मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ४)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ५)
---------------------------------------
मागच्या भागात आपण पाहिले की भौतिक सुखाच्या क्षणभंगुरतेची कल्पना येण्याकरता कवी आपल्याला साकी म्हणून आलेल्या मृत्यूचा दाखला देतोय!
मृत्यूच्या थैमानात सगळ्याचा नाश झाला तरी 'मधुशाला' अमर आहे असा कवीचा विश्वास आहे कारण ती निर्मिती आणि क्षयाच्या प्रक्रियेतलाच एक घटक आहे, वेगळी नाहीच!
पुन्हा एकदा त्या 'मधुशालेचे' आणि माणसाचे आदिम असे कोणते नाते आहे हे विषद करताना कवी एकदम तत्वज्ञानाच्या पातळीवर जातो आहे की काय असे वाटते.
हे तत्वज्ञान सोप्या शब्दात सांगितले आहे असे मला तरी वाटते. शब्दांचा चपखल वापर, जीवनातल्या आणि निसर्गाच्या जवळ नेणार्या अनुभवांचा उल्लेख हे हरिवंशराय यांचे आधीच्या रुबायांमधले वैशिष्ठ्य पुन्हा एकदा जाणवल्याशिवाय रहात नाही.
पाहूयात रुबाया २६ ते ३० -
---------------------------------------------------
एक बरस में, एक बार ही जगती होली की ज्वाला,
एक बार ही लगती बाज़ी, जलती दीपों की माला,
दुनियावालों, किन्तु, किसी दिन आ मदिरालय में देखो,
दिन को होली, रात दिवाली, रोज़ मनाती मधुशाला।।२६।
नहीं जानता कौन, मनुज आया बनकर पीनेवाला,
कौन अपिरिचत उस साकी से, जिसने दूध पिला पाला,
जीवन पाकर मानव पीकर मस्त रहे, इस कारण ही,
जग में आकर सबसे पहले पाई उसने मधुशाला।।२७।
बनी रहें अंगूर लताएँ जिनसे मिलती है हाला,
बनी रहे वह मिटटी जिससे बनता है मधु का प्याला,
बनी रहे वह मदिर पिपासा तृप्त न जो होना जाने,
बनें रहें ये पीने वाले, बनी रहे यह मधुशाला।।२८।
सकुशल समझो मुझको, सकुशल रहती यदि साकीबाला,
मंगल और अमंगल समझे मस्ती में क्या मतवाला,
मित्रों, मेरी क्षेम न पूछो आकर, पर मधुशाला की,
कहा करो 'जय राम' न मिलकर, कहा करो 'जय मधुशाला'।।२९।
सूर्य बने मधु का विक्रेता, सिंधु बने घट, जल, हाला,
बादल बन-बन आए साकी, भूमि बने मधु का प्याला,
झड़ी लगाकर बरसे मदिरा रिमझिम, रिमझिम, रिमझिम कर,
बेलि, विटप, तृण बन मैं पीऊँ, वर्षा ऋतु हो मधुशाला।।३०।
-------------------------------------------
भावानुवाद
एकदाच प्रतिवर्षी येई होळी घेउन ज्वाळेला,
एकदाच फुलबाजी झडते, लागे दीपांची माला,
याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी
दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६||
कुणास ठाउक नसे पिणे तरि, येता माणुस जन्माला
जगती येता, दूधच ओठी, कसा न जाणशी साकीला,
ह्याच कारणे जीवन प्राशुन धुंदित मानव राहि जणू
पाउल ठेवी जगती पहिले, तोच सापडे मधुशाला ||२७||
असो सुरक्षित द्राक्षवल्लरी, निर्मित असती मद्याला,
आणि धरेची काळी माती, बनवी सुरेच्या प्याल्याला,
असो तशिच मधुतृष्णा देखिल, ठाउक तिजला तृप्ति नसे,
असो खुशालहि मदिराप्रेमी, आणि तशिच ही मधुशाला ||२८||
क्षेमकुशलही माझे आहे, कुशल जरी साकीबाला,
मंगल आणिक अमंगलाचे भान नुरे ते प्रेमीला,
नका विचारु क्षेमहि माझे, मधुशालेला कुशल पुसा ,
नकाच बोलू 'राम-राम'ही, म्हणा तुम्ही 'जय मधुशाला' ||२९||
सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला
घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला,
रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू,
होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०||
चतुरंग
प्रतिक्रिया
15 Apr 2008 - 5:06 am | धनंजय
नेहमीसारखे मस्त.
(आता माझा नेहमीचा छिद्रान्वेष :-)
२६.
जगती जरि ह्या होळी-दिवाळी एकदाच तरी वर्षाला,
एकदाच फुलबाजी झडते, आणि दिव्यांची ती माला,
याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी
दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६||
पहिल्या ओळीतली दिवाळी काढून होळीलाच बलवान केले तर बरे होईल. दिवस आणि रात्र जसे समसमान वजनाचे, तसे हे दोन सण समसमान वजनाचे. शिवाय दिव्याच्या माळेला स्वतःचे क्रियापद द्यावे. नाहीतर दिव्याची माळ झडते असा विपरित अर्थ व्हायचा.
३०.
सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला
घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला,
रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू,
होउन वेली, तृण मी प्राशिन, वर्षा ऋतुसम मधुशाला ||३०||
"वर्षा ऋतुसम मधुशाला" ऐवजी "ऋतु वर्षेचा मधुशाला" किंवा "वर्षा ऋतूच मधुशाला" असे काही असावे.
बाकी सर्व रूपके, आणि "सम" घालून हीच एक उपमा केलेली खटकते.
"खटकते" म्हणजे काही फार नाही, हे सांगणे नलगे. छान चालू आहे.
15 Apr 2008 - 8:24 pm | चतुरंग
छिद्रान्वेषही बदल करण्यायोग्य वाटतात. धन्यवाद!
चतुरंग
15 Apr 2008 - 11:58 pm | विसोबा खेचर
एकदाच प्रतिवर्षी येई होळी घेउन ज्वाळेला,
एकदाच फुलबाजी झडते, लागे दीपांची माला,
याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी
दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६||
सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला
घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला,
रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू,
होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०||
वा! वा! नेहमीप्रमाणेच सुरेख अनुवाद...!
रंगा, तुझी ही मधुशाला म्हणजे मिपाच्या तुर्यातलं मोरपीस आहे रे!
तात्या.
17 Apr 2008 - 9:18 pm | चतुरंग
ह्या अनुवादाला मोरपीस बनवून माझ्यावरची जबाबदारी वाढवलीत!;)
चतुरंग
15 Apr 2008 - 11:59 pm | प्राजु
सुंदर..
सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला
घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला,
रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू,
होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०||
खूपच छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Apr 2008 - 12:27 am | चित्रा
आणि आवडतेही आहे.. सर्व वाचून झाल्यावर प्रतिक्रिया देईन, पण उत्तम प्रकल्प आहे.
16 Apr 2008 - 2:40 am | सुवर्णमयी
वाचते आहे, सर्व भाग आवडले,
सोनाली
17 Apr 2008 - 9:19 pm | चतुरंग
चतुरंग