द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)

पहाटवारा's picture
पहाटवारा in जनातलं, मनातलं
20 Dec 2019 - 4:18 am

आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात.

कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं.

वर्ष १९४९ मधला एक ब्लूग्रास बैंड 'द फॉगी माउंट्न बॉईज', संगीत दिग्दर्शक - अर्ल स्क्र्ग्ग्ज (Earl Scruggs) त्या गाण्याचे २००१ मधे पुन्हा एकदा रेकोर्डिंग झाले.
बँजो - स्वतः अर्ल स्क्रग्ग्ज, अकोस्टिक गिटार - स्टिव मार्टिन, दुसरा बँजो - विन्स गिल, पिआनो - जेरि डग्लस, इलेक्ट्रिक गिटार - मार्टी स्टुअर्ट, मेंडोलिन - गॅरि स्टुअर्ट. बघा, काय काॅम्बिनेशन आहे. अनेकदा दिग्गज एकत्र आले की सुसंवादाच्या अभावाने कार्यहानीच होताना दिसते पण इथेमात्र संगीतातलं जणू शिकागोच विलिस सेंटर उभं राहतं.

अर्ल स्क्रग्ग्ज अमेरिकन वाद्य संगीतातलं मोठं नाव. पन्नासच्या दशकात आपले बंधु जुनी आणी होरासच्या छायेतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करू पाहणारे बँजोवादक. पाश्चात्य आॅर्केस्ट्रेशनची उत्तम जाण असलेले पण स्वत:ची अशी शैली असलेले. त्यांनी या गाण्याला संगीत देताना त्यांनी या ज्ञानाचा उपयोग करून अनेकाविध वाद्यांचा एक सुंदर मेळा जमवला. हा संपूर्ण मेळा गाण्याच्या सुरूवातीपासूनच एक द्रूत लय पकडतो. बँजो, फिड्ल, पिआनो, गिटार, मेंडोलीन, बेस ही सारी तन्तूवाद्ये, अन हार्मोनिका हे फूंकवाद्य ठसठशीतपणे ऐकू येतात. त्यांना गती देतो एक कडक ड्र्म. या ड्र्मच्या कडकडाने संपूर्ण गाण्यातील सुरावटीला एक दणकट आधार मिळतो. यामुळे सुरावट त्यात कुठेही लोंबकळून राहत नाही. यात प्रत्येक वाद्य जणू आपली एक लय निर्माण करत त्या संगीत मालिकेतला स्वल्पविराम, अर्धविराम आणि पूर्णविरामच बनते.

या द्रूत लयीतल्या प्रवाहातून एक सुरावट अर्लचं नितांत सुंदर गीत आपल्यापर्यंत पोहोचवतो. प्रत्येक कलाकार त्याच्या वाद्याला साजेल अशीच या गाण्याची सुरावट वाजवतो. आजूबाजूच्या पार्श्वसंगीतातली द्रूत लय कुणालाही विचलीत करत नाही. प्रत्येक जण त्यांना दिलेली गीताची लय तसूभरही सैल सोडत नाहीत, जणू त्यांना खात्री आहे, संगीत दिग्दर्शक पार्श्वभूमीवर वेगाने चाललेला वाद्यमेळा त्यांना समेवर बरोब्बर भेटवणार आहे.

वाद्यसंगीत हे श्राव्य माध्यम असल्यामुळे खरंतर या गाण्यावर केवळ वादनाचा प्रभाव पडावा. परंतु पडद्यावर एक एक दिग्ग्ज हे गाणं जेव्हा वाजवतात, तेव्हा त्या गाण्यातल्या प्रत्येक सुरावटिच्या मागच्या वाजवणार्या हातंची करामत दाखवताना फार शोभून दिसतात. रँडि अन गॅरि स्क्रग्ग्ज इथे केवळ सोबतीला नाहित. त्यांची देहबोली, त्यांची नजर अन त्यांच्या वादनाची कलाकारि याद्वारे त्यांनी पडद्यावरील आपल्या पित्याच्या गाण्याला दिलेली दमदार सोबत बघून आयुष्यात असा दमदार सोबती बनण्याची कुणालाही इच्छा व्हावी.

अर्ल च्या दिग्दर्शनाबद्दल, या गाण्याच्या पिक्चरायजेशनबद्दल, टेकींगबद्दल काय सांगायचं? सायंकालीन स्टुडिओच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यात घेतलेल्या फ्रेम्स प्रत्यक्ष संगीताचे आदर्श छायाचित्रण म्हणून दाखवता येईल.

एकूणच हे गाणं या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्या अन्तरीचा एक ठेवा बनून जातं.

https://www.youtube.com/watch?v=yQIJuu3N5EY

आजचा दिवस सुखाचा जावो!

पहाटवारा

संस्कृतीकलासंगीतप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाआस्वादअनुभवशिफारसविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

20 Dec 2019 - 6:58 am | मुक्त विहारि

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

20 Dec 2019 - 7:38 am | तुषार काळभोर

ज्या मनस्वी पणे सगळ्यांनी परफॉर्म केलंय, मजा आ गया!

अप्रतिम वादक! अप्रतिम संगीत! आणि अप्रतिम जॅम!

धन्यवाद!

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Dec 2019 - 10:36 pm | अनिरुद्ध.वैद्य

काय परफॉर्मन्स होता!! अप्रतिम!!

बबलु's picture

1 Jan 2020 - 10:16 am | बबलु

Bluegrass is an amazing genre.

Check out this song "In Hell I'll Be In Good Company" by "The Dead South".

https://www.youtube.com/watch?v=B9FzVhw8_bY

पहाटवारा's picture

3 Jan 2020 - 5:42 am | पहाटवारा

+१ द डेड साऊथ साठि !

असाच एक मस्त पीस हे जेनर आवड्णार्यांसाठि..द डूएलिंग बँजो..म्हणजे आपल्या जुगलबंदि सारखे..
https://youtu.be/i5vfw5f1CZo