कवनरुपे कहाणी-श्री.अन्नक्षेत्र चिंचवड,मिपा खादाडवारी,संयोजक-मोदक ;-)
एक आहे गावं चिंचवड,तेथे मिपाची एक कावडं
अजोबा एक नातू सगळे,नाती काही असती...
मोदक नामे नवमिपाकरू,वल्ली मागे महामेरु
चिंचवडकरांसी आधारु,मिपा कट्टा करण्या...
तारीख सतरा वारं-शनिवार,रोजवूड मधला आहार
सायं-काली पक्ष्यांचा बहर,बरा होता तेथे बा... ;-)
आंम्ही पोहोचता मुक्कामी,प्रथम येवोनी थडकली चिमी
मोदका फोनवता आंम्ही,शीघ्र तो ही धावला...
मागोनी वल्ली आणी पक पकं,येताच अन्य कितिक...
मिपा परंपरेप्रमाणे,तेथे हलकल्लोळ जाहला...
हाटीलाचा तो द्वार-रक्षक,पाहे जणु मनुष्य भक्षक
आत चला,आत चला...असे,दरडावू तो लागला...
मग समस्तानी कालाजामुन हणुनी,उशिरा येणार्यास फोनवुनी...
आठ वाजले म्हणीता म्हणीता,अंतःपुर गाठला...
शोधले होते आधी टेबल, दहा जणांसी केवल...
परी मेंबर संख्या पहाता,खुर्च्या आणिक जोडिल्या
मग चर्चांना आला बहरं,,,विषय एकाहुनी एक कहरं
आजुबाजुचे यात्रेकरु...त्रासिक बहु जाहले...
हाटीलाचेही वेटर नामी..एकही ऑर्डर घेण्याकामी
पाणी वाटोनी ते हरकामी,अदृष्य कुठे जाहले... ?
मिपाकरांसी ही नामी संधी,,बराच येळं बसायची बंदी
या हाटीलास नाही बघुनी,,कल्लोळ माजवू लागले...
थोड्या समयानी मितान नामे,आल्या ताई मुक्कामे
प्रथम भेटता ओळखा सर्वांसी,चौ.रा.का---का(?) म्हणाले...
मग न्यहाळेनी सार्यांसी,नच ओळखे कोणासी..
ऐसे म्हणोनी स्वस्थानासी,विराजमान जाहल्या..
केली एकमेकांची ओळख,आयडी मुळनामे पाळख
दाटुन येता काळेख...पन्नास प्रकट जाहले...
पन्नासांसह चिरंजीव,दिसताची खुर्ची राखिव
टुण्ण-करुनी उडी मारुनी,बागडू आनंदे लागला...
फ्लाईंग व्हिजिटर दोन त्यात,सौरभ आणी प्र-शांत...
सूप- गफ्फा हणुनी आणिक,मार्गस्थ दोघे जाहले
अन्नपत्रका मधले उप-लब्ध,सूप स्टार्टर कितिकं
ठरवोनी प्रति-पाना गणिक,आर्डर देई मोदके ;-)
मग पुन्हा नेहमिची खेचाखेची,धाग्यांवरुन खोचाखोची ;-)
म्यानी काढोनी तलवारी,सारे युद्ध करो लागले...
बाजुचे पब्लिकं भय-भीतं, विचंलीत जाहले त्यांचे चित्त
सूपं स्टार्टरं मारोनी, वेटरानी त्यास सोडविले...
चौराकाका आणी आंम्ही,स्माई-ली टाकण्या वरोनी
एकमेकासी झणी,छळू लागलो वारं-वारे...!
आपुल्याच नामे स्माईली,कधी होती का-कुणी केली
तैसीची करावी सार्यांनी,प्रस्ताव ठेविती चौरा..का का(?) ;-)
मधेच आलेले मनोबा,आंम्हासी नच कळले बा...
एवढी काकांसह आमुची,स्मायल्या-नंदी टाळी लागली ;-)
पकपक नी वल्ली पलिकडे,हैदोस घालीती खडे-खडे... :-p
वेटरांसी आतल्या आत घडे,दृष्टांतू बाह्य मनांचा...
वेटरंही पन्नासांशी जाती,काय अंतरीची नाती
खाण्यासी जन्म जयांचा,ऑर्डरु लागले मेन-कोर्सी...
एक भाजी कोल्हा-पुरी,तिला दिधलेली मिर्च्यांची धुरी... :-p
अपुरीचं जरी मिळती, लोणचे म्हणुनी कामी येई
परी पनीराची भाजी,मटारासंगे ताजी ताजी..
चाखुन पहाती आजी-माजी,बोटे चाटती रोटीसंगे
नंतर व्हेजं ची बिर्याणी, बरी आहे,,म्हणती कुणी
पोटे भरता आणी,खिचडी आंम्ही म्हणलो बा... ;-)
अश्यारितिने स्वाहा-कार, करोनी सारे मेंबर...
उदरे येता ढेकर... पान खाण्या वळले बा...
पुन्हा भायेर तो रक्षक,भूतं-काळातील शिक्षक :-p
मला भासे तक्षक, आता सलामीण्यासी आला...
मितान आणी छोटुकली चिमी,गेल्या आपुल्या मुक्कामी
मग उरलेले आंम्ही, गप्पा हाणीत राहिलो...
उत्तर रात्र बहुत होता,,,स्वये दूर नगरे जाता
केला सर्वांसी टाटा,,,गुडनाईट..गुडनाईट म्हणोनी.. ;-)
ऐकोनी आत-म्या-चे कवन,कट्टेकर्यांनी करावे चिंतन..
आणिक करोनी मननं,प्रतिसादी जिलब्या पाडाव्या... ;-)
जमला काहो वृत्तांतू, कळवा-जीव होईल शांतू
नविन रुपे म्हणोनी,,,या सम हा लिहिला... :-)
०====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====००====०====०====०===
कट्टा नेहमीचाच,फोटोही नेहमी सारखे,पण दंगल मात्र नविन ;-)
ता.क.-अत्ता वेळे अभावी नावे ठेवण्याचा कार्यक्रम पुढे ढकलीत आहोत... ;-) (आठवली तेवढी ठेवली आहेतच ;-) )
आपला(च) अत्रुप्त आत्मा... :-)
१)हळुहळू-जमणारे (पानासारखे ;-) ) मिपाकर..
२)जादुचे प्रयोग करतांना,जादु-गार जॅकेट आत्मा आणी टि-शर्ट वल्ली=एकमेव प्रेक्षक-पक पक पक ;-)
३)स्वीट सेल्फ स्टाटर>>> काला-जामुन
४)सु-हासित पक पक...
५) दंगल खोर-डावीकडुन-वल्ली,मोदक, -----,
६) दंगल खोर-डावीकडुन------,चौकटराजा,मितान,चिमी,आणी आंम्ही....
७)लाँग-मार्च- अ-नेक जण
८)आमच्याशी चर्चा करुन बेजार झालेले चौरा.काका... एका थरथरत्या मुव्हमेंटसह ;-)
९)पक पक यांची तशीच थरथर बघतांना....प्र-शांत .....!
१०)कोल्हा-पुरीचा (मायापुरीसारखा ;-) ) दणका बसल्याने हा फोटू धरणीकंपावस्थेत आलेला आहे...
११)हा.....! अता पनीर माखनवाला मुळे क्यामेराही जागेवर आला... ;-)
तिथेच लास्टला डाव्या कोपर्यात पन्नासराव चिरं-जीव शंभर सह ;-)
१२)डावीकडुन-मन-१,चौराकाका,पंकज,अनुप
१३) आणी---जाता,जाता---नव-कविंना टेंपोत बशिवतो,म्हणुन आंम्हाला मनरावांच्या बुलेटवर सगळ्यांनी शिक्षितावस्थेत बशिवले...तो काळजाचा थर-काप उडवणारा फोटू ;-)
=====================================================================
प्रतिक्रिया
19 Mar 2012 - 7:03 pm | निश
आत्मा भाऊ, लय भारी दोस्ता, एक दम भन्नाट सुसाट बुंबाट..
20 Mar 2012 - 1:23 pm | सुहास..
हा हा हा !!
चान चान , लहाणपणी असा बालिश पणा अजुन शोभला असता असे म्हणेन !!
20 Mar 2012 - 2:03 pm | मोदक
मित्रा.. प्रतिसाद कळाला नाही.. जरा विस्कटून सांगतोस काय..?
20 Mar 2012 - 2:48 pm | चौकटराजा
||बालादपि सुभाषितम ग्राह्यम ||
||यथा मरणान्ते वैरम त्याज्यम ||
काही तरी यमक म्हणून दुसरी ओळ . खरी मह्त्वाची पहिली ओळ,
19 Mar 2012 - 7:13 pm | सुकामेवा
कट्ट्याचे यथोचित काव्यात्मक वर्णन केल्याबद्दल अतृप्त आत्मा (भटजी) यांचे अभिनंदन व धन्यवाद.
19 Mar 2012 - 7:15 pm | यकु
पहिल्या काही ओळींतच हसून हसून मेलो
आणि पुढचं वाचणं अशक्य झालंय.. आता पुन्हा जीवंत झाल्यानंतरच हा धागा वाचता येईल..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =))
=))
20 Mar 2012 - 8:44 am | स्पा
गुर्जी अशक्य हात
__/\__
चिरंजीव शंभर :D
बाकी फोटो लैच सुमार आलेत हो
20 Mar 2012 - 12:17 pm | अत्रुप्त आत्मा
@बाकी फोटो लैच सुमार आलेत हो >>> आपण स्वतः वेळ काढुन येत जावं,,,कधी कधी मित्रांसाठी...म्हणजे भारी फोटो काढण्याची जब्बाबदारी आपल्या पदरी टाकता येइल आंम्हाला...! ;-)
20 Mar 2012 - 1:29 pm | वपाडाव
कोण आहे रे तिकडे... बांबु, बांबु म्हणुन कोण ओरडतंय....
19 Mar 2012 - 7:19 pm | रेवती
स्तोत्रं म्हणत असल्यासारखा वृत्तांत आवडला.
फोटूही भारी. यावेळी चक्क अडीच मिपाकर नविन होते.
चिरंजीव शंभर, मितान आणि चिमी (हा आयडी आठवत का नाहिये?).
19 Mar 2012 - 7:21 pm | यकु
>>>(हा आयडी आठवत का नाहिये?).
---- तुमच्याकडे रजिष्ट्रेशन झाले नसेल.. हॅहॅहॅ ;-)
19 Mar 2012 - 7:30 pm | रेवती
सांगा की एस्वंतराव.
19 Mar 2012 - 7:34 pm | यकु
मला पण माहित नाही.
पण कुणीतरी सांगेल ब्वॉ आपोआप ;-)
19 Mar 2012 - 7:54 pm | प्रास
याच की काय त्या?
19 Mar 2012 - 8:59 pm | रेवती
धन्यवाद्स.
19 Mar 2012 - 7:20 pm | गणपा
मस्त जमलाय वृतांत.
=))
19 Mar 2012 - 7:21 pm | सांजसंध्या
गटगचा काव्यात्मक वृ. पहिल्यांदाच पाहिला :D
आणि काव्यही धम्माल एकदम..फोटो तर भारीच.
______/\______
19 Mar 2012 - 10:21 pm | अत्रुप्त आत्मा
@गटगचा काव्यात्मक वृ.>>> आँ.... गटगचा म्हणजे काय..? काहितरी गटग/गटग पिल्यासारखं वाटतं... ;-)
20 Mar 2012 - 3:09 am | सांजसंध्या
गटग = गेट टू गेदर ... माबोची सवय झालीये :)
20 Mar 2012 - 7:26 am | अत्रुप्त आत्मा
@गेट टू गेदर ... माबोची सवय झालीये >>> असं व्हय...! ,ब्वार...ब्वार... :-)
19 Mar 2012 - 7:24 pm | पैसा
वृत्तांत लै आवडला!
19 Mar 2012 - 7:24 pm | मोदक
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.
19 Mar 2012 - 9:08 pm | पक पक पक
फक्त हात जोडा ............../\............
20 Mar 2012 - 12:12 am | मोदक
हात जोडून पुढे काही म्हणायचे आहे का..? ;-)
20 Mar 2012 - 8:42 am | पक पक पक
गुरुजी आहेत की म्हणायला... :)
20 Mar 2012 - 9:05 am | मोदक
ब्वॉर. :-)
20 Mar 2012 - 9:07 am | प्रचेतस
मेलो मेलो.
19 Mar 2012 - 7:28 pm | चौकटराजा
||ओलेत्याने जो पारायण करी|| त्यासी लाभे प्रतिभा सत्वरी ||
अंगे त्याच्या " आत्मा " संचरी || मनोभावे ||
सायं-काली पक्ष्यांचा बहर,बरा होता तेथे बा... Wink
|| पक्षांचा बहर कसा होता तिथे ? || दिसल्या मजला पक्षिणी तिथे ||
|| बहर असतो फुलांचा बा || " थवा "म्हणा मनोभावे ||
( चौकट राजाच्या छ्दमी हास्याची स्माईली इथे आहे असे समजावे )
19 Mar 2012 - 10:50 pm | अत्रुप्त आत्मा
@पक्षांचा बहर कसा होता तिथे ? || दिसल्या मजला पक्षिणी तिथे ||
|| बहर असतो फुलांचा बा || " थवा "म्हणा मनोभावे || >>>>
सायंकाली पक्ष्यांचा थवा,हाच शब्द तेथे हवा...
जो असतो तो अर्थ घ्यावा,हवा करणे थांबवावे... :-p
अर्थ निष्पत्ती काव्ये अधिक,शब्दांचा तो वाद तात्विक...
तत्वापरी व्यवहारागणिक,काव्य सुबोध वाचावे... ;-)
भावनेचा ओला मृद् गंध,शब्दांचे ओलांडितो बंध
पानातला परी गुलकंद,विवेकी तो चाखावा... :-)
जाणे आत्मा शब्दांची थोरवी, दह्या जैशी फेटे रवी
अर्थाचे लोणी काढण्या कवी,जो तो समर्थ आहे बा... ;-)
19 Mar 2012 - 11:07 pm | प्रचेतस
अफाट ही काव्यप्रतिभा.
20 Mar 2012 - 8:44 am | पक पक पक
सहमत आहे
आम्ही आधीच सपशेल लोटांगण घातले आहे ,
20 Mar 2012 - 8:11 am | चौकटराजा
||ट्रेडमार्क आमचा हवा || त्यास्तव केली थव्याची हवा |
|| येरवी आपल्या प्रतिभेचा हेवा || आम्हासी खचितचि आहे ||
कवि - चौकट राजा
|| भटजी तो पेटवावा रे पेटविल्याने पेटतो ||
पेटविल्याने " येत राहे" रे आधि पेटविलेच पाहिजे ||
कवि- आग्यावेताळ
वल्ली तो चेचवावारे चेचविल्याने चेचतो
लावी आगी इथे तिथे आधि चेचलेच पाहिजे
कवि- अ आ
20 Mar 2012 - 9:02 am | प्रचेतस
20 Mar 2012 - 12:04 pm | मोदक
नवीन स्मायली काढायला शिकलास का..? ;-)
20 Mar 2012 - 1:16 pm | अत्रुप्त आत्मा
@|| भटजी तो पेटवावा रे पेटविल्याने पेटतो ||
पेटविल्याने " येत राहे" रे आधि पेटविलेच पाहिजे ||
कवि- आग्यावेताळ>>>>
पुन्हा भांडणं ;-)

लावण्याचा क्षीण प्र-यत्न ;-)
@वल्ली तो चेचवावारे चेचविल्याने चेचतो
लावी आगी इथे तिथे आधि चेचलेच पाहिजे
कवि- अ आ>>>>
20 Mar 2012 - 2:18 pm | चौकटराजा
येत रहा, येत रहा, मारितो हाका
आप्सुक येईल शकुनी काका ( बोका)
दोघे मिळूनी करू तयारी
आणखी आणू महा " विडंबन"
कवि- वल्लीकांत- आत्मेलाल
20 Mar 2012 - 2:21 pm | प्रचेतस
अहो मी विडंबक नाहीये हो.
19 Mar 2012 - 7:42 pm | चौकटराजा
गटग = गब्दुल टग्यांचा ( टवाळखोरांचा ? ) गट ?????????
19 Mar 2012 - 7:50 pm | प्रास
कहर वृत्तांत, मस्त फोटो.....
___/\___
19 Mar 2012 - 7:59 pm | गणेशा
छानच ..
असेच सगळे भेटोत राहोत ... हि इच्छा !
20 Mar 2012 - 12:52 am | वपाडाव
पुण्यात स्वाइन फ्लु बहरास येत असताना पाहुन (म्हणजेच गणेशाज्वर ओसरताना पाहुन) ड्वले पाणावले...
बाकी, भटजी .../\...
20 Mar 2012 - 2:01 pm | चौकटराजा
||रोगाचा नसतो बहर || असती त्याचा बा कहर ||
||चौकटराजाची नजर|| अचाट वाईट आहे ||
20 Mar 2012 - 2:05 pm | स्पा
काका बरे आहात ना
20 Mar 2012 - 2:37 pm | चौकटराजा
स्पाउ . तुमची आठवण निघाली कट्ट्याला . आवो नजर वाईट म्हंजी ती फड़के रोड वरची नव्ह . साहित्य पंढरीतील .
19 Mar 2012 - 8:19 pm | पिंगू
भटोबा पुन्हा एकदा फार्मात.. बाकी बैठकीत किती जामुन उडवले.. याची काही गणती केली की नाही... ;)
- पिंगू
19 Mar 2012 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा
@बाकी बैठकीत किती जामुन उडवले.. याची काही गणती केली की नाही..>>> ते खास मिपा कट्टा स्टाटर आहे... गाडी चालु करण्यापुर्तच वापरतात ;-)
20 Mar 2012 - 1:20 pm | मोदक
अनलिमीटेड जामूनची थाळी कुठे मिळते का..? गणेशासोबत जावे म्हणतो.. :-)
20 Mar 2012 - 1:51 pm | प्रचेतस
राजधानीत असतात रे काला जामुन आठवड्यातून एकदा, तेही अनलिमिटेड. अगदी आग्रह करून करून वाढतात. फक्त आधी चौकशी करून जा.
20 Mar 2012 - 2:27 pm | चौकटराजा
आधी चौकशी अशासाठी की अनलिमिटेड च्या ठिकाणी बासुंदीत शेवटी शेवटी कुल्फी व पाणी घालायची पद्दत आहे.
20 Mar 2012 - 2:39 pm | प्रचेतस
छे छे. ते फक्त स्वादला. कर्व्यांकडेच.
इथे तसं काही नाही. स्वीट्स रोज बदलत असतात म्हणून.
---
घाटी देशस्थ.
20 Mar 2012 - 8:01 pm | चौकटराजा
पंत , १९७६ ते १९७८ एका शेवडे आडनावाच्या ( शेवडे आडनाव दोन्हीकडे आहे )माणसाच्या खाणावळीत मेंबर होतो . पण हा तुमच्यावाला होता. लेकाचा काय करायचा. आदले दिवशी वांग्याची भाजी उरली की दुसरे दिवशी त्यात ताक ओतून वांग्याचे भरीत म्हणून सकाळ्च्या मेनूत ढकलायचा ! ( इथे डोळा बारीक केलीले स्माईली आहे )
20 Mar 2012 - 8:09 pm | प्रचेतस
अहो करणारच.
शेवटी दोन्हीकडचा ना तो. ;)
20 Mar 2012 - 9:24 pm | मोदक
फक्त आधी चौकशी करून जा.
म्हणजे तू येणार नाहीयेस का..?
20 Mar 2012 - 9:56 pm | प्रचेतस
तू आणि गणेशापुढे आम्ही कस्पटासमान.
19 Mar 2012 - 9:07 pm | पक पक पक
पुजा घालुन झाली..... ;) उत्तर पुजा देखील झाली ;) दक्षिणा उधार .....
कधी भेट्ताय हो भट्जी बुवा.... ;)
21 Mar 2012 - 12:01 am | मोदक
बुवा... तुमच्या दक्षिणेत माझाही (खारीचा)वाटा आहे...
त्यामुळे जी काय वसुली करायची ती वीकांताला करूया.. थँक्यू आणी सॉरी* अजून पेंडींग आहे पक पक काकांकडे. :-)
*अधिक माहिती साठी पक पक काकांची खव उचकावी.
21 Mar 2012 - 10:04 am | पक पक पक
अजून पेंडींग आहे पक पक काकांकडे
आपण आमच्या वयाची जाहीरात का करत आहात ;) आम्ही कोणाच देण ठेवत नाही :) कधी भेट्ताय... :)
21 Mar 2012 - 10:06 am | पक पक पक
परत असा घोर अपराध घड्ल्यास वल्लींच्या संगन्मतान आत्म्याला सुपारि देण्यात येइल ;)
22 Mar 2012 - 12:34 am | मोदक
आधी तुम्ही मला हात जोडायला लावले... नंतर गुरूजींना काहीतरी म्हणायला सांगू असे म्हणाला..
आणि आता सुपारीच्या गोष्टी..?
तुम्ही नक्की माझे मित्रच आहात ना..? ;-)
22 Mar 2012 - 8:56 am | अत्रुप्त आत्मा
@तुम्ही नक्की माझे मित्रच आहात ना..?
>>> हा मोदक पूर्ण शिजलेला आहे ;-)
19 Mar 2012 - 9:13 pm | अन्या दातार
अरे काय लिहिलाय वृत्तांत! खतरा एकदम!!! हहपुवा होत होती वर्णन वाचता वाचता.
19 Mar 2012 - 9:18 pm | स्वछन्दि
वरुन तिन नम्बर चा फोटू लै आवडला बघा...
बाकि लेखन मस्तच!!!!
19 Mar 2012 - 10:17 pm | सोत्रि
आता चेन्नईत एक मिपाकट्टा केल्याशिवाय कट्ट्याच्या धाग्यांवर प्रतिसाद न देण्याचे ठरवले आहे.
चेन्नईत असलेल्या मिपाकरांनो व्यनीतून त्वरीत संपर्क साधावा.
- (सध्या लुंगीवाला झालेला) ஸொகஜி
19 Mar 2012 - 10:25 pm | प्रास
चेनैला जाऊन सोकाजींचा लुंगीवाला सोकजी का झालाय ब्वॉ? ;-)
19 Mar 2012 - 11:15 pm | प्रचेतस
उधळिला आत्म्याचा वारू, जरी प्यायली नाही दारू,
नच भरकटले तारू,कट्ट्यावरी रंगले.
छान छान काव्य रचुनी, मिपाकरांना रिझवुनी,
शेवटी तंबाखू मळुनी, आत्मा तृप्त जाहला.
सुंदर वृत्तांत रे मित्रा.
चतुरस्त्र भटजीबुवा आमचे मित्र असल्याचा आम्हांस अभिमान आहे.
19 Mar 2012 - 11:21 pm | अत्रुप्त आत्मा
@उधळिला आत्म्याचा वारू, जरी प्यायली नाही दारू, >>>
मेलो...मेलो... वाचवा हो वाचवा...
पण तरिही वैयक्तिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद... :-)
19 Mar 2012 - 11:20 pm | निनाद मुक्काम प...
वृत्तांत आणि फोटो आवडले.
19 Mar 2012 - 11:28 pm | किसन शिंदे
व्वा! जोरदार झाला म्हणायचा हा कट्टा आणि कुर्त्यातले मोदकराव आयोजक म्हणून जास्त शोभून दिसताहेत. :)
20 Mar 2012 - 10:13 am | मी-सौरभ
आता आद्य संयोजक पर्भणी रिटन मा. श्री. वपाडाव यांस एक स्पर्धक निर्माण झाला आहे असे म्हणावे का??
19 Mar 2012 - 11:28 pm | किसन शिंदे
व्वा! जोरदार झाला म्हणायचा हा कट्टा आणि कुर्त्यातले मोदकराव आयोजक म्हणून शोभून दिसताहेत.
19 Mar 2012 - 11:28 pm | किसन शिंदे
व्वा! जोरदार झाला म्हणायचा हा कट्टा आणि कुर्त्यातले मोदकराव आयोजक म्हणून शोभून दिसताहेत.
19 Mar 2012 - 11:30 pm | प्रचेतस
तुझ्या तिहेरी प्रतिसादांनी खरोखरच जोरदार झाल्यासारखा वाटतोय आता.
आयला, आता चार?
19 Mar 2012 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा
@तुझ्या तिहेरी प्रतिसादांनी खरोखरच जोरदार झाल्यासारखा वाटतोय आता.>>> नको त्या कळी*ला जोर लागल्यामुळे दार तुटलं असावं ;-)
*कळी<>पक्षी- कळफलकावरचे बटण,,,, ;-)
19 Mar 2012 - 11:29 pm | किसन शिंदे
व्वा! जोरदार झाला म्हणायचा हा कट्टा आणि कुर्त्यातले मोदकराव आयोजक म्हणून जास्त शोभून दिसताहेत. :)
20 Mar 2012 - 9:31 am | सूड
म्हणणं परिणामकारक व्हायला चार वेळा प्रतिसाद द्यायची पद्धत आवडली.
20 Mar 2012 - 9:03 pm | किसन शिंदे
कसली डोंबलाची पध्दत रे??
प्रतिसाद एकच दिला होता, आयडियाच्या नेटवर्क टाॅवर वर बसलेल्या आत्म्याने त्याचे चार केले.:)
20 Mar 2012 - 9:47 pm | अत्रुप्त आत्मा
@आयडियाच्या नेटवर्क टाॅवर वर बसलेल्या आत्म्याने त्याचे चार केले>>> नाही हो,आमच्यात नाही ही माणसांची आयडिया...एकाचे चार करण्याची
20 Mar 2012 - 1:06 am | सुहास झेले
सहीच... एकदम जबरदस्त :) :)
20 Mar 2012 - 6:26 am | ५० फक्त
जाम भारी लिहिलंय ओ भटजी, मनापासुन धन्यवाद. सविस्तर प्रतिसाद देईनच.
20 Mar 2012 - 8:12 am | बंडा मामा
जबरदस्त कट्टा.जय हो मिपाकर्स!
20 Mar 2012 - 8:36 am | निवेदिता-ताई
तिथेच लास्टला डाव्या कोपर्यात पन्नासराव चिरं-जीव शंभर सह...आता हा पण आला का इथे मिपावर..
पन्नास चा चिरंजीव शंभर. मग बायको किती????
पन्नास तु़झ्या बायकोचे नाव काय????
20 Mar 2012 - 8:37 am | लीलाधर
निव्वळ अप्रतिम व्रुत्तांत.... ओ भडजी बुवा फारच छान लिहीला आहात हो व्रुत्तांत आवडेश....
20 Mar 2012 - 8:59 am | प्रचेतस
ओ चचा, तुम्ही त्यांना भडजी बुवा म्हणून अगदीच भडभुंजा बनवून टाकलत की हो.
20 Mar 2012 - 8:45 am | स्पंदना
इश्टायल आवडली. कट्टा सुद्धा आवडला. पन्नास रावांचा चिरंजिव शंभर हे गणित तर लय भारी.
20 Mar 2012 - 9:29 am | अमृत
||पन्नास रावांचा चिरंजिव शंभर हे गणित तर लय भारी
आता ट्युबलाइट पेटली.. :-)
अमृत
20 Mar 2012 - 1:03 pm | अत्रुप्त आत्मा
@पन्नास रावांचा चिरंजिव शंभर हे गणित तर लय भारी.>>> ह्हा ह्हा ह्हा... हा नुसता शाब्दिक खेळ किंवा कोटी नाहीये.ते ''रसायन'' खरच अत्यंत अवखळ आहे.
पन्नासरावांच्या दुप्पट आहेच,मी काट्याचमच्यानी कालाजामुन भरवायला गेलो,तर मला-'' ऊंऊऊ..मी खाइन न्ना...तू ठेव खाली!'' असं म्हणुन त्याच चमच्यानी माझा काटा काढला. :tired:
मिपावर येइल तेंव्हा कळेलच,,, स्वारी...त्याला कळेल तेंव्हा मिपावर येइलच.. ;-)
20 Mar 2012 - 4:26 pm | स्पंदना
नशिब समजा चमचा आणि हात मागितला न्हाय. बचावलात भुत भाई.
20 Mar 2012 - 9:13 am | चिमी
लय भारी गुरुजी,
कट्ट्यापेक्षा कट्ट्याचा व्रुतांत भारी झालाय.
20 Mar 2012 - 1:07 pm | अत्रुप्त आत्मा
@कट्ट्यापेक्षा कट्ट्याचा व्रुतांत भारी झालाय. >>>
कधी कधी कॉमेंटेटर मुळे म्याच रंगते म्हणतात ;-)
20 Mar 2012 - 11:17 am | महेशकुळकर्णी
थक्क झालो :)
पुढच्या कट्ट्याला मी पण येईन म्हणतो
- महेश