात

आनंद कांबीकर's picture

23 Feb 2016 - 11:21 pm | आनंद कांबीकर

आवडले.
पुढचे भाग लवकर टाका.

दिपुडी's picture

24 Feb 2016 - 11:31 am | दिपुडी

खुपच छान

नाखु's picture

24 Feb 2016 - 11:45 am | नाखु

सुरुवात .. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

सरकट्लेल्या धाग्यांपेक्षा सटक कथा वाच्नोत्सुक नाखु

पैसा's picture

24 Feb 2016 - 1:25 pm | पैसा

कथा आवडली. लिहा पटापट!

मीनादि's picture

25 Feb 2016 - 3:38 pm | मीनादि

मस्त वातावरण निर्मिती।

सस्नेह's picture

1 Mar 2016 - 10:17 pm | सस्नेह

जबराट !