मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १०)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
18 Sep 2008 - 1:01 am

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ९) - ह्याच भागात आधीच्या भागांचे दुवे दिलेले आहेत.
---------------------------------------------------------
'मधुशाला' हे मदिरेची भलावण करणारे स्वैर काव्य आहे इथपासून, ते थेट हे देशभक्तीपर काव्य आहे, इथपर्यंत टोकाची मते ऐकायला मिळतात.
त्यातला सत्यांश कोणता असे शोधायला गेले तर असे लक्षात येते की हे कोणती एकच कल्पना घट्ट धरुन त्याभोवती फिरणारे काव्य नाही तर मधुशाला हा शब्द ही मध्यवर्ती संकल्पना ठेऊन वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य करणारे हे काव्य आहे. त्यात आपलं आयुष्य, जन्म, मृत्यू, प्रेम, प्रेमी-प्रेमिका, सुख-दु:ख, देशप्रेम, निसर्गप्रेम, तत्त्वज्ञान असे अनंत विषय येऊन जातात. वरवर एकच वाटणारा कल्पनेचा रेशमी धागा इतक्या वेगवेगळ्या विषयांना गवसणी घालून कोठेही न तोडता फिरवून आणणे हे कसबी विणकराचेच हात करु जाणे! पाहूयात ह्यावेळी बच्चनांच्या प्रतिभेचा आविष्कार आपल्याला कुठे घेऊन जातो आहे ते -

दुतकारा मस्जिद ने मुझको कहकर है पीनेवाला,
ठुकराया ठाकुरद्वारे ने देख हथेली पर प्याला,
कहाँ ठिकाना मिलता जग में भला अभागे काफिर को?
शरणस्थल बनकर न मुझे यदि अपना लेती मधुशाला।।४६।

पथिक बना मैं घूम रहा हूँ, सभी जगह मिलती हाला,
सभी जगह मिल जाता साकी, सभी जगह मिलता प्याला,
मुझे ठहरने का, हे मित्रों, कष्ट नहीं कुछ भी होता,
मिले न मंदिर, मिले न मस्जिद, मिल जाती है मधुशाला।।४७।

सजें न मस्जिद और नमाज़ी कहता है अल्लाताला,
सजधजकर, पर, साकी आता, बन ठनकर, पीनेवाला,
शेख, कहाँ तुलना हो सकती मस्जिद की मदिरालय से
चिर विधवा है मस्जिद तेरी, सदा सुहागिन मधुशाला।।४८।

बजी नफ़ीरी और नमाज़ी भूल गया अल्लाताला,
गाज गिरी, पर ध्यान सुरा में मग्न रहा पीनेवाला,
शेख, बुरा मत मानो इसको, साफ़ कहूँ तो मस्जिद को
अभी युगों तक सिखलाएगी ध्यान लगाना मधुशाला!।४९।

मुसलमान औ' हिन्दू है दो, एक, मगर, उनका प्याला,
एक, मगर, उनका मदिरालय, एक, मगर, उनकी हाला,
दोनों रहते एक न जब तक मस्जिद मन्दिर में जाते,
बैर बढ़ाते मस्जिद मन्दिर मेल कराती मधुशाला!।५०।
---------------------------------------------

भावानुवाद

धिक्कारे मज मशिद बोलुनी दिसतो हा दारुवाला
मजला ठोकरणारे मंदिर बघते हातातिल प्याला
किती अभागी जगी मी तरी, कोण आसरा देइल हो?
शरणागत मी, जवळ घेऊनी स्वीकारे मज मधुशाला ||४६||

पथिक बनुनि मी भटकत राही, सहज मिळे मजला हाला,
सहज भेटतो कोठे साकी, सहज मिळे मजला प्याला,
सवंगड्यांनो वाट पाहण्या मला न किंचित कष्ट तरी,
मशिद ना मिळो, मिळो न मंदिर, मिळेल माझी मधुशाला ||४७||

सजली नाही मशीद आणिक भजे नमाजी अल्लाला,
सजून धजून ये मदिराप्रेमी, नटून थटून साकीबाला,
शेख, मुळीही तुलना नाही मदिरालय अन मशिदीची,
सदाच विधवा मशीद तुमची, सदा सुवासिनी मधुशाला ||४८||

येता कानी सूर पिपाणी नमाजी विसरे अल्लाला,
वीज पडे तरि मदिराप्रेमी ध्यानलुब्ध घे मदिरेला
शेख, सांगतो कटू सत्य हे, मशिदीला त्या ऐक तुझ्या
युगेच पुढली ध्यान शिकविण्या सज्ज पहा ही मधुशाला ||४९||

मुसलमान आणि हिंदू दोघे, एक तरी त्यांचा प्याला,
एक असे मदिरालय त्यांचे, असे एक त्यांची हाला,
असती दोघे एक जरी ना जाती मशिदी मंदिरी ते,
वैर वाढवी मशीद मंदिर, हृदय जोडते मधुशाला ||५०||

चतुरंग

हे ठिकाणआस्वादप्रतिभाभाषांतर

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 Sep 2008 - 2:05 am | प्राजु

सुरेख.
एक शंका..
दोनों रहते एक न जब तक मस्जिद मन्दिर में जाते,
बैर बढ़ाते मस्जिद मन्दिर मेल कराती मधुशाला!।५०।

इथे : दोघे एक असतात जोपर्यंत ते मंदिर मस्जिद मध्ये जात नाहीत... (अर्थात ते मंदिर मस्जिद मध्ये गेले की, दोघे वेगवेगळ्या धर्मांचे असतात आणि केवळ मधुशालेमध्ये ते एक असतात..) असा अर्थ अभिप्रेत असावा.

असती दोघे एक जरी ना जाती मशिदी मंदिरी ते,

याचा अर्थ असा मी घेतला की, जरी ते मंदिर मस्जिद मध्ये जात नसले तरी ते एक आहेत.. काहीतरी चुकतंय असं वाटतं आहे.
समजावून द्याल का प्लिज.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

असती दोघे एक जरी (जर) ना (नाही) जाती (गेले) मशिदी मंदिरी ते,

करड्या रंगातला भाग वाचला की गद्यातून अर्थ नीट स्पष्ट होतो!

चतुरंग

प्राजु's picture

18 Sep 2008 - 2:16 am | प्राजु

म्हणजे मी घेतलेला अर्थ बरोबर होता तर..
धन्यवाद.
पुढचा प्याला कधी??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

18 Sep 2008 - 3:09 am | धनंजय

बढिया!

मलाही प्राजुला कठिण गेलेली ओळ अन्वय लावायला कठिण गेली -
असती दोघे एक जरी ना जाती मशिदी मंदिरी ते,
ऐवजी
असती विभक्त जोवरि दोघे जाती मशिदी मंदिरि ते
किंवा
नसती दोघे एक जोवरी जाती मशिदी मंदिरि ते
असे चालेल का?

मुक्तसुनीत's picture

18 Sep 2008 - 3:21 am | मुक्तसुनीत

फेस भराभर उसळू द्या अन् काठोकाठ भरा पेला !
चतुरंगाच्या रंगी रंगू, आज लुटूया मधुशाला :-)

नंदन's picture

18 Sep 2008 - 3:39 am | नंदन

सहमत आहे. हा भागही आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

18 Sep 2008 - 7:44 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

स्वाती दिनेश's picture

18 Sep 2008 - 12:24 pm | स्वाती दिनेश

फेस भराभर उसळू द्या अन् काठोकाठ भरा पेला !
चतुरंगाच्या रंगी रंगू, आज लुटूया मधुशाला

सुनीतराव ए १!
चतुरंग,
हा पेला तर उत्तमच पण मधुशालेतला पुढचा प्याला लवकर भरा,:)
स्वाती

फटू's picture

18 Sep 2008 - 7:08 am | फटू

खुप छान भावानुवाद केला आहेस रे रंगा !!!

(हरिवंशरायजींच्या काव्याचा पंखा)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर's picture

18 Sep 2008 - 8:33 am | विसोबा खेचर

क्या बात है रंगा!

प्रत्येक ओळ सुंदर!

आज बर्‍याच दिवसांनी तुझी मधुशाला वाचायला मिळाली...

जियो...!

(मधुशालाप्रेमी) तात्या.

सुनील's picture

18 Sep 2008 - 9:06 am | सुनील

आजची सकाळ काही औरच! अजून चहाचा कप नाही हाती आला तोच धनंजय आणि चतुरंग यानी "पिलवली"!!

वैर वाढवी मशीद मंदिर, हृदय जोडते मधुशाला

खूप आवडले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2008 - 2:30 pm | भडकमकर मास्तर

आवडला...प्याला आवडला...
..
पुढचा पण लवकर येऊदे =D>
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनीषा's picture

19 Sep 2008 - 2:48 pm | मनीषा

सुरेख भावानुवाद ...

सवंगड्यांनो वाट पाहण्या मला न किंचित कष्ट तरी,
मशिद ना मिळो, मिळो न मंदिर, मिळेल माझी मधुशाला ... छान

मुसलमान आणि हिंदू दोघे, एक तरी त्यांचा प्याला,
एक असे मदिरालय त्यांचे, असे एक त्यांची हाला,
असती दोघे एक जरी ना जाती मशिदी मंदिरी ते,
वैर वाढवी मशीद मंदिर, हृदय जोडते मधुशाला .... सुंदर