मागिल भाग..
आणि त्याची सुरवात ह्या आजच्या दिवसापासून केली पाहिजे. फक्त आजच्या दिवसापासून..कारण तोच आज ठामपणे आपल्या हातात आहे!
पुढे चालू...
===============================
तेंव्हा हिला हिच्या आईकडे सोडून आलो..तो आलो खरा. पण इकडे आल्यानंतर कामात अज्जिबात म्हणजे अज्जिबात लक्ष लागे ना. शिवाय त्यांच्याकडे असलेला तो टेलिफोन म्हणजे ..ते मॉडेल जितकं जुनं होतं..त्याहुनहि तिथे मिळणारी फोनसेवा जुनाट दर्जाची होती. त्यात त्यांचं त्या वस्तीवजा लहान गावातलं फोन असणारं एकमेव घर म्हणजे एक प्रकारचा टेलिफोन बुथच झालेलं. त्यामुळे मला केंव्हाही बोलायला मिळणे हाच प्रकार दुरापास्त. शिवाय तेंव्हा मोबॉइल फोन (आणि त्याची अचाट बिलं..)हा प्रकार इकडे पुण्यात नविनच आलेला होता. तेंव्हा..मग तिकडे तर तसलं काही असण्याचा प्रश्नच नाही! मग मी काकाला फोन करायचो. आणि मला मधून मधून माफक हालहवाल कळायची. त्यांत हिनी मला फोन करण्याचे दिव्य करावे..तर त्यांचे घरुन तिला 'अश्या दिवसात' कुठ्ठेही बाहेर बोलायला,फिरायला बंदी..(हो!!!...आहे आमचं तिकडचं घर तसं! काय करणार? :-/ ) त्यामुळे या जास्तीत जास्त सार्वत्रिक संपर्कबंदीमुळे माझी पक्की नाकाबंदी! नशिब एकेकाचं दुसरं काय?
कसे बसे दिवस कंठी,वाट पहाता उत्तराची
जाहली सुरु ही जीवनी,वेळं बाप होण्याची
अश्या आशयाची काहितरी कवने मनात दररोज येऊ लागली. मित्रमंडळीं कडून भावी जीवनातील ह्या वाटचालीसाठी सल्ले,शुभेच्छा- सुरु जाहले. किश्याही मधून मधून फोन करुन छळू लागला. ( :-/ ) सुर्यानी तर हलकटानी "प्रथमच बाप होतो आहेस.(?) तेंव्हा भरभरून शुभेच्छा " असा संदेश खिलवलेलं भेटकार्ड देखिल पाठवलं. मला साली रोज मनात हिची चिंता,आणि धंद्यामुळे दर आठवड्याला तिकडे चक्कर टाकता येत नाही याचं दु:ख्ख! :( आणि ह्या टवाळांना छळ सुचत होता. शेवटी कसेबसे ते काहि महिने गेले. गणित चक्क काहि दिवसांवर आलं.मला मनात परिक्षेचा शेवटचा पेपर टाकतो आहे ..अश्या भावना दाटु लागल्या..आणि एक दिवस काकाचा रिझल्टचा फोन आला.
काका:-"आत्म्या... ये हो ये..इकडे लवकर निघून ये!"
मी:-"अरे पण आधी सांग ना काय ते"
काका:-" नाही..नाही.. तू लवकरात लवकर ये.. "
मी:-"काका...प्लीज..आज अजिब्बात चेष्टा करु नकोस कसलिही! सांग लवकर काय ते अत्ताच..नाहितर मी येणार नाही"
काका:-"तसं काहिही नाहिये रे..पण तुला नुसतं फोनवर सांगायला नको वाटतय..ह्या अश्या बातमीचं..म्हणून म्हटलं लवकर ये निघुन!"
मी:-(प्रचंड कावरा बावरा झालो..आणि..) "अश्या म्हणजे कश्या??? वैजू बरी आहे ना? काका लवकर सांग...मी फोन ठेऊन द्यायच्या आत!"
काका:-" हम्म्म्म्म...आता काळजी दिसली तुझी. आता सांगतो. बघत होतो जरा च्येक करुन..तुझ्यातला उतावळेपणा संपलाय की तसाच आहे ते..पण त्याची जागा काळजी नी घेतल्ये ना आता.मग ठिक आहे.सांगतो आता. ...................."
मी:-" काका..हात जोडून सांगतो. सहनशक्ति संपली रे माझी! आता सांग नाहीतर खरच फोन ठेऊन दिला जाइल माझ्याकडून."
काका:-" ह्हा ह्हा ह्हा! ..बघ बघ आहे अजुन थोडा उतावळेपणा.. "
मी:-"..............................................."
काका:-" बरं.........चिडू नको रे मुला. मी चेष्टा केली हां अत्ता मात्र.
आता येताना पेढे आणि बर्फी असं दोन्ही घेऊन ये!"
मी:-" म्हणजे????????????"
काका:-" अरे गाढवा... ज्याकपॉट लागला हो तुला. एकावर एक फ्री!!!"
मी:-"क्का..................................य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य???"
काका:-" अजुनही कळलं नाही नीटसं तुला. अरे........जुळं झालय. एक गणपती आणि दुसरी सरस्वती!"
मी:-" .................. :D ......................."
काका:-"ह्या ह्या ह्या... आता कसा गप्प बसलास? पण काय रे...ही पुण्यात आल्यापासून काय आधी कसब्या गणपतीला आणि नंतर जोगेश्वरीला,असे जायचात की काय तुम्ही दर्शनाला?"
मी:-" .................... :D .................. :D .............. :D ............. "
काका:-" ह्हा ह्हा ह्हा ह्हा!!!... अं........अं,आता कश्या आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या...अं!!!!!!"
मी:-" ............ "
काका:-"बघ बघ ..बोलता सुद्धा येत नाहिये तुला. खुळ्या मुला. "
मी:- "असू दे!!! :-/ वैजू कशी आहे ...सांग ना आता लवकर"
काका:-" कशी????????? चिडल्ये भरपूर!'"
मी:-"का ते?"
काका:-"ह्याच्याच..ह्याच्याच मुळे.... ती म्हणते ते खरं आहे.काहिही ओळखता येत नाही तुला.दगड आहेस नुसता!"
मी:-"............. :( :( :( ............. "
काका:-" अरे गाढवा..आठवड्यापूर्वी झाला होता ना तुमचा फोन..तेंव्हा काय काय बोल्लावतास? मी का याद देऊ तुला आता!???"
मी:-" हो रे....! पण इकडे मला आमच्या एका कामात गेलेल्या नाहक वेळानी, त्या दिवसातली रात्रीची लाश्ट येश्टी चुकवली. मग म्हटलं आता पर्वा जाऊच काहीही करुन.तर अत्ता तुझा फोन आला. आता अत्ता निघणार आहेच."
काका:-"हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म....... ते मला सांगायला सगळं ठीक आहे. पण तिकडे गेल्यावर हे काहिही सांगू नकोस! बायको नामक प्रकरणाला हे असले धडे जोडावयाचे नसतात.नायतर उत्तरं बरोबर असली,तरी फे....ल व्हायची पाळी येते नवरोबांवर!."
मी:-" आयला..........मग आता मी काय करु?"
काका:-" ए.......काय रे पुणेरी झालेल्या भामट्या.. 'आयला' काय हे!?..बराच रंग लागलाय की तुला तिकडचा. आता काहिही करु नकोस..आणि महत्वाचं म्हणजे डायरेक तिकडे जा."
मी:-" जाणारच आहे तिकडेच..आधीच!"
काका:" हो...हो..कळ्ळं कळ्ळं!.. :D तर डायरेक तिकडे जा.आणि होइल तो मारा निमूट सहन कर. म्हणजे काहितरी आंम्हाला बघायला रहाशील शिल्लक तू!!!.. :D "
मी:-" इतकी चिडल्ये का रे! मग येश्टीतून दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचतच जातो. ( :D ) "
काका:- "अस्सं काय? ह्हा ह्हा!!! बघू हो यावेळी ..त्या देवी कडून ही देवी वाचवते का तुला ते. आणि हो....पेढे बर्फी दोन्ही आण बरं का येताना.कदाचित तोच नैवेद्य वाचवेल तुला तिच्या कोपापासून! ..... ह्या ह्या ह्या ..... चल. शुभेच्छा तुला. मग तिकडनं तीन चार दिवसानी ये इकडे!"
मी:- "ह्हो!!!"
..........................................................................................
मी फोन ठेवला..आणि निघण्याची तयारी करु लागलो खरा..पण माझं मन मात्र माझ्या आधीच तिकडे जाऊन पोहोचलं होतं. आणि एक आनंदी चित्र पहायला लागलेलं होतं...त्यात हिच्या चिडण्याच्या घटनांहि होत्याच होत्या. पण त्याहीपेक्षा...'माझ्या ह्या दोन पिल्लांच्या जोडीचं मी कौतुक करतोय.. काकू तिथे आलेली आहे.. गुरुजीपण येऊन पोहोचलेले आहेत..आमचं सगळं घर आनंदानी भरून गेलेलं आहे. आईला तर ह्या जोडगोळीसाठी काय करु आणि नको होतं आहे. आज्जी मला पहिल्याच ठेपेत दोन मुलांचा बाप झालो. म्हणून भरपूर म्हणजे भरपूर चिडवते आहे. त्यात काकूही सहभागी झालेली आहे. आणि काका आनंदाश्रू डोळ्यात आत ठेऊन हे सगळं बघतो आहे... हे चित्र दिसायला लागलं. मग मात्र त्या दोन खोल्यांमधे माझा अज्जिब्बात म्हणजे अज्जिब्बात पाय ठरेना! पण ह्या अवस्थेला काकाच्या एका संजीवन मंत्रानी मला लग्गेच जागेवर आणलं. "सुखाची स्वप्न पहात बसण्यापेक्षा,ते प्रत्यक्ष जाऊन मिळवावं रे... स्वप्नाळू आत्म्या........" आणि माझं योग्य जागी असलं,तरी बर्यापैकी हवेत उडणारं विमान भुईला आलं
तसा या बातमीनी मी जरा जास्तच आनंदून तर गेलेलो होतो. पण आता यापुढच्या आयुष्यात हे एकावेळी दोन मुलांचं कसं काय जमणार सगळं आपल्याला??? याच्याच जास्त विचारात पडलो. हो.. तसलाच स्वभाव आमचा. मी काहि किश्या सारखा बिनधास्त प्राणी नाही. किश्या तर एकदा गमतीत म्हणाला पण होता मला..
किश्या:-"काय रे आत्म्या ? ह्या जुन्या धर्मशास्त्राचा दोन बायका करायचा नियम आजही जिवंत असता,तर तू केल्या असत्यास का? मी तर आनंदानी तयार झालो असतो! तसं तर आपल्याला घर ,पैसा काहिच कमी नाही!"
मी:-" किश्या.........गाढवा काय बोलतोयस काहि कळतय का तरी तुला? घर आणि पैसा तयार आहे,पण मनाचं काय तुझ्या??? ते कसं तयार करशील?????"
किश्या:-" हे महान तत्वज्ञा..चिडू नकोस! यास आम्हा सामान्य मनुष्यगणात चेष्टा असे म्हणतात. ह्या ह्या ह्या ह्या ह्या!"
मी:-" अरे हलकटा..तरी काय झालं? मला तर बायका सोड ..पोरं सुद्धा दोन नको वाटतात"
किश्या:-"अस्सं काय? मग हे घे.. मी तुला वरदान देतो. तुला पहिल्याच मुलावर थांबण्याची सुबुद्धी होइल. !!!!"
मी:-"अचरट माणसा..,मग मी काय पहिल्या अपत्यानंतर परत परत प्रयत्नात रहाणार..असं तुझ्यासारखं वाटलं की काय तुला???"
किश्या:- "ह्या ह्या ह्या ह्या!!! बघु हां..बघु आपण तेंव्हा! शिवाय तुझ्यासारखं मला,आणि माझ्यासारखं तुला.. काहिच वाटायचं नाही कधी! मग त्यातून काहि प्राप्त होण्याचा तर प्रश्नच नाही!..नाहि का?"
मी:-" हे श्रीयुत कृष्ण भगवंता..तुझीया मनाच्या अपार लीला ..मज पामराला खरच कळणार नाहीत. तेंव्हा तुझ्याच मनात असेल ते मज भक्तास लाभो.. असा उलट आशिर्वादा सारखा वर ,अता मी तुला देतो. पण मज भक्तावर कोपू नकोस!"
किश्या:-" ह्या ह्या ह्या!!! ... तथास्तू.............!"
...........................
हा सगळा संवाद मला बॅग भरता भरता आठवला. आणि मग मनात म्हटलं, 'शेवटी त्या गंधर्वाचीच सरशी झाली. वचन माझं खरं ठरलेलं असलं,तरी परिणाम त्यानी वर्तवलेला खरा ठरला.' आणि माझ्या काकूच्या, "ह्या किश्याच्या वाणीत ना... मेलं गहिरं सत्य असतं हो कधी कधी......!" ह्या वाक्याची आठवण झाली. ह्याच विचारात ती बॅगंही भरून झाली.आणि मी खोलिला टाळं लाऊन बाहेरंही आलो. मग जाण्याआधी आमच्या घरमालकिण बाईंना ही बातमी जाऊन सांगितली. त्या माऊलीला तर अगदी अत्यंतिक आनंद झाला. आणि चहा झाल्यावर मला निघताना.. तिनी, "तिकडे गेलात की फोन करा हो न विसरता. मला माझ्या मुलिशी बोलायचय..!" असं अतिशय जिव्हाळ्यानी म्हणाली. मी मनातून प्रथम ह्या दोघिंच्या नात्याला नमस्कार केला. आणि त्यांनाही नमस्कार करून..
गावाची वाट धरली..........
=======================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९.. ४०.. ४१ .. (खेडेगावातील नाटक..) ४२.. ४३.. ४४.. ४५..
प्रतिक्रिया
21 May 2015 - 1:57 pm | प्रचेतस
21 May 2015 - 2:16 pm | अत्रुप्त आत्मा
21 May 2015 - 3:15 pm | सतिश गावडे
यावरुन शिंदे बंधूंचं एक गाणं आठवलं:
तुझ्या ओल्या वाफ्यामदी, बीज लागलंय अंकूर धरु
वरुन पाखरं नी खालून बकरं दिवसा लागल्यात फिरू
21 May 2015 - 3:23 pm | प्रचेतस
=))
21 May 2015 - 3:54 pm | प्रसाद गोडबोले
बकरं म्हणजे काय ??
22 May 2015 - 8:17 am | खटपट्या
बकरं = बकरा (मराठीत)
22 May 2015 - 4:16 pm | प्रसाद गोडबोले
पण बकरं खालुन फिरु लागले आहे ह्याचा अर्थ लागला नाही
22 May 2015 - 5:24 pm | खटपट्या
तो अर्थ माणणीय स.गा. सांगतील.
21 May 2015 - 2:15 pm | नाखु
एक झाला रंगी रंगला श्री रंग!
स्माईलींच स्माईली चोहिकडे गेले आत्मुदा कुणीकडे !
21 May 2015 - 2:16 pm | सिरुसेरि
कथानायकाचे अभिनंदन !! काकांचीही कमाल आहे . त्यांचा हेतु चांगला असला तरी त्यांच्या सस्पेन्स ठेवण्यामुळे आत्मारावांना हार्ट अॅटॅक आला नाही किंवा बीपी वाढले नाही हे नशीब .
21 May 2015 - 2:29 pm | सौंदाळा
वाचतोय
21 May 2015 - 2:37 pm | स्पा
जबराट
अभिनंदन (कथानायकाचे )
21 May 2015 - 3:09 pm | सूड
पार्टी हवी आता (कथानायकाकडून)
21 May 2015 - 3:17 pm | स्पा
=))
21 May 2015 - 3:17 pm | सतिश गावडे
पार्टी कशासाठी?
गोड बातमी का? (कथानायकाकडून)
21 May 2015 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा
अरे हलकटांन्नो!!!!!!!!! :-\
21 May 2015 - 5:04 pm | टवाळ कार्टा
जुळी झालीत...डब्बल पार्टी ;)
22 May 2015 - 1:41 pm | पॉइंट ब्लँक
+२ ;)
21 May 2015 - 3:19 pm | गणेशा
४६.... हा आकडा बघुनच धदडी भरली आहे, मला वाटते मी अजुन ३ या भागापर्यंतच आहे.
गुरुजी , राग नसावा.. स्लो वाचत आहे.. पण मन लावुन वाचत आहे...
23 May 2015 - 9:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सत्यनारायणाच्या पुजेनंतर थेट जुळं झालेलं बघुन कोणालाही धडकी भरणारचं की. ;)
21 May 2015 - 3:23 pm | प्रचेतस
सदस्यांनी कथानायकाला चिडवलेले पाहून धागालेखकाला मनातल्या मनात लै गुदगुल्या होत असाव्यात.
21 May 2015 - 3:26 pm | सतिश गावडे
हे कशावरुन म्हणता तुम्ही?
धागालेखक कथानायकामध्ये स्वतःला पाहत असावा असे तुम्हाला वाटते का?
21 May 2015 - 3:31 pm | सूड
तसं वाटत नाही. कारण कथानायक यमकात बोलत नाहीय. शिवाय वाक्येही सलग आणि शब्द भलत्याच ठिकाणी न तोडता बोलतोय.
21 May 2015 - 6:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अत्यंत कौतुकास्पद णिरिक्षण....कसं ज-मतं बाबा तुला एव-ढं सगळं ?
21 May 2015 - 3:33 pm | प्रचेतस
सांगता येत नाही. पण लेखकाचे लिखाण हे त्याचे अपत्य असल्याचे म्हटल्या जाते. तेव्हा आपल्या अपत्याचे कौतुक कोणास अवडणार नाही?
21 May 2015 - 3:38 pm | सतिश गावडे
हो ते आहेच.
कोणत्याही कलाकृतीत त्या कलाकाराच्या अनुभवांचे प्रतिबिंब पडलेले असते.
21 May 2015 - 3:44 pm | स्पा
धागालेखक-कथानायक-धागा लेखकाचे एक बंधू
सगळाच साम्य वाटायला लागलंय
21 May 2015 - 3:47 pm | सतिश गावडे
धागा लेखकाच्या एका बंधूंची तुम्हाला साय सॉरी सय येतेय का?
21 May 2015 - 3:47 pm | प्रसाद गोडबोले
धागा लेखकाचे एक बंधू म्हणजे वडाची साय वाले ना ?
साय वाल्यांना जुळं आहे ? :ऑ
21 May 2015 - 3:50 pm | सतिश गावडे
वडाला साल असते हे माहिती होतं. सायसुद्धा असते हे आज कळलं.
सायवाल्यांना एकच बाळ आहे. जुळं नाही. :)
21 May 2015 - 4:23 pm | नाखु
एक नवीन म्हण माहीती झाली वडाची साल पिंपळाला तशी
एकाची ती सय दुसर्याची ती साय
21 May 2015 - 4:31 pm | अत्रुप्त आत्मा
राम राम परमेश्वरा!!! मी अविवाहित आहे ते कित्ती बरं आहे! :-D
अरे धागा कुठं??? त्याच्या मूळ श्टुरिशि सं बंधित एक तरी प्रतिसाद द्या! ╰_╯
21 May 2015 - 4:42 pm | सूड
१)या वाक्याचा प्रतिसादांशी काय संबंध आहे त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्या.
२) अविवाहित या शब्दाचा सामासिक विग्रह करा.
३)
व्याकरणाच्या मदतीने चालवून दाखवा.
21 May 2015 - 4:46 pm | अजया
कथानायकाच्या घरी घुगर्या वाटल्या गेल्या एकदाच्या!अभिनंदन आणि अभिनंदन(कथानायकाचं)!
21 May 2015 - 4:57 pm | सतिश गावडे
एकदाच्या म्हणजे? बरीच वर्ष (कथानायकाच्या) घरी पाळणा हलत नव्हता का?
21 May 2015 - 5:04 pm | सूड
गावडेकाका, लोकांच्या पाळण्याच्या चवकश्या करायला आपण काही प्रवचनकार नै आहोत. ;)
21 May 2015 - 5:08 pm | सतिश गावडे
(कथानायकाने) घुगर्या वाटल्यावर चर्चा तर होणारच. ;)
21 May 2015 - 5:14 pm | अजया
किती चिंतेत होता,.. कथानायक म्हणून एकदाच्या म्हंटलंय!!
21 May 2015 - 5:15 pm | नीलमोहर
अभिनंदन हो अत्रुप्तजी..
21 May 2015 - 5:20 pm | सतिश गावडे
अभिनंदन कथानायकाचे करा हो. कथा लेखकाचे नव्हे. ;)
21 May 2015 - 6:13 pm | प्रसाद गोडबोले
अहो पण कथानाकयाला अत्रुप्तानेच बाप केले ना (कथेत )!! मग त्यांचेही अभिनंदन होवुन जाऊ दे की ;)
21 May 2015 - 5:20 pm | टवाळ कार्टा
अभिनंदन गुर्जींचे कशाला? कथानायकाचे करा....गुर्जींचे कर्र्तृत्व काय जुळे होण्यात =))
23 May 2015 - 9:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
केलेल्या मेहेनतीचं कौतुक केलचं पाहिजे टका. एवढी छान गोष्ट लिहायची तर खुप मेहेनत करावी लागते.
25 May 2015 - 1:29 pm | सतिश गावडे
काय मेहनत करावी लागते ते आम्हालाही सांगा म्हणजे आम्हीही पाठीला लाडिक चिमटे काढणारी बायको आणि नावात यमक जुळणारी जुळी बाळं असणार्या कथानायकाची कथा लिहू =))
1 Jun 2015 - 7:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=)) गुर्जी उखडलेत सद्ध्या. जरा शांत झाले की सांगतो =))
21 May 2015 - 5:19 pm | सौंदाळा
अरे किती चिडवाल "कथानायकाला" लेखकाला आधी मालिका पुर्ण करु देत नाही तर रुसुन बसेल तो.
21 May 2015 - 5:22 pm | टवाळ कार्टा
आधी वैजूचे रुसणे भाव खावून घेउ दे...मग "कथानायकाचे" रुसणे :)
21 May 2015 - 5:31 pm | रेवती
लेखन आवडले. पण तुम्ही तर अविवाहित आहात, मग हे वर्णन कसं ब्वॉ जमलय?
बादवे, आम्ही खफवर मारलेल्या बाणाचा नेम चुकला व वेगळ्या ठिकाणाहून बारश्याचं आमंत्रण आलेलं बघून डोळे पाणावले.
22 May 2015 - 7:24 am | अत्रुप्त आत्मा
@बादवे, आम्ही खफवर मारलेल्या बाणाचा नेम चुकला व वेगळ्या ठिकाणाहून बारश्याचं आमंत्रण आलेलं बघून डोळे पाणावले.>>> दू दू दू !!! :-\
25 May 2015 - 12:07 pm | सतिश गावडे
तुम्ही रेवतीतैंच्या "पण तुम्ही तर अविवाहित आहात, मग हे वर्णन कसं ब्वॉ जमलय?" या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय असं नम्रपणे तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो.
आता उत्तर द्यावे की हां ही प्रश्न "दु दु दु" करुन टाळावा हां तुमचा प्रश्न.
21 May 2015 - 6:16 pm | बॅटमॅन
काँग्रॅच्युलेशन्स!!!!!!!
21 May 2015 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले
नुसते कान्ग्रतुलेशन्स काय रे देतोस बटुमना ...
नावे सुचवा ना गडे बाळांसाठी !!
21 May 2015 - 6:20 pm | प्रसाद गोडबोले
नुसते कान्ग्रतुलेशन्स काय रे देतोस बटुमना ...
नावे सुचवा ना गडे बाळांसाठी !!
(स्वसंपादित प्रगो)
21 May 2015 - 6:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
"""""""""""कथानायक""""""""" आणि वैजुवहिनींचं हार्दिक हाबिणंदन. एकाच वेळी दोन पाळणे हालल्याबद्दल कथानायकाकडुन डब्बल पार्टी पाहिजे किमानपक्षी लेखकगुर्जींकडुन तरी पार्टी हुकळणेत येईल ह्याची नाखुकाका, अन्या, सगाभौ, सुडुक, टका, वल्ली ई.ई. लोकांनी णोंद घ्यावी.
23 May 2015 - 8:01 am | सस्नेह
हारदीक हबिणंदण !
आणि गुर्जींना पूस्प्गूचसह सुबेच्चा !
23 May 2015 - 8:53 am | प्रचेतस
गुर्जींना का सुबेच्चा म्हणे?
22 May 2015 - 7:13 am | जुइ
अभिनंदन हो कथानायकाचे!!
22 May 2015 - 1:48 pm | यशोधरा
कथानायकाचे डब्बल अभिनंदन!
वर अवांतर प्रतिसाद दिलेल्या सगळ्यांना -मज्जा आली वाचायला! खूप हसले!! :D
22 May 2015 - 1:58 pm | जेपी
हाफशेंच्युरी निमीत्त बाळांचा सत्कार* एक एक जोडी चांदीचे बिंदले देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक-जेपी आणी कार्यकर्ते
*कथानायकाच्या बाळांचा
23 May 2015 - 8:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आमच्याकडुन करदोटे, आणि कानातली सुंकली पण घ्या. बाळांचे कान टोचले की कळवा ;)
25 May 2015 - 1:00 pm | नाखु
पार्टीभिलाषी निरागस नाखु.
श्रेय* =नक्की कथानायकाचे की कथानायकास वडील बनविण्यार्या "बाप" माणसाचे यावर अजून्ही एक्मत झाले नाहीये.
25 May 2015 - 1:32 pm | सतिश गावडे
ऑ?? हे काय आता नविन?
22 May 2015 - 4:03 pm | पैसा
छान चाललय कथाकथन!
23 May 2015 - 12:21 am | कंजूस
मागच्या एका भागात कानपिळी बसल्याने वाचनमात्र होतो परंतू अत्ता पाहतो तर लेखक महाशय अंकुश घेऊनच फिरताहेत.
थट्टा बाजूला ठेवून -संवाद माध्यमातून पात्रे चांगली ठसठशीत वटली आहेत.
23 May 2015 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद हो कंजूसकाका! :)
25 May 2015 - 11:40 am | प्रसाद गोडबोले
कथानायकाची काल्पनिक मुले जन्मास घालताना अजिबात कंजुसी केलेली नाहीये हे सर्व्वांना फार अवडले अहे =))
25 May 2015 - 12:04 pm | सतिश गावडे
कथानायकाची काल्पनिक मुले कशी असतील?
25 May 2015 - 12:13 pm | प्रसाद गोडबोले
फार सुरेख प्रश्न विचारलात सतीशराव
... आता आम्ही आमची कल्पना शक्ती लढवतो ....
>>> अय्या कित्ती गोडं आहेत नै , मुलगी एकदम नायकासारखी दिसत आहे आणि गणपति एकदम वैजु वैनींवर गेला आहे ,
हे पहा हे पहा मुलगी ने लगेच जीभ बाहेर काढुन ल्ल्ल्ल्लूऊऊऊउ केले तुम्हाला =))
1 Jun 2015 - 3:59 pm | प्रसाद गोडबोले
आज हा धागा परत वाचला ! अहाहा काय लिहिले आहे राव :) ~
काहीही म्हणा पण , कथानायकाच्या जुळ्यांनी मिपावर एकदम उत्साहाचे वातावरण आणले , सर्वत्र एकदम आनंदाचा सोहळा असल्यासारखे झाले आहे ह्यातच बुवांच्या लेखणीचे यश सामावले आहे असे आमचे ठाम मत आहे !
बाकी बारश्याच्या घुगर्यांची वाट पहाणार्या अनेक वाचकांपकी एक
- औरंगु
लवकर येवुन्दे हो पुढचा भाग अता
3 Jun 2015 - 2:11 pm | बॅटमॅन
घुगरी हा नक्की काय पदार्थ असतो? नुसते वाचूनच माहितीये याबद्दल.
3 Jun 2015 - 3:06 pm | संदीप डांगे
घुगर्या म्हणजे उकडलेले हरभर्याचे (चण्याचे) दाणे. बॉइल्ड चणा.
अधिक माहिती: वाईनशॉपच्या बाहेर, बारमधे मिळतात तसे. (रामा, शिवा, गोविंदा. कुठला संदर्भ कुठे लावतोय मी?)
3 Jun 2015 - 3:08 pm | बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद!
1 Jun 2015 - 4:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
अभिनंदन हो गुरुजी
पैजारबुवा,
3 Jun 2015 - 11:06 am | प्रमोद देर्देकर
अरेच्च्या आठ दिवस काय नव्हतो तो वर कथानायकास जुळे झाले. गुरुजी अभिन्दन तुमच्या
क था नायकाचे.
( काका:-" अरे गाढवा... ज्याकपॉट लागला हो तुला. एकावर एक फ्री!!!" )
अहो का का असे त्यांना चिडवताय. त्यांच्यासाठी ते सरप्राईज आहे हो.