मागिल भाग..
आणि मागुन येऊन मग मला अचानक काकूनीच जागं केलन. "अरे आत्मू..आता जरा ध्यानातून बाहेर ये...आणि तुझ्यासाठी जे ध्यान तिकडे आत डोळे-लावून बसलय ना? त्याच्यासाठीच्या तयारीला लाग..जा .. आवरायला घे त्या शेजारच्या घरात जाऊन... जा!" असं म्हणून तिनी मला संथेतून-पौरोहित्यात आणलन...
पुढे चालू...
============================
वस्तुतः आमची मित्रमंडळी आणि मी स्वतः देखिल,या आदल्या दिवशी वांङनिश्चय वगैरे करण्याच्या विरोधी होतो. कारण किश्याच्या आणि माझ्या(ही) म्हणण्या प्रमाणे, 'हा वांङनिश्चय म्हणजे एकप्रकारे दोन्ही कुळांना सदर विवाह मान्य आहे ना? हे (पुरोहितानी) तपासणे आणि विवाहासंबंधीच्या सामाजिक धार्मिक आचाराची तिथे उभयतांकडून कार्यवाही करवून घेणे' ..यापलिकडे काहिही नव्हते. काका तर तिथे सुरवात होण्याआधीच,गुरुजी आणि सदाशिवदादा देखत सरळ म्हणाला...की, "ह्या वांङनिश्चयाची गरज काय अत्ता? बैठकित ठरले सगळे वाचे'नीच .मग परत कशाला..ही 'वाचादत्ता मया कन्या पुत्रार्थं स्वीकृता त्वया...।..'ची लुटुपुटुची लढाई? . हे सगळे त्या बैठकीतच करावे. उगीच परत तो मंगलंकार्यालयीन दिखाऊ पणा हवा कशाला? घरी लग्नाची देवदेवकं बसविल्यानंतर(म्हणजे शास्त्रानुसार विवाहसंस्कार-सुरु झाल्यानंतर..ज्याची देवक बसविणे,ही सुरवात असते.), परत अत्ता हा विवाहनिश्चितीचा हा तुमचा वांङनिश्चयीन विधी,म्हणजे जेवणात सुरवातीला वरणभातावर लिंबु पिळायचं र्हायलं म्हणून शेवट हात धुतल्यावर,केवळ रीत-पूर्ण करण्यासाठी पुन्हा एक लिंबु तोंडात पिळून घेण्याइतकं खुळे पणाचं आहे..."
काकाचा हा बाँब-असा पडल्यानंतर,सगळी तयारी झालेल्या मांडवात एकदम 'अता काय होणार???' या अत्यंतिक चिंतेचं वातावरण पसरलं. (वास्तविक काकानेही, "केवळ एकमेकास काहि आहेर वगैरे देण्याचे असेल,तर तेव्हढेच आदले दिवशी करायचे आहेत..." असं कलम त्याच्या आणि सदाशिवदादाच्या ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेत टाकलं होतं..पण आमच्या-त्याबाजुची मंडळी या निर्णयावर नाराज होती..म्हणून "हा विधी करवायचाच " असं त्यांनी एक लावून धरलेलं,त्यांचं नियोजन होतं.) मग काहि क्षण त्याच चिंतनीय शांततेत गेले. आणि मग आमच्या गुरुजिंनी काकाला बाजुला नेऊन , "सख्या...तुझी तत्व बरोबर असतात रे नेहमीच!,पण समाजंही त्यासाठी मनानी तयार असेल तर त्याचा आग्रह आपल्याला धरता येतो..आणि मगच उपयोग होतो...क्का....य?" असा मूळ भडकलेल्या अग्निचा, विवेकशास्त्रोक्त उपशमन करणारा प्रतिबाँब टाकुन सदर प्रसंग मार्गी लावला. शेवटी कशीबशी काकाने मान्यता दिली. आणि माझ्या खांद्यावर हात टाकत, "आत्म्या...मी तुझ्यासाठी गुरुजिंना आणवलं,पण ते लाभले मात्र त्यांना!..सालं,राजकारणात मुद्दा मांडायची-वेळ चुकली,तर खेळ समोरच्या पार्टिच्या हतात जातो...हे माझ्या लक्षात आलं नव्हतं!..पण तू लक्षात ठेव हो. कारण तू ज्या दुर्गेला निवडलाय्स..त्यात ही खेळी नेहमी लागणार आहे,हे नक्की!" असा मलाच उलट आशिर्वाद कम-टोमणा मारून तो तेथुन मग चालू कामाच्या नियोजनात-शिरला. आणि हे आणखि कमी की काय..,म्हणून तिथे (भू)मध्य-कोकणातल्या...सॉरी...कोकण(भू)-मध्यातल्या, एका अतिप्र-सिद्ध शहरातून आलेला 'हिचा' मामा, "ह्या: ... गुरुजिंनी मुलाच्या काकाला हरवलनीत एका झटक्यात!मायला.. दोन मिनटात ग्येम फिनिश केलनीत! अव्वल हो अगदी. गाव कोणतं हो मुलाचं?" असा तो ही दगड परत-मलाच मारून निघुन गेला. आणि किश्याही हरामी मेला, "काकचं तेल,आत्मूवर!" म्हणून तो गेल्यावर खदाखदा हसला. ( :-/ ) मी मनात म्हटलं , "बरं झालं हा विधी होतोय ते...नंतर एकदा चौरंगावर मलाच बसलेलं-बघितलन ह्या 'हिच्या' मामानी,की मग बोबडी वळेल मेल्याची!" ...
शेवटी ह्या एकदाच्या सर्व गदारोळा नंतर आमचा तो वांङनिश्चयाचा विधी सदाशिवदादाच्या खणखणीत मंत्रपठणाचा आनंद देत,शिस्तीत पार पडला. त्यातही शहरी भागात पूर्वीपासुनच फेमस झालेलं व्याहिभेट आणि सीमांन्तपूजन- हे अॅडिशन तर त्यातून काकानी बैठकिच्या वेळेलाच सगळ्यांचं अगदी समुपदेशन करून वगळलेलं होतं. त्यामुळे सर्वंकाहि सरळ एक तासात संपलं. आणि प्रांत कोकण असल्यामुळे जो वांङनिश्चय झाला,त्यातंही मान आणि पान हे ही कमीच असल्यामुळे तो ही नाहक वेळ टळला. या सगळ्या झटपट अवराअवरीमुळे काहि परंपरागतं मंडळी जरी नाराज झालेली असली,तरी बाहेर गावाहुन आलेली मंडळी 'अता...लवकर झोपायला मिळणार' , म्हणून सुखावलेली होती. पण "विवाह होण्याचा प्रांत असता को कणं ? तेथे कैचे व्हावे शीघ्र निद्रा-धारण?" , असं म्हणण्यासारखी परिस्थिती आमच्या मित्रमंडळानी आणि हिच्या मैत्रिणमंडळानी आणवली! म्हणजे , जेवताना समोरासमोर बसलेलो आहोत,याचा आंम्हाला चिडविण्यासाठी फायदा घ्यायचा विडा उचलल्या सारखीच मुद्रा करून किश्या आंम्हाला वाढायला आलेला होता. आणि खौटपणानी तिला (सगळ्यांच्या देखत! :-/ ) "दुर्गे....., तुजं संभाव्य पतिस भात वाढू की नुसतीच आमटी?" असे उघड उघड दगड मारत होता. हिच्या मैत्रिणीही काहि कमी नव्हत्या.आणि असणार तरी कश्या त्या? शेवटी हिच्या'च ना त्या..? त्याहि मग किश्याला 'आपण घरी रात्री नक्की काय जेवता? तेच आणि तसेच वाढा' .. असे पलट वार करत होत्या. आणि आंगण्यात चाललेल्या या पंगती-प्रपंचाकडे पाहून गुरुजी ,त्या घराच्या पायरीवर बसल्या बसल्या हसत होते. मी बाकि हिच्या चेहेर्यावरच्या भावना पाहुन...नंतर किश्याचा कुठे तरी ही गणपति करेल्,म्हणून चिंतेला आलो होतो.
शेवटी मित्रमंडळींकडून यथेच्छ चिडवाचिडवी करून झाल्यावर ,आमची ती जेवणे-संपली. आणि मग,आलेल्या नातेवाइकांपैकी कुणी पत्ते खेळायचे फड रमवतोय. कुणी पान तंबाखुत रमलाय. कुणी स्त्रीया आपल्या मुलांना झोपवतायत. तर काहि वयस्क आणि समवयस्क महिलांचे विवाहविधीकार्यकाळात होणारे विशेष संवाद कुठे कुठे ऐकू येतायत,आणि भटजीचं लगीन असल्यामुळे ,काहि खास संवाद ऐकू येतायत,..अश्या वातावरणात तो मांडव-भारला गेला.
त्यातले काहि विशेष आणि खास संवाद...
दल क्रमांकः-१ (वयोगट-४५ ते ५५..)
स्त्री१:- "काय गं? इथे आज इतके पाचपंचवीस भटजी काय गं करतायत?"
स्त्री२:-"अगं करतायत मंजे काय? तुला म्हैती नै? तो ही भटजीच आहे...ज्याच्याशी आपल्या वैजे'चं लग्न आहे...तो!"
स्त्री१:-"अय्या हो...............!??? मला वाटलेलं कोणतरी संस्कृत शिक्षक आहे (म्हणे!) "
स्त्री३:-" पण बरं नै का ते हल्ली!? पश्यापरी पैसा मिळतो,आणि किराणामाल पण निम्म्याहुन जास्त घरी येतो...(आयता!)"
(फुटीर)स्त्री४:-"आयता कसा हो? त्यासाठी लोकांना हवी तेव्हढी दक्षिणा द्यायची तरी सवय लावा कि तुम्ही.. असं वाटणार्या,लोकांनी!"
स्त्री३:-"अस्सं होय...? आपलं पण 'घर' भिक्षुकाचच वाटत?"
स्त्री४:-"भिक्षुकाच कशाला असा(य)ला हवं? नसलं तरी 'एव्हढं-सगळं' कळतच की...लोकांना!"
स्त्री२:-"असू द्या हो..पण मुलगा चांगला आहे....थोडा बुटका(?) असला तरी!"
स्त्री१:-"अगं बुटका कसा? चांगला पाच सव्वापाच फूट उंच आहे की?...मंजे मगाशी पाह्यल,तेंव्हा-वाटलं तरी तसच!"
स्त्री२:-"अगं बुटका म्हणजे तसा नै हो...आपल्या वैजेच्या मानानी बुटका!"
दल क्रमांकः-२ (इथे तिन अज्ज्या होत्या..म्हणून वयोगट:-साठच्या पुढे....!)
१:- "ह्यांच्यात कै देण-घेणं नैय्ये..म्हणतात"
२:"नाय्तं काय? तो मगाशी गर्गाचार्य नै पाहिलास काळी टोपिवाला...त्यानीच हे ठरवलयन (असं!)"
३:-"तो काका ना मुलाचा?..म्हायत्ये! ...पण जरा सुद्धा हौसमौज करु द्यायची नाही..म्हणजे हे लग्न समजायचं की ............ ...........?"
१:-"अहो...अभद्र काय बोलता अश्या कै तरी? काळाप्रमाणे बदलत जातातच सगळ्या पद्धती"
३:-"पण म्हणून इतकी काटछाट? विधी सुद्धा-सगळे केलनीत नै (त्यांनी!)"
१:-"नाय तं काय? ह्याच्यापेक्षा आंम्ही भातुकलीत सुद्धा बर्या वागायचो!"
दल क्रमांकः-३ (वयोगटः-२५ ते ३५..म्हणजे नवंविवाहिता!)
१:-(खांद्यावरच्या बालकाला थोपटत..)"हे विधिंचं कित्ती छान झालं नै...आज? सुटसुटीत एकदम. "
२:-"हो ना...देव करो,आणि त्या मुलासारखा काका,प्रत्येक घरात येवो!"
३:-"ह्ह्ही ह्ही ह्ही ह्ही.....मुला-सारखा नाही गं,मुलाच्या काकासारखा-काका..."
२:-"हो गं! कळतं आंम्हाला सगळ्यांना (तेव्हढं..)"
१:-"ए...भांडू नका गं. मला आपल्या वैजुची गंमत वाटते"
३:-"कसली......??? गं..............????????"
१:-"नै गं...मुलगा भिक्षुक असून, त्याला पसंत केलन..."
२:-"मं...........?,त्यात काय एव्हढं? आपली वैजू श्ट्रेट फॉरवर्ड आहे...म्हणून!"
१:-" ते म्हायत्ये गं...पण आपण तयार झालो असतो का?...मी सुद्धा (अश्याच..) एकाला नाही-म्हणाले होते"
२:-"माझ्या समोर आलं नाही तसं कोणी? नायतर मी ही 'हो'..म्हणाले असते.अगं...भटजी म्हणजे(ही) माणसच"
१:-"मी कुठे म्हटलं, दुसरे कोणी म्हणून..पण अगं...ह्या लोकांना अजुनंही जुनाट रहायची सवय असते,आणि इच्छाही. काहि जणं आयुष्यभर त्या धोतरातच रहातात. ... हे चुक नै का? कंडक्टरनी घरी आल्यावर(तरी..) ती खाकी कापडं काढयला नकोत!???"
३:-" हो ! हवीतच. ती काढायला हवीत्,आणि दुसरी घालायलाही हवीत...!"
१:-" श्शी............! अत्ता चावट बोलायचं काहि नडलय का?...काळवेळंही कळत नाही का हो?"
३:-" मी कुठे चावट बोल्ले? तुलाच ऐकू आलं असेल बहुधा!"
२:-"अगं..पण हल्ली (सुद्धा..) सगळीच भटं काहि तसली जुनाट र्हायलेली नैत. आपण गावात बघतो नै का? माझ्या दादाचा मित्र... तो जोशी...,तो तर टी शर्ट आणि जीन'ची पँट(पण..) घालतो. "
३:-"आमच्या हितला १,संध्याकळी... ते बर्मुडा का फर्मुडा घालुन ... कधी कधी पिऊन ग्गार-पण होतो मेला!...अणि वरनं म्हणतो, 'मी खरा ब्राम्हण आहे...म्हणून सूर्यास्त झाल्याशिवाय स्वतःलाहि अर्घ्य देत नाही'.........,अता बोला?"
१:-"ह्हो!... तुझं मेलं..तसल्यावरच लक्ष..."
२:-"ह्हो...कळलं कळलं...सगळ्यांचं(सगळ्यांना..),चला झोपायला चला...नायतं,भेटलो दोन दिवस,आणि भांडता आली आवस...असं होइल कै तरी...चला...चला...."
......................................................
बाबा तर त्यांना गर्दीमुळे येणार्या थकवेपणामुळे आधीच शेजारच्या एका घरात स्थानंआरक्षण करून झोपावयास निघुन गेलेले होते. आइ,काकू,ही, हिच्या मैत्रिणी आणि हिची आई ...अश्या सगळ्याजणी,एका खोलित..आणखि काहि बायकांना एकत्र जमवून- दागिने,बांगड्या,साड्या,मेहेंदी.., असल्या स्त्रीजातीच्या प्राचीन्,अर्वाचीन्,पुरोगामी अश्या हरेक जमातीतल्या महिलांना आवडणार्या विषयात रममाण झालेल्या होत्या. मग सदर कोला-हलातून, 'आपणाला निजण्यास शांतता लाभणेकरिता किमान रात्रिचे बारा वाजणे निश्चित आहे'....अशी खात्री पटल्यावर्,मी किश्या आणि आमची आलेली सगळी दोस्तकंपनी, त्याच गावातून जरा हिंडून पाय मोकळे करून आलो. आल्यावर पहातो,तर हिच्या त्या घरासह आजुबाजुची आम्हा उतारु-पक्षाची व्यवस्था केलेली सगळी घरं..एकदम कर्फ्यू लागल्यासारखी शांत! हा चमत्कार कैसा जाहला..? असे मनात म्हणत मुख्य घरापाशी आलो,तर तिथे आम्हा सगळ्यांची त्याच आंगण्यात निद्रा-व्यवस्था लावून देण्यात आलेली होती. आणि एका बाजुच्या कोपर्यात काका,गुरुजी,सदाशिवदादा...असे एकत्र बसून काहि तरी निवांत चर्चा करत होते. मग लक्षात आलं,की हा कर्फ्यू काकानी घोषीत केलेल्या कार्यक्रम पत्रिकेच्या भागानुसार होता! पण मग आंम्हीही त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला. आणि सर्व जणं झोपते जाहलो.
मला तर अशिही झोप येत नव्हती. एकतर नवख्या ठिकाणी गेल्यावर निद्रादेवी आमच्यावर बरेचदा रुसते हे एक कारण होतं,आणि त्यात गुरुजिंनी आल्या आल्या दिलेल्या आशिर्वादाचा अन्वयार्थ लावायला माझीया मनात सुरवात झालेली होती. त्यामुळे काहि केल्या झोपेची गाडी मला लवकर मिळत नव्हती. नंतर साधारण अर्ध्या तासात बाकिची सर्वजणं निवांत झोपली..पण माझ्याच दोन जागा पलिकडे झोपलेल्या गुर्जि आणि काकाचे खर्जात चाललेले संवाद मात्र, मला त्या शांत वातावरणात स्पष्ट ऐकायला येऊ लागले....
गुरुजी:-"सख्या...,मगाशी मी तुला जे काहि सांगितलं,ते फक्त प्रसंगावधान म्हणून हो. नायतर मनात धरून बसशील काहितरी."
काका:-"बंडू...मनात धरून बसायला मी आता तो राहिलेलो नाही...पंचवीस वर्षांपूर्वीचा! "
गुरुजी:-"हम्म्म...अजुन लक्षात आहे वाट्टं सगळं?"
काका:-"मग???, ते काय विसरणारं असतं का? पण माझं देखिल धर्मव्यवस्थेवरच्या रागाचं कारण,तुला वाटतं..तसं 'माझी अविवाहितता'..हे नाही"
गुरुजी:-"मग काय आहे? ..आणि अत्ता नसलं,तरी सुरवातीला काहि वर्षं तरी ते होतच! निदान तू ह्या एकंजाती संघटनेचं काम करायला लागेपर्यंत तरी नक्की!!!"
काका:-"हो...मी कुठे अमान्य करताय ते? माझं लग्न ज्या कारणामुळे तुटलं ते असो..पण अंतर्जातीय विवाह, हे आपल्या समाजिक आरोग्याकरता आणि एका चांगल्या मानवतावादी अभिसरणाकरता आवश्यक आहेत, हे तुलाहि आता तरी पटलं ना ? काळाची फळं चाखल्यावर!?"
गुरुजी:-" हो......! पण तुला तर अंतर्जातीय विवाहाकरता ,मी तुझ्या बापाचाही होकार मिळवून दिलावता ना? मग तूच तुझ्या...,- 'अपत्त्यांची जात संमिश्र लावायला हवी!' - या वेड्या हट्टापायी नाही म्हणलास,त्याचं खापर धर्मव्यवस्थेपुढे(च) का फोडतोयस?"
काका:-" हे पहा बंडू...माझं म्हणणं सरळ होतं..मी जर का त्या मुलिला तिच्या कुळातून उचलून आणायची हिंम्मत दाखवित होतो,तर तिच्याही भावकितल्या माझ्या बाजुनी येणार्या सर्वांनी माझं म्हणणं मान्य करायला पाहिजे होतं...'अपत्त्याची जात संमिश्र-लावायला देण्याचं!'... त्याला तेच लोकं नाही म्हणाले,म्हणून मी नाद सोडला. "
गुरुजी:-" तरिही सख्या..,तू गाढवपणा केलास..असच मला आजंही वाटतं!"
काका:-"गाढवपणाच म्हणणार तू...अरे ती मुलगी नाही तर काय मी तिच्याच वाचून अडून बसत नव्हतो. पण एकदा लग्न अंतर्जातीयच करायचं म्हटल्यानंतर सगळीकडे तोच तो प्रश्न यायला लागला... कधी आमची लोकं ऐकेनात्,कधी त्यांची. सगळ्यांचा आपला एकच आग्रह...अपत्यास जात बापाचीच लावायची.. मग आइची काय...ह्यांच्या फो&%$@च्यांच्या... ह्याच्यात घालायची??? आणि जात संमिश्र-लावली नाही,तर अंतर्जातीय विवाहांचे सामाजिक फलित काय???...हे सांग पाहू मला?"
गुरुजी:-" सख्या...,तुझा सात्विक संताप मलाहि कळतो..पण म्हणून स्वतःचं आयुष्य जाळून घेणं..हा काहि त्याचा पर्याय नव्हे."
काका:-"बंडू..........मी माझं आयुष्य जाळून घेतलं,वगैरे काहि तितकंसं खरं नव्हे. मी आपल्या समाजाच्या आणि त्याही पेक्षा सरकारी धोरणाच्या विचित्र पणाला कंटाळलो..एव्हढच खरं आहे. अरे....,लोकं माझ्या अपत्यास माझ्याच जातीचं मानणार्,हे ठीक.पण आपल्या घटना-समतावादी-सरकार दरबारी तरी ,अंतर्जातीय विवाह करणार्यांच्या अपत्याची जात संमिश्र लावण्याची सोय निर्माण करायला हवी कि नको? समतेच्या मार्गातलं...हे केव्हढं मोठ्ठं हत्त्यार आहे!!!? दोघांचं पोरं..आणि जात मात्र एकाचीच..हा कसला निसर्गविरोधी आडाणचोट मक्तेदारपणा??? धर्मव्यवस्था आणि सरकार व्यवस्थेचाही!...लोकांकडेही हरलो,आणि सरकारदरबारिही हरलो...म्हणून मी चिडलो...आणि जी गोष्ट एका अपेक्षित फलप्राप्ती साठीच करायची...,ती मिळत नाही..म्हटल्यावर हा विवाहाचा नाद सोडला!"
गुरुजी:-"सख्या...हाच तो वेडेपणा आहे...तू जे तत्वात मिळत नव्हतं,ते व्यवहारात मिळवू शकला असतास...हे मी तेंव्हाही तुला सांगितलं होतं...आजंही सांगतो आहे. अरे लोकांकडून आणि सरकारकडून..तुला अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला..तर नाही मिळाला,पण तुझ्या अपत्त्यांना तर तू सांगू /शिकवू शकला असतासच ना..,की तुम्हाला कोणिही तुम्ही-कोण???,असं विचारलं..तर उदाहरणार्थः- आंम्ही ब्राम्हणकुणबी,..म्हणजेच ब्राम्हणआणि जि-ती आइची जात..असेल ती!..., असं उत्तर लोकांच्या कानी,त्यांनी आयुष्यभर नसतं का घातलं?"
काका:-" मायला...हे बाकि खरं आहे रे!" :(
गुरुजी:-" आणि लोकांना असं ऐकायची सवय-लागणं,हेच तुझ्यामाझ्या समाजसुधारणेच्या मार्गातलं...पहिलं हत्त्यार नव्हे का? खरी सुधारणा ही नेहमी लोकंसिद्धमतातून चटकन आणि शाश्वत होते,हे तुमच्या सुधारणावाद्यांच्या लक्षात कसं येत नाही? वाईट श्रद्धा मोडायला कायदा-करावा,पण चांगल्या नवंश्रद्धांच्या निर्मितीकरिता लोकमतात हळूहळू रुजेल..असं कृतीशील बीज पेरत रहाणं...हेच हितावह आहे..नव्हे का??? शिवाय,वारंवार ऐकल्या शिवाय खोटच काय?, खरंही पटत नाही लोकांना. म्हणूनच मी म्हणतो ना...पटलं,तरच ते-खरं!!!!....क्का......य!???"
काका:-" होय रे..होय!"
गुरुजी:-"मग खुळ्या माणासा...अजुनंही ज्यांनी कोणत्याही कारणानी अंतर्जातीय विवाह केलेत,त्यांना तुमच्या चळवळीचा वापर करून...हे जे मी म्हणतोय ते पटवून द्यायला सुरवात कर. त्यांच्या मुलांना,कुणी विचारलं-की आईबापाची जात एकत्र सांगायला..लावायची प्रथा निर्माण करं..याला तुमच्या एकजाती संघटनेचं सामाजिक मूल्य बनव. किमान तुमच्या चळवळीत जेव्हढ्यांनी असे विवाह केले आहेत...त्यांना तरी हे करायला लाव. 'त्यांना' तरी अवघड नाही ना हे!? हॅ..हॅ..हॅ..हॅ..!"
काका:-"बंडू.... हळू हस...अरे, आपल्या आजुबाजुला लोकं झोपली आहेत..उठेल कि कुणी दचकून!"
गुरुजी:-" (मंद हसत...) अरे..निद्रेतून-जागं करणे..हेच तर तुमच्या त्या सामाजिक चळवळ्यांचं काम आहे ना..ते आज माझ्याहातुन अत्ता एव्हढं तरी होऊ दे...,म्हणजे आजपासून मि ही आतुन-तुमच्यातलाच!क्का....य?"
काका:-(मंद हास्य करीत..) "बंडू...आज मी हरलो,मला खरच क्षमा कर...!"
गुरुजी:-" बरं बरं...असू दे हो...असू दे. आता उद्या पुतण्याला आशिर्वाद देताना..असच तुझ्यासारखं जागं-कर..,म्हणजे झालं...क्काय????"
=================================
क्रमशः...............
मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल)भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५ भाग- २६ भाग- २७ (यज्ञयाग विशेष!) भाग- २८ भाग- २९ भाग- ३० भाग- ३१ भाग- ३२ भाग- ३३ भाग- ३४ (विवाह विशेष...-१)
प्रतिक्रिया
16 Mar 2015 - 9:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्त _/\_
सवडीने अजुन टंकतो.
16 Mar 2015 - 9:17 pm | सूड
वाचतोय...
16 Mar 2015 - 9:21 pm | रेवती
फार सुरेख लिहिलयत. पहिला अर्धा लेख तर खुसुखुसु हसत पार पाडला, नंतरचा समाधानात!
गुरुजी, आता पुढीलवेळी तो विवाह संपन्न करा बुवा! किंवा वैजयंतीच्या जानवश्यातील प्रसंग लिहिले तरी चालतील.
ते डॉ. खरेही मुलगी बघण्यातले पुढील प्रसंग लिहित नाहीयेत.
मी काय म्हणते, राजकारणात घोटाळा झाला की धागे चटाचटा आणि प्रतिसाद पटापटा येतात पण अशा प्रेमळ लिखाणाला वेळ का लागतो ते कळत नै!
16 Mar 2015 - 9:52 pm | अत्रुप्त आत्मा
@गुरुजी, आता पुढीलवेळी तो विवाह संपन्न करा बुवा!
किंवा वैजयंतीच्या जानवश्यातील प्रसंग लिहिले तरी
चालतील.>> होय .. नक्कीच . पुढच्या भागात हे सगळं येइल आता. :)
@ते डॉ. खरेही मुलगी बघण्यातले पुढील प्रसंग लिहित
नाहीयेत.>> अरे बाप रे! :-D
@मी काय म्हणते, राजकारणात घोटाळा झाला की धागे
चटाचटा आणि प्रतिसाद पटापटा येतात पण अशा
प्रेमळ लिखाणाला वेळ का लागतो ते कळत नै!>>> मलाही!
16 Mar 2015 - 10:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आता वेळ मिळाला.
"""""""कथानायकाच्या"""""" जीवनातले प्रसंग वाचुन आणंद झाला. मस्तं चाल्लय. तुम्ही काढा हो पुस्तक अता. =))
17 Mar 2015 - 10:53 am | अत्रुप्त आत्मा
@ """""""कथानायकाच्या"""""" जीवनातले
प्रसंग वाचुन आणंद झाला.>> अस्सं क्काय .. क्यापू टन! :-D
17 Mar 2015 - 11:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही नीट निरिक्षण केलं असेल तर दर लेखामधे एकेक अवतरण चिन्ह वाढतं चाल्लं आहे =))
17 Mar 2015 - 12:24 pm | अत्रुप्त आत्मा
=))
दूषषषष्ट! :-\
17 Mar 2015 - 3:22 pm | सूड
नशीब शेवटी ट ची पुनरावृत्ती नाही केली, वाईट्ट झालं असतं!! =))))
17 Mar 2015 - 4:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
आ व रा॥
गुर्जी मोड "चालु"
सुडुक खुडुक कोंबडीचं हाडुक
गुर्जी मोड बंद
17 Mar 2015 - 4:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह.घ्या.ओ.
17 Mar 2015 - 4:19 pm | अत्रुप्त आत्मा
@शेवटी ट ची पुनरावृत्ती नाही केली>> थांब हा सुडुका तुला...हलकटा!
==============
बंदुकात्रुप्त-बोंबिलसुडुक-नागात्रुप्त
16 Mar 2015 - 10:15 pm | सिरुसेरि
छान लेख. बाकी , 'भिक्षुक' / 'भिक्षुकी' या शब्दांपेक्षा 'पुरोहित'/ 'पौरोहित्य' असे कालानुरुप उल्लेख होतील तर दुधात साखरच .
16 Mar 2015 - 10:23 pm | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच उत्तम आणि सकस लिखाण.
शिवाय मधे मधे ख़ास बुवा स्टाईल शब्दांची पेरणी असलेने वाचायची खुमारी ती आगळीच.
16 Mar 2015 - 10:25 pm | माहितगार
सध्या कॉपीराईट बद्दल लिहितोय तर तो जाच जरासा येथे सुद्धा, आंतरजातीय विवाह हि संकल्पना किंवा आयडीया आहे. कॉपीराईट आयडीयांवर मिळत नाही. १ ती आयडीया/ संकल्पना मांडण्याच्या तुमच्या मांडणी आणि शैलीवर मिळतो. २) एखाद्या आयडीयाच्या बेसीस वर नवीन प्रॉडक्ट किंवा प्रक्रीया बनवलीतर कॉपीराईट नाही पण पेटंटचा अधिकार रजिस्ट्रेशन करून मिळवता येतो.
बाकी लेख छानसे पुस्तक प्रसिद्ध करु शकाल असा झाला आहे. पुलेशु
16 Mar 2015 - 10:32 pm | माहितगार
तुम्ही कॉपीराईटेड अस लिहिल नाही तरी तुमचा कॉपीराईट चालू होत असतो हे खरयं, पण तरीही तुमच्या लेखांच्या/छायाचित्रांच्या प्रथम प्रसिद्धी सोबत तळटिपेत C हे प्रताधिकारीत असल्याचे सुचीत करणारे चिन्ह टोपण नाव आणि आपल्या प्रथम प्रसिद्धीचे वर्ष (जसे C टोपणनाव अत्रुप्त आत्मा (किंवा खरे नाव) २०१५) नोंदवण्याची सवय प्रताधिकाराचे मालक म्हणून तुम्हाला सोईचे असते तसेच या बाबींची पडताळणी करणारी मंडळी या बाबी सहसा अधिक गांभीर्याने घेतात असा अनुभव आहे.
16 Mar 2015 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा
ओक्के माहितागार... फ़क्त ही चर्चा माझ्या संथेच्या धाग्यावरच आपण करुया ... असे मी आपणास सुचवितो. :)
तो धागा सदर चर्चेच्या दृष्टीने अनुकूल आहे.. हा नाही. :)
16 Mar 2015 - 11:04 pm | माहितगार
होय आपण म्हणता ते बरोबर आहे, कॉपीराईट सगळी कडेच असतो ना आणि आपण तो आपण आवर्जून जपावा (इतर वाचकांनाही सजगता यावी हाही जरासा उद्देश) या सदिच्छेने लिहिले एवढेच.
16 Mar 2015 - 10:34 pm | वगिश
सर्व भाग अतिशय उत्तम आहेतं. मोबाइल वर टंकण्याची सोय झालयाने आज प्रतिसाद देत आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
17 Mar 2015 - 1:20 am | खटपट्या
खूप छान भाग !!
गंगेत घोडं न्हालं एकदाचं !!
17 Mar 2015 - 2:21 am | निमिष ध.
वा वा सुंदर भाग आहे हा सुद्धा. काही म्हणा गुरूजींच्या गुरूजींचे बोलणे आणि गर्भीत उपदेश खूप आवडतात आम्हाला.
17 Mar 2015 - 8:43 am | यशोधरा
वाचतेय. मस्त चाललंय. लिहा पटापटा.
17 Mar 2015 - 3:19 pm | अभिजित - १
हि मालिका जोरदार आहे !!! याच्यावर एक सिरिअल झलि पाहिजे .. तुमि लेखक बना ..
५/१० वर्श चालेल !!