हिशेब हिशेबाचा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
3 Sep 2016 - 6:36 am

आमची प्रेरणा
मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरताना माझ्या मित्राची भाची रुचिरा रस्त्यावरील शाहरुकच्या पोस्टर समोर उभी राहून, तोंडाचा चंबू करत सेल्फी घेताना दिसली. हाय - हॅलो झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन अपार्टमेंट घेतले आहे. एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. तिचा नवरा चिन्मय (माझ्या दुसऱ्या एका मित्राचा मुलगा) लहानपणी आमच्या मांडीवर खेळलेला असल्याने आम्हा दोघांना त्यांचे नवीन घर बघण्याची फार उत्सुकता होती.

आम्ही सगळे घर बारकाईने बघितले. कुठे काय कसे घर सजवले आहे हे बघत आम्ही नवरा-बायको आपसात बोलत होतो. ऋतुजा ( तिची मुलगी) कुठल्या शाळेत जाते ? आम्ही विचारले, पण तिने तिकडे दुर्लक्ष केले. रुचिराकडे तीन मोबाईल आहेत. एक खास सेल्फी आणि व्हाट्सअँप साठी, एक टॅब फेसबुक आणि सिरियल्स बघण्यासाठी आणि एक ऋतुजाला कार्टून्स बघण्यासाठी. माय-लेकी सकाळपासून रात्रीपर्यंत त्यातच बिझी असतात. भूक लागली की पिझ्झा, चिप्स, कोक मागवून घेतात... आणखी काही करायला वेळच मिळत नाही ... वगैरे कौतुकाने सांगत होती.

या गप्पा चालू असतानाही तिचे माना वेळावून सेल्फी घेणे, त्या लगेच व्हाट्सअँप वर पाठवणे वगैरे चालूच होते. त्यातूनच क्षणभराची गॅप पकडून मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला घेऊन फिरायला गेला आहे. चिन्मय हा एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे, हे मला ठाऊक होते, पण नवीन घराचे मात्र आजच कळत होते. .

मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो, ब्रेकफास्ट तयार करतो, तिला आठवड्याची अंघोळ घालतो, सर्वांसाठी स्वयंपाक करून जेवायला वाढतो. दोन दिवस घराची पूर्ण साफसफाई, कपडे धुणे वगैरे त्यानेच करायचे. शनिवार रविवार मला पूर्ण फ्री.

माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो, कारण व्हाट्सअँप, फेसबुक आणि सिरियल्स मधून तिला इतर काही करायला तिला अजिबात फुरसत नसते हे तिने सांगितलेच होते.

बाहेर पडल्यावर बायको म्हणाली ही घरीच तर असते (होम मेकर आहे). नवरा बिचारा पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो, भरपूर पैसे मिळवतो. ही इथे हिरॉईन सारखी राहते. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.

तीन मोबाईल असल्याने नऊ हजार रुपये वायफाय आणि मोबाईल डाटावर खर्च करते आहे. मुलगी चार तास शाळेत असते, त्या वेळात ती आपल्या मैत्रिणींबरोबर मॉल्स मध्ये शॉपिंग आणि किट्टी पार्टी वगैरे आटोपते, किंवा माहेरी जाऊन बसते... पाची दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवऱ्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा ?

मी अजून विचार करतो आहे.आपल्याच मित्राची भाची आहे. ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर?

संस्कृतीविनोदसाहित्यिकसमाजराहणीराहती जागामौजमजाप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

3 Sep 2016 - 6:57 am | चांदणे संदीप

"विरंगुळा" असे शेवटी वाचनात आल्याने तोच करवून घेतला आहे!
यापेक्षा जास्त बोलवत नाही. असो, चला.... पुढे!

Sandy

मराठी कथालेखक's picture

3 Sep 2016 - 10:42 am | मराठी कथालेखक

बरं... पाच दिवस घराची साफसफाई, धुणी-भांडी कस होत ? टॅब्समधून डाउनलोड होत का ?
आणि जर पाच दिवस पिझ्झा चिप्स खावून काम भागत तर मग दोन दिवस स्वयपाक काय फक्त नवर्‍याला त्रास द्यायलाच का ?

क्षमस्व's picture

3 Sep 2016 - 11:16 am | क्षमस्व

+११११११

क्षमस्व's picture

3 Sep 2016 - 11:16 am | क्षमस्व

+११११११

एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली>>>>>>>
हुचभ्रू मोड ऑन!
जराही मॅनर्स नाहीत त्या ओल्ड फेलोला! असा कसाही कुणाच्याही अपार्टमेंटमध्ये जाण्याचा आग्रह करतो?
हुचभ्रू मोड ऑफ!

चित्रगुप्ताचा हिशेब हँहँहँ।

चित्रगुप्त's picture

3 Sep 2016 - 5:50 pm | चित्रगुप्त

'आजकालच्या काही मुलींची विचारसरणी कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न' असलेला डॉ. खरे यांचा लेख वाचून नकळत माझ्या नजरेसमोर मी बघितलेल्या आजकालच्या काही नवविवाहिता तरळून गेल्या, त्यातून हा धागा निर्माण झाला आहे. इथे मी जे लिहीले, ते काहीसे अतिरंजित असले, तरी आजच्या वास्तवाच्या ते फार जवळ आहे, हेही खरे. अर्थात आजची बहुतांश जोडपी अतिशय मेहनती, समजदार, जबाबदार असतात हे खरे, त्यामानाने मी लिहिलेल्यासारख्यांचे प्रमाण अगदी कमी असले तरी ही वृत्ती मात्र वाढत चालली आहे, असे निरिक्षण आहे.

संदीप डांगे's picture

3 Sep 2016 - 6:59 pm | संदीप डांगे

सॉरी टू से... पण म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं आहेत ही. तुमच्या लहानपणी जे म्हातारे होते तेही सेम टु सेम अस्साच विचार करत होते. त्यामुळे हे प्रतिसादातले विचार एका चिरंतन सत्याचा अविष्कार आहेत,

ते चिरंतन सत्य म्हणजे "काळ कोणताही असो, लोक सारखेच असतात."

चित्रगुप्त's picture

3 Sep 2016 - 8:22 pm | चित्रगुप्त

डांगे साहेब, सॉरी कशाला हो ? माझं वय आहेच पासष्ठ वर्षे. प्रकृती उत्तम असेल आणि आर्थिक विवंचना नसेल (अर्थात या दोन्ही गोष्टींसाठी कमालीच्या जागरुकतेने जगावे लागते) तर म्हातारपणासारखं दुसरं सुख नाही बघा. एकाद्या छंदाला, कार्याला वाहून घेऊन त्याचा पाठपुरावा करत आयुष्य घालवणं वेगळं आणि व्हॉट्सॅप, सिरीयल्स बघणं यात वेळ घालवणं यात मूलतः फरक हा आहेच. कुणीतरी प्रचंड आर्थिक फायदा मिळवण्यासाठी रचलेल्या सापळ्यात अलगदपणे सापडून त्यात आपलं बहुमोल आयुष्य घालवणं यात कोणते शहाणपण आहे ? आवड आणि औचित्य यातील फरक समजणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे.

संदीप डांगे's picture

3 Sep 2016 - 8:36 pm | संदीप डांगे

साहेब, तुम्ही तुमचे जीवन सांगताय, त्याबद्दल कोणतीही टिप्पणी नव्हती केली मी, उपरोक्त प्रतिसादाची संभाव्य कारणे सांगितली, वयानुसार माणसाचे विचार त्या त्या लेवल चे होतात, "हल्लीची पिढी, आजकाल" असे शब्द आपल्या बोलण्यात यायला लागले की समजावे आपण खवट म्हातारे होत चाललोय, यात वयाचं नाही तर विचारांबद्दल निरीक्षण आहे, काही वृद्ध 90च्या वयामध्येही विचारांचे तारुण्य राखून असतात, काही पन्नाशीच्या आतच आजोबागिरी करायला लागतात,

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 12:08 am | सुबोध खरे

डांगे अण्णा
"पण म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं आहेत ही"
"आपण खवट म्हातारे होत चाललोय",

हे आपले प्रतिसाद उद्धट किंवा उर्मट पण कडे झुकतो आहे असते वाटते.
त्या तुलनेत चित्रगुप्त साहेबांचा हा प्रतिसाद पहा
"आवड आणि औचित्य यातील फरक समजणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे".
चार बुकं वाचलेला भिक्षुक आणि
दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न
यातील हा फरक आहे

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 2:45 am | संदीप डांगे

ब्वॉर्र!

अमितदादा's picture

4 Sep 2016 - 12:23 am | अमितदादा

आपला हा प्रतिसाद आवडला. चार बुक वाचून हा शहाणपणा येणार नाही हे खरं आहे.

अमितदादा's picture

4 Sep 2016 - 12:24 am | अमितदादा

वरील प्रतिसाद चित्रगुप्त सरांना आहे.

क्षमस्व's picture

4 Sep 2016 - 2:34 pm | क्षमस्व

+11111

क्षमस्व's picture

4 Sep 2016 - 2:36 pm | क्षमस्व

dange saranna

अभ्या..'s picture

3 Sep 2016 - 5:56 pm | अभ्या..

अरे वा मस्तच की.
असं लाईफ पाह्यजे राव.

सुबोध खरे's picture

3 Sep 2016 - 7:47 pm | सुबोध खरे

वस्तुस्थिती दर्शविणारा लेख
काही लोकांमध्ये व्हॉट्स अँप चे व्यसन पार टोकाला पोहोचले आहे. तीन दिवसापूर्वी च एक २४-२५ वर्षाची गरोदर मुलगी रक्तस्त्राव होतो म्हणून आपल्या मोठ्या बहिणी बरोबर सोनोग्राफी साठी आली होती. सोनोग्राफी चालू झाल्यावर मोठी बहीण व्हॉट्स अँप मध्ये मग्न झाली. सोनोग्राफी मध्ये बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येईपर्यंत त्या मुलीच्या जिवात जीव नव्हता. ठोके दिसू लागले आणि ऐकू लागले आणि त्या मुलीचा बांध फुटला आणि ती मुसुमुसु लागली. दोन दिवसांचा ताण एकदम कमी झाला होता. पण तिची बहीण व्हॉट्स अँप वर काही तरी पाहत स्वतःशी हसत होती. पूर्ण सोनोग्राफी होईपर्यंत ती आपल्या बहिणीला धीर देईल असे मला वाटले होते. मी त्या मुलीला धीर दिला सर्व काही ठीक आहे सांगितले तरीही बहीण थंडपणे व्हॉट्स अँप वरच होती.
हे टोकाचे उदाहरण आहे परंतु आपण जे लिहिले आहे त्यात भरपूर तथ्य आहे यात शंका नाही.
माझ्या दवाखान्यात येणाऱ्या मुलांना गप्प बसवण्यासाठी मोठ्या आवाजात व्हिडीओ लावून देणारे कित्येक पालक रोजच्या पाहण्यात आहेत. आजूबाजूच्या रुग्णांना त्रास होईल हे त्यांच्या खिजगणतीतहि नसते.
दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाच्या बाबत आजकाल लोकाना काहीही वाटेनासे झाले आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Sep 2016 - 8:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

"वृत्ती"च्या गोग्गोड अन त्यातल्या त्यात प्लॉझीबल कारणाखाली "हल्लीची पिढी" नामक ठराविक बिलं फाडलेली अजिबात आवडलेली नाहीत, ह्यात स्त्री आहे म्हणूनच नाही तर तरुण मुलग्याबद्दलही असते तरीही मी असाच बोललो असतो. त्यात डॉक्टर खरेंसारख्या सुजाण मनुष्यालाही आपल्या क्लिनिकच्या परिघातली सीमित उदाहरणे पाहून सार्वत्रिकरण करावे वाटले, ह्याचे अजूनच वाईट वाटले.

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 12:13 am | सुबोध खरे

बापूसाहेब
आमचा परिघच काय पण विचारसरणी सुद्धा संकुचित आहे. सीमितच कशाला?
जे दिसतं ते तसंच मांडतो.
एखाद्या अत्यंत ताणाखाली असलेल्या मुलीच्या पाठीवरून हात फिरवण्याऐवजी डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये व्हॉट्स अँप पाहणारी मोठी बहीण पहिली आणि ते १०० % चक्षुर्वैसत्य उदाहरण दिले.
उद्या मंदिरात सुद्धा आरतीच्या वेळेस हेच पाहायला मिळेल यात आश्चर्य ते काय?
जाऊ द्या झालं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 7:25 am | कैलासवासी सोन्याबापु

बापूसाहेब
आमचा परिघच काय पण विचारसरणी सुद्धा संकुचित आहे. सीमितच कशाला?

कबुली जवाब दिल्याबद्दल धन्यवाद सर! ह्यापुढे हे लक्षात ठेऊनच बोलले जाईल. :)

जाता जाता

तुम्ही स्वतः पाहिलेले उदाहरण म्हणून तुम्ही त्या उदाहरणाचे सार्वत्रिकरण करून पूर्ण पिढीच जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केलीत तर ती चूक आहे(च). तुमच्या क्लिनिक मध्ये आलेल्या एका पोरीवरून तुम्ही एका पिढीची मापे काढलीत ते सर्वथैव चूकच आहे, खरे तर हा प्रश्न सार्वत्रिक आहे! तरीही क्लिनिक सेंट्रीक बोलूयात, एकट्या तुमच्या मुलुंड वेस्ट मध्ये नुसती सुलेखा येलो पेजेस वर निबंधीत 20 पेक्षा जास्त डायग्नोस्टिक क्लिनिक अन प्रॅक्टिसिंग रॅडिओलॉजिस्टस दिसत आहेत, (सुलेखावर) अनरजिस्टर्ड किती असतील? प्रत्येकाने आपली "चक्षुर्वैसत्य" उदाहरणे जर सार्वत्रिक करायची म्हणली तर कठीण होऊन बसेल. शिवाय तुमचा आदर आम्ही करतो म्हणून तुम्हाला अंधपणे फॉलो करणे जमणार नाही सर, जिथे पडतात तिथे प्रश्न विचारणारच आम्ही, रुचले तर पहा, अर्थात तुम्हाला तुमचा मुद्दा(च) इतका जास्त फुलप्रूफ वाटतो, का तुम्ही कायमच "सानू की??" मोड मध्ये असता तो तुमचा प्रश्न झाला.

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 11:11 am | सुबोध खरे

वा बापूसाहेब,
आपण खोदकाम करून मुलुंड पश्चिमेला २० पेक्षा जास्त रेडीयोलोजिस्ट आहेत हे खणून काढलंत .
मग मी किती रुग्ण पाहतो तेही आपण शोधलं असेलच. म्हणजे माझा अनुभव किती आणि काय हे हि आपल्याला माहिती असेलंच.
बढिया है !
त्याखाली हेही लिहिलेले आहे.
हे एक टोकाचे उदाहरण आहे.
माझ्या दवाखान्यात येणाऱ्या मुलांना गप्प बसवण्यासाठी मोठ्या आवाजात व्हिडीओ लावून देणारे कित्येक पालक रोजच्या पाहण्यात आहेत. आजूबाजूच्या रुग्णांना त्रास होईल हे त्यांच्या खिजगणतीतहि नसते.
दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाच्या बाबत आजकाल लोकाना काहीही वाटेनासे झाले आहे.
असो .
बाकी डांगे अण्णांच्या मैफिलीत सामील झाल्यापासून आपले प्रतिसाद बदललेले आढळतात असे एक निरीक्षण आहे

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2016 - 11:23 am | प्रभाकर पेठकर

शिवाय 'शितावरून भाताची परिक्षा' हा वाक्प्रचार आहेच.
ह्यातही तुम्ही फक्त एक शितच तपासलं आहे. सर्व भाताचे कसे उदाहरण देता? तुम्हाला भात शिजलेला आहे असे वाटते म्हणजे आम्हीही तसेच मानायचं का? हे तुमचे वैयक्तिक मत आहे. त्याचे सार्वत्रीकरण का करताय? असे अनेक प्रश्न उभे करता येतील आणि चर्चा जगाच्या अंतापर्यंत चालू ठेवता येईल.

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 11:26 am | सुबोध खरे

पेठकर साहेब
जाऊ द्याहो
आता आपण लोक त्या अँग्री यंग जनरेशन चे राहिलो नाही.
कुठे समजावयाला लागला आहात .

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 1:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

अरेच्या! हे शितावरून भाताची परीक्षा मला म्हणाला होतात का पेठकर काका! ? एकंदरीत एका पेशंट वरून सार्वत्रिकारण झाले त्यावर बोलला असाल असे वाटून गेले मला!

असो, आमचा अभ्या म्हणतो तसेच म्हणतो

गणपती नंतर बदलणारे मी स्वभाव :)

अभ्या..'s picture

4 Sep 2016 - 2:05 pm | अभ्या..

:)

मारवा's picture

4 Sep 2016 - 2:33 pm | मारवा

असो, आमचा अभ्या म्हणतो तसेच म्हणतो
गणपती नंतर बदलणारे मी स्वभाव :)

हे वरती सोन्याबापु जे प्रतिसादात म्हणाले ते नेमक काय आहे कृपया स्पष्ट करावे हि विनंती.

म्हणी या दुधारी तलवारी सारख्या असतात.
एक म्हणते शितावरुन भाताची परीक्षा.
दुसरी म्हणते सुतावरुन स्वर्ग गाठणे.
त्यामुळे म्हणींचा वापर जोर लावण्यापुरताच सार्वकालिक सत्यासारखा नको.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 1:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

मग टोकाचे उदाहरण देऊन सार्वत्रिकारण कसे झाले सरजी??

बाकी डांगे अण्णांच्या मैफिलीत सामील झाल्यापासून आपले प्रतिसाद बदललेले आढळतात असे एक निरीक्षण आहे

मुद्द्यावर बोला की कश्याला ऍड होमिनेम करावे म्हणतो मी, मी कधीच कुठल्याच महफिलीत नसतो, आम्ही एकटेच होतो, आजही एकटेच आहोत, अन मुद्द्यावर बोलायला मांडा ठोकून बसलेले आहोत, त्यावर बोलायचे बघा जरा. प्रतिसाद बदलायचे म्हणालात तर आता फक्त उघड बोलतोय इग्नोर न करता, आता ते वाचून जर तुम्हाला ती कोण्या तिसऱ्याची महफिल वाटायला लागली असले तर तो तुमचा प्रश्न , माझा नाही :). निरीक्षणेच काढायची म्हणली तर असंख्य निघतात, उदाहरण सांगायचे झाल्यास तुमचेच घ्या, जोवर आम्ही (किंवा इतरही अनेक मेंबर) तुम्हाला येस सर, ओके डॉक म्हणत असतात तोवर सगळे आलबेल असते, तुमचा मुद्दा कोणी काँट्रॅडिक्त केला की तुम्हाला त्यात स्कोर सेटलिंग दिसते, आकस दिसते , तुम्ही आदरच्या पात्र आहात हा मुद्दा एक (तो आमच्यालेखी शाश्वत आहे) अन तुम्ही तुमचे मुद्दे चुकलेले असू शकतात हे मान्य करणे हा मुद्दा वेगळा , तुम्ही स्वतः दुसरा मुद्दा स्वीकारायला किती तयार आहात हे तुम्हीच स्वतःला विचारा सर, त्यात मी काय सांगणार!.

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 2:38 pm | सुबोध खरे

माझा मुद्दा यात कुठे आला ? मी फक्त " हे टोकाचे उदाहरण आहे परंतु आपण जे लिहिले आहे त्यात भरपूर तथ्य आहे यात शंका नाही." असे चित्रगुप्त साहेबाना लिहिले आहे.
डांगे साहेबांची भाषा नक्कीच खटकली . चित्रगुप्त साहेबांची कलेच्या क्षेत्रातील किंवा एकंदर आयुष्यातील प्रगती पाहता डांगे साहेबानी "म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं ,हे प्रतिसादातले विचार एका चिरंतन सत्याचा अविष्कार आहेत
खवट म्हातारे" इ भाषा वापरली ते काही पटले नाही.
डांगे साहेब कोण किती शिकलेले आहेत ते मला माहित नाही परंतु चित्रगुप्त साहेबांची फारशी माहिती नसताना त्यांच्या एक न पटलेल्या मुद्द्या वर हि अशी भाषा ?
तिथे जैन धर्मावर टीका करताना "नागडे" संत कि काहीतरी लिहिले. त्यांनी जर अल्पसंख्य समुदायाच्या भावना दुखावल्या म्हणून डांगे साहेब आणि मिपाच्या मालकांवर एफ आय आर दाखल केला तर ते निस्तरताना यांची पळता भुई थोडी होईल. (तो प्रतिसाद उडवण्यात आला आहे. )
६५ वर्षाचा माणूस हा केवळ ६५ चाच असेल असे नव्हे तर तो २५ वर्षाचा माणूस अधिक ४० वर्षे अनुभव असाही असू शकतो हे डांगे अण्णा विसरले आहेत.
असो. मी लिहिलेलें परत वाचून त्यात कुठे खोट आहे ते सांगाल का ? म्हणजे मी स्वतः ला सुधारून घेईन.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2016 - 2:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रतिसाद डांगेंना आहे का मला? डांगेंची जबाबदारी माझी नाही, मी माझ्यापुरता बोलू शकतो, अन तुमच्या प्रतिसादात डांगे उवाच डांगे उवाच सोडून काही दिसले नाही, पिन पॉईंट सांगा, माझ्या बद्दल मग काही स्पष्टीकरण देता येईल मला :)

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 2:54 pm | सुबोध खरे

तुम्ही त्या उदाहरणाचे सार्वत्रिकरण करून पूर्ण पिढीच जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केलीत तर ती चूक आहे(च).
याचे उदाहरण देता येईल का ? म्हणजे स्पेसिफिक शब्द कोणते ?

आपला वरील श्री डांगे संदर्भातील प्रतिसाद असा आहे.
डांगे अण्णा
"पण म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं आहेत ही"
"आपण खवट म्हातारे होत चाललोय",
हे आपले प्रतिसाद उद्धट किंवा उर्मट पण कडे झुकतो आहे असते वाटते.
त्या तुलनेत चित्रगुप्त साहेबांचा हा प्रतिसाद पहा
"आवड आणि औचित्य यातील फरक समजणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे".
चार बुकं वाचलेला भिक्षुक आणि
दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न
यातील हा फरक आहे

आणि दुसरा प्रतिसाद असा आहे ज्यात आपण म्हणता कि
डांगे साहेब कोण किती शिकलेले आहेत ते मला माहित नाही परंतु चित्रगुप्त साहेबांची फारशी माहिती नसताना त्यांच्या एक न पटलेल्या मुद्द्या वर हि अशी भाषा ?

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 2:56 pm | संदीप डांगे

काय झालं की काल रात्री भला मोठा मेगाबायटी लिहिला होता, तुम्हाला जे खटकलं त्याच्यावर, पण पूर्ण डिलीट मारला, म्हटलं का आपण त्या लोकांना समजावत बसायचे ज्यांना समजून घ्यायचंच नाही!

तुमची समजून घ्यायची इच्छा असेल तर आज रात्री परत लिहितो, have some patience till dark!

सुबोध खरे's picture

4 Sep 2016 - 2:58 pm | सुबोध खरे

आपण थोर सर्वज्ञ असे आहात. मी कुठे आपल्याशी वाद घालू. आम्ही जुन्या पिढीचे आहोत. सोडून द्या आणि माफ करा
आपण म्हणता तेच खरं.
इति लेखन सीमा

हाच फरक आहे आयटी आणि नॉन आयटीवाल्यात.

आयटी वाला मेगाबायटी काय टेराबाईटी प्रतिसादही लिहील. फक्त पोस्ट करायचा नसेल तर त्याचा बॅकप घेवून ठेवेल.

..आणि नॉन आयटी वाला... हॅ हॅ हॅ

(ह.घ्या)

बाकी आयटीवाल्या जनरेशनमध्येही फरक आहेत.. ते नंतर कधीतरी..!! ;)

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 3:43 pm | संदीप डांगे

रातीचा हंगोवर हो! दुसरं काय नाय, लाईफ में फस्ट टाइम कोई मेगाबायटी पोस्ट नई किया, पण ज्या टेबलावरचे बिल तिथेच पे करायचं त्यामुळे लिहावं लागणारच, आपण लै तंत्त्ववादी ;))

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2016 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

तिला आठवड्याची अंघोळ घालतो

आठवड्यातून एकदाच अंघोळ करणे/घालणे प्रकृतीच्या दृष्टीने बरे नाही असे सांगा त्या नवराबायकोंना ;) :)

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2016 - 1:44 am | प्रभाकर पेठकर

अगदी हेच म्हणणार होतो.

जेपी's picture

4 Sep 2016 - 11:28 am | जेपी

चित्र मिस केली..