कृष्णाच्या गोष्टी-७
*स्यमंतक मणी
रुक्मिणी नंतर कृष्ण कुटुंबात मान होता तो सत्यभामेला!
ती सुंदर होती पण राजकन्या नव्हती. द्वारकेतील सत्राजित नामक एका यादव गणप्रमुखाची ती मुलगी होती. एका अलौकिक कथेप्रमाणे सत्राजिताने सूर्य देवाला प्रसन्न करून स्यमंतक नावाचा एक मणी प्राप्त करून घेतला होता. तो एक विशेष प्रकारचा मणी होता जो रोज दोन तोळे सुवर्ण निर्माण करत असे.असे रत्न गणप्रमुख ऐवजी राजाच्या आगार संघप्रमुखाच्या पदरी असावे म्हणून कृष्णाने सत्राजितच जवळ त्या मणीची मागणी केली पण त्याने चक्क नकार दिला.