नेहमीसारखेच - १
नेहमीसारखेच - २
नेहमीसारखेच - ३
आजही मावळतीला ढग काळवंडले...
अगदी नेहमीसारखेच...
आजही तुझ्या स्मरणाने डोळे पाणावले...
अगदी नेहमीसारखेच...
कसे सांगावे तुला गं...
रोज पहाटेसह निघतो मी...
मला अर्ध्या वाटेवर सोडून...
पहाट, सकाळ, मध्यांन्न सगळे जातात परतुनी...
पण तरी मी चालत राहतो...
तुझ्या शोधात वणवण फिरतो...
कुठ जाऊन दडतेस गं...
अखेर मी तसाच...शरीर थकवून...घरी परततो...
बिछान्यावर अंग टाकून...शुद्ध हरपतो...
अन् मग...तू स्वप्नात येऊन विचारतेस....
कुठे असा भटकत होतास वेड्यासारखा...कधीची वाट पाहतेय...
तेही नेहमीसारखेच....अगदी नेहमीसारखेच....
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०९\०३\२०११)
प्रतिक्रिया
9 Mar 2011 - 12:13 pm | फ्रॅक्चर बंड्या
छान
9 Mar 2011 - 12:53 pm | गणेशा
अन् मग...तू स्वप्नात येऊन विचारतेस....
कुठे असा भटकत होतास वेड्यासारखा...कधीची वाट पाहतेय...
तेही नेहमीसारखेच....अगदी नेहमीसारखेच....
मस्त एकदम .. कवितेला एकदम वेगळेच वळण लावणार्या ओळी
10 Mar 2011 - 4:01 am | अथांग
आज खूप दिवसांनी मिसळपावला भेट दिली, आणि बरेच वाचन केले...पाहुणी बनुन. पण तुमची ही व आधीच्या दोन्ही कविता वाचल्या आणि अभिप्राय दिल्यावाचून रहावेना, म्हणून मग शिस्तीत साईन-इन करुन हे लिहीतेय.
फारच छान आहे ओघवती भावना आणि कवितेची भाषासुद्धा ! मुक्तछंदाचा आभास - पण तरीही एका वेगळ्या बंधात गुंतवून ठेवणारी ही कविता.
लिहीत रहा, वाचायला आवडेल...
-अथांग.
11 Mar 2011 - 1:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
धन्यु अथांग तै!!
वाचत रहा... पुढील भाग देत राहीन....
11 Mar 2011 - 12:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
धन्यु..