गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३३

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
9 Mar 2015 - 10:55 pm

मागिल भाग..
आणि मी मात्र रात्रिची जेवणं झाल्यानंतर..झोपताना काहि क्षण पुन्हा त्या देवळातल्या प्रसंगाच्या शेवटाला गेलो.
मला भेटलेला देव नक्की कोण???..............असुरेश्वर? की तो धनगर???
पुढे चालू...
================================

त्या कार्यक्रमा नंतर घरी आलो खरा.पण खरा कुठे??? खरा तिकडेच राहिलो होतो. मन थार्‍यावर रहात नव्हतं. सरळ जाऊन आईला विचारावं,तर तिचा गैरसमज होइल की काय? ही भिती. मग कुणाकडून तरी तिकडचा पत्ता काढावा, तर ज्यांच्याकडून पत्ता काढीन अशी खात्री वाटली ते गावातले मित्र, एकजात सखाराम काकाला टरकणारे! त्यामुळे तिकडनंही काहि कळायची आशा संपुष्टात. शेवटी एक दोन दिवस असेच गेले,आणि मी "होइल पुन्हा जेंव्हा भेट तेंव्हा बघू!" ,असं म्हणून मनातल्या मनात विषय टाळू लागलो.पण नंतर कुठेही कामास गेलो,की मन काहि केल्या कामात रमे ना! ही नको ती अवस्था चालुच राहिली.मला नेमकं याचच भय होतं,कारण काका असल्या गोष्टी एका झटक्यात पकडणारा..त्यामुळे मी शक्यतोवर त्याच्या समोर जातच नव्हतो. आणि एक दिवस होऊ नये ते घडले. आमच्या पलिकडच्याच अगारात एकांकडे श्राद्ध -चालवायला गेलेलो असताना..नेमका तिथे सखाराम काका येऊन टपकला. काय? कसे? समजायच्या आत..यजमानच म्हणाले..."आज जेवायच्यातल्या एका ब्राम्हणानी दांडी मारून आंम्हाला अगदी अपेक्षित पुण्य गाठिला मारुन दिलन!चक्क क्रांतिवीर सखाकाका लाभले हो..त्यामुळे. " मला काहि हा गोंधळ झटकन उलगडे ना. मग काकाच मला म्हणाला, "अहो आत्मूभट. गोंधळू नका हो असे. ह्यांनी श्राद्धाला सांगितलेल्या दोघांपैकी एकानी अचानक दांडी-दिलिन्,आणि मी नेमका हे लोकं उतरणार त्या श्टॉपवर आमच्या संघटनेचं प्रचार पत्रकांचं पार्सल घ्यायला थांबलेला. तिथे हा सर्व प्रकार ह्या आलेल्या एकाकडून समजला.आणि मग 'श्राद्धाची जेवत्या ब्राम्हणाची जागा काय वाट्टेल ते झालं, तरी खाली र्‍हाता कामा नये' या-आमच्याकडल्या नियमाप्रमाणे आलो इकडे.आता ज्यानी दांडी दिल्येन..त्याच्यापाठी आज संध्याकाळ पासून जाणार मी दांडा घेऊन... ह्या..ह्या..ह्या...मग??? फो%$#@चा श्राद्धास दांडी मारतो म्हणजे काय? दुसरीकडेच कुठे गेला असेल ना..जास्तीचं गवत चावायला! मग??? .. तसं असलं,तर मग हण्णार त्याला.नंतर,पौरोहित्य आणि बेइमान निर्लज्जपणा.., ह्यातला फरकच त्याच्या ध्यानी येइल. काय हो यजमान? बरोबर ना?"

हा संवाद ऐकत..मी आपला श्राद्धाची पूर्वतयारी करण्यात मग्न होतो. पण काकाचं हे असलं बोलणं आज मी नीट ऐकत नाहि आहे.हे जसं त्याच्या तिथेच लक्षात आलं,त्याहुनंही माझं कामात नीट मन लागत नाहिये..हे त्यानी जाणलनच. मला मात्र मनात..आज घरी जाता जाता काका आपली भरपुर शाळा-घेणार अशी जबरदस्त भिती वाटायला लागली. मी भरपूर एकाग्रचित्तानी ते काम कसंबसं पार पाडलं.आणि नंतर तिथेच थोडा जेवुन आधी काकाला टांग द्यायचा प्रयत्न केला..

मी:- काका..आईला सांग,की मी जरा पलिकडच्या गावात एका मित्राकडे चाललोय . संध्याकाळी येइन.

काका:- ...... अस्सं होय. बरं..बरं.. जा हो जा.

या सहज मिळालेल्या परवानगीमुळे मी आधी निश्चिंत झालो. पण नंतर माझ्या फेवरीट एकांती जागेवर पोहोचे पर्यंत मनात हा विचार येत राहिलाच,की काका एव्हढ्या सहज 'जा...' कसे म्हणाला? पण कसलं काय? मी गेलो ते डायरेक ज्जेट्टी अलिकडल्या माझीया निवांत-पारी..तिथे एका वळणावर थोडा आत एक पिंपळाचा छोटासा पार होता. बाजुला गुरं पाण्याला येतील, असा एक पाणवठा .पाऊस वजा जाता एरवी तोही शुष्कच असायचा.पण आजुबाजुला गर्द झाडी आणि थंडगार सावली होती. दुपारचं तर तिकडे कुण्णीही फिरकायचं नाही. (कारण.., तो खास-मुंजा'चा पिंपळ..अशी त्याची ख्याती) मी आपला निवांत गाडी बाजुला सोडून तिथे पारावर येऊन विसावलो. काहि वेळ मनातले विचार एका जागी येण्यात गेले. आणि तिथेच थोडा वेळ काढून परतावं असं वाटे वाटे पर्यंत, मागच्या एका पायवाटेनी साक्षात सखारामकाका भुतासारखा तिथे समोर येऊन उभा राहिला! आणि जवळ आल्यानंतर त्यानी माझ्याकडे ज्या मुद्रेनी पाहिलन,त्यावरून याला सर्व काहि समजलेलं आहे.अशी खात्रिही पटली..आणि मग मात्र माझी हालत अजुनच खराब झाली. मनात म्हटलं,आलं आता आपलं मरण! आणि काका आता तसाच उभ्या उभ्या सुरु झाला.
काका:- "आत्मारामपंत..अहो कुणापासून दडवता हे सगळं...माझ्यापासून! अरे बालका,गावापासून कैक कोसावर जरी रहायला गेलास ना..तरी तू कोणच्या दिवशी कोण्या रंगाचा शर्ट घालुन बाहेर पडलास घरातून..हे ही सांगेन हो मी तुला.."

मला काकाच्या संघटनेतल्या कामामुळे,त्यानी गावोगाव कोणत्या आणि किती दुर्बिणी लावलेल्या होत्या,याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे मी त्याच्यापासून काहि अजुन दडवून ठेवणं शक्यहि नव्हतं..त्याच्या या दोन ओळीतल्या हंटरनी माझ्या मनावर योग्य जागी प्रहार केला, आणि मी त्याला घडलेला सगळा प्रसंग सांगायला सुरवात केली. त्यावर मधेच मला तोडत तो...

काका:- "ते सर्व कळलय मला..,ते जाऊ दे .आता तुला काय वाटतं? ते सांग आधी.

मी:-" मला वाट्तं म्हणजे..मला त्या धनगरानी सांगितलन..तेच पटलं.

काका:-"कोण धनगर हा???"

मी:-"असुरेश्वराच्या देवळाजवळ भेटलेला.." (मग मी त्याला तो सर्व प्रसंग सांगितला..)

काका:-"अरे सज्जन मुला..त्याचा अर्थ तू लगेच त्या पोरिच्या मागे हातात माळ घेऊन हिंडावं, असा होत नाही रे!!!"

मी:-"पण तो चुक काय बोल्ला?"

काका:-"उपदेशकानी चुकिचच बोलायला हवं.असा काहि नियम केलायन का कुणी ? सांग बरं मला?

मी:- "क्ल....."

काका:-"अरे गाढवा..त्यानी तुझ्या समोर माणसाच्या जीवनपद्धतीतलं एक सूत्र मांडलन..पण गणित मांडायची वेळ आली असती,तर त्यानिही तुला विचारलं असतनच ना..कि तु कुठचा कोण? आणि ती पोर कुठची कोण म्हणून?

मी:-"हूं...!"

काका:-" पटणार नाहीच तुला...तुझं वय आणि तूला पहाता अशक्यच आहे ते..पण जर मी तुझं म्हणणं ऐकावं असं तुला वाटत असेल..तर मला एकदा 'लग्न म्हणजे काय?' हे सांग पाहू... आणि शब्दावरून व्याख्या झोडू नकोस..त्या मला तुझ्या पेक्षा अधिक छान येतात. लोकांना विधी सांगतोस,आज मला 'आचार' सांग पाहू.

मी:-...........................

काका:-" गेली ना फिलिम रिकामी... असो.जायचीच ती.. अरे मुला.., तरुण वय हो हे तुमचं. तुला आणि तिलाही वाटत असेल आणखिही एकमेकांविषयी बरच काहि. पण तुझी ही गेल्या तिनचार दिवसातली अवस्था पहाता, एकच सांगतो..हे प्रेम नव्हे..फक्त आकर्षण आहे. "

मी:-"असं कसं रे बोलू शकतोस तू सखारामकाका... ?" :(

काका:-" ह्हा ह्हा ह्हा...आता तर खात्रिनी सांगतो तुला . मी म्हणतोय तेच खरं आहे. "

मी:- "कशावरून?"

काका:-" ह्हां....वादाला तोंड फुटलं की लगेच ब्याट्री तापते हो तुझी..अरे गाढवा,ज्या मुलिला तू नीट कधी पाहिलं बोललं सुधा नाहिस,आणि तिनिही कदाचित तुला!... त्या मुलिबरोबर घडलेल्या एक दोन प्रसंगावरून आपल्या जीवनाची नाव लगेच निघालास हाकायला?..आणि आधी तुला ती नाव असते,आणि ती सुकाणू/वल्ह्यानी नव्हे..तर मेंदुनी हकायची असते..हे तरी कुठे म्हायत्ये?... सांग..आहे माहिती? "

मी:-" पण मला वाटलं,तुला तरी माझ्या मनातलं खरं कळेल..पण आता तु ही नाहिच म्हणतोस"

काका:-"मुला...मला खरंही कळतं,आणि खोटंही..त्याशिवाय का मी तुझं हे 'पलिकडच्या गावातलं-मित्राचं घरं'..ओळखलं? "

मी:-" ....... :( .. :( .. :( "

काका:-"अहो नाराजेश्वर, तुमचं वय अत्ता कुठे एकविशी पार करतय. त्यात तू नंबर एकचा फिल्मी मांइंडेड..स्वप्नाळू..चार मित्रांनी चेष्टा केली ..आणि तू चढलास लगेच हरभर्‍याच्या झाडावर. असं झालय तुझं. त्यात तो सज्जन धनगर भेटला..पण त्यानीही दोघांच्या आईबापाना सांगा ..असं सांगितलवतन ना???,,मग ते कसं विसरलास? "

मी:-"पण तुला मी सांगणारच्च होतो ना!!!?"

काका:-" हो...पण सांगितलं नाहिस..आणि आता तूच म्हणतो आहेस,तर माझ्यापासून दडवलस..म्हणजे नक्की-भिती कशाची वाटली तुला. ? काहि कळतय???"

मी:-"......................"

काका:-"जाऊ दे अगम्य आहे तुला हे सगळं...आरे आत्मू..हे वयच नसतं हो ह्या सगळ्या गोष्टी कळण्याचं.या वयात तुझ्यासारखि मुलं अगदी सहज अश्या गोष्टींना भुलतात..मग ती बाइ असो अथवा अन्य काहि."

मी:-" श्श्श्शी...काका.... कसल्या उपमा देतोस रे त्या मुलिवरून???"

काका:-" अस्सं क्काय? ह्या ह्या ह्या!!!... भलताच 'जीव' जडलाय हो अगदी. किती पटकन जखम जाहली एका हळव्या मनाच्या मुलास!...ह्या ह्या ह्या ह्या ह्या!"

मी:- " काकाsssssssssssssssssssssssss" :-/

काका:-" आता मी तुझ्या मनातून त्या मुलिला घालवणारंही नाही..आणि तू तिला -सोड..वगैरे निरर्थक उपदेशंही मी तुला करणार नाही. आता फक्त मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक.आणि मग काय घ्यायचा तो निर्णय घे. आत्मू...,लग्न म्हणजे सामान्यतः फक्त बाइ आणि पुरुष एकत्र येणं नव्हे..मग ते तू म्हणतोस तसल्या प्रेमानी असो,किंवा समाजात चालतं,त्या 'रीतीनी' असो. तो काहि, एक अधिक एक बरोबर दोन..असा सोपा हिशेब नव्हे. विवाहाचा खरा अर्थ , एक अधिक एक बरोबर तीनंही असतो..आणि पाचंही असतो.आणि जर का दोन किंवा दहा असे उत्तर मिळत असेल..तर मग तर तो विवाहच नव्हे.तो अविवाहच! तसच तुम्ही मुलं जे, 'भेटू...भेटू..' असं म्हणता ना..ते खरं तर फक्त आकर्षण तुम्हाला ओढून बोलावत असतं....आणि ते ही तुम्हाला अज्जिबात न कळणारं. "

मी:-" पण काका..., ओळख हीच तर विवाहाची पहिली पायरी असते ना??"

काका:- " असं का... तत्व-ज्ञ ? ओळख ही पायरी..., आणि मग गच्ची कोणती?"

मी:-" काका...तू टवाळी का रे उडवतोस ........ .......... .....?"

काका:-"म्हण म्हण..पुढे 'आमच्या निर्मळ प्रेमाची'...वगैरे म्हण. "

मी:- "आंsssssssssssssssss, तुला माझ्या मनातलं कसं रे ऐकू येतं..नेहमी?"

काका:-" अरे मुला ,वर्षाला ही असली दहा तरी प्रकरणं ह्यांडल करतो हो मी संघटनेत! तेंव्हा उडत्या पक्ष्यांची जी मोजायची..ती नै मोजता आली,तरी पिसे मात्र आरामात गिनतो हो मी."

मी:-" ह्हूं....मग आता तूच सांग मी कसा वागू?...मग तुझ्याच निर्णयाप्रमाणे वागेन मी!"

काका:- " मुला..., विवाहा सारखे महत्वाचे निर्णय दुसर्‍यांच्या नव्हे,तर स्वतःच्या आकलनानी घ्यायचे असतात. आणि त्यासाठी तुमचा तो स्व आहे ना? आत दडून-बसलेला...तो आधी कळावा लागतो. आधी तो ओळखायला शीक...मग कुठच्याही निर्णयाला तुला कुण्णाचिही गरज भासणार नाही..अगदी तुझ्या त्या शांत जागी भेटणार्‍या देवाचिही!"
...................................................................

कसाबसा तो दिवस पार पडला..आणि एक दिवस आमच्याच इथल्या तालुक्याच्या बाजारात मी आईला घेऊन खरेदीला गेलो असताना..नेमकी ती वैजु,आंम्ही शिरलो त्या दुकानात उभी! मग मात्र परत माझी पहिल्या अवस्थेकडे वाटचाल सुरु झाली. आणि आता तर आइही बरोबर होती.म्हणजे त्यात अजुन बोंब. बोलावं तरी गैरसोय..न बोलावं तरिही. तेव्हढ्यात तिनीच आईला मागच्या मागे येऊन एकदम, "काकु...." अशी हाक मारलीन. मि ही सावधपणानी पलिकडच्या सेल्समनशी गप्पा मारून हा प्र संग टाळायच्या प्रयत्नांना लागलो. पण तिला हे सगळं लक्षात आलच. आणि त्या बयेनी आईशी हसत खिदळत नक्की काय गप्पा मारलन कोण जाणे? निघता निघता.. "काकू...हल्ली तुमच्याकडे काहि जणं एक दोन महिन्यांनी भेटली की ओळख द्यायची बंद-होतात का हो???" असा मला आईअडून दगड मारलन. ( :-/ ) आईहि तिथे तिच्या मारलेल्या-दगडाला, हसून अनुमोदन देती जाहली. मग मात्र मी मनात ठाम निश्चय केला. काय वाट्टेल ते होवो..पण हा झोक्याचा खेळ आता थांबायला हवा. उद्या सरळ तिच्या गावात जाऊन..जिथे ती पहिल्यांदा भेटेल..तिथे समोरासमोर विचारायचं..की, "बाई गं...तुझं माझं नक्की नातं काय? ओळख की प्रेम?"

परंतू हा निश्चय मनात होइपर्यंत मी दुकानातून आई बरोबर बाहेर कधी पडलो,आणि गाडीवरून घराकडे येऊ कधी लागलो..हे ही मला कळलेलं नव्हतं.आणि घराच्या जवळपास पोहोचणार एव्हढ्यात मातोश्री सुरु जाहल्या.."आत्मू...त्या वैजुला तुझी बरीच माहिती आहे कि रे. नक्की बात काय आहे? मला सांग हं." हिला ती बया काय काय बोलली याचा अंदाज यावा म्हणून मी आपला सौम्य खडा टाकला. "काहि नाही गं तसं अजुन!" पण शेवटच्या शब्दानी जो गाढवपणा केला,तो पकडला गेलाच लग्गेच. "अजुन??? म्हणजे आधी तुम्ही भेटलायत...थांबव..थांबव ती गाडी..!. मला सांगितलस नाही काहि कसं काय ते???" बोंबला...मला वाटलं होतं..तिच काहि बोलली असेल..पण गाढवासारखं मीच बसलो बोलुन...मग पुन्हा एकदा ती क्यासेट मातोश्रींना ऐकवली..पण सगळं ऐकल्यानंतर आई मात्र एकदम शांत झाली. आणि मग घरी येइपर्यंत आई माझ्याशी जे काहि बोलली ,ते ऐकू जाता...मला म्हणजे गाडी हवेत चालत असल्याचा भास होत होता. मातोश्री:-" हे बघ . मला तिच्या बोलण्यातनं अत्ता जे जाणवतय.ते मी तुला बोलत्ये. नाहितर स्वभावाप्रमाणे एकदम सुतावरुन स्वर्ग गाठशील..हे आधी लक्षात ठेव. पोरगी हुशार आहे एकदम. मी तिला ओळखतेही गेली काहि वर्षं. आमच्या भिशिच्या पैशांचा हिशेब ठेवते ती. शिवाय दर दोन महिन्याला घरी येऊन मला सगळं समजावते,बोलतेही. जवळ जवळ माझच सगळं काम ती करते. पण हे काहिही असलं,तरी तुमचं अत्ता जे काहि चाल्लय..ती एकतर मैत्रि वगैरे नव्हे..सरळ पुढचा टप्पा आहे. यात खरं काय? हे ओळखायचा एकच मार्ग असतो. अशा व्यक्तिला सरळसोट्पणे आणि स्पष्टपणे विचारणे. तेंव्हा एकतर तिला तू विचार..नाहितर आठवड्याभरानी ती येणारच आहे घरी..,तेंव्हा मी विचारेन माझ्या पद्धतिनी. ह्या असल्या गोष्टी लोंबकाळत ठेवणं कुणाच्याही दृष्टिनी बरं नाही. काय समजलास???" मग मी घरी येइपर्यंत गप्प. आणि रात्रिची जेवणं वगैरे झाल्यावर आईला सरळपणे , "ती घरी येइल त्या दिवशी मीच तिला विचारेन" असं सांगुन मी आइचं (आणि माझ्याहि मनाचं..) समाधान करवून घेतलं. आणि शांतपणे झोपि गेलो.

पुढे तो दिवस आला. पण तोपर्यंत माझिही तयारी झालेली होती. आणि यामधे काकाच्या कानमंत्रांचा सगळ्यात मोठ्ठा वाटा होता. मी त्या दिवशीच्या दुकानातल्या प्रसंगामुळे ,तिच्यावर मनातून आलेला रागबिग..शिस्तशीर बाजुला ठेऊन दिला. आणि मनात ठरवलं. प्रश्न तोच विचारायचा..पण फक्त धाडसानी आणि शांत चित्तानी विचारायचा.आणि येइल त्या उत्तरासाठी ठामपणे तयार रहायचं. मन काहिही सांगत असलं,तरी त्याचं ऐकायचं नाही..कारण आपल्याला अजुन ते माहित नाही. ब्बास! इतकिच गोष्ट्,मनात घट्ट धरून ठेवली. आणि माझं ते,काकाच्या म्हणण्यानुसार असलेलं फिल्मी माइंड, एकदम बाजुला पडलं. भयाची जागा विश्वासानी घेतली. हे सगळं आइकडून काकाच्या कानावर गेलेलं होतच. त्याचिही अपेक्षित दाद आली. मी त्या दिवशी दुपारि अंगण्यात सुपार्‍या सोलत बसलेला असताना..मागुन एकदम काका आला,आणि माझ्या पाठिवर थाप मारत मला.."बेश्ट लक!" असं म्हणुन सायकल दाराशी लाऊन त्याच्यासह आलेल्या संघटनेच्या लोकांबरोबर बोलत बोलत वाडित निघुनहि गेला. ह्या वरुन मी एक ताडलं..कि ज्या अर्थी आता काकाला हे सगळं अत्यंत साधं आणि सरळ वाटतं आहे,त्या अर्थी आपण बरोबर मार्गावर आहोत. आणि मग काहि वेळात ती आली. आईशी बोलायचं ते सगळं बोलली.आणि जायला निघाली..तशी मी तिला अंगणातच. "दोन मिनिटं वेळ आहे का?" अशी सरळ मुद्द्यानीच हाक मारली. मग ती 'हो..' म्हणाल्यावर मी सरळ तिच्यासह मागे वाडीत गेलो.आणि माझ्या विहिरिमागच्या नेहमीच्या अवडत्या जागी..म्हणजे त्या मोडक्या रहाटाच्या टाकलेल्या ओंडक्यावर विसावलो. मग माझ्या पहिल्या प्रश्नाला,तिचा होकार आल्यानंतर ..तिनिहि मला पुढे तिन चार प्रश्न विचारले. आणि मग..दोघांच्याही घरच्यांचा होकार असेल..तर(च) पुढल्या निर्णयाकडे जायचं.असं ठरवून आंम्ही परतलो. जाताना कुठचेही टाटा बाय बाय इत्यादी आमच्यात काहिही घडलं नाही. मला जे वाटत होतं,ते मी बोललेलो होतो.आणि तिला जे वाटत होतं ते ती..! आता पुढचा निर्णय आमचा नसून आमच्या दोघांच्याही घरच्यांचाच होता..हे निश्चित झालेलं असल्यामुळे...मि ही शांत होतो,आणि ति ही निवांत!

मग त्याच दिवशी रात्री, मी आई आणि काकाला आमच्यात झालेलं सर्व बोलणं नीट व्यवस्थित सांगितलं. आणि माझा तिचा एकमेकांना होकार आहे...हे ही सांगितलं. मातोश्रींनी सगळं शांतपणे ऐकलं..आणि मला पुढील महिनाभर शांत रहाण्याचा आदेश करुन्,त्या जात्या जाहल्या. मी मात्र या निर्णयानी काहिसा बुचकळ्यात पडलो.आणि ती गेल्या गेल्या याबद्दल काकाला विचारलं. काकानी मग मला, "अरे आत्म्या, तुझी आईस आहे हो ती. तिला तिचं वासरु रानात हरवतय..की रमतय? त्याचा अंदाज नको का यायला.? अं?????? का....य?. आणि मी असताना तू कशाला चिंता करतोयस एव्हढी?.. अं??? तिनी तिच्या घरी 'पेपर' टाकायच्या आत रिझल्ट आणिन मी! काय समजलास? " यावर पुढे अख्खे दोन आठवडे गेले. पण कुठूनच काहि पत्ता हले ना. मग मात्र मी पुन्हा काहिसा अस्वस्थ व्हायला लागलो. पण एक दिवस तिची आईच सकाळी सकाळी चक्क आमच्या घरी येऊन गेल्याचं मला समजलं. आणि मग मात्र त्यादिवशी मी मनातून अस्सा काहि अस्वस्थ झालो,के ज्याचं नाव ते! आइनी मात्र , काका संध्याकाळी घरी येइपर्यंत मला काहिही कळू देखिल द्यायचं नाही ...या भूमिकेचं अत्यंत ठाम बेअरिंग घेऊन ठेवलं होतन. त्यामुळे माझी अज्जुन वाट . शेवटी ती दुपार टळली,सांजकाळहि जाहली..काका आला..आइचे त्याच्याशी बोलणे जाहले..आणि काकानी मला आई आज्जी यांच्या समोरच आतून हाक दिली... " अहो राजकुमार..या हो आत या! तुमचा रिझल्ट आणलाय. या..!" असं म्हणाला. मी मनात विचार केला, हिची आई तर सकाळीच काय ते सांगुन गेली ना..मग आता काकानी त्यात हा आणखि रिझल्ट कुठनं आणलन? पण सगळी गेम,पूर्ण न-खेळून येइल..,तर तो आमचा काका कसला?

त्याच्याच सांगण्या प्रमाणे..त्याला सकाळि घरी झालेलं बोलणं, आइनी त्याला कळवलन. मग तो दुपारी डायरेक त्यांच्या घरी गेला.. त्यांच्याशी आणि मुख्य म्हणजे तिच्याशी जे विचारायचं/बोलायचं,ते बोलुन (काकाच्याच भाषेत-"झडती करुन"..) मगच तो इकडे आला. आणि मग मला "आत्मू...आहे हो.. जमण्यातलं आहे. तुझं तिचं आणि आपलं त्यांचंही. " यातल्या दुसर्‍या वाक्याचा अन्वयार्थ मला काहि केल्या समजे ना. मी काकाला काहि विचारणार्,एव्हढ्यात तो मला तसाच बोलत बोलत मागच्या अंगण्यात घेऊन गेला. पण तरिही मी त्याला 'आपलं त्यांचंही!' म्हणजे काय? हा प्रश्न विचारलाच.

काका:- "अरे मेल्या ते घरंही ब्राम्हणाचच असलं,तरी तिची आइस ब्राम्हण नव्हे.!"
मला हे सर्व ऐकताना आधी तो माझा काका 'बोलतो आहे!',यावर विश्वासच बसे ना! मनात म्हटलं, 'हा एकजाती संघटनेचा कार्यकर्ता आणि तोही कृतीशील...तरिहि ह्याला हा प्रश्न पडवा?' पण पुढंचं सर्व ऐकल्यावर मग मात्र मी अजुनंही काकाला पूर्ण ओळखलेलं नाहिये ह्याची मला खात्रिच पटली.
काका:- "आणि जरी तीची आई ब्राम्हण नसली,तरी ती आणि तिची पोर-'कशी असेल?'...असल्या मूर्ख श्रद्धा मी पाळत नाही,आणि आपल्या घरच्यांनाही मी पाळू द्यायचा नाही. काय समजलास? पण तू पडलास भटजी. तिथे गेम आहे रे सगळी! त्यामुळे पहिले तुझ्या धंद्यातल्या लोकांनी तुला स्विकारायला हवे. आणि आजच्या काळात ते ही तुला उघड नाकारायचे नाहीत..याची मलाहि खात्री आहे. पण आपल्या सगळ्याच समाजाकरिता हे स्विकारण्या सारखं आहे काय? की एका भटजीची बायको ही तथाकथित अशी म्हणून! ... हा खरा तो प्रश्न आहे..त्यामुळे तो तपासून पहाणं, हा खरा त्यांच्या घरभेटीतला माझा हेतू होता."

मी:- " मग काय कळलं तुला तिकडे?,आणि काका...आजच्या काळात ह्या असल्या गोष्टींवरून माझं काम बंद पडेल्,असं मला नाहि वाटत.मी ही आता तिनएक वर्ष झाली हे काम करतोय.त्यात मी दहातली दोन लग्ने जी लावतो ती तर सरळ अंतर्जातीय सुद्धा असतात. "

काका:- "हो...पण गाढवा दोनच आहेत अजुन...आठ नव्हे! नै...,आणि कित्तीही आपल्या धर्मशास्त्रांच्या निर्णयानुसार अपत्यास पित्याची जात मिळते..हे खरं असलं..तरी अश्या जागी मात्र ,अजुनंही काहि लोकांना ती मिश्र संतती असल्याचे साक्षात्कार होतात. शेवटी सत्य, हे - आधुनिक मुल्यांनी सामोरं आलेलं असो,किंवा धर्मशास्त्रांनी स्वतःच्या सोयीकरता त्यांची लावुन-दाखवलेली संगती आपल्या समोर ते मांडत असो..ज्या गोष्टीवर लोकांची अज्ञानापोटी ठाम अंधःश्रद्धा असते. तीच्यातले बदल, ते प्रकट्पणे आणि पटकन स्विकारतील..याची खात्री काय? शिवाय जोपर्यंत असल्या (अंधः)श्रद्धा अज्ञानाचा वज्रलेप शिवभस्मासारखा पवित्र मानुन आणि अभिमानानी लेऊन फिरत असतात,तोपर्यंत त्या प्रांतात लढाइच्या पवित्र्यातहि उभे राहुन चालत नाही. अरे गळू काढायला ऑपरेशनच करावं लागतं..,सुरी भोसकुन नै जमत तिथे..आपल्याच-पोटातलं ना ते शेवटी!!! "

मी:-" मला हे कळतय सगळं...पण शेवटी तुला तिथे नक्की समजलं..ते काय???? हे सांग ना?"

काका:-" ह्या ह्या ह्या..आलास मुद्द्यावर! अरे तिची आई जरी ब्राम्हणेतर असली..तरी ती केवळ ह्या मानलेल्या जातिनी. एरवी तिचे आचार अगदी ब्राम्हणकुळांसारखेच आहेत. आणि मी त्या मुलिसंही हे डायरेक ठणकावून सांगितले...म्हटले...'हे बघ ..उद्या तू आमच्या घरी आलीस तर तुला आंम्ही कोणी भटाची बायको,म्हणून पाचवारी/नौवारी'च नेस असली बंधने घालणार नाही. पण चालु जमान्याला आवश्यक असेल..अश्या सर्व गोष्टींनुसार तुला रहावे लागेल..हे ध्यानात घे..आणि मग काय त्या निर्णयाला ये!"

मी:- "मग...काय म्हणाली ती?"

काका:-"अरे..., 'वेळ आली..तर नौवारिही नेसेन..येते मला'हि!' असे कडक उत्तर दिलेन. "

मी:-"बाप रे!!!!!!!!!!!"

काका:-"बाप रे..??? आत्मू...तुझा चेहेरा सांगतोय..कि तुला बरं वाटलय हे उत्तर ऐकुन..माझ्या जवळ हे खोटे आश्चर्य व्यक्त करुन नको दाखवुस! ख्या...ख्या...ख्या...! "

मी:-"काका...... ( :-/ ) छळू नको ना. शेवटी सांग ना काय झालं ते!"

काका:-" अरे व्हायचं काय आणखिन आता त्यात?...तिच्या आई बापास सगळे बोललो नीट.आणि पुढल्या पौर्णिमेच्या मुहुर्ताला 'बैठकिचे' - सगळे ठरवुन आलो...आता दे बरं मला टाळी!"
===================================================
क्रमशः.........
मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल)भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४ भाग- २५ भाग- २६ भाग- २७ (यज्ञयाग विशेष!) भाग- २८ भाग- २९ भाग- ३० भाग- ३१ भाग- ३२

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2015 - 11:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

"अज्ञात" ""कथानायकाची"" गोष्ट आवडली हो गुरुजी =))

सूड's picture

9 Mar 2015 - 11:39 pm | सूड

असेच म्हणतो !! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2015 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा

व्बॉर! ढण्यवाआड...चिमणराव आणि सुडुक! http://www.freesmileys.org/smileys/smiley-fc/chin.gif

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 7:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पेर्णास्त्रोताचा उल्लेख नं केल्याबद्दल णिषेध ;)

आनन्दिता's picture

10 Mar 2015 - 3:21 am | आनन्दिता

+२ :)

गुर्जी, पुढे काय झालं ते लवकर ल्ह्या नैतर ते डॉक्टरसाहेबांसारखं सगळ्या वाचकांचा चक्का टांगून ठेवल्यासारखं व्हायचं.

एस's picture

10 Mar 2015 - 1:45 am | एस

आता पुढचा भाग लिहावयास पुढच्या पौर्णिमेच्या मुहूर्ताची वाट पाहू नका म्हणजे झालं. क्का.........य्य?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2015 - 10:37 am | अत्रुप्त आत्मा

चिमणराव
@पेर्णास्त्रोताचा उल्लेख >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-shocked015.gif काहिही आकलन झाले नाही. धन्यवाद.
========================
रेवती
@ते डॉक्टरसाहेबांसारखं सगळ्या वाचकांचा चक्का टांगून ठेवल्यासारखं व्हायचं.>>> आमच्या कडुन नाहि होणार तसे काहिही.
==========================================
स्वॅप्स
@पौर्णिमेच्या मुहूर्ताची वाट पाहू नका म्हणजे झालं.>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Mar 2015 - 8:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जाउन द्या. उगीचं धोत्रास/ पंचास हात घालायचा प्रयत्न फसला =))

पॉइंट ब्लँक's picture

10 Mar 2015 - 10:46 am | पॉइंट ब्लँक

सुंदर लिहिले आहे.

तीन तीन लेख इथेच येऊन अडकलेत.पुढे काय झालं??

विजुभाऊ's picture

10 Mar 2015 - 2:42 pm | विजुभाऊ

छान ल्हिलय हो आत्मारावजी.
अम्मळ लौकर लौकर ल्हित जॉ ना.

सिरुसेरि's picture

11 Mar 2015 - 8:10 am | सिरुसेरि

या लेखातील विचार समाज प्रबोधक आहेत. कथानायक आणि काका हे जात , पोटजात , पत्रिका , कुंडली यांमध्ये अडकलेले नाहित .

पैसा's picture

29 Apr 2015 - 8:11 pm | पैसा

इथून पुढचे लेख वाचायचे राहिलेत मध्यंतरी.