मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ११) - ह्याच भागातून आधीच्या भागाचे दुवे मिळतील.
-------------------------------------------------------
रसिकांच्या अस्वादासाठी सादर आहे मधुशालेचा पुढचा भाग.
मधुशाला
वही वारूणी जो थी सागर मथकर निकली अब हाला,
रंभा की संतान जगत में कहलाती 'साकीबाला',
देव अदेव जिसे ले आए, संत महंत मिटा देंगे!
किसमें कितना दम खम, इसको खूब समझती मधुशाला।।५६।
कभी न सुन पड़ता, 'इसने, हा, छू दी मेरी हाला',
कभी न कोई कहता, 'उसने जूठा कर डाला प्याला',
सभी जाति के लोग यहाँ पर साथ बैठकर पीते हैं,
सौ सुधारकों का करती है काम अकेले मधुशाला।।५७।
श्रम, संकट, संताप, सभी तुम भूला करते पी हाला,
सबक बड़ा तुम सीख चुके यदि सीखा रहना मतवाला,
व्यर्थ बने जाते हो हिरजन, तुम तो मधुजन ही अच्छे,
ठुकराते हिर मंिदरवाले, पलक बिछाती मधुशाला।।५८।
एक तरह से सबका स्वागत करती है साकीबाला,
अज्ञ विज्ञ में है क्या अंतर हो जाने पर मतवाला,
रंक राव में भेद हुआ है कभी नहीं मदिरालय में,
साम्यवाद की प्रथम प्रचारक है यह मेरी मधुशाला।।५९।
बार बार मैंने आगे बढ़ आज नहीं माँगी हाला,
समझ न लेना इससे मुझको साधारण पीने वाला,
हो तो लेने दो ऐ साकी दूर प्रथम संकोचों को,
मेरे ही स्वर से फिर सारी गूँज उठेगी मधुशाला।।६०।
---------------------------------
भावानुवाद
सागरमंथन करुन निघाली वारुणी बनली मग हाला
रंभेची पुत्रीच म्हणवते ह्या जगती साकीबाला
सुरासुरांनी जिला आणली, नष्ट काय तिज संत करी!
कोण किती आहे बलशाली खरिच जाणते मधुशाला ||५६||
कधी न ऐकू येते ह्याने स्पर्शियली माझी हाला
कधी न म्हणतो कोणी ह्याने उष्टियला माझा प्याला
बसुनि बरोबर सर्व जातिचे प्राशन करती लोक सुरा,
सुधारकांचे शंभर,सगळ्या काम करितसे मधुशाला ||५७||
श्रम, संकट,संताप विसरतो पिऊन जाता मद्याला
हेच असे तात्पर्य जरी, तू धुंद रहाण्याला शिकला
उगाच का तू बनशी हरिजन, मधुजन तू आहेस बरा,
धिक्कारति हरि मंदिरवाले, स्वागत करते मधुशाला ||५८||
एकप्रकारे स्वागत करते सगळ्यांचे साकीबाला
ज्ञानी वा अज्ञानी, नसतो फरक कवळता धुंदीला
रंक राव हा भेद कधीही करत नसे मदिरालयही
समानतेची प्रथम प्रचारक आहे माझी मधुशाला ||५९||
पुन्हा पुन्हा जरी पुढती येऊन आज न मागितली हाला
मुळीच समजू नकोस तू पण साधारण पिणार्याला
जरा उठू दे संकोचांचा पडदा मग तू बघ साकी
स्वरात माझ्या पहाच सगळी दुमदुमेल मग मधुशाला ||६०||
मधुशालेच्या मागल्या भागात आणि ह्या भागात अनेक कारणांनी प्रचंड अंतर पडल्याबद्दल क्षमस्व.
चतुरंग
प्रतिक्रिया
13 Jan 2009 - 4:07 am | धनंजय
वाटच बघत होतो.
14 Jan 2009 - 4:03 am | केशवसुमार
देर आये, दुरुस्त आये..
रंगाशेठ,
अजून किती बाकी आहे? संपवा लवकर..
भावानुवाद उत्तम..
केशवसुमार
13 Jan 2009 - 5:16 am | मदनबाण
मस्तच...
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
13 Jan 2009 - 9:00 am | विसोबा खेचर
क्या बात है रंगाभैय्या! सुरेखच अनुवाद!
उगाच का तू बनशी हरिजन, मधुजन तू आहेस बरा,
धिक्कारति हरि मंदिरवाले, स्वागत करते मधुशाला
या ओळी सर्वात आवडल्या!
(मधुशालाप्रेमी) तात्या.
13 Jan 2009 - 9:08 am | मुक्तसुनीत
बर्याच महिन्यांनी डवरलेय झाड. थोडे धुंदफुंद होऊन गेलो. :-)
लिखाळराव टागोरांचे दर्शन घडवताहेत. तुम्ही मधुशालेतून प्याले आणताय. मधल्यामधे उत्सव चालतोय आमचा.
13 Jan 2009 - 9:12 am | प्राजु
कालच विचार करत होते की, तुम्हाला मधुशालेची आठवण करावी. आणि आज मधुशाला समोर..
रंक राव हा भेद कधीही करत नसे मदिरालयही
समानतेची प्रथम प्रचारक आहे माझी मधुशाला ||
हे खूप आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
आवांतर : क्षमा मगितली आहे म्हणून माफ केले आहे तुम्हाला मिपाकरांनी, नाहीतर तुटून पडले असते उशिर केल्याबद्दल.
http://praaju.blogspot.com/
13 Jan 2009 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रंगासेठ, मस्त भावानुवाद !
शेवटच्या चार ओळी तर लैच भारी और भी आने दो !
-दिलीप बिरुटे
13 Jan 2009 - 6:57 pm | लिखाळ
छान अनुवाद. पुढचे भाग लवकर लिहा.
-- लिखाळ.
13 Jan 2009 - 9:19 pm | मृण्मयी
अप्रतीम भावानुवाद!
ह्या आधीचे भाग वाचून काढायचेत.
फार फार सुंदर !!
आपण फक्त 'मधुशाला'चेच भावानुवाद करताय की बाकी दोन (मधुबाला आणि मधुकलश) चे पण करण्याचा विचार आहे?
'मधुबाला'मधल्या माझ्या लाडक्या ओळी :
क्या केहेती(?) दुनिया को देखो
दुनिया देती लानत मुझको
हैं केहेती फिरती गली गली
'मदीरा पीने की लत मुझको'
दुनिया तो मुझसे हैं रूठी
हैं तुली हुई बद केहेनेको
गंगाजल जब मैं था पीता
कब दी उसने इज्जत मुझको
बदनाम रहे हो मंदीर हैं
फिरतो यह ठेहेरा मदीरालय
तेरा मेरा संबंध यही
तू मधुमय और मैं तृषित हृदय..
(शुध्दलेखनाच्या चुका झाल्यात! :( )
13 Jan 2009 - 9:27 pm | चतुरंग
सध्या तरी 'मधुशाले'त शिकतोय! :)
हे लवकरात लवकर पूर्ण करायचेय मग पुढे.
चतुरंग