प्रिय राजेश घासू आण्णा यांसी,
जय मिपाराष्ट्र!
एका विशेष नात्याने ही पत्रवजा विनंती आपणास करीत आहे. मिपाकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. समज आणि गैरसमजाच्या वावटळी उठत असतात. तुम्ही काय आणि आम्ही काय... त्यातून सुटलेलो नाही. काही असले तरी आपल्या संपादकांबद्दल असूया व कवितेच्या पाककृती विषयक लेखाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे.
सध्या आपण मिपाच्या मर्कटलीला मैदानावर एकूणच पिडीत लोकांसाठी स्लटवॉक नामक जबरदस्त युद्ध पुकारले आहे. मर्कटलीला मैदान म्हणजे कंपूबाजी आणि खोपच्यात घेऊन टीका करणार्यांच्याविरोधी लढ्याचे कुरूक्षेत्र बनले आहे. स्लटवॉक मार्गाने छेडलेल्या युद्धास मिपा-भरातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. जनजागृतीची एक लाटच उसळली असून, वातावरण घासूआण्णा मय झाले आहे.
आपल्या स्लटवॉक धाग्याचा पहिलाच दिवस सुरू झाला आहे व त्यावर ७० च्यावर प्रतिसाद आल्याच्या बातमीने आम्हाला चिंता वाटू लागली आहे. एका महान कार्यासाठी आपण मिपा पणास लावण्याची घोषणा केली आहे, पण ही लढाई आपल्या संपादकांवर बेतू नये व ज्यांच्या विरोधात आपण युद्धाला उतरलात त्या दुश्मनांचे त्यात फावू नये यासाठी आम्ही ही कळकळीची नम्र विनंती करत आहोत. आपल्या स्लटवॉकने मिपाकर जागा झालाच आहे व संकेतस्थळही हलले आहे. तेव्हा आता ढासळत्या सर्व्हरकडे पाहून स्लटवॉक सोडा ! स्लटवॉक सोडले तरी कंपूबाजी सुरूच राहील. आपल्या धाग्याच्या शंभरी नंतर आपले सहकारी ३_१४ विक्षिप्त बाई, परा'दिया, थत्ते'चाचा वगैरे मंडळींना संपादकांच्या तोंडी द्या व स्लटवॉक चालू राहू द्या.
मिपात अंतर जालिय स्वैराचार आणि कंपूबाजीने टोक गाठले आहे व सामान्य जनता त्रस्त आहे. आपणांस आठवत असेलच, साधारण १ वर्ष २७ आठवड्यापूर्वी आपण मिपाचे सदस्य म्हणून वस्तीस आलात. शर्ट म्हणून 'जगताना' मिपावर तुम्ही कविताही लिहिली. तेव्हाही सर्व कवितांचे विडंबन करण्याचा परवाना आपणांस संपादकांनी दिला होता आणि आपण त्यावेळी मिपामिपा खेळताना म्हणाला होतात कि, 'आनंदी आयुष्याच्या पाककृती - मिपा कट्टा'. केवळ तेच हे जीवन आनंदी करण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणताही हिम्मत नाही. आम्ही वरचेवर कवितेच्या, लेखाच्या पाककृती पाडू. मग यश निश्चितच! ' असा विश्वासही आपण तेव्हा व्यक्त केला होता, पण दुअर्दैवाने त्याच दरम्यान मिपावर सर्वर नामक आपत्ती कोसळल्या व आपला साचा तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हेसुद्धा एक महान योद्धेच होते. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना दिलेला एक मंत्र असा की धुरेने युद्धासी जाणे, ही तो नव्हे राजकारणे. हा मंत्र सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. शेवटी पुन्हा एकदा आपणांस मिपाराष्ट्राच्या नात्याने विनंती करते आहे की, स्लटवॉक आपण थांबवावे, मात्र लढा सुरूच ठेवावा. आपल्या आंदोलनाचा व या लढ्याचा आंतरजालिय फायदा-तोटा काय हे हिशेब आम्ही करत नाही व आमचा तो स्वभाव नाही. पुढील स्लटवॉकसाठी आपले प्राण महत्त्वाचे. आई मिसळादेवी आपणास उदंड पाव (वॉकसाठी) देवो, हीच प्रार्थना !
जय संपादक ! जय मिपाराष्ट्र ! कांदे कातरम !
आपली नम्र
(प्राजक्ता)
संपादक
(प्रेरणा "हा" धागा आणि शिवसेनाप्रमुखांचे आण्णांना पत्र यातील मजकूर)
प्रतिक्रिया
26 Aug 2011 - 8:24 pm | शुचि
पण घासूगुर्जी स्वतः छुपे संपादक आहेत असे आम्ही ऐकून आहोत त्याचे काय?
26 Aug 2011 - 8:25 pm | इंटरनेटस्नेही
मस्त मस्त लेख, प्राजुताई! लेख मनापासुन आवडला!
-
(संपादक समर्थक) इंट्या.
26 Aug 2011 - 8:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गुर्जी आणि त्यांचे सहकारी (म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती , पराण्णा आणि थत्तेचिच्चा) यांच्या फूट पाडण्याच्या या संपादकीय प्रयत्नांचा मी निषेध करते. खरंतर तो उठवळ मोर्चातच करायला हवा, पण इथेही करते आहे.
27 Aug 2011 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार
अदितीशी सहमत आहे.
(काय वेळ आलीये ह्या घासुगुर्जींमुळे. श्या ! )
संपादकताईंचा निषेध ! ह्या निमित्ताने त्यांच्या संपादककार्याची व संपादक पदावर राहून जमा केलेल्या संपादनाची चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे.
पराण्णा
बाबा राजेश ह्यांचा विजय असो.
28 Aug 2011 - 10:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरेरे, परा ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीशी सहमत होण्याआधी आयडी बॅन का नाही झाला पराचा?
असो, परा तुला "संपादनाची चौकशी व्हावी" असं म्हणायचं होतं का "संपाधनाची चौकशी व्हावी" असं?
26 Aug 2011 - 9:07 pm | रेवती
पण ही लढाई आपल्या संपादकांवर बेतू नये
आपल्या संपादकपदाचे भान ठेवून संयमित भाषेत लिहिले गेलेले हे पत्र हा जालीय विनंती अर्जाचा उत्कृष्ट नमूनाच म्हणायला हवा!
प्राजु, आई मिसळादेवी आपल्यालाही पाव देवो ही प्रार्थना! आपण आम्हा पुणेकरांना खाता येणार नाही अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवून आमच्या र्हिदयावर रामपुरीने घाव घालता आणि आम्ही बनवलेली पुणेरी मिसळ खाण्यास नकार देता तेंव्हाच आपले मिपावरील प्रेम प्रकट होते. इथे असे धागे काढून स्वप्रसिद्धिचा प्रयास आवरता घ्यावा ही आपणास विनंती.
26 Aug 2011 - 10:08 pm | भाकरी
..थेट १ वर्ष २७ आठवड्यापूर्वी वस्तीस आल्याचं आठवलं वगैरे वगैरे :-))
26 Aug 2011 - 10:16 pm | भाकरी
दाखवण्याचा क्षीण प्रयत्न" ही प्रतिक्रिया कशी वाटते? ह. घ्या. (ह. न घेतलात तरी काय फरक पडतो म्ह्णा!!)
27 Aug 2011 - 2:09 pm | इरसाल
परत तीच बोंब.
एकदा डीक्लेर करून टाका कोण कोण आहेत संपादक मंडळात.कि प्रत्येक संपादक असे एक एक पत्र लिहून मी संपादक असल्याचे जाणवून देणार.
27 Aug 2011 - 3:02 pm | परिकथेतील राजकुमार
आजकाल आपण संपादक नसल्याचे किंवा संपादक म्हणून कार्यरत नसल्याचे दाखवण्याची फॅशन आहे ना ? ;)
27 Aug 2011 - 3:06 pm | नितिन थत्ते
'संपादकाचे' या शब्दातून अन्य एका धाग्यावर सांगितल्या गेलेल्या "स्त्री-नाम-सदृश आयडी धारी व्यक्ती स्त्रीच असते असे नाही" या वैश्विक सत्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. :)
अवांतर : घासुगुर्जींनी आपल्याच डु आयडीने स्वतःला पत्र का लिहिले असेल बरे?
27 Aug 2011 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
थत्ते चाचा तुम्हाला 'अवांतर : घासुगुर्जींनी आपल्याच डु आयडीने स्वतःच्याच डु आयडीला पत्र का लिहिले असेल बरे?' असे म्हणायचे आहे का?
पराच्या आयडीमागचा निळ्या
27 Aug 2011 - 3:50 pm | नितिन थत्ते
काहीसं असंच म्हणायच आहे.
.
.
.
.
(थत्तेचिच्चांच्या आयडीमागची) प्रियाली.
27 Aug 2011 - 4:03 pm | सहज
जालप्रसिद्ध भयालीतै आयडीने किती आयडी वश केले आहेत आतापर्यंत? :-)
27 Aug 2011 - 4:08 pm | श्रावण मोडक
वश? नाही हो, झपाटलेले म्हणा. प्रियालीला राग येईल ना. ;) ही सगळी तिची झाडं. एकेकाला धरते, तिला हवं ते त्यांच्याकडून टंकवून घेते, सोडते, पुन्हा धरते... ;)
28 Aug 2011 - 4:15 am | प्रियाली
उद्यापासून कुठल्याही धाग्यावर अवांतर, तिरपे तिरपे प्रतिसाद येऊ लागले तर प्लीज थत्तेचिच्चा आणि मोडक यांना पकडा.
(सध्या स्वकायेत)प्रियाली.
27 Aug 2011 - 4:56 pm | राजेश घासकडवी
अत्यंत सेक्सिस्ट विधान. प्राजुताईंनी 'संपादकिणीचे' असा शब्दप्रयोग करायला हवा होता असं तुमचं म्हणणं आहे का? डॉक्टर, वकील, संपादक ही पेशांची नावं आहेत - ती युनिसेक्स आहेत. ती पुल्लिंगी आहेत हे गृहित धरणं हे पुरुषप्रधान मनोवृत्तीचं लक्षण आहे. आता बघा तुमच्यावर गर्ल कॉमरेडरी कशी तुटून पडते ते.
तुमच्या आयडीचा बोलवता धनी (की धनीण? :) ) कोण हे शोधून काढायला पाहिजे.
मूळ पत्राला सावकाश उत्तर देतोच. सध्या राळेगण सिद्धीच्या लोकांनासुद्धा भेटायला वेळ नाही.
27 Aug 2011 - 5:12 pm | नितिन थत्ते
>>सध्या राळेगण सिद्धीच्या लोकांनासुद्धा भेटायला वेळ नाही
हे राळेगण सिद्धी नेक्सिकोच्या कुठल्या भागात आहे?
नितिन थत्ते
29 Aug 2011 - 1:56 pm | विजुभाऊ
हे राळेगण सिद्धी नेक्सिकोच्या कुठल्या भागात आहे?
तिथे जायला कनेक्टईकट( बु) कडून डावीकडे एक रस्ता जातो तेथे नाही जायचे पुढे एक उजवीकडे होडीवात लागते. तेथेही नाही वळायाचे.
पुढे गेले की एक उंचवटा लागतो तेथून थोडे मागे येवून उजवीकडे वळायचे
29 Aug 2011 - 9:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"संपादकांना मार्गदर्शन करता येईल का?" नामक लेख का उडला? तो लेख उडण्याचा या पत्राशी काही संबंध आहे का?
साधारणतः सुडंबन म्हणावे असा लेख, ज्यातून संपादकांकडून असणार्या अपेक्षा, (संपादकांनी फक्त सफाई-कर्मचारी म्हणून असू नये, इ.) सुजाण वाचकाने सकारात्मक पद्धतीने नोंदवल्या आहेत, ज्यात मिसळपावचा उल्लेखही नाही, त्या लेखांत काय आक्षेपार्ह असू शकतं?