नेहमीसारखेच - १
आजही तिला छान जमलेली कविता दिली वाचायला....
अगदी नेहमीसारखेच.....
आजही तिने वाचून प्रेमाने विचारले मला.....
अगदी नेहमीसारखेच....
कसे जमते तुला रे.....
इतके सुंदर शब्द...
इतक्या छान उपमा...
मनाचा ठाव घेणारी लय...
अंत:करणाला थेट भिडणा-या भावना...
तू आणतोस तरी कुठून रे...
काय उत्तर देऊ....विचार करतोय...
खर तर हे प्रश्नच निरर्थक आहेत...
हो खरंच निरर्थक आहेत...
मी तर... मी तर फक्त तिला कागदावर उतरवत होतो....
नेहमीसारखेच... अगदी नेहमीसारखेच...
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०४/०३/२०११)
प्रतिक्रिया
4 Mar 2011 - 1:16 pm | गणेशा
काव्यप्रेमींचे प्रेमकाव्य आवडले मनापासुन ..
5 Mar 2011 - 1:45 am | आत्मशून्य
.
5 Mar 2011 - 3:45 am | बेसनलाडू
नेहमीसारखीच आवडली.
(वाचक)बेसनलाडू
5 Mar 2011 - 11:05 am | हरिप्रिया_
:)
छान ...
5 Mar 2011 - 11:07 am | नगरीनिरंजन
आवडली!
7 Mar 2011 - 11:59 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सर्वांचे धन्यु...
27 Mar 2011 - 10:12 pm | काव्यवेडी
नेहमीसारखेच - १ ही खूप जास्त आवडली.