या ऊन्हाळ्याच्या शेवटाला आमच्या घरापासून जवळच असलेल्या "बिग सर" पॅसिफिक सामुद्रिक Scenic Highway ला गेलो होतो.
मस्त प्रकरण आहे हे ! अतिविशाल पॅसिफिक समुद्र, क्यालिफोर्नियाची नयनरम्य coastline आणि उत्कृष्ट हवामान.
त्यातलेच काही फोटू.... कॅमेरा-- सोनी DSC100 (आपला साधा डिजिटल).
सर्वांना दीपावलीच्या अनेकानेक शुभेच्छा !!!!
--बबलु
प्रतिक्रिया
26 Oct 2008 - 5:06 pm | बेसनलाडू
बबलु, सगळे शॉट्स् अशाच ठिकाणी घेतले आहेस, जिकडे मीही गेल्या जानेवारीत काही क्षण टिपले होते. बहुदा हे स्पॉट्स छायाचित्रणासाठी सर्वदूर सुप्रसिद्ध असावेत. सगळेच पर्यटक याच ठिकाणी कसे काय फोटो काढतात बॉ?!
लेका, तुझ्या या चित्रांमध्ये प्रसिद्ध 'बर्ड् रॉक्' आणि 'द लोन् सायप्रस्' कसे दिसले नाहीत? :(
आमच्या प्यासिफिक कोस्टल १७ माइल ड्राइवची काही चित्रे सवडीने चढवेन :)
(पर्यटक)बेसनलाडू
27 Oct 2008 - 1:28 am | फटू
बबलू राव,
जबरदस्त आहेत सगळे फोटो...
आम्ही तो सुर्यास्ताचा फोटो ढापला सुदधा... (स्वगतः लेका का फोटो ढापतो रे... एकदा जाऊन ये की स्वतः, तुझ्यापासून फार दुर नसेल ते...)
सतीश गावडे
मी शोधतो किनारा...
27 Oct 2008 - 3:00 am | नंदन
आहेत, फोटोज. चक्रपाणि (बेसनलाडू) म्हणतो तसे, ही ठिकाणे फोटोसाठी प्रसिद्ध आहेत. अजून थोडं दक्षिणेला गेलात तर ज्युलिया फायफर स्टेट पार्क आहे. तिथे समुद्रकिनार्याजवळच एक धबधबा आहे. फार छान आहे, ते ठिकाणही.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 Oct 2008 - 3:06 am | भाग्यश्री
वा काय भारी चित्रं आहेत!! फार्फार आवडली!!
आमचं अजुन जाणं झालं नाही, आता उत्सुकता वाढली!!
बेला, १७ माईल्स ड्राईव्ह ड्राईव्ह आणि लोन सायप्रस वगैरे ठीकाणे बेस्ट आहेत..
तेही फोटोज चढवा.. :)
27 Oct 2008 - 3:15 am | मदनबाण
व्वा.. ए वन फोटोज्..बबलुजी जबरदस्तच काढले आहेत सर्व फोटो..आपल्याला लई आवडले पहा.. :)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
27 Oct 2008 - 7:53 am | चतुरंग
समुद्र तसा मला नेहेमीच भुरळ घालतो आणि ही चित्रे तर रमणीयच आहेत! धन्यवाद रे मित्रा!!
चतुरंग
27 Oct 2008 - 11:51 am | सहज
अतिशय सुंदर फोटो.
अवांतर - बेसिक इंस्टिंक्ट मधील काही चित्रीकरण [कार चेस] येथेच झाले होते ना?