नेहमीसारखेच - १
नेहमीसारखेच - २
नेहमीसारखेच - ३
नेहमीसारखेच - ४
आजही पावसात भिजतांना तिला छेडले...
अगदी नेहमीसारखेच....
आजही लटक्या रागाने तिने पहिले...
अगदी नेहमीसारखेच...
कसे खुळावतेस मला गं....
इतकी नाजूक रेखीव काया...
इतक्या लोभस नजरेत इतका मोहक तोरा...
सावळ्याश्या डोळ्यात सावळासा नखरा...
पापण्यांची उगाच चाललेली उघडझाप...
कसे हे जुलूम सहावे गं....
मग उगाच लुडबुड चालू झाली माझी...
आणि शेवटी घडवूनच आणला मी...
एक गोड अपघात...
नेहमीसारखेच...
............
तेव्हा तू मात्र विरघळत होतीस...
माझ्या साखरमिठीत....
नेहमीसारखेच..... अगदी नेहमीसारखेच......
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(११/०३/२०११)
प्रतिक्रिया
11 Mar 2011 - 1:12 pm | प्रकाश१११
मिसळलेला काव्यप्रेमी - एकदम फ्रेश लिहिले आहेस .
आजही पावसात भिजतांना तिला छेडले...
अगदी नेहमीसारखेच....
आजही लटक्या रागाने तिने पहिले...
अगदी नेहमीसारखेच..
खरेच छान .आवडले.!!
11 Mar 2011 - 6:15 pm | गणेशा
हे संपुर्ण सिरीझ खुपच बेस्ट होत चालली आहे ... एकदम मस्त
11 Mar 2011 - 9:29 pm | निनाव
गणेश ह्यांना अनुमोदन. खरंच आहे. मस्तच होत चालले आहे.
इतकी नाजूक रेखीव काया...
इतक्या लोभस नजरेत इतका मोहक तोरा...
सावळ्याश्या डोळ्यात सावळासा नखरा...
पापण्यांची उगाच चाललेली उघडझाप...
खूपच छान..वाह. - पुढिल भाग कधी वाचायला मिळेल? - :)
- शुभेछा.
निनाव.
12 Mar 2011 - 7:55 pm | वैशाली .
:) सुन्दर.. !!
14 Mar 2011 - 11:40 am | मिसळलेला काव्यप्रेमी
प्रतिसाद दिलेल्या (आणि नुसतेच वाचुन प्रतिसाद न दिलेल्या ;)!) सर्वांचे धन्स..