नेहमीसारखेच - १
नेहमीसारखेच - २
नेहमीसारखेच - ३
नेहमीसारखेच - ४
नेहमीसारखेच - ५
नेहमीसारखेच - ६
सहज नजर उंचावून नभाकडे पहिले...
अगदी नेहमीसारखेच...
सारे कसे अगदी स्वच्छ, निरभ्र अन् शांत...
अगदी नेहमीसारखेच....
कसा थांगपत्ता लागावा गं....
क्षितीजास टेकलेल्या नजरेतून सुटलेला...
उत्कट श्वासांची उब असलेला...
एक चुकार अश्रू अवचित निसटला....
अन् जीवाला घोर लावून गेला...
कसा उमजावा हा खेळ गं....
मग मी ही जरा चाचपडायाला लागलो...
डोळे, नजर अन् श्वास सगळे काही तपासून झाले...
काही कळेना... सारे काही जगाच्या जागी...
अचानक ध्यानी आले माझ्या...
मन तपासायचे राहिले....
पहिले तर चुकून एक कप्पा उघडला गेला होता....
.......
............
तुझ्या आठवणींचा...... नेहमीसारखेच....
हं...अगदी नेहमीसारखेच....
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१६/०३/२०११)
प्रतिक्रिया
16 Mar 2011 - 12:39 pm | नगरीनिरंजन
सहज नजर उंचावून स्क्रीनकडे पहिले...
अगदी नेहमीसारखेच...
सारे कसे अगदी स्वच्छ, सुंदर अन् शांत...
अगदी नेहमीसारखेच....
कसा थांगपत्ता लागावा भौ....
स्क्रीनवर रोखलेल्या डोळ्यांतून सुटलेला...
उत्कट पश्चात्तापाची धग असलेला...
एक चुकार अश्रू अवचित निसटला....
अन् कीबोर्डची वाट लावून गेला...
कसा उमजावा हा खेळ भौ....
मग मी ही जरा धडपडायाला लागलो...
डोळे, नजर अन् श्वास सगळे पार कामातून गेले...
काही कळेना... सारे काही काहीच्या काही...
अचानक ध्यानी आले माझ्या...
स्क्रीन तपासायची राहिली....
पहिले तर चुकून एक धागा उघडला गेला होता....
.......
............
तुमच्या कवितेचा...... नेहमीसारखेच....
हं...अगदी नेहमीसारखेच....
16 Mar 2011 - 12:53 pm | प्रकाश१११
मिसळलेला काव्यप्रेमी -
क्षितीजास टेकलेल्या नजरेतून सुटलेला...
उत्कट श्वासांची उब असलेला...
एक चुकार अश्रू अवचित निसटला....
अन् जीवाला घोर लावून गेला...
छान सूर लागलेत .नेहमीप्रमाणेच ..!!
16 Mar 2011 - 2:24 pm | गणेशा
नेहमीसारखीच छान
16 Mar 2011 - 3:56 pm | निनाव
तुफ्फान...
क्षितीजास टेकलेल्या नजरेतून सुटलेला...
उत्कट श्वासांची उब असलेला...
एक चुकार अश्रू अवचित निसटला....
अन् जीवाला घोर लावून गेला...
भन्नाट... भन्नाटच्...वाह... हरवलो मी....
16 Mar 2011 - 7:44 pm | मनीषा
सुरेख !!!