आणखी एक निवांत, मोकळा वीकांत

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
16 Mar 2009 - 6:01 am

सुनीलरावांचा एक निवांत, मोकळा वीकांत वाचून आम्हांला - म्हणजे नाटक्या, अस्मादिक आणि बबलु हे मिपाकर - आमचा गेला वीकांत आठवला - अशीच निवांत, मोकळी शनिवारची संध्याकाळ.
"वीकेन्डला काय करतो आहेस?" आठवड्याच्या मध्यावर नाटक्याचा फोन आलेला.
"हापिसात नसलो तर मोकळा असेन; पण शक्यता अंधुक आहे" मी.
"बबलुच्या घरी कॉक् टेल् पार्टी करायचा बेत आहे. बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. ब्याचलर् पार्टी करू ;)" नाटक्या
(सौ. बबलुंची गैरहजेरी सगळ्यांच्याच पथ्यावर पडणारसे दिसते काय, असा विचार करून मी) - "संध्याकाळी हापिसातूनच येतो हवे तर"
"वीकेन्डला हापिस?" नाटक्या
"हल्लीच काही लोकांना हाकलले आहे. तेव्हा म्हटले आपल्याला हाकलायच्या आधी काम उरकावे; (आणि काम केल्याने हाकलले जाणार नाही, अशी आशा प्रज्वलित झाली, तर तिला तेवत ठेवावे)" मी.
"बरे. शनिवारी संध्याकाळी बबलुच्या घरी भेटू" नाटक्या.
शुक्रवार रात्री -
"उद्या येतो आहेस ना?" बबलु.
"होय. काय आणू?" मी.
"नाटक्याशेठ काही कॉक् टेल्स् करणार आहेत. आवश्यक ते सामान ते स्वतः घेऊन यायचेत. तू ऑरेन्ज् ज्यूस् (नारिंगी नव्हे ;) ), डाळिंबाचा ज्यूस् आणि जिन्जरेल् घेऊन येणार आहेस" बबलु.
"बरे" मी.
"खायचे काय? नाटक्या शेठ चटपटीत कोलंबी करणार आहेत" बबलु
"मी फ्राइड् राइस् करेन. सामान तयार ठेव" मी.
शनिवारी संध्याकाळी पोचलो बबलुच्या घरी. नाटक्याशेठ आधीच येऊन बसलो होतो. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती.
tayaarii
सुरुवात मार्गारिटाने करायची ठरले. नाटक्याशेठ ने अगदी 'विदिन् नो टाइम्' आकर्षक लाल-गुलाबी मार्गारिटा सादर केली. डाळिंबाच्या ज्यूस् मुळे घोटाच्या शेवटी लागणारी आंबट चव तर लाजवाबच! याची पाककृती लवकरच मिपावर येणार आहे :)
margarita
त्यानंतर पुदिन्याच्या पानाचा मोहक स्वाद आणि चुरचुरीत जिन्जरेल् युक्त एक कॉक् टेल् चवीचवीने घोटाघोटाने प्यालो. याचे नाव माझ्या लक्षात नाही.
जोडीला गप्पा चालू होत्याच. नाटक्याने चटपटीत कोलंबी करायला सुरुवात केली. सगळी पूर्वतयारी अगोदरच घरूनच करून आणल्याने फार काही वेळ गेला नाहीच; आणि फ्राइड् राइस् च्या तयारीसाठी बबलुला भाज्या कापायला बसवले गेले ;) विश्व साहित्य संमेलन, त्यातील एच्च. मंगेशकरांचे 'भावसरगम', मनोरंजनाचे कार्यक्रम विरुद्ध साहित्याशी संबंधित कार्यक्रम असे आता शिळे झालेले, पण तरीही चवीचवीने चघळले जाणारे वाद, यांवर चर्चा झाली. नाटक्याने सांगितलेले काही किस्से ऐकून फारच करमणूक झाली. हवा छान सुटल्याने खाणे करण्याआधी मोकळ्या हवेतल्या गप्पा आणि अर्थातच त्यायोगे भूकवृद्धी यासाठी बाल्कनीत खुर्च्या टाकल्या. टीव्हीवर चालू असलेल्या 'मेरे बाप की बीवी मुझे बेटा बोल्ती' सारख्या अतिटुकार गाण्यावरून चालू झालेल्या गप्पा, त्यावरून आठवलेले स्कॉलरशिपच्या परीक्षेत विचारले जाणारे नातेसंबंधांवरील 'ओळखा पाहू' स्वरूपाचे प्रश्न या सगळ्यांत वेळ कसा गेला समजले नाही. भूक लागल्यावर घरात येऊन कोलंबीवर ताव मारणे चालू झाले, आणि त्याच्या जोडीला संत्रे-अननसाचा संयुक्त स्वाद असलेले बहामा ब्रीझ सारखे पिवळेधमक आकर्षक कॉक् टेल्.
bahamas_breeze
आतापर्यंत मिपावर फोटो पाहूनच लाळ गळायला लावणारी चटपटीत कोलंबी खरोखरच किती चवदार, चटपटीत लागते, हे मी लिहिल्याने समजायचे नाही; ते करूनच पहायला हवे.
khadadi
प्रसन्न हवा आणि कोलंबीने चाळवली गेलेली भूक मग रंगीबेरंगी फ्राइड् राइस् शिवाय भागणे शक्यच नव्हते. अस्नादिकांनी पटापट फ्राइड् राइस् शिजवला. बबलु आणि नाटक्याशेठने काही तक्रार केली नाही, म्हणजे तो ठीकच झाला असावा, असे समजून तो हादडला. जोडीला एक लालभडक रंगाचे, गुलाबाच्या स्वादाचे आणि डॉक्टरकाका देतात त्या लाल कफ् सिरप् ची आठवण करून देणार्‍या स्वादाची छटा असलेले एक कॉक् टेल् होते. जेवणानंतर मोर्चा पुन्हा बाल्कनीत वळवला. तेथे द. मा. मिरासदारांच्या लेखनावर चर्चा (व्यंकूची शिकवणी), शंकर पाटल्यांच्या लेखनावर चर्चा (धिंड), नाटक्याच्या नव्या नोकरीच्या वेळचे भारतातील अनुभव, अस्मादिकांचे आतापर्यंतचे रंगमंचावरचे प्रयोग, त्याबाबतच्या रंजक आठवणी अशा विविधांगी गप्पा झाल्या. शेवटी गप्पा आणि पोट दोन्ही इतके जड झाले होते की ठरवलेली आणखी दोन कॉक् टेल्स् आता आज नको, पुढे कधीतरी पाहू, असे ठरवून निरोप घेतला. आता अशाच आणखी एका निवांत, मोकळ्या वीकांताची वाट पाहणे आले ;)

वावरसमाजजीवनमानराहणीमौजमजाप्रतिसादबातमीअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

16 Mar 2009 - 6:20 am | विंजिनेर

खल्लास. एकदम "श्रिम्प कॉकटेल" झालयं की :)
फोटू पण सुंदर. कॉकटेल चे म्याचिंग ग्लास आणि शेकर म्हणजे जय्यत तयारी होती का!

सहज's picture

16 Mar 2009 - 7:03 am | सहज

बेला हेही भारी!

छोटा डॉन's picture

16 Mar 2009 - 8:10 am | छोटा डॉन

एकदम खल्लास विकांत रे बेला, आम्हाला नुसते वाचुन मज्ज आली तर तुमचे काय बोला ?
सह्ही है ...!!!

बाकी नाटक्यारावांनी कॉकटेल्सला अगदी प्रोफेशनल टच दिलेला दिसतोय ...
फोटो पण एकदम ऑथेंटिक आहेत.

------
(आस्वादक)छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2009 - 2:10 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत.
तुमच्या सारखे काहि दुष्ट मिपाकर हे असले काय काय सचीत्र लेख टाकता आणी मग संध्याकाळी आमचे बिल अंमळ जास्तच वाढीव होते.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

एक's picture

16 Mar 2009 - 8:03 am | एक

एक कोलंबी आणि कॉकटेल माझ्यानावाने बाहेर ओतलत ना?

परत अश्या तारखा अजिबात विसरणार नाही..

(रम & कोक चा एक ग्लास रिचवून पुढचा प्रतिसाद देईन)

नंदन's picture

16 Mar 2009 - 8:10 am | नंदन

सही आहे, कट्टा अगदी रंगलेला दिसतोय.

त्यानंतर पुदिन्याच्या पानाचा मोहक स्वाद आणि चुरचुरीत जिन्जरेल् युक्त एक कॉक् टेल् चवीचवीने घोटाघोटाने प्यालो. याचे नाव माझ्या लक्षात नाही.

-- मोहितो बेस्ड?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

पिवळा डांबिस's picture

16 Mar 2009 - 11:36 pm | पिवळा डांबिस

रंगलेल्या कट्ट्याचे रसभरीत वर्णन!!!
वा बेलाशेठ वा!!

त्यानंतर पुदिन्याच्या पानाचा मोहक स्वाद आणि चुरचुरीत जिन्जरेल् युक्त एक कॉक् टेल् चवीचवीने घोटाघोटाने प्यालो. याचे नाव माझ्या लक्षात नाही.
-- मोहितो बेस्ड?
बहुतेक मोहिटोच असावी
(असा आपला आमचापण एक अंदाज! बाकी आम्हाला काय कळतंय त्यातलं!!:))

आणि काय हो नंदनभावजी, भाग्यश्री, घाटावरचे भट?
बघा, बे-एरियातली मंडळी कट्ट्यांवर कट्टे करून र्‍हायली!!!
काय सोकॅल मध्ये काय जमवायचं का? का नुसतंच त्यांना दाद देत र्‍हायची?:)
आपण तर बुवा आता पार्टी बदलायला तयार झालोय!!!
बे एरिया काय तसा लांब न्हाई जर उत्तम कॉकटेल मिळणार असेल तर!!!
:)

भाग्यश्री's picture

17 Mar 2009 - 12:23 am | भाग्यश्री

:O तुम्हीच पार्टी बदललीत तर आम्ही पामरांनी कुठे जायचे??? :((
करू ना कट्टा.. काय मत आहे सगळ्यांचे?

नंदन's picture

17 Mar 2009 - 1:49 am | नंदन

>>> Surprise तुम्हीच पार्टी बदललीत तर आम्ही पामरांनी कुठे जायचे??? Sad(
-- सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

नाटक्या's picture

17 Mar 2009 - 12:37 am | नाटक्या

कधीही या. प्यायला आणि पाजायला आम्ही कधीही तयार असतो :-)

- नाटक्या

विसोबा खेचर's picture

16 Mar 2009 - 8:53 am | विसोबा खेचर

मस्तच!

शेवटचा कोलंबीचा फोटू पाहून माझं मनच थार्‍यावर नाहीये! संसारातलं लक्षच उडालं आहे! :)

तात्या.

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Mar 2009 - 9:33 pm | ब्रिटिश टिंग्या

संसारातुन? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2009 - 8:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ हो, जंगी कार्यक्रम झाला वाटतं ! चखन्याला कोळंबी......मस्त रे !
फोटु रिपोर्टींग मस्तच..मला वाटलं विकांताचं विडंबनच आहे की काय :)

-दिलीप बिरुटे
(चखण्यावर भर देणारा )

१५ मिनिट च्या अंतरावर होतो आणि वाईट गोष्ट म्हणजे हा सगळा मेनू मला माहित होता पण मला हजर रहाता आलं नाही..(तात्या माझी काय अवस्था झाली असेल इमॅजिन करा!)
एकूणच तुम्ही तुफान ऐश केलेली दिसते!

तुमची तिकडे ऐश चालू असताना मी बायकोच्या मैत्रीणी साठी पनीर रॅप करत होतो :(

परत कधी भेटायचं आहे? लवकरातला मुहुर्त ठेवा.. नवीन वर्षातला (गुढीपाडव्या नंन्तर चा) पहिला विकांत कसा वाटतो?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Mar 2009 - 11:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खल्लास! वर्णनही भारीच.

नाटक्याशेट, तुम्ही एकदम छुपे कलाकार निघालात, कधी येताय भारतात?

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

गणपा's picture

16 Mar 2009 - 1:06 pm | गणपा

लाडुशेठ एकदम जबरा फोटु. मस्त रंगलेला दिसतोय तुम्चा कट्टा.
तेवढ त्या कॉकटेल्सच्या रेशिप्या लवकर टका राव.

बबलु's picture

16 Mar 2009 - 1:07 pm | बबलु

एकूणच तुम्ही तुफान ऐश केलेली दिसते!
अरे एक.... खल्लास ऐश केली. तू यायला हवं होतास.
नाटक्या हा मनुष्य जबराट "साकीया" आहे. त्याने बनवलेली कॉकटेल्स ढोसून थोडं थोडं हवेत "त रं गा य ला" धमाल आली.
कोळंबी आणि फ्राईड राईस तर रंपाट एकदम !!!

परत कधी भेटायचं आहे? लवकरातला मुहुर्त ठेवा.
येत्या शनिवारी करायची का पार्टी (२१ मार्च) ? काय म्हंताव ? बेला/नाटक्या... ??

....बबलु

छोटा डॉन's picture

16 Mar 2009 - 1:20 pm | छोटा डॉन

>>कोळंबी आणि फ्राईड राईस तर रंपाट एकदम !!!
हा हा हा, "रंपाट" हा शब्द खुप दिवसांनी ऐकला ...
कोल्हापुरचे का ?

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

बबलु's picture

16 Mar 2009 - 1:31 pm | बबलु

हा हा हा, "रंपाट" हा शब्द खुप दिवसांनी ऐकला ... कोल्हापुरचे का ?

आम्ही मुंबईचे. पण मला वाटतं कुणा कोल्हापुरी मस्तमानवा कडूनच ऐकला होता हा शब्द १०-१२ वर्षांपूर्वी. :)

असाच अजून एक शब्द:-- रापचीक-रबाडा (ठाण्यात पहिल्यांदा ऐकला होता).

....बबलु

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Mar 2009 - 1:42 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!!!!!

कसली जंगी तयारी आणि भारी भारी फोटू.... जबरदस्त.

बिपिन कार्यकर्ते

सुनील's picture

16 Mar 2009 - 1:51 pm | सुनील

मस्त झालाय की तुमचाही वीकांत!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

16 Mar 2009 - 2:06 pm | सुनील

मस्त झालाय की तुमचाही वीकांत!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश's picture

16 Mar 2009 - 2:09 pm | स्वाती दिनेश

मस्त रे बेला, झ्याक दिसतय की सगळंच.. अदिती म्हणते तसे नाटक्याराव छुपे कलाकार निघाले की,:)
त्यांच्याकडच्या गौरींचे फोटू आणि वर्णन वाचलेलं आठवतय..:)
स्वाती

नाटक्या's picture

16 Mar 2009 - 9:16 pm | नाटक्या

लोक्स,

नाटक्याशेट, तुम्ही एकदम छुपे कलाकार निघालात, कधी येताय भारतात?

म्हणूनच माझे नाव 'नाटक्या' असे आहे. आधी 'साकिया' असे घेणार होतो पण त्याने ही कला सगळ्यांना झटकन कळली असती. बाकीच्या गोष्टीही अशाच हळूहळू कळवत राहीन. (काय आदिती, बरोबर ना?)

हे आता सगळ्यांना कळलेच आहे, तर मी एक माझा नवीन प्रोजेक्ट सांगतो.

दर आठवड्याला शुक्रवारी दोन नवीन कॉकटेल्स मिपावर टाकण्याचा विचार आहे, एक अल्कॉहोलिक आणि एक फक्त फळांच्या सरापासून बनवलेले शुध्द, सात्वीक आणि पौष्टीक कॉकटेल. कशी वाटते कल्पना?

जर तुम्हाला कुठल्या विशिष्ट फळांचे कॉकटेल हवे असेल तर मला व्यनीने कळवा, मी ते टाकण्याचा प्रयत्न करीन. तात्यांना मी या बाबतीत बर्‍याच दिवसांपुर्वी विचारले होते आणि त्यांनी मोठ्या मनाने मला परवानगीही दिलेली आहे. मी फक्त नारळ फुटण्याची वाट बघत होतो, तो ही या पार्टीच्या निमित्याने फोडून झाला आहे.

आता पार्टी बद्दल: ह्या पार्टीमध्ये मी ४ कॉकटेल्स बनवली होती. अर्थात सगळेच तळीराम असल्याने चारही कॉकटेल्स मध्ये सढळपणे मदिरा ओतली होती हे सांगणे नलगे.
१. मार्गारिटा: मेक्सिकन पेय, फारच सुंदर लागते, नॉन-अल्कोहोलिक सुध्दा बनवता येते.
२. स्पायसी-कुल व्होडका
३. बहामा फ्रेश
४. स्वीट-सॉर रम

यांच्या पाककृती लवकरच येत आहेत.

- नाटक्या

फळांच्या रसापासून बनवलेले वाचायला तर नक्कीच आवडेल! :)

(खुद के साथ बातां : रंग्या, कालचं कॉकटेल अजून उतरलेलं दिसत नाहीये. नाही 'फळांच्या सरापासून' असं लिहिलं आहे म्हणून म्हणतो! ;) )

चतुरंग

नाटक्या's picture

16 Mar 2009 - 9:25 pm | नाटक्या

माझी उतरली की अशा चुका होतात, हात थरथरायला लागतो, बोलणे असंबद्ध होते. काही विचारू नका.

(स्वगत: च्यामारी कालची मात्रा कमी झाली बहुतेक, आज लवकर घरी जावून नवीन मात्रा शोधली पाहीजे)

- (तळीराम) नाटक्या

बेसनलाडू's picture

16 Mar 2009 - 11:03 pm | बेसनलाडू

अर्थात सगळेच तळीराम असल्याने चारही कॉकटेल्स मध्ये सढळपणे मदिरा ओतली होती हे सांगणे नलगे.
:O [-(
नाही हो; फळांचे रस नसताना अस्मादिक मदिरेला हात-तोंड काहीही लावत नाही. आमचे सुरापान हे अशी कॉकटेल्स्, ख्रिश्चन मित्रमैत्रिणींच्या वाढदिवस/लग्नाचा वाढदिवस/लग्न अशा ठिकाणी रम् केक् चा/चे तुकडा/डे, भारत दौर्‍यावर जाताना प्रसिद्ध ड्यूटी फ्री दुकानांतून घेतलेली वाइन् घातलेली रेकमेन्डेड् चॉकलेट्स् अशा फसवाफसवीच्या (नकली?) माध्यमातूनच षठीसामाशी होत असते. आद्य श्री. तळीरामांबरोबर आमचे नाव घेणे हा तळीरामांचाच अवमान ;)
(सुधाकर)बेसनलाडू

नाटक्या's picture

16 Mar 2009 - 11:15 pm | नाटक्या

नाही हो; फळांचे रस नसताना अस्मादिक मदिरेला हात-तोंड काहीही लावत नाही.

छे हो!! त्या दिवशी तुमच्या कडे पाहून तसे नाही वाटले! आणि तुमची जी दाद मिळत होतो त्यावरून तर मला खरंच वाटत नाही...

काय मग 'एक' यांनी सुचवल्या प्रमाणे करायचा का आणखी एक कट्टा (अट्टलांचा कट्टा याला काही वेगळा शब्द शोधुन काढला पाहीजे)

- (अट्टल) नाटक्या.

बेसनलाडू's picture

17 Mar 2009 - 12:19 am | बेसनलाडू

अट्टलांच्या कट्ट्यासाठी अट्टाकट्टा हा शब्द छान वाटतो. गुढीपाडाव्याच्या शुक्रवारला लागून येणारा शनिवार ठीक वाटतो. आयत्या वेळी महत्त्वाचे काम अंगावर आले तर जमायचे नाही हा 'क्लॉज' आहेच :(
(कट्टेकरी)बेसनलाडू
छे हो!! त्या दिवशी तुमच्या कडे पाहून तसे नाही वाटले! आणि तुमची जी दाद मिळत होतो त्यावरून तर मला खरंच वाटत नाही...
म्हणजे अस्सल नाटक्या मीच आहे तर !! :) आता आपले नामाभिधान (नाटक्या) आम्ही आमच्याकडे घेतो ;) नाहीतरी माझी खाद्ययात्राच्या एका प्रतिसादात भाग्यश्रीताईंनी 'एक नाटक्या बेसनलाडू' म्हटलेच होते (ह. घ्या. सर्वांनीच!) :D
(नाटक्या)बेसनलाडू

भाग्यश्री's picture

17 Mar 2009 - 12:25 am | भाग्यश्री

चला म्हणजे ती उपाधी बरोबरच होती! :))

धमाल मुलगा's picture

17 Mar 2009 - 11:04 am | धमाल मुलगा

बेला, नाटक्या आणि बबलु,
एक नंबर अट्टाकट्टा केलेला दिसतोय :)

बेला धन्यवाद ह्या शॉल्लेट कॉकटेली सरंजामाचं छान वर्णन केलंत.

नाटक्या, मान गये उस्ताद. कॉकटेल किंग दिसताय आपण :)

बाकी, ही कॉकटेलं काय असतात नक्की, एकदा करुन पहायला हवं. गेल्यावेळी ऍड्याला म्हणालो तर तो म्हणाला, गप रे धम्या..आपण साले दारुत दारु घालुन पिणारे लोक, आपल्याला काय टिपणार ती कॉकटेलं? :)
नाटक्या शेठ, लवकर कॉकटेल कृती द्या बॉ! आम्हीही करुन पहावी म्हणतो :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::