नेमेची येतो मग संकल्प

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
18 Dec 2007 - 7:10 am

नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प.

१५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?"
आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरूवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत नाही. सगळे नेहमीचेच.

हो, जर मी ठरविले की दररोज सकाळी लवकर उठायची सवय लावीन, तर प्रयत्न करू शकतो. पण कामावरून उशीरा आल्यावर कसले लवकर उठणे आणि कसला संकल्प. व्यायामाचेही तेच.

गेल्या (ह्याच) वर्षाचेच बघा की, कार्यालयातील कामाचा आढावा, मिटींग, पुढील कामे लिहिण्याकरीता एक प्लॅनर विकत घेतला. पण तो प्लॅनर नीट वापरणे जमलेच नाही. कारण काय तर एका कामातच एवढा गुंतलो की पुढे काय करायचे तेच ठरवता आले नाही. मग प्लॅनर मध्ये काय लिहिणार? @^%&@^@((@#%">%&@^%

बरं मग, दुसऱ्याला त्रास न देणे ठरवावे का? अरे, मी काही एवढा वाईट नाही आणि खरे तर मी कोणाला त्रास देतच नाही. तेच स्वत:च येतात त्रास करून घ्यायला. ;) जसे मागील आठवड्यात ठरवले होते की ह्या आठवड्यात शांत रहायचा प्रयत्न करीन. पण कसले काय, नेमके ह्याच सौजन्य सप्ताहात लोक असे विचित्र वागतात की ... (काय गरज होती त्या कार वाल्याला रस्त्यात गाडी पार्क करून जायची? )
एक आठवडयाचा संकल्प पाळता येत नाही, निघाला नवीन वर्षाचा संकल्प करायला.

पण काय करणार, जगाप्रमाणे वागायला पाहिजेच. मग करूया की नवीन वर्षाचा संकल्प.
काय करूया बरं?

एक करू शकतो, नवीन संकल्प न करण्याचा संकल्प किंवा मग परिस्थितीनुसार नेमके वागायचा आणि मग खंत न करायचा संकल्प.

मग, तुमचा काय आहे नवीन वर्षाचा संकल्प?

हे ठिकाणजीवनमानतंत्रराहणीप्रकटनप्रतिसादशिफारससल्लाअनुभवप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

सर्किट's picture

18 Dec 2007 - 7:27 am | सर्किट (not verified)

केलेले सगळे संकल्प वाया जातात, म्हणून यापुढे कुठलाही संकल्प न करणे हाच माझा संकल्प..

(मी नववर्षाला संकल्प करत नाहीच. माझ्या वाढदिवसाला संकल्प करायचो. पण आता तेही करणे सोडले आहे..)

कुठलेही संकल्प करायला काहीही लागत नाही, तो संकल्प पाळायला मात्र धैर्य लागते. छोट्या छोट्या गोष्टींनी सगळे संकल्प लांबणीवर टाकून संकल्पांबद्दल आणिबाणी घोषित करावी लागते..

एवढे सगळे हवेच कशाला ? त्यापेक्षा संकल्प करणे सोडणे, हेच उत्तम !

- सर्किट

विसोबा खेचर's picture

18 Dec 2007 - 9:07 am | विसोबा खेचर

देददत्तराव,

गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही!

हे आमचं ब्रीद असल्यामुळे आम्हीही कधी कुठला संकल्प करत नाही! आयुष्य जिथे घेऊन जाईल तिथे चुपचाप त्याचा हात धरून त्याच्यासोबत जातो! :)

तात्या.

विजय पाटील's picture

18 Dec 2007 - 12:31 pm | विजय पाटील

एक करू शकतो, नवीन संकल्प न करण्याचा संकल्प किंवा मग परिस्थितीनुसार नेमके वागायचा आणि मग खंत न करायचा संकल्प.

असा असावा संकल्प, कारण संकल्प पुर्ण झाला नाही म्हणत दु:ख करण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीशी सामना करून नेमके काय करावे याचा विचार करावा.

-विजय