एक स्वतःची भाषा

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
15 Sep 2011 - 12:14 am

मिसळीवर वावरताना
आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे.

काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया

उदा...

मोठे व्हा
जिलब्यापाडू लिखाण
हलवाई
भंपक

आपल्याला आठवणार्‍या शब्दांची आपण भर घालावी

---

नृत्यधोरणसंस्कृतीम्हणीभाषावाक्प्रचारवाङ्मयशिक्षणप्रकटनविचारमतप्रतिसाद

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

15 Sep 2011 - 12:20 pm | विनायक प्रभू

माझी एक स्वतंत्र भाषा आहे असे लोक म्हणतात.
काय काय म्हणुन लिहु.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 2:41 pm | बिपिन कार्यकर्ते

तुमचा 'चित्रकला' हा एकच शब्द तुमचे समग्र योगदान दाखवायला पुरेसा आहे मास्तर! ;)

सन्दीप's picture

15 Sep 2011 - 12:20 pm | सन्दीप

बाडिस आहे.

धाग्याचे काश्मीर करणे हाही एक शब्द प्रयोग मिपावर प्रचलित आहे. त्याचा वाक्यात उपयोग पुढील प्रमाणे:

श्री चेतन सुभाष गुगळे यांनी अरे सॉरी सॉरी टिंब राहिलं वाटतं श्री. चेतन सुभाष गुगळे यांनी धाग्याचे यशस्वीपणे काश्मीर केल्याबद्दल समस्त मिपाकरांतर्फे त्यांना एक फायर एक्स्टिंग्वीशर भेट देण्यात येत आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

2 Oct 2011 - 12:00 pm | चेतन सुभाष गुगळे

मी धाग्याचं काश्मीर केलंय की नाही हे धागाकर्ताच ठरवेल. इतरांनी चोंबडपणा करायचं कारण नाही. त्यामुळे आपला फायर एक्स्टिंग्विशर आपल्याकडेच ठेवावा. मला त्याची गरज नाही. तसंही इथे आभासी जगतात प्रत्यक्ष वस्तु दिली जातच नसल्यामुळे कुणी कुणाला फायर एक्स्टिंग्विशरच काय पण अगदी रणगाडाही भेट देत असल्याचं जाहीर करू शकतं, त्यात काय मोठंसं? शब्द टंकायला प्रत्यक्ष वस्तू विकत घेण्याएवढा खर्च थोडाच येतो?

पुष्कर जोशी's picture

25 Apr 2013 - 9:13 pm | पुष्कर जोशी

गुगळे साहेबांनी ह्या मी.पा. ह्या college काट्यावर भांडारकर प्राच्य विद्या संशोधन केंद्राचे वातावरण आणू नये हि विनंती ....

विनायक प्रभू's picture

15 Sep 2011 - 12:59 pm | विनायक प्रभू

एक तर तिखट खाउ नये.
झेपल नाही तर फायर एक्स्टींग्विशर लागणारच.

चेतन सुभाष गुगळे's picture

2 Oct 2011 - 11:52 am | चेतन सुभाष गुगळे

प्रत्येकच ठिकाणी भुंकू नये अन्यथा दगड लागणारच..

शिल्पा ब's picture

2 Oct 2011 - 12:18 pm | शिल्पा ब

यिप्पी...चेसुगु ऑन फायर!! (पण इतक्या उशीरा का बुवा?

आशु जोग's picture

20 Jan 2015 - 12:20 pm | आशु जोग

ते तेवढं लाइकचं बटन हवं होतं

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2011 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावरील काही सदस्य हे सतत श्री. गुगळे, श्री. काळे व श्री. ओक ह्यांना टार्गेट करणारे, टिंगल उडवणारे लिखाण करत असतात. लेखनाचा नाहीतर निदान वयाचा तरी मान ठेवावा हे ह्या टिंगलखोरांना कधी कळणार आहे ?

श्री. गुगळे, श्री. काळे व श्री. ओक हे मिपाची संपत्ती आहेत. आज ज्या काही लेखकांमुळे मिपावर वाचकांची गर्दी होते त्या लेखकांच्या यादीत ही नावे सर्वात वर आहेत. स्वतः काही उजेड न पाडणारे सतत ह्या लेखकांना मानसीक त्रास देण्याचे उद्योग करत असतात. संपादक मंडळ ह्याची दखल कधी घेणार आहे ?

ह्यापूर्वी विद्याभूषण आणि आधुनीक ज्ञानेश्वर असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते श्री. विनायक पाचलग अशाच त्रासामुळे मिपापासून दूर झाले. श्री. सामंतकाकांना तर कोण विसरु शकेल ? सर्वचजण श्री. गुगळे ह्यांच्यासारखे क्षमाशील नसतात, जे सव विसरुन पुन्हा वाचकांसाठी परत येतात.

संपादकांनी वेळीच अशा नाठाळ आणि उपद्रवी सदस्यांना शिक्षा द्यावी अन्यथा मिपा आणि मिपाकर स्वर्गीय लेखनाच्या अनुभवांना कायमचे मुकतील. असे थोडक्यात वैश्विक सत्य उलगडणारे, आंतरराष्ट्रीय प्रश्नांना हात घालणारे, तुम्हाला भविष्याची दारे किलकिली करुन दाखवणारे लिखाण तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार आहे ?

प्रियाली's picture

15 Sep 2011 - 3:34 pm | प्रियाली

पराशी पूर्ण सहमत. चेतन सुभाष गुगळे यांची प्रतिभा यापूर्वी लक्षात आली नव्हती याचा खेद वाटतो. :(

शैलेन्द्र's picture

15 Sep 2011 - 3:47 pm | शैलेन्द्र

श्री. परिकथेतील राजकुमार यांच्याशी संपुर्ण सहमत..

असे लेखक हे मीपाची शानच नव्हे तर तिकीट बारीवर हमखास यशस्वी होनारे कलाकार आहेत.. काळे काकांचा परफोर्मन्स तितक्का चांगला नसतो पण इतरांचा यात हात्खंडा आहे..

तरी इतर पडेल आर्ट फिल्म्वाल्या पब्लीकने फुकट च्याव च्याव करु नये असा सज्जड दम या लोकप्रीय लेखकांच्या फ्यान क्लबतर्फे देण्यात येत आहे..

विश्वेश's picture

15 Sep 2011 - 5:24 pm | विश्वेश

सहमत
+१

कुंदन's picture

15 Sep 2011 - 6:22 pm | कुंदन

श्री. कुलकर्णी काकांना विसरलास?
तुझ्या केसांची चहा साखर होईल हां .....

कुंदन's picture

15 Sep 2011 - 6:23 pm | कुंदन

श्री. कुलकर्णी काकांना विसरलास?
तुझ्या केसांची चहा साखर होईल हां .....

अप्पा जोगळेकर's picture

15 Sep 2011 - 9:46 pm | अप्पा जोगळेकर

असे थोडक्यात वैश्विक सत्य उलगडणारे, आंतरराष्ट्रीय प्रश्नांना हात घालणारे, तुम्हाला भविष्याची दारे किलकिली करुन दाखवणारे लिखाण तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार आहे ?
आवंढा गिळला.

संपादकांनी वेळीच अशा नाठाळ आणि उपद्रवी सदस्यांना शिक्षा द्यावी
पूर्ण सहमत.

५० फक्त's picture

15 Sep 2011 - 4:11 pm | ५० फक्त

श्री. परा यांनी
१.टींगळखोरांचे
२.स्वतः काही उजेड न पाडणा-या सदस्य
३. नाठाळ व उपद्रवी सदस्य
यांचे डोके ठिकाणावर आहे का अशी एक लेखमाला लिहावी ही नम्र विनंती सर्व आजी माजी* कंपुतर्फे करण्यात येत आहे. अर्थात हे तिन्ही कटॅगिरीतले सदस्य वेगळे आहेत असा समज करुन हि विनंती करीत आहे.

* -माजी म्हणजे पुर्वीचे या अर्थाने लिहिलेले आहे.

अवांतर - व्याकप कसा घेतात याबद्दल कोणी रस्तादर्शन करु शकेल काय ?

परिकथेतील राजकुमार's picture

26 Sep 2011 - 4:40 pm | परिकथेतील राजकुमार

सर्व आजी माजी* कंपुतर्फे करण्यात येत आहे. अर्थात हे तिन्ही कटॅगिरीतले सदस्य वेगळे आहेत असा समज करुन हि विनंती करीत आहे.

* -माजी म्हणजे पुर्वीचे या अर्थाने लिहिलेले आहे.

मिपावर एकच कंपू होता, आहे आणि राहील. हान आता गावकुसाच्या राजकारणात कधीतरी स्वतःच दुफळी माजवून धूळवड खेळायला लागते म्हणा. पण म्हणून मिपावर २/४ कंपू आहेत असा कोणाचा समज झाल्यास दुर्दैव त्याचे. ;)

अवांतर - व्याकप कसा घेतात याबद्दल कोणी रस्तादर्शन करु शकेल काय ?

१.कोणाची नस (दुखरी) दाबली
२.कोणाच्या शेपटीवर पाय दिला.
३.कुठे दगड्प्रहर केलात.
४.विशिष्ट धागा काढलात.
५.काम्पुतल्या कोणाच्या मागे हात धुवून (पक्षी नहा-धोके) लागलात.

नाय न मग ब्याकप चे काय टेन्शन .

मिहिर's picture

15 Sep 2011 - 5:46 pm | मिहिर

सही केल्या गेली आहे, निषेध नोंदवल्या गेला आहे अशा प्रकारची वाक्ये पण बरेचदा सापडतात. वैग्रे हा शब्दपण सापडतो.

अनामिक's picture

15 Sep 2011 - 6:09 pm | अनामिक

हा धागा काढून 'आजो' कुठे उलथलाय कुणास ठाऊक?

तिमा's picture

15 Sep 2011 - 7:37 pm | तिमा

धागा उघडताना त्यात इतकी करमणूक ठासून भरली असेल अशी कल्पना नव्हती. 'खास लोकाग्रहास्तव' असा एक वाकप्रचार पूर्वी जाहिरातीत वापरायचे. तर खास मिपाकराग्रहास्तव, थोर लेखक इथे येतात, जातात, परत येतात (सत्य परिस्थिती माहिती
असूनसुध्दा) हे वाचून मौज वाटली.

आशु जोग's picture

15 Sep 2011 - 10:38 pm | आशु जोग

यादी कराला घेतली आहे

एवढी मोठ्ठी होइल असे वाटले नव्हते

आशु जोग's picture

15 Sep 2011 - 10:59 pm | आशु जोग

>>हा धागा काढून 'आजो' कुठे उलथलाय कुणास ठाऊक? <<

-अनामिक
मी इतका वेळ वाचनमित्र झालो होतो

तुमचं सर्वांचं संपलं की झा ssss लं ssss अशी हाक द्या की हा मी आलोच

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 3:06 pm | बिपिन कार्यकर्ते

ह.घ्या!
हेवेसांनल!
आकाकाकनाहेजजाआ! - सौ. धमाल मुलगा

तसे, 'सौ.' ही पण इथलीच देणगी आहे. लै मोठा इतिहास आहे त्यामागे! ;)

छोटा डॉन's picture

16 Sep 2011 - 3:14 pm | छोटा डॉन

>>तसे, 'सौ.' ही पण इथलीच देणगी आहे. लै मोठा इतिहास आहे त्यामागे!

वा वा.
'सौ'ची आठवण ठेवता आणि चक्क 'श्री'ला विसरता होय ? ;)
आकाशातला बाप तुम्हाला चांगली शिक्षा करो असे म्हणतो.

- छोटा डॉन

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 3:18 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

बाझवला! हा प्रतिसाद संपूर्णच्या संपूर्ण ज्याला/ जिला कळेल तो / ती म्हणजे एकदम ओल्डटायमरच असणार बघा!

सोत्रि's picture

16 Sep 2011 - 6:31 pm | सोत्रि

माझ्यासारख्या न्यु टायमरला काही क्लु द्या ना कळण्यासाठी

- (जिज्ञासु न्यु टायमर) सोकाजी

परिकथेतील राजकुमार's picture

16 Sep 2011 - 6:34 pm | परिकथेतील राजकुमार

माझ्यासारख्या न्यु टायमरला काही क्लु द्या ना कळण्यासाठी

त्यासाठी वेळ, जागा आणि परिस्थीती योग्य असावी लागते ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2011 - 7:59 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

ठरवा!

>> माझ्यासारख्या न्यु टायमरला काही क्लु द्या ना कळण्यासाठी
क्लु द्या का कळू द्या

आपला शब्दफोड कर्ता (जोग)

ओल्डटायमर म्हणजे अगदी आपल्या श्री. विक्षिप्त बाईंएवढे ओल्डटायमर ना?

टिप - विक्षिप्त बाईंना ओल्डटायमर म्हणतोय, ओल्ड नाही, तेव्हा त्यांनी आम्हाला सुर्यमालेतला एखादा ग्रह फेकून मारु नये म्हणजे झालं!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2011 - 11:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला ओल्ड म्हटलंस तरी चालेल पण "देव" वगैरे गोष्टींबद्दल वाद घालू नकोस.

"श्री." अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

16 Sep 2011 - 3:24 pm | परिकथेतील राजकुमार

आकाशातला बाप तुम्हाला चांगली शिक्षा करो असे म्हणतो.

तुम्हाला 'देवबाप्पा' म्हणायचे आहे का? ;)

छोटा डॉन's picture

16 Sep 2011 - 3:28 pm | छोटा डॉन

आम्हाला जे काय म्हणायचे आहे ते आम्ही म्हणालो आहोत.
उगाच आता त्यावरुन आम्हाला अजुन वाद घालायचा नाही, ओके ?

- (सुस्पष्ट) ;) छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2011 - 11:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गप्प बसण्याचे ठरवले आहे.

सौ. नितिन थत्ते.

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2011 - 9:40 pm | टवाळ कार्टा

असेच म्हणतो
बाकी चालुद्या

विनीत संखे's picture

18 Sep 2011 - 12:59 am | विनीत संखे

मला सुरूवातीला गोंधळात टाकणार्‍या काही मिपा संज्ञा...

१. तूनळी.
२. नीलदंत
३. चेपु
४. प्रकटाआ
५. विकांत

अजून शिकवा की वो भौ.

आशु जोग's picture

18 Sep 2011 - 12:12 pm | आशु जोग

नीलदंत blue tooth
चेपु फेसबूक
विकांत weekend

तूनळी, प्रकटाआ

म्हणजे काय ?

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Sep 2011 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रकाटाआ = प्रतिसाद काढून टाकला आहे.
तूनळी = युट्युब

आशु जोग's picture

19 Sep 2011 - 12:15 am | आशु जोग

धन्यवाद बिपिन !

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Sep 2011 - 5:00 pm | चेतन सुभाष गुगळे

खपलो, मेलो, वारलो असे शब्द प्रतिसादात टंकणारी मंडळी पुन्हा पुढच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला कशी काय (खरं म्हणजे कशासाठी) जिवंत राहतात बुवा?

परिकथेतील राजकुमार's picture

26 Sep 2011 - 5:06 pm | परिकथेतील राजकुमार

खपलो, मेलो, वारलो असे शब्द प्रतिसादात टंकणारी मंडळी पुन्हा पुढच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला कशी काय (खरं म्हणजे कशासाठी) जिवंत राहतात बुवा?

श्री. गुगळेंसारख्या विद्वान आणि व्यासंगी व्यक्तिने एखाद्याचे असे मरण चिंतावे हे खरंच मनाला पटले नाही. एखाद्या व्यक्ती विषयी, त्याच्या मतांविषयी आकस समजू शकतो पण म्हणून त्याचे असे मरण चिंतावे ?

काय हे साहेब ? आम्ही तुम्हाला येवढ्या भक्तीने इतरांपेक्षा श्रेष्ठ मानले आणि तुम्ही पण इतरांच्या मार्गावर निघालात ?

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Sep 2011 - 5:28 pm | चेतन सुभाष गुगळे

<< श्री. गुगळेंसारख्या विद्वान आणि व्यासंगी व्यक्तिने एखाद्याचे असे मरण चिंतावे हे खरंच मनाला पटले नाही. >>

<< काय हे साहेब ? आम्ही तुम्हाला येवढ्या भक्तीने इतरांपेक्षा श्रेष्ठ मानले आणि तुम्ही पण इतरांच्या मार्गावर निघालात ? >>

आपण मला विद्वान, व्यासंगी आदी विशेषणांनी गौरविले, त्याचप्रमाणे भक्तीने इतरांपेक्षा श्रेष्ठ मानले याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. परंतू मी इतरांचे मरण चिंततो असा जो आपला गैरसमज झाला आहे त्याविषयी एवढेच म्हणेन की मी कुणाचे मरण चिंतत नसून सदर व्यक्तीच जर आपण मेलो असे जाहिर करून पुन्हा या संकेतस्थळावर अवतीर्ण होत असेल तर किती अनर्थ होईल? अशा माननीय व्यक्तींच्या मरणोत्तर अस्तित्वामुळेच या संकेतस्थळावर भूतबाधा होण्याचे प्रकार घडत आहेत असेही नम्रपणे नोंदवू इच्छितो.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Sep 2011 - 5:35 pm | परिकथेतील राजकुमार

मी कुणाचे मरण चिंतत नसून सदर व्यक्तीच जर आपण मेलो असे जाहिर करून पुन्हा या संकेतस्थळावर अवतीर्ण होत असेल तर किती अनर्थ होईल? अशा माननीय व्यक्तींच्या मरणोत्तर अस्तित्वामुळेच या संकेतस्थळावर भूतबाधा होण्याचे प्रकार घडत आहेत असेही नम्रपणे नोंदवू इच्छितो.

तुमच्यासारख्या अभ्यासु व्यक्तीने असे बोलवे ?

अहो 'जालहत्या' , 'जालआत्महत्या' तुम्हाला माहिती नाहीत काय ? असे मेलेले आणि मारले गेलेले आयडी पुन्हा मूळ स्वरुपात किंवा मुखवट्यात प्रकट होतच असतात :) कधी कधी तर काही लोक एका अनामिक भितीने स्वतःचा 'हमशक्ल' बरोबर घेऊनच आंतरजालावार अवतिर्ण होत असतात.

बाकी तुम्ही आमचे आभार वगैरे प्लिज मानत जाउ नका. हे म्हणजे पहाटेच्या समयी कुठे कुठे उजेड पाडायचा ते टिमटिमून दाखवल्याबद्दल सूर्याने काजव्याचे आभार मानण्यासारखे आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Sep 2011 - 5:45 pm | चेतन सुभाष गुगळे

<< तुमच्यासारख्या अभ्यासु व्यक्तीने असे बोलवे ?>>

<< अहो 'जालहत्या' , 'जालआत्महत्या' तुम्हाला माहिती नाहीत काय ? असे मेलेले आणि मारले गेलेले आयडी पुन्हा मूळ स्वरुपात किंवा मुखवट्यात प्रकट होतच असतात कधी कधी तर काही लोक एका अनामिक भितीने स्वतःचा 'हमशक्ल' बरोबर घेऊनच आंतरजालावार अवतिर्ण होत असतात. >>

ही माहिती मला नव्यानेच उपलब्ध झाली. सबब या विषयातला माझा अभ्यास कमी पडला हे नम्रपणे नमूद करू इच्छितो.

<< हे म्हणजे पहाटेच्या समयी कुठे कुठे उजेड पाडायचा ते टिमटिमून दाखवल्याबद्दल सूर्याने काजव्याचे आभार मानण्यासारखे आहे. >>

हा अतिशयोक्ती अलंकार समजून आपण "विद्या विनयेन शोभते" हे वचन सार्थ करीत आहात असे नोंदवितो. बाकी आपल्या उपमेप्रमाणे मी सूर्य असलो तरी सध्या या संकेतस्थळावरील कंपुबाजांमुळे मला ग्रहण लागले आहे. माझा एक धागा या कारणामुळेच अर्धशतकावर बाद (वाचनमात्र) झाला आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

26 Sep 2011 - 5:15 pm | अविनाशकुलकर्णी

सर्वात आवडलेले..

सरळ लेख का इथे चोप्य पस्ते करत नाही?..
इति..मृता...

आशु जोग's picture

26 Sep 2011 - 10:13 pm | आशु जोग

>> खपलो, मेलो, वारलो असे शब्द प्रतिसादात टंकणारी मंडळी पुन्हा पुढच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला कशी काय (खरं म्हणजे कशासाठी) जिवंत राहतात बुवा? <<

हे विचारून त्या लोकांना मेल्याहून मेल्यासारखे झाले असेल

--

एक गाणे आठवले

मरणोन्मुख त्याला का मारीसी पुन्हा रघुनाथा !
अडविता खलासि पडलो पळविली रावणे सीता !!

आशु जोग's picture

29 Sep 2011 - 2:02 am | आशु जोग

एकोळी धागे - शब्द जाम आवडला

चेतन सुभाष गुगळे's picture

1 Oct 2011 - 1:08 pm | चेतन सुभाष गुगळे

काही जण सतत लेखन करणार्‍यांस डायरिया झालेले म्हणतात. त्यांना प्रत्युत्तर म्हणून हे सतत लेखन करणारे या कमी लिहीणार्‍यांना बद्धकोष्ठ झालेले म्हणतात. (आता नेमके किती लेखन केले म्हणजे निरोगी कोठा असेलेले म्हणतील?) या भांडणात आपण साहित्याला विष्ठेची उपमा देत असून या संकेतस्थळाला शौचालयाची उपमा देत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही का?

त्याचप्रमाणे काही जण साहित्य निर्मितीला प्रसवणे असे म्हणतात.

या उपमांचा वापर करण्याविषयी फेरविचार व्हावा.

आशु जोग's picture

1 Oct 2011 - 3:28 pm | आशु जोग

चेतन
हे अगदी बरोबर बोललात !

लोकांचं हे सारे आचरट लिखाण थांबवता येइल, संपादकांनी ठरवले तर.

पण संपादकच इथे आचरट लेखनाकडे, इतरांना नाऊमेद करणार्‍या लेखनाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
अनुभव असा आहे, संपादक अशांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत,

काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे याला जास्त महत्व दिले जाते.

लिखाणाला प्रतिसाद देण्याऐवजी लेखकावर कमेंट केली जाते.

असो

आम्हाला फरक पडत नाही

कारण आम्ही इथे माणसे आणि लेखनातून दिसणारे त्यांचे स्वभाव वाचायला आलो आहोत.
जेवढे नमुने भेटतील तेवढे आम्हाला हवेच आहेत.

नक्कीच आशु

<< लिखाणाला प्रतिसाद देण्याऐवजी लेखकावर कमेंट केली जाते.

असो

आम्हाला फरक पडत नाही

कारण आम्ही इथे माणसे आणि लेखनातून दिसणारे त्यांचे स्वभाव वाचायला आलो आहोत.
जेवढे नमुने भेटतील तेवढे आम्हाला हवेच आहेत. >>

असेच काहीसे धोरण असणार. त्याशिवाय का हे असे स्वत:ला प्रभु समजणारे महाभाग http://www.misalpav.com/node/19281#comment-343607 प्रत्येकच ठिकाणी भुंकत असणार?

इतके प्रगल्भ, पंडीत असुन इतके कोपीष्ट कसे हो तुम्ही दोघे? अं?
बाकी नमुने मिळवायचे म्हणता अन मिळाले की अमका असाच तमका तसाच, आम्हाला बै प्रोत्साहनंच देत नैत असं का म्हणता?

एक आपलं आपुलकीने विचारलं इतकंच!!

आशु जोग's picture

1 Oct 2011 - 11:31 pm | आशु जोग

>>एक आपलं आपुलकीने विचारलं इतकंच!!

धन्य झालो

पण हे नाही नेहमीसारखं वाटलं
पुढे सरका...

don't loose ur identification

शिल्पा ब's picture

2 Oct 2011 - 2:32 am | शिल्पा ब

हि सुद्धा आमचीच ओळख आहे. तुमच्या विद्वानांच्या भाषेत identification हो!!
बाकी आमची काळजी घेण्यास अजुन आम्ही जिवंत आहोत...तुम्हाला काळजीचं कारण नाही.

आशु जोग's picture

2 Oct 2011 - 3:44 pm | आशु जोग

मी कोण काळजी करनार तुमची

काकूंनी काळजी कराची शगळ्यांची

चेतन सुभाष गुगळे's picture

2 Oct 2011 - 11:49 am | चेतन सुभाष गुगळे

एका सदस्याचा अनेक जण लुटारू म्हणून उल्लेख करतात. हे कितपत योग्य आहे?

आशु जोग's picture

31 Aug 2012 - 7:57 pm | आशु जोग

हल्ली बाई दोन बॉम्बस्फोटांमधे
मिसळीवर कुठला टॉपिक ठोकावा हेच कळत नाही

अन्या दातार's picture

31 Aug 2012 - 8:15 pm | अन्या दातार

म्हणून असे खाणकाम करत सुटायचे का स्वतःच्याच धाग्यांचे?

आशु जोग's picture

31 Aug 2012 - 10:42 pm | आशु जोग

हो पण
सगळे धागे मिसळीबाबतचे

मिसळीची तब्येत तर बरी आहे ना !

ज्ञानराम's picture

3 Sep 2012 - 2:31 pm | ज्ञानराम

मुद्दा भरकटला आहे.......:| :-| :stare:

हे नेहमीचच आहे म्हणा... असो...आता सवय झाली आहे....8) 8-) :cool:

ज्ञानराम's picture

3 Sep 2012 - 2:44 pm | ज्ञानराम

मुद्दा भरकटला आहे.......:( :-( :sad:

इथे हे नेहमीचच आहे.. म्हणा.. आता सवय झाली आहे. 8) 8-) :cool:

ज्ञानराम's picture

3 Sep 2012 - 3:35 pm | ज्ञानराम

मुद्दा भरकटला आहे.......:| :-| :stare:
मुद्दा भरकटला आहे.......:| :-| :stare:
मुद्दा भरकटला आहे.......:| :-| :stare:

ज्ञानराम's picture

5 Sep 2012 - 10:20 am | ज्ञानराम

माझे पण प्रतिसाद कुठे गेले!!

प्र का टा आ वाटत
:| :-| :stare:

खरा आयडी आणि डुप्लीकेट आयडी या विषयावर गेले दोन तीन दिवस खरडफळ्यावर सुरू असलेली रंगतदार चर्चा (आणि चर्चेचा एकंदर खाक्या!) पाहून हा धागा वर काढत आहे ;-)

आशु जोग's picture

22 Feb 2013 - 4:38 pm | आशु जोग

चे पु
हाकानाका
सकाळची कामे नका बुवा इथे करु
आवडल्या गेले आहे

आशु जोग's picture

23 Feb 2013 - 1:21 am | आशु जोग

फाट्यावर मारला आहे

आशु जोग's picture

10 Dec 2013 - 1:04 am | आशु जोग

मिपावरील भाषेशी संबंधित विचारणा करणारा धागा आला आहे म्हणून त्यांच्या माहितीसाठी हा धागा वर आणतो आहे...

काळा पहाड's picture

10 Dec 2013 - 2:14 am | काळा पहाड

मग काय ठरलं शेवटी?

आशु जोग's picture

10 Dec 2013 - 10:33 am | आशु जोग

मग काय ठरलं शेवटी? अर्थ काय !

काळा पहाड's picture

10 Dec 2013 - 11:51 am | काळा पहाड

अर्थ काय !

चेसुगु म्हणाय किंवा न म्हणाय बद्दल.

काळा पहाड's picture

10 Dec 2013 - 11:52 am | काळा पहाड

अरेच्च्या.. मि प्रतिसाद दुसरीकडेच पोस्ट केला होता वाटतं