डास ढेकुण झुरळ

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
29 Jan 2011 - 3:12 pm

मित्रानो
आपण ज्याना अगदी क्षुल्लक मानत असतो ते खरेतर खूप काही करत असतात.
त्यांचे कर्तृत्व वादातीत असते. त्यांचे आपण त्यांचेकडे नीट पहात नाही. मूर्ती लहान पण कीर्ति महान असेच म्हणावं लागेल यांचे कर्तृत्व पाहून.
1
नाना पाटेकरसारख्या बुलन्द अभिनेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि एखादा क्षुद्र जीव प्रबळ माणसाला सुद्धा हिजडा बनवतो असे म्हणावे लागले. यातच या जीवाचे मोठेपण दिसून येते.
600
हे त्याचे पुर्ण रूप.
2
एखाद्या गाण्यात कोणीतरी रात्रभर याकुशीवरून त्या कुशीवर तळमळतोय असे आले की मला याचीच आठवण यायची.
2
याचे कराल विजयी हास्य आपल्याला दिसत नाही. 5
गेल्य अकित्येक सहस्त्र वर्षात जर्राही न बदललेला प्राणी. उत्क्रान्ती सूत्रात पुर्णपणे स्वतःला नेहमी सर्वपरिस्थीती त विजयी ठेवणारा प्राणी
हा 6

या प्राण्याला म्हणे सहा र्‍हदये असतात. त्याचा मेंदू त्याच्या डोक्यात नसतो. डोके कापलेले झुरळ साधारणतः चार ते पाच दिवस जिवन्त राहु शकते. ते चालते फिरते. फक्त त्यानन्तर उपासमारीमुळे मरते.
झुरळाला उलटे केले की त्याच्या र्‍हदयावर दाब पडतो आणि झुरळ मरते हा याचा वीकनेस.
अन्यथा तुम्ही त्याच्या पाठीवर एखादी वजन्दार वस्तु ठेवा झुरळ त्याच्या वजनाच्या २०० पट वजन सहन करू शकते . इतके ते ताकदवान असते.

अनेक जाती प्रजाती अनेक आकारात झुरळ आढळते
7
8

जमिनीवर , पाण्यात , हवेत , उष्णप्रदेशात , थन्डगार प्रदेशात कोरड्या रुक्ष हवेत , दमट हवेत झुरळ सर्वत्र आढळते.
9
हे समुद्री थन्ड पाण्यातले समुद्री झुरळ
15

मानवाचे खाद्य म्हणूनही याच्याकडे पाहिले जाते.
9
त्याची झैरात सुद्धा होते
10
आपण मात्र उगाच त्याचा द्वेश करतो.
थायलंड मध्ये रस्तोरस्ती फूड स्टॉल वर अशा डिशेस मिळतात
स्थानीक दारुसोबत चखणा म्हणून तळलेले कॉक्रोचेस
12
चवीने खाल्ले जाणारे झिंगे तरी काय असतात. समुद्रातली झुरळेच ना
14
टीपः लेखातील चित्रे जाला वर सर्वत्र उपलब्ध आहेत त्यावरुन घेतेली आहेत.
अवांतर : चित्र ज्यान्ताने आपापल्या जबाबदारीवर पहावीत

नृत्यसंस्कृतीनाट्यगझलसाहित्यिकविचारअभिनंदनआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

29 Jan 2011 - 3:40 pm | टारझन

वा वा वा !! तोंड लाळावले ... बादलीभर लाळ गळाली ..
विकांताला नक्की करुन पाहिन .. अगदी ढासु स्टायलीत :)

अवांतर : ढेकुण कढी ही भाकरीबरोबर उत्तम लागते. झुरळं एक दिवस आधी पाण्यात भिजत ठेवल्यास भाजीला छाण तर्री येते :)

- कैप्टण कुक

विनायक प्रभू's picture

29 Jan 2011 - 3:44 pm | विनायक प्रभू

माहीतीपुर्ण लेखाबद्दल विभौ चे ढण्यवाद आणि अभिणंदन.

तुमच्या गुज्जु ढोकळ्यात घालुन कसे लागतील हो? पाकृ करुन खातानाचा फोटु टाका ना.

प्रचेतस's picture

29 Jan 2011 - 4:03 pm | प्रचेतस

या तिघांमध्ये ढेकूण घरासाठी सर्वाधिक त्रासदायक असतो असे आमचे मत. एकतर झुरळे विचारी पेस्ट कंट्रोल केल्यावर निमूटपणे गायब होतात पण ढेकणाचे तसे नाही. साध्या साध्या कीटकनाशकांच्या मार्‍यातूनही हे जिवंत राहतात. चिरडले तरी हे परत जिवंत होतात म्हणे म्हणून त्यांना रावणाची उपमाही दिली जाते. यांना मारण्याचा जालीम उपाय म्हणजे पकडून रॉकेलमध्ये टाकणे. यांचा प्रादुर्भाव खूप वाढला तर घरचे फर्निचर विकायची पाळी येते व ते विकतही कोणी घेत नसल्याने शेवटी जाळूनच टाकावे लागते. यांना इंद्रजितासारखी अद्दृश्य होण्याची शक्तीही लाभलीय म्हणे. चावतांना हे महाशय दिसत नाहीत कारण हे चावल्यानंतर बधिर करणारे रसायन सोडतात व रक्तप्राशन केल्यानंतर हे महाशय सुखरूप दूर पळतात व बरेच वेळाने आपणास चावल्याची जाणीव होती.
यांचा त्रास विशेषतः घरच्या स्त्रियांना जास्त प्रमाणात होतो तो मासनिकच जास्त असावा. घरात उग्र रसायनांचा वास आला की खुश्शाल समजावे की घरातल्या पुरुष मंडळींची तोंडाला फडके बांधून ढेकूण मारण्याची मोहीम चालू आहे.

किशोरकुमारने पण यांची महती वर्णन केली आहे.

धीरे रे से आजा रे खटीयन में रे खटमल धीरे से आजा रे |
सोयी है राजकुमारी.........||

धीरे रे से आजा रे खटीयन में रे खटमल धीरे से आजा रे |
सोयी है राजकुमारी.........||

आजा नाय रे भो... धीरे से जाना खटीयन मे.. असं आहे ते. राजकुमारी असताना तो ढेकणाला बोलावेल कशाला खटीयन मे.. तुम्ही बॅचलर आहात काय?

प्रचेतस's picture

29 Jan 2011 - 4:16 pm | प्रचेतस

गाणे फार पुर्वी ऐकल्यामुळे गफलत होउ शकते; :)
तरी 'आजा ' च्या ऐवजी 'जाना' असे वाचावे. ;)

हरकत नाय हो... खाट, राजकुमारी आणि ढेकणाच्या जरा भावनिक आठवणी आहेत हो.. म्हणुन एकदम उचंबळुन आलो. ;-)

वा काय उपमा आहे खाटेतला मल्ल तो 'खट्मल'

नरेशकुमार's picture

29 Jan 2011 - 4:21 pm | नरेशकुमार

झुरळ हा एकमेव प्रानी आहे जो प्रियकरला ऐन वेळि मदत करतो. (प्रेयसिला मिठीत घेण्यासाठी)

लेख मंजे सर्व गुन संपन्न

एक शंका : एडस झालेल्या मानसाला चावलेला ढेकुन चावल्याने एडस होतो का ?

तुले चावला का भो ?

- भाद्रा फुकट

नरेशकुमार's picture

29 Jan 2011 - 5:47 pm | नरेशकुमार

शक्यता नाकारता येत नाय.

क्या बात है ! जबरा विजुभाउ!!

ह्याच बरोबर त्यांना पाळण्याची कृती दिली असती तर बरे झाले असते.

संपादन किंवा अन्य कुठल्याही बाबतीत संपादकीय कारवाईचा उल्लेख टाळावा. यापुढे असे प्रतिसाद काढून टाकले जातील.
- नीलकांत

कुंदन's picture

29 Jan 2011 - 5:09 pm | कुंदन

संपादन किंवा अन्य कुठल्याही बाबतीत संपादकीय कारवाईचा उल्लेख टाळावा. यापुढे असे प्रतिसाद काढून टाकले जातील.
- नीलकांत

अजुन काही किटक मानवांवर प्रेम करतात त्यात ढेकुण,पिसु,ऊवा,लिखा किंवा गोचीड ह्याबद्दल देखिल विजुभौना लिहता आले असते.

आत्मशून्य's picture

29 Jan 2011 - 7:23 pm | आत्मशून्य

अप्रतीम छायाचीत्रांच कलेक्शन...असलेच लीहीत रहा. आणी प्रसीध्द पण करा.

कच्ची कैरी's picture

29 Jan 2011 - 8:54 pm | कच्ची कैरी

जनरली ह्या कीटकांना पाहुन ईईईईईईईईईईईईईईई असेच वाटते पण जे काही फोटो या लेखात टाकले आहे ते पाहुन यांना क्युट कीटक म्हणावेसे वाटतेय.

विजुभाऊ's picture

7 Mar 2012 - 4:00 pm | विजुभाऊ

धन्यवाद

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 4:50 pm | चौकटराजा

माझी एक मुलगी जरा जास्त गॅप नंतर झाली. ( असा "क्लीन बोल्ड "तुमच्यापैकी काही जणांचा झाला असेलच तेंव्हा फार हसू नका ! ) तर सांगत काय होतो. आता सनलाच्या गिलावा असणार्‍या मुलायम भिंती आल्या. ढेकणाना चिकटण्यासाठी कपार मिळेनाशी झाली. गेल्या २३ वर्षात आमचे घरी ढेकूण नाही.मुलगी विचारते 'बाबा ढेकूण हा काय प्रकार आहे ? आता तिला विजूभौ चा फोटो .... अरे अर माफ करा विजुभौ ने डकविलेला फोटू दाखवितो.
विजू भौ, पोरीच्या हट्टा साठी खालील फोटू चिकटवावे
फिरकीचा तांब्या
मायाळूची भाजी
टाकळ्याची भाजी
डिंगर्‍या
घोळूची भाजी
वैलाची चूल
नेवेग्र्या
भुशाची शेगडी
कोळशाची इस्त्री
खांडसरी साखर