कथा

'माया': एक झुंजं संसाराशी!-भाग १

सुहास चंद्रमणी बारमासे's picture
सुहास चंद्रमणी ... in जनातलं, मनातलं
31 May 2021 - 4:14 pm

......... माया एक ग्रामीण भागातील एक चुणचुणीत अन् चाणाक्षं मुलगी! काळेभोर डोळे, बुटके नाक, लांब केश, सडपातळ बांधा, मध्यम उंची आणि गव्हाळ वर्णाची! तशी तर ती सुखवस्तू कुटुंबातली! घर छान वाड्या सारखे, वडील 'रामराव' गावचे सरपंच! तीस एकर बागायती शेती, नोकर-चाकर, घरी गोदामात धान्याच्या रासा भरलेल्या, मोटार पंप विहीर सर्वकाही सुव्यवस्थित होते.

कलाकथालेखअनुभव

मौसमी....एक दुखरी सल (भाग २)

OBAMA80's picture
OBAMA80 in जनातलं, मनातलं
29 May 2021 - 11:28 am

.....ती रात्र मला अजून लख्ख लक्षात आहे. माझा पहिलाच दिवस. माझा मित्र अविनाश मुलांना शोधायला गेला होता आणि मी त्या तिकीट खिडकी जवळ आमची सामानाची बॅग सांभाळत उभा होतो.

कथाव्यक्तिचित्रणलेख

अर्धवट कागदे. - कथा

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
26 May 2021 - 2:11 am

प्रस्तावना - ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे.एकूण पाच भागात ही कथा प्रकाशित करण्याचा मानस आहे. त्यातील एक भाग आज प्रकाशित होत आहे.
----

कथालेख

शेर अफगाण- कथेनंतर, संदर्भ आणि नोंदी

विश्वनिर्माता's picture
विश्वनिर्माता in जनातलं, मनातलं
22 May 2021 - 9:25 pm

अली कुलीच्या मृत्युनंतर तीन वर्षांनी, १६११ साली, मेहरुन्निसाचा जहाँगिरशी विवाह झाला. द ट्वेंटीथ वाईफ या कादंबरीनुसार, जहाँगिर मेहरुन्निसाला उपस्त्री होण्याबाबत आग्रह धरुन होता, पण मेहरुन्निसाने लग्न करण्याचा आग्रह केला. मेहरुन्निसा ही जहाँगिरची विसावी आणि शेवटची पत्नी ठरली. मेहरुन्निसाचे लग्नानंतर नामकरण “नुर महाल”, म्हणजे, महालातला प्रकाश म्हणून केले गेले. पण इतिहासात ती आठवली जाते ते नुर जहाँ या नावानेच- जगताचा प्रकाश. नुरुद्दीन मुहम्मदची पत्नी- नुर जहाँ.

इतिहासकथाविरंगुळा

शेर अफगाण- भाग १

विश्वनिर्माता's picture
विश्वनिर्माता in जनातलं, मनातलं
22 May 2021 - 9:25 pm

एक: अली कुली (ईसवी सन १६०७) I
गवताच्या सळसळीतून आणि घोड्यांच्या टापांनी चुरडल्या जाणार्‍या पाचोळ्याच्या आवाजामधून सुद्धा अली कुलीला वाघाच्या गुरकावण्याचा आवाज आला. त्याने हाताची मूठ दाखवून सोबतच्या गावकर्‍यांना सावध होण्याचा ईशारा केला.
काही पावलांनंतर हरणाच्या धडावर पाय रोवलेला प्राणी अली कुलीला दिसला. रक्ताळलेले दात दाखवत वाघाने आपल्या शिकारीपुढे बचावात्मक पवित्रा घेतला.

इतिहासकथाविरंगुळा

कावळ्याची फिर्याद

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
21 May 2021 - 3:14 pm

सद्दपरीस्थीतीत एकमेकाची भेट तर होऊ शकत नाही म्हणून अधुन मधून एकमेकाची मोबाईल, टेलिफोन विचारपुस करणे हा अलिखित नियमच झालाय.

आजच गावाकडं मावशीला फोन लावला, सर्वसाधारण इकडची तीकडची विचारपुस झाल्यावर विषय करोनाच्या महामारी कडे वळाला. बोलता बोलता मावशी म्हणाली आज आपल्या गावात २१ दशक्रिया विधी आहेत, आमक्या तमक्याचा नंबर आकरावा आहे, दुपारी अडीच ची वेळ मीळाली. हल्ली विधी करण्यासाठी माणसं पण मीळत नाहीत. विषयाला गंभीर वळण लागतय पाहून विषय बदलला, म्हटंल काळजी घ्या वगैरे वगैरे बोलून फोन ठेवला.

कथाविचार