मत

फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे प्रेरणा साम्य आणि फरक कोणते ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
15 Aug 2014 - 5:37 pm

आदूबाळ यांचा मिपावर मंत्रचळाच्या मागोव्यावर (http://www.misalpav.com/node/28407) असा एक विश्लेषणात्मक आणि चर्चा रंगलेला लेख बर्‍याच जणांनी वाचला असेलच. त्यापुढे जाऊन काही अधिक माहिती चर्चा करून हवी आहे.

१) संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्‍या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून हवा आहे.

सर्दीवरील उपाय आणि अनुभव

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
11 Aug 2014 - 11:41 am

नमस्कार मिपाकर

सर्दी, या जास्तीत जास्त आढळणा-या आजाराने प्रत्येक मानवाला कधी ना कधी, कमी जास्त प्रमाणात ग्रासलेलं असतंच. तर या अतिशय लोकप्रिय आजाराशी वर्षातून एखाद दोनदा माझीही नाकभेट होत असते. मग काही दिवस आम्ही एकमेकांना अजिबात दूर जाऊ देत नाही. एकत्र मिळून शिंकांचे फटाकेही फोडतो. अखेर कंटाळून मग आम्ही सोडतो एकमेकांना. असो. गमतीचा भाग वेगळा. पण या सर्दीवर अनेक उपचारपद्धतीत अनेक उपाय सांगितलेले आहेत, औषधं सांगितलेली आहेत. घरगुतीपासून ते गोळीबारापर्यंत. मला लागू झालेले काही उपाय इथे देत आहे,

स्वच्छता आणि आपली मानसिकता

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
4 Aug 2014 - 4:06 pm

माझं डोकं हटलं होतं. कॉलेजमध्ये भांडण झालं होतं. त्याच विचारात घरी परतत होतो. दुपारची वेळ होती. त्यामुळे साहजिकच वातावरण तापलेलं होतं. ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. माझ्यासमोर एक माझ्याच वयाचा, कृश शरीरयष्टीचा (हे महत्त्वाचं आहे) मुलगा दाणे खात बसला होता. दाण्याची सालं खाली टाकत होता. ज्या प्लॅस्टीकच्या पिशवीतून खात होता ती पिशवी खाऊन झाल्यावर त्याने खिडकीतून बाहेर फेकून दिली. मी हा सगळा प्रकार मुकाट्याने बघत होतो. त्याने खिशातून दुसरी पिशवी काढून त्यातनं पुन्हा दाणे खायला आणि साल खाली टाकायला सुरुवात केल्यावर मात्र माझा ताबा सुटला. आधीच डोकं भडकलेलं असल्याने बोलण्यात चेव सुद्धा होताच.

संस्कृतीसमाजजीवनमानराहणीविचारलेखमत

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... तुम्ही असा... आस्तिक?... नास्तिक? ...???

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
30 Jul 2014 - 12:42 am

"देव आहे की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही.

हे जग "देव आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "देव नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे...

Online Shopping

NiluMP's picture
NiluMP in काथ्याकूट
28 Jul 2014 - 4:21 pm

Virtual जगात चतुर माणसाने दुकाने थाटली आणि Online Shopping उदयास आले आणि माणसाची Window Shopping ची हौस एका Click वर येउन टेपली.

Online Shopping ने इतर Online सोयीप्रमाणे ब-याच गोष्टी सोप्या केल्या पण विश्वासहर्ता संपादन करण्यात अपयशी ठरल्या आहेत

खरंच Online Shopping विश्वासहर्त आहे का?, तुमचे चांगले वाईट अनुभव share करा.

अभिजात भाषा सप्ताह कधी ?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
22 Jul 2014 - 3:24 pm

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांमधील मुख्य सचिवांना पत्र पाठवून '7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट', या काळात संस्कृत सप्ताह पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पत्रानंतर ऐका राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानी केंद्राच्या या सूचनेला विरोध करत, त्यामध्ये सुधारणा करण्याची विनंती केंद्राला केली आहे. "आमच्या राज्यात सरकारी स्तरावर अधिकृतपणे संस्कृत सप्ताह पाळणे अत्यंत चुकीचे आहे. याउलट, प्रत्येक राज्याच्या भाषिक परंपरेनुसार त्या त्या राज्यांमध्ये अभिजात भाषा सप्ताह पाळणे योग्य ठरेल,' असे त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

संत ज्ञानेश्वर व आपण

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
22 Jul 2014 - 10:23 am

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, लॅटिन ही धर्मभाषा होती. ती फारच थोडय़ा विद्वानांना अवगत होती, मार्टनि ल्यूथर या जर्मन पाद्रीने पोपच्या दडपशाहीविरुद्ध आजाव उठवून, बायबल लोकभाषेत असावे, असा आग्रह धरला व बायबलचे प्रचलित जर्मन भाषेत (लोकभाषेत) भाषांतर केले. त्यापाठोपाठ ख्रिश्चन धर्मात अनेक सुधारणा घडवून आणल्या. काहीशे वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील ज्ञान मराठीत (लोकभाषेत) आणले. त्यांना तथाकथित संस्कृत-तज्ञ धर्ममार्तंडांचा त्या काळात विरोध सहन करावा लागला.

मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता !!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
18 Jul 2014 - 1:54 pm

"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात" असा संदेश देणारे मराठी चित्रपट बंद होत आहेत आणि मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे मला वाटायला लागले असतांनाच मध्यंतरी एक "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला आणि वाटलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार म्हणजेच मराठी चित्रपट हे सून-मुलगा द्वेष्टेच राहाणार!! असे हे चित्रपट नाण्याच्या केवळ एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं.

ऑनलाईन मराठी कट्यांच्या आणि ग्रूप्सच्या मराठी आणि महाराष्ट्रासाठीच्या योगदानाची माहिती हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
6 Jul 2014 - 10:41 am

आंतरजालाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या ऑनलाईन मराठी लोकांच्या कट्यांच्या आणि ग्रूप्सच्या मराठी आणि महाराष्ट्रासाठीच्या उल्लेखनीय योगदानाची माहिती हवी.

* कट्टे = यात मराठी संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारे कट्टे आले

* ग्रूप = यात जुने याहू ऑर्कूट ग्रूप नवीन काळातील फेसबूक ग्रूप इत्यादी तत्सम ग्रूप आले

* या धाग्यावर प्राप्त ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेली माहिती मराठी विकिपीडियासाठी वापरली जाऊ शकते म्हणून नेहमी प्रमाणे या धाग्यावरील आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.

* दिल्या जाणार्‍या माहितीस इतर सदस्यांचा दुजोरा उपयूक्त ठरणारा असू शकेल.