नेहमीसारखेच - ७

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
21 Mar 2011 - 12:02 pm

नेहमीसारखेच - १
नेहमीसारखेच - २
नेहमीसारखेच - ३
नेहमीसारखेच - ४
नेहमीसारखेच - ५
नेहमीसारखेच - ६

नेहमीसारखेच - ७

आजही ती गौरवर्णी काया गहिवरली....
अगदी नेहमीसारखेच....
आजही त्या सावळ्याची प्रतीक्षा दाटली...
अगदी नेहमीसारखेच...

किती उत्कट व्हावे सारे रे....

इतकी कशी रे संध्या वेडी...पुढे सरकेच ना....
इतकी कशी रे अवनी अधीर झालेली....
सारे कसे सावळ्यासाठी आतुरलेले....
यमुनातीरावरील कदंबही आज बेचैन...

कुणाकुणाला समजवावे आणि कुणी रे....

त्या गौरवर्णीच्या हृदयी वादळ कोंदाटले....
उरातून सारे कसे असे उचंबळले....
अवचित एक निळसर उत्तरीय दूरवर तरळले...
एकाच गलका सा-या विश्वात उठला....
संध्या तृप्त अन् अवनी अवघडली....
कदंबाचे पानन् पान सळसळले....
ती गौरवर्णी तर संमोहित..... अन् नि:स्तब्ध...
हे असेच होते....
सावळ्याची जादूच अशी कि.....
अवघे विश्व व्यापते... नेहमीसारखेच....
.........
.............
अन्....मग ती गौरवर्णी हळू हळू....
सावळी होत जाते....
नेहमीसारखेच...अगदी नेहमीसारखेच....

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२१/०३/२०११)

शृंगारकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

21 Mar 2011 - 12:25 pm | नगरीनिरंजन

छान! राधाकृष्णाचं प्रेम या चिरंतन काव्यरसिकप्रिय विषयाच्या परीसस्पर्शाने कविता नेहमीपेक्षा वेगळ्याच उंचीवर गेली आहे.

प्रकाश१११'s picture

21 Mar 2011 - 12:31 pm | प्रकाश१११

नेहमीप्रमाणेच मस्त . आवडली !!

कच्ची कैरी's picture

21 Mar 2011 - 6:25 pm | कच्ची कैरी

बाप रे !!!!!!! ही कविता नीट समजुन घेण्यासाठी आधीचे सहा भाग वाचावे लागतील .

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Mar 2011 - 12:16 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

न्हाई वो तै,
प्रत्येक कविता वेगळी आहे. स्वतंत्र आहे. फक्त सादरीकरणाची पद्धत सारखी आहे. म्हणुन ति एका मालिकेत मांडतो आहे.
बाय द वे, ही कविता कशी वाटली सांगितलेच नाहीत तुम्ही?

गणेशा's picture

22 Mar 2011 - 12:22 am | गणेशा

छान

प्राजु's picture

22 Mar 2011 - 2:34 am | प्राजु

कविता खूप आवडली.

नेहमीप्रंमाणेच... :) सुंदरच. काय मस्त सीरिज सुचली आहे तुम्हाला. वाह. म्हण्जे हे तुम्हाला सुचले , हे आम्हा रसिकांचे भाग्यच असेच बोलावे वाटते. सुंदर लिहिता तुम्ही. असेच वाचायला अजुन मिळु द्यावे :).