(पाहिजे वीकांत मोठा)

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
7 Mar 2009 - 12:30 am

पाहिजे वीकांत मोठा
पाहिजे सोडा, टकीला
पाहिजे वोडका थोडी
पाहिजे पोकर, पसारा
होउ दे मग रात्र कितिहि
डाव हा खेळून जाउ
विसरुनी त्या सायबाला
उद्विग्नता उधळून देउ

मिटुनि तू डोळे तुझे रे
पापडी भरपूर खाशी
सोबतीला श्रिम्प थोडे
तू बशा घेऊन बससी
छेडुनी कोणा सखीला
हास्यकल्लोळात बुडवु
विसरुनी त्या सायबाला
उद्विग्नता उधळून देउ

तृप्तता नरड्यात थोडी
तृप्तता लीवर् मधेही
शांतता विश्वात सार्‍या
शांतता खोलीमधेही
सटकताना रामप्रहरी
काहिशी चलबिचल व्हावी
झोपलेल्या बांधवांची
थोडिशी चुळबूळ व्हावी
सोमवारी ब्याद परते
शुक्रवारी चाट देउ
विसरुनी त्या सायबाला
उद्विग्नता उधळून देउ

प्रेरणा: मित्रमंडळींचे शुक्रवार-शनिवार-रविवारचे 'स्केड्यूल्' आणि पुष्कराजांना हवा असलेला एकांत

कविताविडंबनजीवनमानराहणीमौजमजाप्रकटनविचारप्रतिसादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

7 Mar 2009 - 12:41 am | नाटक्या

पेटला आहात!! एका मागोमाग एक विडंबने करता आहात आणि ती पण व्होडका वगैरे घेऊन? तात्या हाणतील एकटेच प्यालात तर!!!

- नाटक्या

नंदन's picture

7 Mar 2009 - 12:49 am | नंदन

भर शुक्रवार दुपारी, पुढचा मोठा वीकांत अडीच-तीन महिने दूर असताना हे विडंबन वाचायला मिळाले :). पापड, टकीला, श्रिम्प, वोडका आणि पोकर - उत्तम कॉम्बो :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धमाल नावाचा बैल's picture

7 Mar 2009 - 5:44 am | धमाल नावाचा बैल

दारू मांसाहार आणि जुगार! उत्तम कॉम्बो !!
मस्त विडंबन.

घाटावरचे भट's picture

7 Mar 2009 - 8:03 am | घाटावरचे भट

हम्म्म्म.... व्होडका!!

रेवती's picture

7 Mar 2009 - 1:02 am | रेवती

मजेशीर आहे.

रेवती

बबलु's picture

7 Mar 2009 - 4:48 am | बबलु

अरे बेला... जरा धीर धर. शनिवारी (उद्याच) माझ्या घरी आपली पार्टी आहेच. नाटक्या काही innovative कॉकटेल्स करणार आहे.

....बबलु

सहज's picture

7 Mar 2009 - 6:34 am | सहज

जोरात!

अवलिया's picture

7 Mar 2009 - 9:20 am | अवलिया

आजकाल भलतेच जोरात आहात बेलाशेट ... :)

--अवलिया

विसोबा खेचर's picture

7 Mar 2009 - 9:53 am | विसोबा खेचर

अतिशय म्हणजे अतिशयच सुरेख काव्य..!

मनापासून केलेलं! जियो...!

तात्या.

चतुरंग's picture

8 Mar 2009 - 9:05 pm | चतुरंग

टकीला अन पोकर आवडला रे बेला! 'जाम' जमलेले विडंबन! ;)

चतुरंग

केशवसुमार's picture

8 Mar 2009 - 9:57 pm | केशवसुमार

बेलाशेठ,
उत्तम चालू आहे.. चालू दे..
केशवसुमार