थोडेसे 'रंग'वणे

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
5 Apr 2011 - 1:14 am

वडापाव मिळणार असे समजून जावे आणि अचानक पुरणपोळी समोर यावी तसा मिसळपावावर 'थोडेसे शब्दवणे' हा लेख सामोरा आला. अलवार पुरणपोळीवर पातळ तुपाची धार पडून डाराडूर वामकुक्षीची दवंडी पिटणारा. शब्दनशब्द दवणीय रसाने ओथंबलेला. 'लिखाळ' हे दवण्यांचे टोपण नाव तर नव्हे असे वाटून मी नखे कुरतडतो! पुलाखालच्या कविता करण्यासाठीच खरेतर लिखाळाने कलम हाती घ्यावे. त्याच्या भेसूर कवितेचे जसे शब्द, तसे हे उंबराला आलेले फूल. लिखाळाच्या अनिर्बंध काळ गायब होण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठी प्रतिसाद कर्त्यांचे सर्व प्रयत्न. पण तो या सर्वांहून फार हुशार.

मी नव्या उत्साहाने प्रतिक्रिया वाचून पुढे जाणार तोच सुडंबन करावे की नको अशा आशयाची प्रतिक्रिया वाचली, म्हणालो, असे लेख पाडायचे ते रिवर्स इंजिनियरिंग साठीच ना! मग असे सोडायचे कशाला. हा वेडेपणा नाही का? चला आपण त्या ताजमहालाला विटा लावूयात!
माझ्या मेंदूत विडंबन तरारले.
आज पाडव्याच्या मुहूर्ताला ही विडंबनाची गुढी उभारूयात!
एका विडंबकाने लिखाळाच्या दवणीय लेखणीला दिलेली ही दाद आहे.

-चतुरंग

विनोदवाङ्मयमुक्तकविडंबनव्युत्पत्तीसमाजप्रकटनविचारआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

5 Apr 2011 - 2:36 am | आनंदयात्री

हा हा हा मस्त !!

प्राजु's picture

5 Apr 2011 - 6:13 am | प्राजु

_____/\______

रंगा इज ब्यॅक!! :)

टारझन's picture

5 Apr 2011 - 6:31 am | टारझन

व्वा ! रंगाजी वा !! रंग्याचाचा सोबत सर्व मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच इद मुबार्रक आणि मेरी च्रिसमस :)

आनंदी आनंद गडे .. रंगां संगे मोद भरे ..
वाजवा सनै-चौघडे .. टार्‍या म्हणे

पैसा's picture

5 Apr 2011 - 11:50 am | पैसा

या लेखाच्या निमित्ताने चतुरंग बरेच दिवसानी लिहिते झाले, तसंच 'सुडंबन' हा नवा शब्द मिळाला, म्हणून छान वाटलं. आणखी येऊ द्यात!

कानडाऊ योगेशु's picture

5 Apr 2011 - 1:48 pm | कानडाऊ योगेशु

या लेखाच्या निमित्ताने चतुरंग बरेच दिवसानी लिहिते झाले.

मी चुकुन - चतुरंग बरेच दिवसानी नाहते झाले - असे वाचले.

नव वर्षाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!

राजेश घासकडवी's picture

6 Apr 2011 - 7:40 am | राजेश घासकडवी

लिखाळ आणि चतुरंग दोघेही लिहिते झाले...

चतुरंगाने लिखाळाच्या दवणीय लेखणीला दिलेली ही दाद म्हणजे मिपाकरांना पर्वणीच आहे.

राजेश