झिंग थिंग..!!

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
24 Nov 2010 - 6:09 pm

ब्रँड नॉस्टाल्जिया ही एक मजेशीर चीज आहे..

आज अशाच काही ब्रँडमित्रांची आठवण झाली ..

पहिला गोल्ड स्पॉट ..झिंग थिंग..!!

संत्र्याची मिरमिरीत मस्त चव आत्ताही जिभेवर आली..

हाँ हुजूर.. वो मेरा दीवाना जरूर.. !!
मेरा उतना दीवाना जितने दोनों है दीवाने..
गोल्ड स्पॉट.. दीवानों का मज़ा..गोल्ड स्पॉट..!!

कोकाकोलानं थम्स अप् सोबत हाही विकत घेतला आणि ठार केला..

लिम्कासुद्धा फोटोत गेला होता.. पण त्याचं अवतारकार्य बाकी होतं..

त्याचा पुनर्जन्म झाला..

आय ड्रिंक लिम्का बिकॉज आय लाईक इट.. !!

ही टॅगलाइन खूप गाजली.. खरं तर ग्रेट क्रिएटिव्ह काही नसतानाही..

लाईम अँड लेमोनी लिम्का.. ही जुनी लाइन तर आजही नव्यानं जागी झाली आहे..

"ये नोकझोंक शरारतें" वाल्या फ्रेश अ‍ॅडसोबत तो परत आलाय..!!

मला लिम्का "प्यायला" फार आवडायचा नाही. पण त्याच्या बुचाच्या आत रबरी स्टिकर मिळायचा..डिस्ने चा..

आई बाबांसोबत कुठल्या भारी हॉटेलात गेलो तरी मी भिकारडेपणासदृश वर्तन करून, तिथल्या स्टाफकडे फेकलेली लिम्काची बुचं मागायचो..मी लाज सोडायचो आणि आई बाबाना लाज आणायचो..

कधी चुकून कोल्ड्रिंक पिण्याची ऑफर मोठ्यांकडून झालीच तर लिम्का मागवायचा...दोन घोट पिऊन निर्लज्जपणे टाकून द्यायचा (म्हणजे बिचार्‍या आईला प्यायला लावायचा..आई हे देवाचं रूप..!!)

..आणि (मुद्द्याचं..!!) बूच मिळवायचं..

नजर भंगारवाल्यासारखी सदैव होटेलातल्या खाली पडलेल्या बुचांच्या ढिगावर..लाल बुचात स्टिकर नसतो.. हिरव्या बुचातच असतो हे मी लवकरच शोधून काढलं होतं.. माझी बोटं आणि नखं पत्र्याची बुचं खरवडून खरवडून कुरतडल्यागत दिसायची..

डोनाल्ड डक मला जाम आवडायचा...मऊ मऊ रबरावर छापलेले रंगीत मिकी, डोनाल्ड, स्क्रूज, लुई, ह्युई, ड्युई..त्यांची मऊ थप्पी बोटांत दाबून भाव मारायचा मित्रांमधे.... त्या स्टिकर्सची एक्सचेंज व्हैल्यूही खूप होती..चार पाच स्टिकर्सच्या "बदली" एखादं मॅग्नेट (त्या वेळच्या पोरांच्या भाषेत "लवचिंबक") सुद्धा मिळू शकायचं..कोण म्हणतं की वस्तुविनिमय फार जुना झाला.. आमच्या शाळेत तर त्याचं "कमोडिटी एक्सचेंज" होतं..

अमुक एक इतके स्टिकर्स जमा केले की काहीतरी बक्षीस मिळतं अशीही एक बोलवा होती.. पण मी कधीच माझे स्टिकर द्यायला तयार झालो नसतो..
............

कॅडबरीजचं "डबल डेकर" हे माझं अगदी पहिलं प्रेम..थोडं कुरकुरीत..खुटखुटीत आणि बरंच बरंच टेस्टी..हे जर कोणाला आठवत असेल तर मला खूप ग्वाड वाटेल.

..त्याचं जाणं मला खूप धक्का देऊन गेलं..मिलिंद बोकिलांच्या "शाळा" मधल्या शिरोडकरच्या जाण्यासारखं..

पण आयुष्य पुढं जात राहातं.. (.. फिर हमारे मोहल्ले में हेमा आयी...!!!)

..तसंच मग कधीतरी कॅम्पको चॉकलेट आलं.. कॅडबरीजच्या जगात काही नाही तरी फक्त एक चेंज म्हणून ते सॉलिड आवडलं..

कुठे गेलं ते काय माहिती..शोधतोय शोधतोय.. मग काही वर्षांनी नाद सोडून दिला..

.....

डबल कोला.. हे एक पेय .. आणि रोला कोला नावाच्या गोळ्या..

रोला कोला..रोला कोला..इसमें कोला का मजा अलबेला..!! रोला कोला...कोला का गोला.. !!

बघा अजूनही जिंगल आठवतेय मला...

साल्या या जिंगल्स ही गायब झाल्या..नवीन विजुअल अ‍ॅड्सच्या तंत्रामधे..
...
नोगा जाम.. मस्ती भरा स्वाद खरा..
...
लाईफबॉय है जहां, तंदुरुस्ती है वहां..
...

माल्टोवा मम..

...
दातों को सडने से बचाता है कोलगेट..

पेस्ट आहे पण जिंगल गेली.
...

सुधा सुधा सॉफ्ट ड्रिंक काँन्सेन्ट्रेट
अड़तीस गिलास एक पैकेट से बने..
तेरा तरह के स्वाद नये नये..
...

शार्प नावाचं पेन...रेनोल्ड्स ०.४५ फाईन कार्ब्युअर ..

न्युट्रामूल..अंकल चिप्स..(बोले मेरे लिप्स..आय लव्ह अंकल चिप्स..).लॅक्टो किंग..

"O.K. च्युईंग गम".."डबल बबल गम"..

एक्स्ट्राँग गुलाबी पेपरमिंट..पॉपिन्स.. रावळगाव..

हे सर्व ब्रँड एकतर संपले..किंवा त्यांचा चार्म तरी गेला..

अनब्रँडेड चिजा तर मोजण्यापलिकडच्या..

मनोज पान शॉपच्या बरणीतल्या लाल गोळ्या..किंवा पांढर्‍या दूधगोळ्या..
लिमलेट्च्या संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या गोळ्या (५ पैसे..!!)..
चंदा आईस्क्रीम नावाच्या ढकलगाडीतली गार गार लाल कांडी..
कालाखट्टावाला पेप्सीकोला..खारट बर्फाळ प्लॅस्टिकच्या पिशवीचं टोक दातांनी तोडून गार गोड थेंब जिभेवर चोखायचे..

प्रत्येक brand कड़े स्वत:चं काही ख़ास होतं..आहे..!!
प्रत्येक brand कड़े स्वत:ची काही बात होती.. आहे..!!

आणि आपल्यातही ...

कुछ ख़ास है हम सभी में..
कुछ बात है हम सभी में..
बात है..ख़ास है..
क्या स्वाद है जिन्दगी में..!!
...

अर्थकारणविचारलेखमाध्यमवेधअनुभवमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

24 Nov 2010 - 6:23 pm | कवितानागेश

तुम्ही लाल लाल पानगोळ्या खाल्या नाहित कधी?
आणी लाल टोकाच्या पेपर्मिंटच्या सिगरेट्स?
अजून मिळतात का माहित नाही?

तुम्ही लाल लाल पानगोळ्या खाल्या नाहित कधी?.........

Yes.. :-)

Also those cigarettes are named phantom.

Sorry..cant type marathi on my phone..thanks..

ज्ञानव's picture

17 Jan 2014 - 5:08 pm | ज्ञानव

ठाकूरद्वारच्या पुलावर अजून मिळतात. काळ्या गोळीवर पांढर्या रेघावाल्या गोळ्या आणि जुन्या सगळ्या गोळ्यांचे प्रकार तिथे मिळतात. (विकणारा आता म्हातारा झालाय...सो बी क़्विक..)

चिरोटा's picture

24 Nov 2010 - 6:32 pm | चिरोटा

पार्लेवाल्यांची बरीच पेये येवून गेली.रिमझिम,अ‍ॅपी,रश,डू ईट्,स्प्रिंट.. हैदराबादच्या एका कंपनीने डबल कोला नामक पेय बाजारात आले आणि काही महिन्यांत गायब झाले.फ्रुटी बर्‍यापैकी चालला.थम्स अप्,गोल्डस्पॉट्,लिमका अर्थातच जास्त लोकप्रिय.

गवि's picture

24 Nov 2010 - 6:36 pm | गवि

डबल कोला mentioned here. Yes..you reminded me of so many more..sprint..hmm.

Appy survived and refurbished now.
Thanks for additions.

लॉरी टांगटूंगकर's picture

24 Nov 2010 - 6:51 pm | लॉरी टांगटूंगकर

हि एक माझी आवडती जाहिरात
http://www.youtube.com/watch?v=ETQi73o7tGo

कोणीतरी फेसबुक वर शेअर केला होता हा चित्र-पट प्रचंड जुन्या काळात गेलो बघून

विशाखा राऊत's picture

24 Nov 2010 - 8:00 pm | विशाखा राऊत

रत्नागिरीचे फेमस.. लग्नामध्ये हमखास असायचे
त्या गाडीची वाट सगळे बघायचे

गवि's picture

24 Nov 2010 - 8:04 pm | गवि

Kelkaraanche chanda ice cream.
Ratnagiri has biggest place in my heart.
Thanks Vishakhaji..

Majhya shalet vagaire hotaat asa kahitaree vatayala lagala.

स्पा's picture

24 Nov 2010 - 8:21 pm | स्पा

गवि...

झकास लेख..

चार आण्याच "किस मी" चोकलेट विसरलात......

ते अजूनही "चार अण्यालाच" मिळतं....

नंदू's picture

24 Nov 2010 - 8:33 pm | नंदू

लेखनशैली आवडली.

" वेलकम टू द क्लब..!!

आम्ही काड्यापेटीच्या रिकाम्या कव्हर साठी सुद्धा लाज सोडायचो...

जसं गोल्ड्स्पॉट मधे कार्टून मिळायचे तसे थम्प्सप मधे क्रिकेटर्स चे फोटो मिळायचे..

मला रॉजर बिनी आणि कपील देव मिळाले होते. वेस्ट इंडीजचे क्रिकेटर्स मिळाले की खूप निराशा व्हायची. एक काळा ठिपका म्हणजे माल्कम मार्शल का ग्रोव्हर हेच कळायचं नाही.

तुमचे लेख जबरी असतात. ट्रंकेच्या तळात, फटीत अडकलेलं एखादं जुनं वासाचं खोडरबर अचानक सापडावं आणि एकदम प्राथमिक शाळेतल्या आठवणी जाग्या व्हाव्यात तसे हे लेख आहेत..और आने दो..

-एक

गवि's picture

24 Nov 2010 - 11:00 pm | गवि

ट्रंकेच्या तळात, फटीत अडकलेलं एखादं जुनं वासाचं खोडरबर..

...ही उपमा मस्त..

बेसनलाडू's picture

25 Nov 2010 - 6:34 am | बेसनलाडू

तुमचे लेख जबरी असतात. ट्रंकेच्या तळात, फटीत अडकलेलं एखादं जुनं वासाचं खोडरबर अचानक सापडावं आणि एकदम प्राथमिक शाळेतल्या आठवणी जाग्या व्हाव्यात तसे हे लेख आहेत..और आने दो..
शब्दशः सहमत!!
(सहमत)बेसनलाडू

चाणक्य's picture

10 Feb 2012 - 4:17 pm | चाणक्य

+१

चाणक्य's picture

10 Feb 2012 - 4:18 pm | चाणक्य

+१

चाणक्य's picture

10 Feb 2012 - 4:18 pm | चाणक्य

+१

चाणक्य's picture

10 Feb 2012 - 4:18 pm | चाणक्य

+१

प्रियाली's picture

24 Nov 2010 - 10:42 pm | प्रियाली

कॅम्पा कोलाही होता. त्याची जाहीरात त्याकाळी खूपच मस्त होती. त्यात छोटे खाजगी, पाण्यावर उतरणारे प्लेन वगैरे होते असे वाटते.

बाकी त्या बिल्ल्यांसाठी का बूचांसाठी होणारी मारामारी, धावपळ आणि निर्लज्जपणा आठवून हसू आलं. लिम्काच्या आत मिळणारे डिस्नीचे रबरी बिल्ले मलाही आवडायचे. छान मऊ असायचे.

मलाही लिम्का आवडायचा नाही.

गवि's picture

24 Nov 2010 - 10:58 pm | गवि

डिस्नीचे रबरी बिल्ले..

प्रियालीजी, सहानुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.छान वाटलं...!!

इंटरनेटस्नेही's picture

25 Nov 2010 - 1:37 am | इंटरनेटस्नेही

पहिली व्हिस्की ग्रीन लेबल... नंतर मग रॉयल स्टॅग नाहीतर ब्लेन्डर्स प्राईड कायम.
पहिली बीअर किंगफिशर.. नंतर मग हेवर्डस २००० (हल्ली हिला एच २ के) म्हणतात.

गवि's picture

25 Nov 2010 - 5:43 am | गवि

then you cant forget LP.

It was oh so famous.

Slogan: Live it up..!

I see that London Pilsner is back since just two yrs.

One imp thing..in the ads these are all necessarily SODAs.. :-)

मी-सौरभ's picture

1 Feb 2012 - 3:15 pm | मी-सौरभ

एल पी मला बी ट्राय करायचीय :)

हा प्रतिसाद बघून लहानपणात हरवलेलं मन परत जागेवर आलं ;)

एलपी मधे गायबली होती. आता परत आली आहे. नव्या व्हायब्रंट रुपात..

ट्राय करायला हवी..

खूप पूर्वी एव्हरी लिमिट अप , लिव्ह इट अप.. अशी काहीशी जिंगल होती त्याची टीव्हीवर (सोडा म्हणून असणार)

चूभूदेघे..

सुहास झेले's picture

3 Feb 2012 - 8:36 am | सुहास झेले

एलपी मिळायचे हमखास ठिकाण... मिल्ट्री कॅफे (फोर्ट)

इथे जेवणसुद्धा अफाट मिळतं .... महेंद्र काकांनी लिहिलेला रिव्हु - इराणी :) :) :)

रेवती's picture

25 Nov 2010 - 2:16 am | रेवती

अरे वा!! म्हणजे असा निर्लज्जपणा करणारे आम्हीच नव्हतो तर......
डिस्नेच्या बिल्ल्यांसाठी माझ्या भवांनी जंगजंग पछाडले होते.
आम्ही कितीतरी जमवले.....पुढे ते कुठंतरी गेले असेच....
वर उल्लेखलेल्या उत्पादनांपैकी ड्बल कोला सोडलं तर बाकी कधीमधी मिळत रहायचं आणि तीच चैन वाटायची.
अशीच मज्जा वाटायची ती मसालाडोसा खाताना. तो पूर्ण कधीच संपायचा नाही पण मागवल्यावर हाऽऽ मोठ्ठा प्रकार समोर यायचा त्याची मजा वाटायची.
गोल्डस्पॉटची चव अजूनही जिभेवर आहे हे नक्की!

(पार्सल करून आणलेला नव्हे) काट्या चमच्याने कसा खायचा हे कोणी सांगेल का?

मला कधीच जमलं नाही ते.

रेवती's picture

25 Nov 2010 - 2:26 am | रेवती

मलाही नाही जमलं. चक्क भाजीपोळी खातात तसा खाते. सांबार आणि चटणीला चमचा ठिक आहे.

मी-सौरभ's picture

1 Feb 2012 - 3:18 pm | मी-सौरभ

मी पण खायचो..

जरा जास्त अक्कल आली तेव्हा ही अडचणच नको म्हणून हाटिलात गेल्यावर 'मेदू वडा सांबार' ही आमची ठरलेली ऑर्डर असायची.

उन्हाळा सुरू झाला हे रसना, रूह आफझा यांच्या जाहीरांतीनी कळायचं. रूह आफ्झा दूधात घालून काय सुरेख मिल्क शेक व्हायचा.
"ये है बढता बच्चा , देखो कैसी कूद लगाये" - हॉर्लीक्स ..... हॉर्लीक्स फार आवडायचं. खीरीसारखं लागायचं.

मुक्तसुनीत's picture

25 Nov 2010 - 5:28 am | मुक्तसुनीत

दिलखुलास लेख. अनेक आठवणी.

मला आठवणार्‍या काही.

"तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय.." (अशोक पत्की.)
"जो ओके साबुन से नहाएं कमल सा खिल जाए"....
लिरिल ... व्हरिजिनल - आय मीन ओरिजिनल - कॅरेन ताईंची अ‍ॅड.
गार्डन वरेली - ए आर रहमानची धुन.
ओन्ली विम्मल : ती कुठली ती पारशी सुंदरी. (ही आठवली की ती १९८३ ची वर्ल्ड कप नंतर झालेली वेस्ट इंडीज टूर आठवते. अरेरे. वन डे सिरीज = ०-५ आणि टेस्ट सिरीज = ०-३ हरलो होतो. इतका निराश फक्त क्रिकेट चे मॅच फिक्सींग चे स्कँडल झाल्यावर झालो होतो. )

एक भयावह अ‍ॅड : "सपट चहा" . निळुभाऊ फुले : "सपट चहाची मजा काही औरच आहे." कोण घेत असेल हो हा चहा. आधी एकतर सपट ब्रँड म्हणजे दाद-खाज-खुजलीच्य मलमाकरता प्रसिद्ध. त्याच ब्रँडचा चहा. आणि त्यात निळु फुले केवळ त्यांच्या पेटंट भूमिकेतले पेटंट कृत्य करतेवेळीच्या आवाजात वरचे वाक्य बोलणार. मला खरंच कुतुहल आहे : कोण पीत असेल सपट चहा ???
त्यावरून आठवले : एक सदैव डोक्यात बसलेली महाभीषण अ‍ॅड : बीटेक्स-मलम. अरारारारा. रवी वासवानि आणि अर्चनाताई जोगळेकर (काय डेडली काँबिनेशन आहे !) आणि ओयेओये च्या चालीवरचे ते गाणे " ओये ओये बीटेक्स लगाले...." अरारारारा... डोक्यात जाणार्‍या गोष्टी कायम डोक्यात जाऊन बसतात नि कधीही आठवतात याचेच प्रत्यंतर.

असो. गेले ते दिवस (नि ब्रँड). राह्यल्या त्या आठवणी.

रंगोली रंगोली
पहाता क्षणी खूण पटली
रंगोली रंगोली
स्वप्ने संसाराची रचली
रंगोली रंगोली
लक्ष्मी आज घरा आली
रंगोली रंगोली
...
भूल न जाना ई सी ई बल्ब लाना
ब ब ब ब बल्ब!!
ज्यादा दे उजाला दिनोदिन चलने वाला
ईसीई बल्ब और ईसीई ट्यूब
...
कालनिर्णय द्या ना (अर्चना जोगळेकर)
अहो कालनिर्णय घ्या ना (अजय वढावकर)
कालनिर्णय आपो नी (???)
कालनिर्णय लो नी (अ. व.)
कालनिर्णय दीजिए (रेणुका शहाणे)
कालनिर्णय लीजिए (अ. व.)

झालंच तर

भविष्य, मेनू, आरोग्य, ज्ञान
उपयुक्त साहित्य प्रत्येक पान
पंचांग सोपे सुमंगल स्वभावे
भिंतीवरी कालनिर्णय असावे
...

खुजली करनेवाले
बीटेक्स लगाले
बीटेक्स लगाकर तू अपनी
दाद, खाज, खुजली मिटा ले
....
सार्‍यांनी जायचं एकाच ठिकाणी, सार्‍यांची पुरवीन हौस
बनारस सिल्क हाऊस बाई बनारस सिल्क हाऊस (!!!)
...

भूल न जाना ई सी ई बल्ब लाना
ब ब ब ब बल्ब!!
ज्यादा दे उजाला दिनोदिन चलने वाला
ईसीई बल्ब और ईसीई ट्यूब

....

Khaas...

:-)
:-)
:-)

ekdam athavale...

बेसनलाडूजी गुरूजी, ती एक अॅड होती पहा:"जीवनाला वेग हवा रिस्क हवी आणि दरवर्षी नवं मॉडेलही हवं."

"उद्या मलाही बदलशील."
Etc.

कुठली होती हो ती? दातात अडकलेल्या सुपारीसारखा त्रास देतेय ती अॅड,नाव न आठवल्याने.

One more I remembered.

Laajri.Ranade road,Dadar.

.rang dhund urmeechi lajjit lajaree.

Dhund yaksh gandhaat chimb laajaree.

Vagaire.

बाप : मुली, यापैकी एखाला पसंत कर

पहिला तोस्रिस्क वाला.

दुसरा: झटपट श्रीमंत होण्याचा एकच मार्ग.. शेअर्स
दिपीका: नको गं बाई
अविनाश खर्शीकर: अमुक अमुक मिळकत राष्ट्रीय बचत सर्टीफिकेटमधे गुंतवली, हे वर्कशॉप काढलं, आता भविष्याची चिंता नाहि
दिपीकाची लाजत लाजत पसंती :)

अर्धवटराव's picture

18 Jan 2014 - 1:15 am | अर्धवटराव

थोडं खाली यऊन बघतो तो सुपारीचा तुकडा अगोदरच निघालेला... अर्धवटराव, एक तरी काम वेळेवर करज जा. (ति डोकं आपटायची स्मायली कुठे मिळेल?)

प्रदीप's picture

25 Nov 2010 - 11:04 am | प्रदीप

"तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय.." (अशोक पत्की.)

ही नक्की अशोक पत्कींची जिंगल आहे? ती पत्की नावारूपाला येण्याच्या बरीच अगोदरची आहे (माझ्या आठवणीनुसार अगदी ६० च्या दशकातही ती ऐकली होती). पं. वैद्यनाथन नावाचे एक गृहस्थ जिंगल्सच्या क्षेत्रात अगदी ८९ पर्यंततरी (त्यानंतर असल्यास मला माहिती नाही) बरेच कार्यरत होते, दुसरे लुई बँक्स. वैद्यनाथन विशेषतः भारतीय संगीतावर आधारीत जिंगल्स बनवीत, लुई बँक्स जाझ, रॉक इं. वर विषेशतः-- पण त्याचा संचार सर्वदूर होता (आणि अजूनही असावा: दूरदर्शनची 'सिग्नेचर ट्यून' त्याने केली तेव्हा अमजाद अलीने थयथयाट केलेला. 'मिले सूर मेरा तुम्हारा' मधेही त्याचा हात होता असे वाटते).

सपट चहा व बीटेक्स मलमाच्या अ‍ॅड्सच्या टिपण्ण्या आवडल्या. ह्या (आणि विशेष मराठी) अ‍ॅड्स अगदी कमी खर्चात करून घेतल्या असाव्यात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Nov 2010 - 11:58 am | विश्वनाथ मेहेंदळे

"मिले सूर मेरा तुम्हारा" ही अशोक पत्की यांची रचना आहे. त्यांच्या आजवर हजारो जिंगल झाल्या आहेत म्हणे. साक्षरता प्रसाराची "पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा" पण त्यांचीच.

प्रदीप's picture

25 Nov 2010 - 8:01 pm | प्रदीप

त्यात होता असे दिसते.

'The song was composed by Ashok Patki, co-composed & arranged by Louis Banks, written by Piyush Pandey (then an Account Manager and presently the Executive Chairman and Creative Head of Ogilvy and Mather, India). The project was conceived and directed by Suresh Mullick (then all India Creative Director, Ogilvy & Mather)' - विकीपेडियावरून

मैत्र's picture

25 Nov 2010 - 11:17 am | मैत्र

जो ओके साबुन से नहाएं कमल सा खिल जाए"....
सचमुच काफी बडा है...

त्या काळातल्या इतर काही जाहिराती

पँथर मोपेड... बडे बडे पहियो कि है बडी बात...
आणि अवंती ....

शान से बोलो चल मेरी लुना...

बुलंद भारत की बुलंद तसवीर - हमारा बजाज...

एक खूप जुनी - क्राउनिंग ग्लोरी - डिंपल ....

वोलफॉर्म सॉस...

ब्रिटानिया कोकोनट क्रंची - एक नारियल पेड से टुटा ... गिरते ही वो बीच में फुटा... वाली...

दोन ऑल टाईम फेवरिट -
हाजमोला सर - हॉस्टेल च्या कॉटखालून बाटली रोल करणारा तो छोटा मुलगा :)
आणि
जब मैं छोटा बच्चा था बडी शरारत करता था... मेरी चोरी पकडी जाती.. जब रोशन होता बजाज...
अब मैं बिलकुल बुढा हूं ... गोली खाकर जीता हूं... लेकिन आज भी घरके अंदर... रोशन होता बजाज...

आणि आकाशवाणीवरच्या दोन कालातीत जाहिराती...

फिनोलेक्सनं आणलं पाणी शेतं पिकली सोन्यावाणी...

आणि ...

कसला विचार करतोयस रामण्णा... घराला आणि गोठ्याला कुठले पत्रे लावू?

पँथर मोपेड... बडे बडे पहियो कि है बडी बात...

आणि अवंती ....(मेरे पापा की अवंती. कितनी सुंदर लगती, कितनी तेज चलती. पापा जल्दी घर लौटे, साथ में कुछ ना कुछ लाते..)

मला वाटतं, हमारा बजाज,हाजमोला सर,रोशन होता बजाज...
या आणि इतर काही अ‍ॅड मिसळून एक तुनळी व्हिडीओ पण आहे मस्त.

>>>>

आकाशवाणीवरच्या दोन कालातीत जाहिराती...

फिनोलेक्सनं आणलं पाणी शेतं पिकली सोन्यावाणी...

आणि ...

कसला विचार करतोयस रामण्णा... घराला आणि गोठ्याला कुठले पत्रे लावू?

अशीच आकाशवाणीची लोकल जाहिरातः

मला काहीतरी घ्यायचंय,
मलाही काहीतरी घ्यायचंय..
काय घ्यायचंय,
रेडिओ..
कोणता..?
फिलिप्स..

टी.व्ही. वरचीच एक अजून :

भरपूर फसल लाये सरदार,
लक्ष्मी का है ये वरदान
नवयुग का संदेश है सरदार्..सरदार..

राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलायझर्सद्वारा निर्मित..

सरदाआअर..

अगोचर's picture

18 Jan 2014 - 2:16 am | अगोचर

मेरे पापा की (*****), नक्की काय ते आजतागायत माहिती नव्हते ... अत्ता कळले .. गविकाका धन्स ...

प्राजक्ता पवार's picture

25 Nov 2010 - 12:48 pm | प्राजक्ता पवार

बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या या लेखाने.
- अमुल बटरची utterly ,butterly , delicious म्हणणारी ती गोडुली ,
- कुछ ख़ास है हम सभी में..
कुछ बात है हम सभी में..
बात है..ख़ास है..
क्या स्वाद है जिन्दगी में..!!
...या तालावर नाचत जाणारी तरुणी,
- एरियलच्या जाहिरातीमध्ये आसावरी जोशीचे बोट फिरवत ' दाग ढुंडते रह जाओगे' बोलणे
- ओन्ली विम्मल ( यातली पारशी सुदंरी म्हणजे मेहर जेसिया )
:)

रामदास's picture

26 Nov 2010 - 8:27 pm | रामदास

तुम्ही आणखीही काही माहीती लिहीली आहे .येऊ द्या ती मराठीत .

गवि's picture

25 Nov 2010 - 5:37 am | गवि

khoop mast athavani jagavalyaat..

तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय.." (अशोक पत्की.)
Lifebuoy jyache gharee arogy tethe vaas kari.

Amhi arogy tethe vaas mari ase mhaNayacho. Khoop ghan vas hota Lifebuoy cha.

"जो ओके साबुन से नहाएं कमल सा खिल जाए"....
..laajawaab yaad..

लिरिल ... व्हरिजिनल - आय मीन ओरिजिनल - कॅरेन ताईंची अ‍ॅड.

La lala lala..jabardast tune.

गार्डन वरेली - ए आर रहमानची धुन.

ओन्ली विम्मल : ती कुठली ती पारशी सुंदरी. (ही आठवली की ती १९८३ ची वर्ल्ड कप नंतर झालेली वेस्ट इंडीज टूर आठवते. अरेरे. वन डे सिरीज = ०-५ आणि टेस्ट सिरीज = ०-३ हरलो होतो. इतका निराश फक्त क्रिकेट चे मॅच फिक्सींग चे स्कँडल झाल्यावर झालो होतो. )

Mala only Vimal mhatale ki Viv Richardsne keleli ad athavate. Dance wali.

एक भयावह अ‍ॅड : "सपट चहा" . निळुभाऊ फुले : "सपट चहाची मजा काही औरच आहे."
Absolute true point. Ya brandschya mixing baddal ek 'swadbhara Nirma shreekhand' navachi post lihili hoti.

Mast comment..thx a lot.

बेसनलाडू's picture

25 Nov 2010 - 6:27 am | बेसनलाडू

टाटा का ओके धुलाई का साबुन
ओके ओके हा टाटा का ओके
खर्चा कम सफेदी ज्यादा
कपडे ज्यादा धोनेवाला
.. (या जिंगल चा पुढचा भाग आठवतोय का कुणाला?)

आणखी एक -

निर्मा निर्मा
निर्मा डिटर्जन्ट टिकिया
इस्के झाग ने जादू कर दिया
पानी में रहके भी यह कम गले
ढेरों कपडे धोये और ज्यादा चले
सब की पसंद निर्मा

गवि's picture

25 Nov 2010 - 7:01 am | गवि

Nirma. hee ajoonahee chaaloo aahe.

Tee chikhal "pause" waali boring ad. Tyatahee teech Jingle ahe. Verbal,without music.

बेसनलाडूजी,"ओके"ची जिंगल पुढे आठवण्याचा यत्न करतोय.तबतक.
One more:

इमामी नॅचरली फ़ेअर, फ़ेअरनेस क्रीम.
सनस्क्रीन धूपतापसे बचाये.
दूध खीरा नारियलपानी.
जडीबूटियां रंग निखारे.
और कुछ ही हफ्तो मे रंग तेरा निखर निखर जाये.

बेसनलाडू's picture

25 Nov 2010 - 6:48 am | बेसनलाडू

और कुछ ही हफ्तों में रंग तेरा निखर निखर जाए - हे भारी!!
(काळासावळा)बेसनलाडू

बेसनलाडू's picture

25 Nov 2010 - 7:09 am | बेसनलाडू

कुंदन सा बदन दमके
चंदन सी सुगंध महके
हल्दी चंदन के उपटन से रूप सदा निखरे निखरे
विको ने हल्दी चंदन को
औषध के रूप में अपनाया
विको टर्मरिक क्रीम को रचकर
देश-विदेश में पहुंचाया

आणि 'बन्नो'फेम जाहिरात -

देखो चंदन सी महके हमारी बन्नो
रूप की आज रानी बनी है बन्नो

कील मुहासों को जड से मिटाये
हल्दी चंदन के गुण इस्मे समाये
त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक क्रीम

(स्मरणशील)बेसनलाडू

विकोच्या जाहिरातीत संगिता बिजलानी आहे कि काय?

बेसनलाडू's picture

26 Nov 2010 - 1:58 am | बेसनलाडू

(अंदाजपंचे)बेसनलाडू

स्पंदना's picture

25 Nov 2010 - 9:47 am | स्पंदना

किराये की बुलडोझर पे बैठे भाडे के टट्टु, दम है तो चला बुलडोझर्.....एकदम कूऊउल.

मी ऋचा's picture

25 Nov 2010 - 12:50 pm | मी ऋचा

थोडं करेक्शनः

भाडे के बुल्डोझर पे बैठे किराये के टट्टु दम हे तो बढ आगे!

प्रतिक्षा लोणकर होती त्यात! कुठला तरी चहा पित असायची.

वपाडाव's picture

31 Jan 2012 - 9:55 pm | वपाडाव

भाडे के बुल्डोझर पे बैठे किराये के टट्टु दम हे तो बढ आगे!

सपट परिवार चहा... सुर्रर्रर्र के पियो...

गवि's picture

25 Nov 2010 - 10:42 am | गवि

संदर्भ लागत नाही अपर्णाताई.

ऐकल्यासारखं वाटतंय पण नाहीही.

काय आहे हे?

कोणत्यातरी चहाची जाहिरात होती ती..

मस्त कलंदर's picture

25 Nov 2010 - 11:20 am | मस्त कलंदर

१. जरास्सा उफ्फ... जरासा आह.. जरासा ओहो..
यही तो प्रॉमिस की शान है.
२. एक कुठल्या तरी क्वायरची अ‍ॅड होती. तेव्हा इंग्रजी यायचं नाही,.(आताही जास्त येतं असा गैरसमज नाही) तरी ती अ‍ॅड मस्त वाटायची. आता त्यातलं फक्त 'मम्मी नेम' असं काहीतरी आठवतंय.
३. दिनेश सुटिंग-शर्टिंग. त्यात सुनील गावस्कर एका माणसाच्या हातातल्या कोनातलं आईस्क्रीम उडवून लावतो हे उगीचच आवडायचं.
४. आणि नेस्ले चॉकलेटच्या जाहिरातीपण छान होत्या. बर्‍याचशा होत्या त्यातली
'बीत गये दिन गुडियोंके आये नहीं अभी साडीके, तो फिर क्यूँ ना खाये अमूल चॉकलेट" हीच तेवढी आठवतेय आता.

एक कुठल्या तरी क्वायरची अ‍ॅड होती. तेव्हा इंग्रजी यायचं नाही,.(आताही जास्त येतं असा गैरसमज नाही) तरी ती अ‍ॅड मस्त वाटायची. आता त्यातलं फक्त 'मम्मी नेम' असं काहीतरी आठवतंय..

क्वॉयर डेकोर फ्रॉम क्वॉयर बोर्ड..

असं काहीतरी होतं का?

दिनेश, मला वाटतं, टेक द वर्ल्ड इन योर स्ट्राईड्..असं काहीतरी.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

25 Nov 2010 - 11:57 am | डॉ.श्रीराम दिवटे

जुन्या जाहिरातींचा आपला एक जमाना होता...

खरच जुना काळ आठवला तेव्हाच्या जाहिरातीही अजून आठवतात, कारण तेव्हा रिमोट हातात नसायचा -नव्हे रिमोट मला तर माहीतही नव्हता ....त्या जाहिरातीही पाहायला आवडायच्या
ज्यांचा उल्लेख झाला नाही त्या मला काही आठवतात...
१. मैने कहा कुछ तुमने सुना ..
क्या, क्या...
ओरीयंट, ओरीयंट , ओरीयंट फ्यान...
हवाये ताजी थंडी ,तस्सली जीवन भर कि ओरीयंट, ओरीयंट , ओरीयंट फ्यान...
२. मेलडी खो खुद जन जावो..(मी नेहमी 'मेलडी खावो खुचान्जावो असे ऐकायचो)
३. आवो चाले हम लेकर अपनी टोबु सयाकले , अपनी टोबु सयाकले (यातला लहान मुलगा शान होता)

गवि's picture

25 Nov 2010 - 12:41 pm | गवि

मस्तच अ‍ॅडिशन्स झाल्या..टोबू सायकलें..

ओरिएंट प्रमाणेच उषा फॅन्सची पण होती काहीतरी.

परत सूर्या ट्यूब्ज, सूर्या बल्ब्ज.

थॅक्स जोशीले साहेब.

मी ऋचा's picture

25 Nov 2010 - 12:55 pm | मी ऋचा

अमृत मलम त्वचेचे संरक्षण!
अमृत मलम त्वचेचे संगोपन!!
अमृत मलम..

अविनाश नारकर आणि रेणुका शहाणे आणि इतर दोन तीन लोकं होते एक लहान मुलगा/मुलगी आणि एक आजोबा!
अजुनही कधी कधी लागते.

अमृत मलम तर हिट होतीच्..पण कैलास जीवन मधे ती वाटीने आजोबांचे तळपाय चोळणारी आजी आणि आजोबांच्या चेहर्‍यावरचे गुदगुल्या होत असल्यासारखे भाव..!! :-)

satish kulkarni's picture

25 Nov 2010 - 1:21 pm | satish kulkarni

इन्हे चाहिये हमदर्द क सिन्कारा..
आनि तो अशक्त तरुण काच फोडुन येतो...

हा हा हा...

ये बेचारा काम के बोझ का मारा. इन्हे चाहिये हमदर्द का टॉनिक सिंकारा..
पूरे परिवार के लिये ..हमदर्द का टॉनिक सिंकारा..

तो तरूण, जावेद जाफरी होता

मॉन्टे कार्लो च्या जाहिराती मधले 'Nothing is gonna change my love for you' गाणे जीव टाकुन बघत असू
तसेच बॉम्बे डाईंग मधला शशी कपूर चा मुलगा करण कपूर.
एक फॅण्टा ची अ‍ॅड पण मस्त होती.
आनि कुणाला ती चौकोनी गुलाबी काजुकंद वडी आठवत नाही? अजूनही मिळते ती..

एका ठराविक किराणा मालाच्या दुकानात मिळायची बरीच वर्षं.

चौकोनी पारदर्शक आणि मधे सोनेरी टिकलीसारखा कागद्..तीच ना?

महानगरी's picture

25 Nov 2010 - 3:22 pm | महानगरी

दहाचे पाकिट असायचे. मस्त गुलाबी रंगाची, काजुकंद च म्हणायचे तिला. चपटी, चौकोनी आणि मऊसर..
काजुकतली ची गरिबडी नातलग आहे ती....

पारदर्शक म्हणजे वडी नव्हे. रॅपर.

अनंत अँड आठवलेंची ना?

अशी का?

गूगलवर कुठेच चित्र मिळेना म्हणून फोटोशॉपमधे कामचलाऊ चित्र बनवलं.

महानगरी's picture

25 Nov 2010 - 5:18 pm | महानगरी

सोनेरी ठिपका प्रथमच बघितला पण....

तो फक्त कागद असायचा सोनेरी..बहुधा ए ए (अनंत आठवले ट्रेड्मार्क) लिहिलेला.

मिळते अजून ती... देसाई बंधू च्या दुकानात अजून ही मिळते.. मी आणते बर्‍याच वेळेला!!

विजुभाऊ's picture

1 Feb 2012 - 2:59 pm | विजुभाऊ

चौकोनी गुलाबी काजुकंद वडी आठवत नाही
ती अनंत अँड आठवले ची काजू वडी होती. अजूनही मिळते.
बिनाका टुथपेस्ट च्या बॉक्स मधे एक रबरी खेळणे मिळायचे.
मला तर शाळेतल्या कंपासपेटीतल्या खोडरबराचा वास अजून आठवतो.

अनुराग's picture

25 Nov 2010 - 3:23 pm | अनुराग

शिटि जल्दि बजाए ओर खाना पकाए

एम आर कॉफी डीटेल्स न देता बायपास केलीत ते चांगलं केलंत.

एक होती ती :" डबल मजा है और कम दाम, एम आर कॉफी जिसका नाम"

आणि दुसरी "रिअल प्लेझर डजन्ट कम इन्स्टंट.."

एम आर च ना ती पण?

असो.

जोशी 'ले''s picture

25 Nov 2010 - 3:44 pm | जोशी 'ले'

अजुन एक........जो बिबी से सचमुच करे प्यार वो प्रेस्टिज से कैसे करे इन्कार...

स्वाती दिनेश's picture

25 Nov 2010 - 5:18 pm | स्वाती दिनेश

बिल्ले गोळा करण्यात निर्लज्जतेची कमाल पातळी गाठलेली होती. त्यावेळी लग्नाच्या रिसेप्शनला बुफे डिनर नसे तर तिरंगी आइसक्रिम किवा कोल्डड्रिंक असायचे. लिमका, गोल्डस्पॉट नाहीतर थप्स अप. ते पिण्यापेक्षा जेथे क्रेट ठेवलेले असत तेथे जाऊन बुचं गोळा करण्यात जास्त रस आणि पर्यायाने बरोबरच्या मोठ्यांना कुठून आणलं ह्या कार्ट्याना इथे असे वाटायला लावायचे.पण मग तेथे आलेली इतर मुलंही बुचं आणि बिल्ले गोळा करण्याच्या उद्योगाने आपापल्या पालकांना लाज आणत असत.
हॅप्पी डेज आर हिअर अगेन... ही जाहिरात खूप आवडायची .
सर्फ की खरिदारीमेही समझदारी है ! वाले ललिताजी उडान मालिकेत आली तेव्हा काय भारी वाटलं होतं.
आणि आसरानीची एक रामलक्ष्मण बल्ब देना,
रामलक्ष्मण नही भाई, सिल्व्हेनिया लक्ष्मण..
सारे घर के बदल डालूंगा...
जब मै छोटा बच्चा था
बडी शरारत करता था....
बजाज बल्बची ही पूर्ण जाहिरात क्वचित दाखवत, कधी बच्चा, कधी जवान तर कधी बूढा... वाली कडवी दाखवत असत.
अशा कितीतरी अनेक...
ब्लॅक अ‍ॅन व्हाइट टीव्ही च्या काळातल्या खूप आठवणी ताज्या झाल्या.
स्वाती

गवि's picture

25 Nov 2010 - 5:26 pm | गवि

बिल्ला..येस्..बुचाला मूळ लहानपणचा शब्द दिल्याबद्दल धन्स स्वातीजी.

धमाल मुलगा's picture

25 Nov 2010 - 5:42 pm | धमाल मुलगा

सूप्परडूप्पर हिट्ट है भौ!

एकदम मजा आली.

गवि's picture

26 Nov 2010 - 10:07 am | गवि

धन्स..

इन्द्र्राज पवार's picture

26 Nov 2010 - 10:35 am | इन्द्र्राज पवार

श्री.गगनविहारी यांचे या धाग्याबद्दल आभार थोडे जास्तच मानले पाहिजेत कारण या निमित्ताने त्यांनी इथल्या अनेक सदस्यांना 'Tour De Nostalgia' घडविली आणि त्यातून प्रकट होत आहे निखळ आनंद जो वर्षानुवर्षे आपण मनी जतन केलेला असतो.

खूप आनंद झाला या आठवणी वाचून. मलाही यातील बर्‍याच आठवतात त्यामुळे द्विरूक्ती टाळत आहे, तरीही अजून ज्यांचा उल्लेख झालेला नाही पण स्मरणी आहेत त्यापैकी काही :

१. कोणत्याही शब्दांचा भाषेचा अजिबात उल्लेख न करताही अत्यंत प्रभावी ठरलेल्या Fevicol च्या सर्वच जाहिराती...त्यातही राजस्थानच्या रेताड रस्त्यावरून जाणारी ती परिवहन मंडळाची प्रवाशांनी लडबडलेली बस...! व्वा !! [हल्लीहल्ली व्होडाफोनच्या झूझूंनी अशीच धमाल केली आहे.]

२. मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांची अनेकविध कारणांनी गाजलेली (की गाजविलेली??) TUFFS बूटांची जाहिरात.

३. प्रिती झिंटा आणि वर्गमित्र आपल्या मागण्यासाठी संप आणि उपोषण करीत आहेत आणि प्रिती हळूच कुणाला नकळत कुर्रम कुर्रम Perks खाते.

४. एक फारच जुनी....टीव्हीवर की थिएटरमध्ये पाहिलेली [कदाचित मॅगेझिन्समध्येही असेल].... चेरी ब्लॉसम बूट पॉलिशची...."Something special is coming on your way...." ~ मॉडेल बहुतेक नफिसा अली होती.

५. अर्चना जोगळेकरची ती एक खट्याळपणाची "शादी और तुमसे..? कब्बी नही..." ~ प्रॉड्क्ट विसरलो. कदाचित श्री.गगनविहारींच्या पोतडीत असेल.

इन्द्रा

मस्त कलंदर's picture

26 Nov 2010 - 10:38 am | मस्त कलंदर

>>"शादी और तुमसे..? कब्बी नही..."
पान पसंद.. पान का स्वाद, गज़ब की मिठास...

जाता जाता, अजून कुणाला "काय झालं?", "बाळ रडत होतं" का आठवली नाहीय?

पान पसंदची सीरीजच होती. भारती आचरेकर लाटणं घेऊन, अशी पण एक होती.

मस्त कलंदर, आधीच उत्तर दिल्याबद्दल धन्स..

प्लीज कोणीतरी माझ्या दातात अडकलेल्या सुपारीसारखी ती न आठवणारी जाहिरात काढा रे.

"जीवनाला वेग हवा, रिस्क हवी आणि दरवर्षी नवं मॉडेलही हवं.."

(मुलगी नाक मुरडून फोटो फेकून देत) "उद्या मलाही बदलशील.."

"हमखास पैसे मिळवण्याचा / फायद्याचा (??) एकच मार्ग - शेअर्स.."

(मुलगी तुच्छतेने फोटो फेकून देत): "(शी) नको ग बाई.."

...काय होतं ते...?

प्रतिसाद बघून मलाही खूप आनंद झालाय..सर्वांना आपल्यासारखेच अनुभव आहेत हे बघून..

इन्सान खुद की ही नही, दूसरे की छाती में भी जिन्दा रहने का सबूत मांगता है..

डावखुरा's picture

26 Nov 2010 - 10:58 am | डावखुरा

ख्ल्लास धागा................(ख्ल्लास=क्लास हा शब्द जोर लावुन )

योगप्रभू's picture

26 Nov 2010 - 4:49 pm | योगप्रभू

गगनविहारी :
आपण म्हणता ती जाहिरात बहुधा इंदिरा विकास पत्र किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांची असावी. त्यात रामायणफेम दीपिका चिखलिया होती. तिला ३ स्थळे सांगून येतात. पहिल्या दोघांचे संवाद आपण दिलेच. तिसरा म्हणतो, ' नोकरीची शिल्लक बचत प्रमाण पत्रांत गुंतवली. हे गॅरेज काढले. आता भवितव्याची चिंता नाही.' त्यावर दीपिका लाजून 'बाबा' असे म्हणत होकार देते.

ओन्ली विमलच्या जाहिरातीत पारशी सुंदरी होती का? गार्डन वरेलीच्या जाहिरातीत पर्सिस खंबाटा होती.

पानपसंदच्या जाहिरातीत अर्चना जोगळेकर व भारती आचरेकरप्रमाणेच आणखी एक हिंदी अभिनेता होता. (बहुतांश खलनायकी भूमिका करणारा. नाव सांगेल का कोणी?) तो घरमालक असतो. चिडून म्हणत असतो, 'भाडा नही देना हो तो खाली कर दो मकान' तेच पानपसंद खाल्ल्यावर गोड हसून म्हणतो, 'अगर भाडा नही देना हो तो क्यू न मकान खाली किया जाय'

काही आणखी रंजक जाहिराती

आय लव्ह यू रसना
धारा धारा... शुद्ध धारा. (घर सोडून जाणार्‍या चिमुरड्याला पोस्टमनकाका 'घर मे मा जलेबिया पका रही है' असे सांगून परत आणतात ती जाहिरात मस्तच.
पानपराग पानमसाला (एक से मेरा क्या होगा?)

फिनोलेक्स पाइप्सचे जिंगल लक्षात राहणारे
झुळझुळ पाणी, खेळवा रानी
आणायचं कुणी? सांगतो राणी
फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी

सपट चहाप्रमाणेच 'मगदूम चहा' ची जाहिरात ऐकली आहे का? सातारा-सांगली-कोल्हापूरच्या लोकांना नक्कीच ठाऊक असेल. त्यातला संवाद
'सखू चा टाक पावन्यास्नी'
'चा नगं'
'का वं? सवाष्णिनं कुंकवाला आनं मर्दानं चा ला न्हाई म्हनायचं नसतं'
'पन आमी फकस्त मगदूम च्याच पितो'
'आन आमी काय उनपानी पितो काय? आमीबी आमच्या आजाच्या काळापासून मगदूम चा च पितो.'
'आसं म्हनता? मग हून जाऊंदे डबल'

निघाली निघाली...दातात अडकलेली सुपारी निघाली एकदाची.

पण उपयोग काय?

>>>>>>>>>>

पानपसंदच्या जाहिरातीत अर्चना जोगळेकर व भारती आचरेकरप्रमाणेच आणखी एक हिंदी अभिनेता होता. (बहुतांश खलनायकी भूमिका करणारा. नाव सांगेल का कोणी?) तो घरमालक असतो. चिडून म्हणत असतो, 'भाडा नही देना हो तो खाली कर दो मकान' तेच पानपसंद खाल्ल्यावर गोड हसून म्हणतो, 'अगर भाडा नही देना हो तो क्यू न मकान खाली किया जाय'

>>

"तो कोण...?"

हा नवीन सुपारीचा तुकडा अडकवलात दाढेत आमच्या..

बसतो आता आठवत..