गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ५१

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
2 Feb 2017 - 5:53 pm

डिस्क्लेमरः- वर्षभरापेक्षा जास्त कालावधी नंतर आज ह्या लेखमालेच्या पुढच्या भागाच्या लेखनाचा मुहुर्त लागला आहे . त्यामुळे अगदी नवीन वाचणार्‍यांना सगळे संदर्भ लागतीलच असे नाही.यासाठी क्षमस्व.परंतू सदर भागापासून या लेखमालेनीही मनातल्या मनात थोडा सांधेबदल केलेला आहे.त्यामुळे हे लेखन मागील संदर्भांशिवायंही सर्ववाचकांना आवडेल अशी आशा धरून पुनः एकवार सुरवात करतो आहे. चुकभूल द्यावी घ्यावी. __/\__

मागिल भाग..
...तर आतून वैजू हसत हसत हतातल्या पोहे परतायच्या झार्‍यासह बाहेर आली आणि दुष्ट्पणानी " आई आत पोहे करते,बाबाचा झाला उभा नंदी!" असा दगड मला हाणून पुन्हा आत पळाली.. आज्जीबाई हसून हसून बेजार व्हायला आल्या होत्या..आणि पोरांना बिचार्‍यांना ह्यातलं काहिच कळत नसल्यामुळे(किती सुखी! नाही का? ) सगळ्यांच्या हास्याचं आणखि हसू येत होतं...

पुढे चालू...
====================

आता आमचं कुटुंब या चाळीवजा वाडा आणि वाड्यावजा चाळीत चांगलं रमलय. हिलाही वाडा आता चांगलाच अंगी लागयला लागलेला आहे. सदू आणि स्वानंदीनी तर काय अवघा वाडाची आमुचे घरं ..अशी अवस्था आणून ठेवलेली आहे. पर्वा मी दुपारचा एक सत्यनारायण टाकून...सॉरी हं..करून (मायला ही पुण्याची भाषा फारच अंगी रमू लागल्ये हां!) घरी आलो तर ही स्वानंदीच्या हातावर छडीचा प्रसाद देत होती. मी माझं पिसवाड खाटेवर टाकून हीला "काय गं मारतेस पोरिला..तीच वय आहे का मार खाण्याचं तरी!" इत्यादी बोलू लागलो..तर म्हणे ," काय उद्योग करून ठेवालय बघा तुमच्या कार्टीनी!" हे बाकी बरं हां बायकांच. उद्योग केलाय म्हटलं..की ती कार्टी,पुन्हा वर "तुमची!"

मी :- काय झालं अता?
ही:-त्या शिंदकर आंण्णांच्या फिशट्यांकला ताश्याची काटकी मारून मारून तडा आणवलन.. बरा फुटला नाही आणि पाणी कमी होऊन निभावलं..नायत त्यांच्या देखत फुटून सगळे मासे मेले असते. त्यांच्या देखत पाठीत धपका घातला हिच्या,तर ते आण्णा मलाच म्हणतात.. 'आहो जाऊ दे, लहान आहे हो पोर.'
मी:- "आता ते नाही चिडले,तर मग तू कशाला चिडतेस?"
ही:- " ह्हो! चिडतेस म्हणजे काय? आज फिशट्यांक वर मारलीन काटकी.उद्या कुणाच्या टीव्हीवर चालवलीन तर???
मी:-" नाही हं..नाही करणार असं काही.." "नै की नै गं माजं श्वांदुळं-मांदुळं-येडयेडं नांदुळं!?" असं म्हणून स्वानंदीला उचलून घेतली आणी प्रकरण मार्गावर आणायला घेतलं.

पण खरच हां. सदूच्या मानानं ही स्वानंदी जरा द्वाडच आहे. सकाळ दुपार म्हणू नका.. संध्याकाळ म्हणू नका..वाड्यात कुणाकडेही अखंड भटकत असते.त्यात वाड्यातल्या मांजरींचं आणी हिचं एक अजब नातं आहे.त्यांना ती कधिही आणी कसंही खेळवत असते. ज्या मांजरी इतरांच्या अंगावर फिस्सकन जातात,त्यांना स्वानंदी आमच्या आलिबागच्या पांढर्‍या कांद्यांच्या वेणीसारखं शेपटाला धरून (त्यांची!) मुंडी पाताळधुंडीत जाईपर्यंत व...............र उचलते. त्याही मेल्या चिडणं/बोचकारणं इत्यादी सोडाच,उलट 'ही आपल्याला योगासनं शिकवायला भगवंतानं धाडलेली शिक्षिका आहे' असं समजून कोऑपरेट करत असतात. हीला लहानपणापासून ह्या मांजरी अश्या काही लाभल्या की हिनी पाहुण्यांनी दिलेल्या बाहुल्या वगैरे खेळायला कधीहि म्हणजे कधीही घेतल्या नाहीत. हिच्या दृष्टिनी मांजरी म्हणजेच बाहुल्या! मग लहान मुलं जे जे उद्योग त्या बाहुल्यांच्या बरोबर करतात,ते स्वानंदी त्या मांजरी बरोबर करित असे. त्यांच्या मिश्या उपट. डोळेच काढायला जा. शेपटीला धरून रिव्हर्स गिअरमधे खेच. काय वाट्टेल ते! पण त्याच बरोबर सकाळच्या दुधातही त्यांना वाटा असे. शिवाय बिस्किटं,पाव इत्यादी प्रातःकालीन आणि चिवडा,पॅटीस,भेळ इत्यादी अखंडदीन चराळ पदार्थात आमच्या वाड्यातल्या अनेक मांजरांची स्वानंदी बरोबर पार्टनरशिप होती. (इथे पार्ट-नारीशिप असे का म्हणू नये बरे!!!? ;) ) एकमेकिला सोडून काहिही खायच्या प्यायच्या नाहीत! पुढे पुढे तर स्वानंदी शाळेत जाताना ड्रेसप व्हायला लागली,की खोलीत शिरलेल्या प्रत्येक मांजराला(अर्थातच ऐ'ची नजर चुकवून!) स्वतःबरोबर पावडर सुद्धा लावायला लागलेली होती. पण एकदा मात्र स्वानंदीनी स्वतःच्या हतातली बांगडी काढून एका मांजरीच्या पुढच्या दोन्ही पायात अडकवली..तेंव्हा मात्र मी ही गडबडलो.आणी ओरडलो तीला. आहो हीचं हे मार्जारं-बांगडीकाम पाहून जर उद्या सदूनी माझ्या दाढी करायच्या ब्रश आणी खोर्‍यानी एकदोन बोक्यांची दाढी करायला घेतली तर!!!? बहिणीच्या पावलावर पाऊल ठेऊन! भलतीच बोंब व्हायची. कारण सदूही काहि कमी नाहिये.

आमच्या ह्याच वाड्यात शेवटाकडल्या सहासात खोल्यांसमोर एक बारकसं आंगण,आणि त्यासमोर जास्वंद,पारीजातक अश्या आठ दहा झाडांची एक बाग आहे. (म्हणजे तयार झालेली आहे!) त्या बागेत प्राचीनकाळी (म्हणजे वाडा जन्मला तेंव्हा!) गणूतात्यांनी (हे एक वाड्यातलं म'हान व्यक्तिमत्व!) शाळेतील हस्तोद्योगकागद-वर्गाप्रमाणे एक छोटीशी शेड तयार करून त्यात मेणबत्त्या, पणत्या तयार करायचा कारखाना काढला होता.आजही तो त्यांच्या तयार केलेल्या पेश्शल हॅपीबर्थेडे मेणबत्यांप्रमाणे कधिही चालू आणी बंद होतो...ते असो! पण तिथे त्यांच्या त्या मेणबत्त्या, पणत्या तयार करण्याच्या वस्तूंची सदू आणी पार्टीनी चोरटी आयात सूरू केलेली होती.( हो ..आयातच! कारण तात्यांना ही कार्टी करतात ते उद्योग कळायचे.पण ते थांबणार नाहीत या त्यांना असलेल्या आत्मप्रत्ययक ग्यारेंटीमुळे,आणी पोरांना त्या ग्यारेंटीच्या असलेल्या तसल्याच खात्रीमुळे त्यांना त्या चोरसाहित्याच्या मो'बदल्यात कुणाच्यातरी संडासच्या खिडकी पत्र्याशी लपवलेल्या विड्या आणून द्यायची.)दुपारच्या वेळी तात्या जरा कलंडले की ही अख्खी टीम तिकडे घुसायची. आणी मग त्यांच्याइथलं मेण पळवणे.पावसाळी पाण्यात होड्या करून सोडण्यासाठी पणत्यांचे साचे पळवणे ,असे उद्योग चालत. एकदा तर सदूनी कुणाचं तरी पाहून कहर केला. ते पांढरेशुभ्र मेणाचे तुकडे पेपरातल्या शिनूमाच्या जाहीरातीवर घासून त्याच्या शालेय्यवही या बालवांङमयीन दस्ताइवजाच्या मागच्या पानात त्या मेणलावत्या बाजू चिकटवून त्याच्यावर पेनशिलनी रबींग करून त्याच्या प्रिंटआउट काढून मला दाखवल्या. (त्यातंही हिरोंपेक्षा हिरोइनी जास्त!...असो..आपलच कार्टं आणी आपलाच पार्टं!) आणि वर मला.........

सदू:- बाबा...बाबा...
मी:-काय?
सदू:-हे बघ..
मी:-काय?
सदू:- आमी ना शिनेमाचा सरकता स्लैडशो तयार केलाय.
मी:- कुठे?
सदू:- हे बघ.
बघतो तर काय... ह्या पोरांनी त्या छापांना कापून पुठ्ठ्यांच्या तुकड्यांवर चिकटवलेलं,आणी त्यातल्या पहिल्या म्हणजे एंट्रीच्या तुकड्याला 'श्टार्ट' (हे शुद्ध बाल-भारती मराठी आहे. =)) ) असं लिहून त्याला वरएक भोक पाडून त्यात एक भक्कम दोरा अडकवलेला..आणी आलटून पालटून वेगवेगळ्या शिनूमांच्या जाहिरातींच्या तुकड्यात झिकझॅक सिक्वेन्सनी दोरा लावला.आणी मग तो गठ्ठा खाली आलेल्या दोर्‍याच्या टोकावर बोट ठेऊन दोरा ओढत वर/खाली सरकत त्या स्लाइड्स कश्या दिसतात..त्याचे प्रात्याक्षिक दाखवले. मी मनात हसलो,पण हैराण देखील जाहलो. आठ/नऊ वर्ष ,म्हणजे मुंजीच्या वयाची कार्टी ही ,आणी हे असलं दिव्य ज्ञान यांना कसं काय घडलं? या विचारात मी पडलो. आणी हिला "अगं तुझं लक्ष असतं की नै काही? हे कार्टं अभ्यासबिभ्यास सोडून हे काय काय करतय पाहतेस की नाही कधी?" असं विचारल्यावर आता मात्र हिनी झटकन सद्याची बाजू घेतलीन. "असू दे! कै वैट तर नैय्ये ना करत त्या ह्यांच्या पोरांसारखा.उलट क्रिएटिवच आहे,ते बघ की. तुला कै कौतुकच नै त्यांचं!" असा मलाच उलट उपदेश केला. मी म्हटलं "अगं आज हे करतायत उद्या अजून दोन वर्षांनी नको तसले फोटो नसत्या मसिकातनं मिळवून त्याचे शो-लावले यांनी तर???" यावर लग्गेच "कै नै हं तसलं कै करणार माझा सदू.तसली वृत्तीही नै त्याची.आणी माझं तेव्हढं लक्ष असतं हं त्याच्यावर" अस बोलून परत मलाच गप्प केलं.

मी ही काही क्षण शांत राहिलो,आणी मनी विचार करू लागलो तो माझीया त्या वयातील उद्योगांचा! अर्थात मी त्या वयात कोकणातल्या एका खेड्यात असलो,तरी तसली पुस्तकं आणी इंग्लिश मासिकं मोठ्या पोरांच्या ग्यांगनी जिथे लपवलेली असायची ,त्या जागा मला कळलेल्या होत्या. एकदोन वेळा अतीकुतुहलानी, 'नक्की काय असतं त्यात?' हे पहायला मी वाडितल्या त्या विविक्षित ठिकाणाहून ती पुस्तकं लंपास करायचा प्रयत्न केलेला होता. पण पहिल्या दुसर्‍या प्रयत्नातच माझी वाडित जायची एकंदर 'चाल' ओळखून सखारामकाकानी मला पक्का धरला होता.फक्त सरळसोटपणे इतर पालकांसारखं मला न मारता बडवता त्याच्या नेहमीच्या काऊंन्सेलिंग श्टाइलनी त्यानी माझं बौद्धिक घेतलं होतं.

मी त्यावेळी भयंकर घाबरलेलो. वेदपाठशाळा एंट्रीच्या आधीचंच वर्ष होतं ते. पायात पोटरीच्या बाजूनी गरम शिरशिरी येऊन मेंदू लाह्यांप्रमाणे फुटायला लागलेला होता.

काका:- आत्म्याsssssss.....
मी:- ....... (पुस्तक शर्टात दडवत घाबरून वाडीतून समुद्राकडे पळायच्या बेतात असताना..)
काका:- हिकडे ये आधी..ये हिकडे.पळू नको.मी काय जीव घेणाराय का तुझा?
मी:- .... (हळूहळू परतत..काकासमीप जाऊन थरथरत उभा!)
काका:- लपवू नकोस.मला म्हयत्ये हो काय आहे आपल्या काखेत. बाहेर काढ ते स्वतःच्या हातानी.
मी:- काका.. नको ना रे... :( :( :(
काका:- का रे मेल्या..का? करताना लाजायला होत नाही ना? मग सांगताना कसं होतं?
मी:- म्हैत नै मला. :(
काका:- अरे गाढवा.. हे वयच असतं असल्या गोष्टी आवडण्याचं. मी काय डायरेक ३०व्या वर्षी जन्म नैय्ये घेतलेला.मला म्हायत्येत ह्या गोष्टी.
मी:- (थोडं भय चेपल्यामुळे..) मंजे तुमच्याही वेळी होती अशी पुस्तकं(???)
काका:- (हसत हसत) अरे गद्ध्या. आमच्यावेळी कसाबसा न्यूजपेपर सोडला तर छापलेलं असं दुसरं काहिही हाताला तरी लागायला होतं का?
मी:-.....
काका:- जौ दे..तुला मुलाला काय ठाऊक असणारे. अरे समोर चित्र आणी कथा नसल्या तरी एकत्र कुटुंबात ज्याला आपल्याकडे 'नको..नको ते दिसणं.' असं म्हणतात ते सगळं घरादारात कधी काळी नजरेस पडे आमच्या.
मी:- (कान टवकारून..) मंजे???
काका:- ते सगळं तुला स्पष्ट मी ही नै सांगू शकणार.पण तुम्ही पोरं ह्या कथाकागदात जे चोरून चोरून वाचता ना.तेच आणी बरेचसे तसेच हो.
मी:- (मी त्यातल्या 'बरेचसे' ह्या शब्दाला नकळत गालात हसलो) .. .
काका:- वीर.हसलात का ते कळ्ळं हो मला.त्यासाठी तुमची ही पुस्तकं आणी त्यातली अतीप्रासंगिक वर्णनं वाचायची गरज नाही मला.
मी:- (लाजून अजून गप्प!)
काका:- अरे आत्म्या.. ह्या सगळ्याला इच्छांन्ना शरीरातल्या नैसर्गिक बदलांची किमया म्हणातात हो. पण त्याला आपल्या ह्या गाढव संस्कृतीनी निष्कारण अपवित्र ठरवून ठेवलन ना..त्यानी ही बोंब झाल्ये सगळी- तेरी भी चूप मेरी भी चूप'ची!
मी:- मंजे?
काका:- अरे असं बघ..मला सांग तुझा जन्म कश्यामुळे झाला?
मी:- ...........
काका:- ह्हां... हेच..! हेच त्या संस्कृतीनी मौन धरायला लावलय ना आपल्याला. त्या सहजसुंदर नैसर्गिक क्रीयेविषयी . त्यातूनच झालाय तुझा जन्म. कळतय तुलाही पण बोलता येत नाहिये. त्याला कारण तुझेमाझे आईबाप. आणी त्यांचेही! जाऊ दे. आता अनेक पिढ्यांच्या चुका मोजत बसण्यापेक्षा मीच ती चूक सुधारतो.तुला ह्याविषयातले..सहज सुंदर ज्ञान देऊन.

मी:-(बावरत..बावरत) मंजे काय सांगणार तु मला आता काका?
काका:- ह्हा..ह्हा..हा..हा... अरे ज्ञान श्रवणोत्सुक युवका . ऐक . मी मगाशी आपल्या संस्कृतीला जी दूषणं दिली ती त्या मधल्या काळातल्या बदलत्या जीवनमूल्यांना दिली असं समजू आपण हवं तर. तुला हे जीवनमूल्य वगैरे काही कळणार नाही अत्ता. पण एकच लक्षात ठेव की हा काळाचा न्याय आहे.आणी आपल्यातच कशाला? आपल्या धर्मातला जो विवाहसंस्कारविधी असतो ना..त्यात देखिल हा दांभिकपणा शिरलेला आहे,इतकी या कामविषयातल्या सांस्कृतिक दंभानी मजल मारलेली आहे. विवाह संस्कारविधींचा संकल्प काय म्हणतो?
मम अस्य पुत्रस्य धर्मप्रजा सिद्ध्यर्थं ब्राम्हविवाहविधिना विवाहसंस्काराख्यं कर्म करिष्ये।
यातील धर्म म्हणजे ती पारंपारिक धर्मरचना सिद्ध रहावी आणी प्रजा सिद्ध व्हावी..म्हणजे त्या धर्मासाठी जगण्याकरता जन्माला यावी..म्हणून मी माझ्या मुला/मुलिचा हा विवाहसंस्कार धर्मातल्या ब्राम्हविवाहविधी पद्धतीनी करतो. हे त्या संकल्पाचं ट्रांन्सलेशन!
मी:- मग यात चुकलं काय? लग्न झाल्यावर मुलं होतातच की.
काका:- अरे होतात ना..पण(फक्त) मुलं व्हावी..या उदात्त हेतूनी माणूस विवाहीत होतो असं समजायचं का? मुलं होणं हा त्या निसर्गानी दिल्या क्रियेचा केवळ परिणाम आहे.
मी:- म्हणजे??????
काका:- मला सांग तू शाळेचे जिने चढतोस ते काय पाय/मांड्या बळकट व्हाव्या या बलवर्धक उद्देशानी चढतोस का?
मी:- मंजे काय? मला नै समजलं नीटसं. हां..पण त्यामुळे पाय/मांड्यांना त्याकारणानी व्यायाम तर घडतोच ना?
काका:- अरे पण तू व्यायाम घडण्यासाठी जिने चढतोस की वरच्या मजल्यावर पोहोचण्यासाठी???
मी:- वरच्या मजल्यावर जाण्यासाठीच.
काका:- होय ना. मग उद्देश काय? वर जाणं हा ना.मग तेच कारण पुढे केलं पाहिजे ना?हे पायबळकटीचं जिभ चावत चावत घुसवलेलं लचांड कशाला मधे?
मी:- (भरपूर हसत) ... कळ्ळं कळ्ळं.
काका:- हां...कळणारच तुला अत्ता झटकन.. ब्याट्री चार्ज आहे ना तुझी अत्ता ... ह्या ह्या ह्या ह्या..
मी:- (पुन्हा भरपूर अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसत..) काका............ आं... असं कशाला बोलतोस रे. =))
काका:- (हसू थांबवत) इतकं उघड बोल्ल्याशिवाय नोटीस नै व्हावयाचं तुझ्यामाझ्या मेंदूत..क्काय???
मी:- हो!!!
काका:- दंभ आहे तो हा. जे नैसर्गिक आहे. शिवाय विवाहासारख्या समाजमान्य सुसांस्कृतिक चौकटीत बसवून स्विकारायची त्यात सोय आहे तेही प्रकट बोलताना आणी आचरतानाही गुंडाळून लपवून आडवून आणी दडवून बोलायचं/आचरायचं . चावटपणानी या कामविषयातले विनोद सांगताना सगळं उघडपणे बोलतो आपण.पण सभ्यपणानी त्यातलं ज्ञानार्जन तर सोडाच..साधी चर्चाही कधी आपण करत नाही. एकिकडे धर्म,अर्थ,कामं,मोक्षं असं धर्मात ,आध्यात्मातंही म्हणायचं पण त्यातल्या कामं..या पुरुषार्थाची ज्ञानार्थानी अखंड उपेक्षा करायची.तो काम- स्विकारला तरी तोही त्यातल्या पुरुषार्थासारखा पुरुषार्थीच स्विकारायचा..ही अजून एक गोची. असे अनंत गोंधळ आपण घालून ठेवलेत त्यात.
मी:- काका..कंटाळा आला रे आता.
काका:- ह्हे ह्हे ह्हे हे..कंटाळणारच हो तू आता.सिरियसली बोलायला लागलो ना आपण त्याविषयी. जाऊ दे .अता ती पुस्तकं होती तिथे ठेव आणी पळ घराकडे.नैतर तुझ्या ऐशिनी पाहिलन तर आपल्या दोघांची वाट लागेल. जा पळ...

मधे गेलेल्या इतक्या वर्षांनंतर हा सगळा संवाद आठवला तो सदूविषयी अचानक आणी काहिश्या निष्कारण आलेल्या त्या शंकेनी.पण तो अत्ताही मला चांगलाच अंतर्मुख करून गेला.आणी लैंगिकशिक्षण वगैरे शब्दही जन्माला न आलेल्या सामाजिक कालावधीत कोकणासारख्या खेड्यात वाढलेला,स्वतःच्या अंतर्मनातून क्रांतिकारकांसारखी उर्जा मिळवून सुशिक्षित झालेला..., माझा खराखुरा काऊंन्सेलर सखाराम काका त्याच्या त्या भारदस्त पण मार्दवपूर्ण आवाजासह क्षणभर माझ्या समोर येऊन माझ्या पाठीवरून हात फिरवत मला आधार देत उभा आहे, असं वाटवून गेला.
================================
क्रमशः ..

संस्कृतीधर्मसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

नवीनच सांधा जोडलेला दिसतो =))

गुर्जींचे अप्रतिम हृदयस्पर्शी संसारवर्णन आवडले.
त्याला दिलेला लेक्चर तडका आवडला नाही.

पैसा's picture

2 Feb 2017 - 6:20 pm | पैसा

पुन्हा लिहायला सुरुवात केलीत हे छान झालं. सांधा बदलला तर काय वाईट नाय. गाडी मुंबैच्या ऐवजी पुण्याला पोचेल. चालू झाली हे महत्त्वाचं!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2017 - 6:37 pm | अत्रुप्त आत्मा

@चालू झाली हे महत्त्वाचं! ››› =)) दुत्त दुत्त! =))

पैसा's picture

2 Feb 2017 - 6:41 pm | पैसा

तुमचा आयडी हॅक झाला काय? अजून एकही स्मायली कशी आली नाही? =)) =))

सूड's picture

2 Feb 2017 - 6:28 pm | सूड

बरंय.

आssssssलं एकदाचं भावविश्व!

छान. पुभाप्र.

व वर अनुस्वार द्या हो.

आदूबाळ's picture

2 Feb 2017 - 6:59 pm | आदूबाळ

ये बात! वेलकम बॅक गुर्जी!

बादवे हल्ली सखारामकाका कुठे असतो?

..आणि पुभाप्र.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2017 - 8:07 pm | अत्रुप्त आत्मा

@बादवे हल्ली सखारामकाका कुठे असतो?››› आहे हो आहे तिकडेच गावात!

टवाळ कार्टा's picture

2 Feb 2017 - 9:12 pm | टवाळ कार्टा

गुर्जी इज ब्याक विथ ब्यांग :)

प्रचेतस's picture

2 Feb 2017 - 9:19 pm | प्रचेतस

सदू, स्वानंदी मोठे व्हायला लागले वाटतं हळूहळू.

गुरुजींच्या आवडत्या विषयाची झलक मध्ये हळूच मिळून जाते.
लेक्चर तडका मात्र जरा कमी करायला हवा होता.

पुढचे भाग येऊ द्यात पटापट. अता थांबायचं नाय शतक झाल्याशिवाय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2017 - 11:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शतक करायला काय धृतराष्ट्र आहेत का कथानायक? =))

प्रचेतस's picture

3 Feb 2017 - 6:36 am | प्रचेतस

=))

ऑ.....दुत्त दुत्त

अगदी शिट्टी फुकत गाडी सुटलीय!!
फासफुस करणारी इंजेनं शोलेतच राहिली.

निमिष ध.'s picture

2 Feb 2017 - 10:03 pm | निमिष ध.

बुवा आले परत !! येल्कम ब्याक !! मस्त जमलाय भाग.

मग उद्देश काय? वर जाणं हा ना.मग तेच कारण पुढे केलं पाहिजे ना?हे पायबळकटीचं जिभ चावत चावत घुसवलेलं लचांड कशाला मधे? हे एक नंबर होतं !!

अजया's picture

2 Feb 2017 - 11:06 pm | अजया

गुर्जी आ ले !
मुंजीला आला की लेक. बराच उशीर केलात !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2017 - 11:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आले कथानायक सहकुटंब आले. येल्कम ब्याक अत्मबंधजी. आतातरी चहात्यांमधे स्थाण द्या ना!!!

वेल्कम ब्याक गुर्जी. अता शतक पाहिजेच.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2017 - 11:24 am | अत्रुप्त आत्मा

@यशोधरा
नवीनच सांधा जोडलेला दिसतो››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-064.gif आं ssss.., दू दू दू!

@अभ्या..
गुर्जींचे अप्रतिम हृदयस्पर्शी संसारवर्णन आवडले.››› धन्यवाद.
त्याला दिलेला लेक्चर तडका आवडला नाही.››› ठीक आहे.

@सूड
बरंय.››› ऒके.

@एस
आssssssलं एकदाचं भावविश्व!
छान. पुभाप्र. ››› धन्यवाद.

@आदूबाळ
ये बात! वेलकम बॅक गुर्जी! ››› थांकू.

@ टवाळ कार्टा
गुर्जी इज ब्याक विथ ब्यांग ››› बँग.. अस्सं क्काय टक्कूमक्कूशोनू ssss
थांब तुला बघतो अता! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif

@ प्रचेतस

गुरुजींच्या आवडत्या विषयाची झलक मध्ये हळूच मिळून जाते.››› अस्स्स्सं!!!
हतोडात्मबंध-फटकाचप्टीआगोबा!
http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/hammer-smash.gif
लेक्चर तडका मात्र जरा कमी करायला हवा होता.›› दखल घेनत आली हाय.

पुढचे भाग येऊ द्यात पटापट. अता थांबायचं नाय शतक झाल्याशिवाय.››› ल्लूल्लूल्लूल्लूल्लू!

@ कॅप्टन जॅक स्पॅरो
शतक करायला काय धृतराष्ट्र आहेत का कथानायक?›› दुष्ष्ष्ष्ट खौट चिमणराव गेंडास्वामी दगडहाणे!
दुत्तचिमण-खुर्चीमारात्मबंध!
http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/chair-to-the-head.gif

आले कथानायक सहकुटंब आले. येल्कम ब्याक अत्मबंधजी. ››› धन्यवाद ची मण राव जी!
आतातरी चहात्यांमधे स्थाण द्या ना!!! ››› ल्लूल्लूल्लूल्लूल्लू!

@कंजूस
अगदी शिट्टी फुकत गाडी सुटलीय!!
फासफुस करणारी इंजेनं शोलेतच राहिली. ››› ह्ही ही ही ही!

@निमिष ध.
बुवा आले परत !! येल्कम ब्याक !! मस्त जमलाय भाग.›› ठांकू फ्रॉम मनापासून.

मग उद्देश काय? वर जाणं हा ना.मग तेच कारण पुढे केलं पाहिजे ना?हे पायबळकटीचं जिभ चावत चावत घुसवलेलं लचांड कशाला मधे? हे एक नंबर होतं !! ›› पुनश्च ठांकू फ्रॉम मनापासून. __/\__

@अजया
गुर्जी आ ले ! ›› आं ssssss. दुष्ट दुष्ट!

मुंजीला आला की लेक. बराच उशीर केलात ! ››› खि खि खी खी!

@ बॅटमॅन
वेल्कम ब्याक गुर्जी. ›› ठांकू खा टूक! ;)
अता शतक पाहिजेच.››› बाप्रे.....!!!
खेळत राहिन चेंडू तटवत फिल्डिंग लागो कशिही.
झालो औट तर फुडची इणिंग, तोपरेंत हसेन ह्ही ही ही!

स्पा's picture

3 Feb 2017 - 2:00 pm | स्पा

वा क्या बात

अभि गुर्जी आणंद से फुले नही समायेंगे रे बाबा!! योउ मदे हिस दय!!

जगप्रवासी's picture

3 Feb 2017 - 4:54 pm | जगप्रवासी

वाह एकदम भारी एंट्री

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2017 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा

@जगप्रवासी
वाह एकदम भारी एंट्री ›› धन्यवाद.

@स्पा
वा क्या बात ››› धन्यवाद रे पांडोबा.

@सूड
अभि गुर्जी आणंद से फुले नही समायेंगे रे बाबा!! योउ मदे हिस दय!! ››› कुजकट जळकट सुडूक,मिपा वरचं कुजकं हडूक!
किकात्मबंध~फुट-बॉलसुडूक
http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/ass-kicking.gif

मुक्त विहारि's picture

3 Dec 2019 - 11:16 pm | मुक्त विहारि

आता पुढचा भाग कधी?