जगताना...
शर्ट म्हणून जगताना
खूप खोचावं लागतं
स्वत:च्या फाटक्या बनियनला
नीट झाकावं लागतं
ताठ कॉलरनं जगताना
घामाने भिजावं लागतं
आणि इस्त्रीच्या वाफेखाली
स्वतःला झोकाव॑ लागत॑
वॉशिंग मशिनच्या गोलात
खूप घुमावं लागतं
ड्रायरच्या गरम जाळात
वाळवून घ्यावं लागतं
चिखलाचा सामना करताना
पांढरेपण जपावं लागतं
चुरगळण्याच्या प्रसंगांना
सामोरं जावं लागतं
टर टर फाटताना
थोडं तुटावं लागतं
कपाटातल्या घडीसाठी
खूप वेळ पळावं लागतं
प्रतिक्रिया
18 Feb 2010 - 6:05 pm | चतुरंग
चतुरंग
18 Feb 2010 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजुन येऊ द्या....!
-दिलीप बिरुटे
18 Feb 2010 - 6:40 pm | मुक्तसुनीत
वेल्कम टू द सोसायटी ;-)
19 Feb 2010 - 2:44 am | राजेश घासकडवी
छुपा सदस्य कायमच होतो. आत्ताच 'बाहेर' येतोय... :-)
18 Feb 2010 - 10:14 pm | मदनबाण
मस्त... :)
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
19 Feb 2010 - 5:29 am | प्रभो
आवडली
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
19 Feb 2010 - 11:25 pm | गजा गाजरे
सदरा आवडला
20 Feb 2010 - 3:19 am | प्राजु
व्व्वा!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/