जगताना...
शर्ट म्हणून जगताना
खूप खोचावं लागतं
स्वत:च्या फाटक्या बनियनला
नीट झाकावं लागतं
ताठ कॉलरनं जगताना
घामाने भिजावं लागतं
आणि इस्त्रीच्या वाफेखाली
स्वतःला झोकाव॑ लागत॑
वॉशिंग मशिनच्या गोलात
खूप घुमावं लागतं
ड्रायरच्या गरम जाळात
वाळवून घ्यावं लागतं
चिखलाचा सामना करताना
पांढरेपण जपावं लागतं
चुरगळण्याच्या प्रसंगांना
सामोरं जावं लागतं
टर टर फाटताना
थोडं तुटावं लागतं
कपाटातल्या घडीसाठी
खूप वेळ पळावं लागतं
वाचने
2645
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
मस्त !
वेल्कम
बाहेर...
In reply to वेल्कम by मुक्तसुनीत
मस्त...
आवडली --प्र
उत्त्तम !
व्व्वा!! -