नेहमीसारखेच - २
आजही पहिले तिला खिडकीत बसलेले...
अगदी नेहमीसारखेच...
आजही तिने कटाक्षाने माझे कटाक्ष टाळले...
अगदी नेहमीसारखेच...
कसे जमते तुला गं...
इतके अलिप्त भाव चेह-यावर...
इतकी स्तब्ध नजर क्षितिजावर...
मनातील खळबळ मनातच लपवून...
डोळ्यांमध्ये मात्र ही अजोड अनभिज्ञता...
तू आणतेस तरी कुठून गं...
मग मि ही अंमळ त्राग्याने...
नजर फिरवू लागतो...
परंतु...नजर फिरवता फिरवता.... हलकेच...
डोळ्यांच्या कोनांतून स्पर्शून जाते...
तेच तुझे.....जीवघेणे.... अबोध प्रेमाची कबुली देणारे...
मंदमधुर हास्य.....नेहमीसारखेच.....
अगदी नेहमीसारखेच....
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०७/०३/२०११)
प्रतिक्रिया
7 Mar 2011 - 12:38 pm | निनाव
भन्नाटच. खूप आवडली.
इतके अलिप्त भाव चेह-यावर...
इतकी स्तब्ध नजर क्षितिजावर...
मनातील खळबळ मनातच लपवून...
डोळ्यांमध्ये मात्र ही अजोड अनभिज्ञता...
खूपच सही.
7 Mar 2011 - 4:00 pm | गणेशा
कविता अतिशय छान .. आवडली एकदम ..
सोप्या शब्दांना ही खुपच छान पद्धतीने लिहिले आहे. विशेष करुन - >>
स्तब्ध नजर ,
अजोड अनभिज्ञता...
अबोध प्रेम
मंदमधुर हास्य.....
7 Mar 2011 - 4:31 pm | पियुशा
मस्त जम्लिये :)