अंधारात खस्स्स्स्स् स्स्कन् चादर ओढल्याचा भास झाला...
कोणाचतरी कारटं चादरीवर पसारलं असणार...
डोळ्यात धगधगीत आग आणि मनात कचकचीत शिव्या आल्या...
दारात उघड्यावर झोपलो होतो म्हणून त्या नुसत्या मनातच बरळल्या..
पुन्हा पुन्हा तिडीक उठवणारा तोच चादर ओढल्याचा भास...
कोण तडमडतोय रे चादरेवर... मरतोय नुसता **चा..
असशिल कोणाचा लाडाचा कारटा म्हणून झोपेचं खोबर का करतोय..
वात्रट मेलं नालायक कारटं कुणाच...
तोंडावरची चादर सारुन हळूच डोकावून बघितल तर ते गल्लीतल शेफारलेलं कुत्र होतं...
मग मी त्याच्या कंबरट्यात कच्चकन लाथ मारुन गप गुमान मुस्कटून झोपलो...
(आमचे प्रेरणास्थान फस्स्स्स्स्स्स्कन् ;) )
प्रतिक्रिया
12 Apr 2012 - 8:47 pm | मुक्त विहारि
आज विडंबन भुताने झपाटले आहे काय?
12 Apr 2012 - 9:03 pm | पैसा
=))