कवनरुपे कहाणी-श्री.अन्नक्षेत्र चिंचवड,मिपा खादाडवारी,संयोजक-मोदक ;-)
एक आहे गावं चिंचवड,तेथे मिपाची एक कावडं
अजोबा एक नातू सगळे,नाती काही असती...
मोदक नामे नवमिपाकरू,वल्ली मागे महामेरु
चिंचवडकरांसी आधारु,मिपा कट्टा करण्या...
तारीख सतरा वारं-शनिवार,रोजवूड मधला आहार
सायं-काली पक्ष्यांचा बहर,बरा होता तेथे बा... ;-)
आंम्ही पोहोचता मुक्कामी,प्रथम येवोनी थडकली चिमी
मोदका फोनवता आंम्ही,शीघ्र तो ही धावला...
मागोनी वल्ली आणी पक पकं,येताच अन्य कितिक...
मिपा परंपरेप्रमाणे,तेथे हलकल्लोळ जाहला...
हाटीलाचा तो द्वार-रक्षक,पाहे जणु मनुष्य भक्षक
आत चला,आत चला...असे,दरडावू तो लागला...
मग समस्तानी कालाजामुन हणुनी,उशिरा येणार्यास फोनवुनी...
आठ वाजले म्हणीता म्हणीता,अंतःपुर गाठला...
शोधले होते आधी टेबल, दहा जणांसी केवल...
परी मेंबर संख्या पहाता,खुर्च्या आणिक जोडिल्या
मग चर्चांना आला बहरं,,,विषय एकाहुनी एक कहरं
आजुबाजुचे यात्रेकरु...त्रासिक बहु जाहले...
हाटीलाचेही वेटर नामी..एकही ऑर्डर घेण्याकामी
पाणी वाटोनी ते हरकामी,अदृष्य कुठे जाहले... ?
मिपाकरांसी ही नामी संधी,,बराच येळं बसायची बंदी
या हाटीलास नाही बघुनी,,कल्लोळ माजवू लागले...
थोड्या समयानी मितान नामे,आल्या ताई मुक्कामे
प्रथम भेटता ओळखा सर्वांसी,चौ.रा.का---का(?) म्हणाले...
मग न्यहाळेनी सार्यांसी,नच ओळखे कोणासी..
ऐसे म्हणोनी स्वस्थानासी,विराजमान जाहल्या..
केली एकमेकांची ओळख,आयडी मुळनामे पाळख
दाटुन येता काळेख...पन्नास प्रकट जाहले...
पन्नासांसह चिरंजीव,दिसताची खुर्ची राखिव
टुण्ण-करुनी उडी मारुनी,बागडू आनंदे लागला...
फ्लाईंग व्हिजिटर दोन त्यात,सौरभ आणी प्र-शांत...
सूप- गफ्फा हणुनी आणिक,मार्गस्थ दोघे जाहले
अन्नपत्रका मधले उप-लब्ध,सूप स्टार्टर कितिकं
ठरवोनी प्रति-पाना गणिक,आर्डर देई मोदके ;-)
मग पुन्हा नेहमिची खेचाखेची,धाग्यांवरुन खोचाखोची ;-)
म्यानी काढोनी तलवारी,सारे युद्ध करो लागले...
बाजुचे पब्लिकं भय-भीतं, विचंलीत जाहले त्यांचे चित्त
सूपं स्टार्टरं मारोनी, वेटरानी त्यास सोडविले...
चौराकाका आणी आंम्ही,स्माई-ली टाकण्या वरोनी
एकमेकासी झणी,छळू लागलो वारं-वारे...!
आपुल्याच नामे स्माईली,कधी होती का-कुणी केली
तैसीची करावी सार्यांनी,प्रस्ताव ठेविती चौरा..का का(?) ;-)
मधेच आलेले मनोबा,आंम्हासी नच कळले बा...
एवढी काकांसह आमुची,स्मायल्या-नंदी टाळी लागली ;-)
पकपक नी वल्ली पलिकडे,हैदोस घालीती खडे-खडे... :-p
वेटरांसी आतल्या आत घडे,दृष्टांतू बाह्य मनांचा...
वेटरंही पन्नासांशी जाती,काय अंतरीची नाती
खाण्यासी जन्म जयांचा,ऑर्डरु लागले मेन-कोर्सी...
एक भाजी कोल्हा-पुरी,तिला दिधलेली मिर्च्यांची धुरी... :-p
अपुरीचं जरी मिळती, लोणचे म्हणुनी कामी येई
परी पनीराची भाजी,मटारासंगे ताजी ताजी..
चाखुन पहाती आजी-माजी,बोटे चाटती रोटीसंगे
नंतर व्हेजं ची बिर्याणी, बरी आहे,,म्हणती कुणी
पोटे भरता आणी,खिचडी आंम्ही म्हणलो बा... ;-)
अश्यारितिने स्वाहा-कार, करोनी सारे मेंबर...
उदरे येता ढेकर... पान खाण्या वळले बा...
पुन्हा भायेर तो रक्षक,भूतं-काळातील शिक्षक :-p
मला भासे तक्षक, आता सलामीण्यासी आला...
मितान आणी छोटुकली चिमी,गेल्या आपुल्या मुक्कामी
मग उरलेले आंम्ही, गप्पा हाणीत राहिलो...
उत्तर रात्र बहुत होता,,,स्वये दूर नगरे जाता
केला सर्वांसी टाटा,,,गुडनाईट..गुडनाईट म्हणोनी.. ;-)
ऐकोनी आत-म्या-चे कवन,कट्टेकर्यांनी करावे चिंतन..
आणिक करोनी मननं,प्रतिसादी जिलब्या पाडाव्या... ;-)
जमला काहो वृत्तांतू, कळवा-जीव होईल शांतू
नविन रुपे म्हणोनी,,,या सम हा लिहिला... :-)
०====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====०====०===
कट्टा नेहमीचाच,फोटोही नेहमी सारखे,पण दंगल मात्र नविन ;-)
ता.क.-अत्ता वेळे अभावी नावे ठेवण्याचा कार्यक्रम पुढे ढकलीत आहोत... ;-) (आठवली तेवढी ठेवली आहेतच ;-) )
आपला(च) अत्रुप्त आत्मा... :-)
१)हळुहळू-जमणारे (पानासारखे ;-) ) मिपाकर..
२)जादुचे प्रयोग करतांना,जादु-गार जॅकेट आत्मा आणी टि-शर्ट वल्ली=एकमेव प्रेक्षक-पक पक पक ;-)
३)स्वीट सेल्फ स्टाटर>>> काला-जामुन
४)सु-हासित पक पक...
५) दंगल खोर-डावीकडुन-वल्ली,मोदक, -----,
६) दंगल खोर-डावीकडुन------,चौकटराजा,मितान,चिमी,आणी आंम्ही....
७)लाँग-मार्च- अ-नेक जण
८)आमच्याशी चर्चा करुन बेजार झालेले चौरा.काका... एका थरथरत्या मुव्हमेंटसह ;-)
९)पक पक यांची तशीच थरथर बघतांना....प्र-शांत .....!
१०)कोल्हा-पुरीचा (मायापुरीसारखा ;-) ) दणका बसल्याने हा फोटू धरणीकंपावस्थेत आलेला आहे...
११)हा.....! अता पनीर माखनवाला मुळे क्यामेराही जागेवर आला... ;-)
तिथेच लास्टला डाव्या कोपर्यात पन्नासराव चिरं-जीव शंभर सह ;-)
१२)डावीकडुन-मन-१,चौराकाका,पंकज,अनुप
१३) आणी---जाता,जाता---नव-कविंना टेंपोत बशिवतो,म्हणुन आंम्हाला मनरावांच्या बुलेटवर सगळ्यांनी शिक्षितावस्थेत बशिवले...तो काळजाचा थर-काप उडवणारा फोटू ;-)
=====================================================================
प्रतिक्रिया
20 Mar 2012 - 1:25 pm | मोदक
स्वागत आहे... :-)
20 Mar 2012 - 11:35 am | चिगो
अतृप्तराव, ही स्टाईल प्रचंड आवडल्या गेलेली आहे..
कट्टा तर भारी आहेच, पण कवणाची शैली लैच झ्याक..
20 Mar 2012 - 12:21 pm | प्रशांत
कट्ट्याचा व्रुतांत भारीच..
धन्यवाद : जादु-गार जॅकेट आत्मा
20 Mar 2012 - 1:37 pm | सविता००१
केवळ भारी लिखाण. कहर आहे......
20 Mar 2012 - 1:39 pm | मृत्युन्जय
लै भारी लिवलय. मागच्या कट्ट्याला सविनय उपस्थित राहुन देखील या कट्ट्याची माहिती अस्मादिकांना न देण्यात आल्याने आम्ही लै चिडलो आहोत हे संबंधितांनी लक्षात घ्यावे.
खासकरुन ज्यांनी गुलाबजाम खाल्ले असतील त्यांना ते आज एवढ्या दिवसांनी बाधतील आणि त्यांना जुलाब जाम होतील असा शाप देतो आहे. :)
20 Mar 2012 - 2:06 pm | चौकटराजा
जानी,
शक्कर के पाक के बिना गुलाब जाम गुरू ( यानेकी बडे) नही होते
किसीकेभी कहनेसे जुलाब जाम शुरू नही होते
20 Mar 2012 - 4:28 pm | स्पंदना
आपने तो "पेट" की बात कर डाली ।
20 Mar 2012 - 2:10 pm | सूड
'मिपाकट्ट्याचा वृत्तांत' छान आहे. कालाजामून राजधानीत असतात त्यापेक्षा लहान वाटले.
20 Mar 2012 - 2:16 pm | सर्वसाक्षी
आत्मारामपंत,
कट्टे खूप झाले पण असा काव्यमय वृत्तांत एकमेव! फर्मास!
20 Mar 2012 - 5:47 pm | अत्रुप्त आत्मा
@कट्टे खूप झाले पण असा काव्यमय वृत्तांत एकमेव! फर्मास! >>>
मनःपूर्वक धन्यवाद!
20 Mar 2012 - 3:42 pm | मालोजीराव
चिंचवडवर स्वारी आवडण्यात आली आहे....गुर्जींच वर्णन भन्नाटच !
सविस्तर प्रतिसाद देऊच...पन्नासराव लहानपणीच पंचवीसरावांना कट्टेकरी बनवत आहेत पाहून सुखावलो गेलो आहे !
- मालोजी
20 Mar 2012 - 6:55 pm | मोहनराव
कट्टा उत्तम झालेला दिसतोय! गुर्जींनी तर कमालच केली आहे! फॅन झालो आहे तुमचा!!
21 Mar 2012 - 10:00 am | प्रचेतस
शतकी धाग्याबद्दल अत्रुप्त आत्म्यास हार्दिक शुभेच्छा.
आता तरी त्याची त्रुप्ती होईल ही अपेक्षा. :P
21 Mar 2012 - 10:07 am | ५० फक्त
आता तरी त्याची त्रुप्ती होईल ही अपेक्षा. - म्हणजे नक्की अपेक्षा काय आहे तुमची आयडि बदलावा का कसं ?
21 Mar 2012 - 10:18 am | प्रचेतस
त्रुप्तात्मा हे नाव कसं वाटेल?
21 Mar 2012 - 2:15 pm | अत्रुप्त आत्मा
@आता तरी त्याची त्रुप्ती होईल ही अपेक्षा. >>> दुष्ट...! दुष्ट...! दुष्ट...! अ****** :-p
21 Mar 2012 - 11:27 am | सस्नेह
व्रुत्तांत मस्त जमलाय्...फोटो पाहून मजा आली. मिपाकरांना पहायला तरी मिळाले. एरवी नुसत्या प्रतिसादांवरून चेहर्यांचा अंदाज बांधणे कठीणच !
22 Mar 2012 - 6:14 am | Pearl
कवितारूपी वृत्तांत आवडला. कट्टा छान झालेला दिसतो आहे.