नेहमीसारखेच - ५

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
14 Mar 2011 - 11:46 am

नेहमीसारखेच - १
नेहमीसारखेच - २
नेहमीसारखेच - ३
नेहमीसारखेच - ४

नेहमीसारखेच - ५

आजही पावसाने सरींचे सूर छेडले...
अगदी नेहमीसारखेच....
आजही तुझ्या कुंतलांचा मृदगंध दरवळला....
अगदी नेहमीसारखेच....

नजरेसमोर अशी विजेची रेष उमटली गं.....

इतकी मोहक तनु जणू हिरकणी....
इतक्या ढगाळलेल्या भुईवर जणू चमकती चांदणी...
भान हरपून मी जागच्या जागी थिजलो....
श्वास हृदयात अडकून बापडा स्तब्ध जाहलो....

कसे स्व:ताला सावरू गं.....

मग माझ्या काळजात गान उमटू लागले....
मेघमल्हारचे आळवणीचे सूर घुमू लागले....
आता पुन्हा ती लोचनांतून भरभरून ओघळू लागली....
गालांवरून सरकून ओठात अडकाया लागली....
आणि माझी मात्र... उगाच दमछाक.... तिला गाठायला....
नेहमीसारखेच...
............
अन् ती तर जणू काही घडलेच नाही..... असे पाहत....
चक्क निघून गेली...
नेहमीसारखेच.... अगदी नेहमीसारखेच...

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४/०३/२०११)

शृंगारकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

14 Mar 2011 - 1:16 pm | प्रकाश१११

मिसळलेला काव्यप्रेमी
आजही पावसाने सरींचे सूर छेडले...
अगदी नेहमीसारखेच....
आजही तुझ्या कुंतलांचा मृदगंध दरवळला....
नेहमीसारखीच छान . मस्त !!

कुंतलांचा मृदगंध .. आवडला हा शब्द..

कविता नेहमीसारखीच सुंदर