जमीयत उलेमा मुफ्ती महंमद यांचा साक्षात्कार
कालचा १९ फेब्रुवारी २०१५ दिवस म्हणजे जगाच्या इतिहासातला " वेगळा दिवस " असे लिहायला हवे.
जमीयत उलेमा मुफ्ती महंमद यांनी सर्व मुस्लीम ही शंकराची लेकरे आहेत तसेच शंकर हे मुस्लीमांचे पहिले प्रोफेट आहेत अश्या आशयाचे भाष्य जाहिर रित्या दुरदर्शनवर केले.
वाक्यातल्या शब्दावर काथ्याकुट करायला हरकत नाही पण असा साक्षात्कार एखाद्या उलेमाला होणे हे एक आश्चर्य मानावे लागेल. उत्तर प्रदेशात "बिंदुमाधव मशीद " अश्या नावाचे अनेक चमत्कार आजही सरकारी कागदपत्रात दिसतात. १९४७ सालची स्थिती कायम ठेवण्याचा कायदा कै नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मंजुर झाल्यामुळे यावर अधिक भाष्य नको.