झिंग थिंग..!!
ब्रँड नॉस्टाल्जिया ही एक मजेशीर चीज आहे..
आज अशाच काही ब्रँडमित्रांची आठवण झाली ..
पहिला गोल्ड स्पॉट ..झिंग थिंग..!!
संत्र्याची मिरमिरीत मस्त चव आत्ताही जिभेवर आली..
हाँ हुजूर.. वो मेरा दीवाना जरूर.. !!
मेरा उतना दीवाना जितने दोनों है दीवाने..
गोल्ड स्पॉट.. दीवानों का मज़ा..गोल्ड स्पॉट..!!
कोकाकोलानं थम्स अप् सोबत हाही विकत घेतला आणि ठार केला..
लिम्कासुद्धा फोटोत गेला होता.. पण त्याचं अवतारकार्य बाकी होतं..
त्याचा पुनर्जन्म झाला..
आय ड्रिंक लिम्का बिकॉज आय लाईक इट.. !!
ही टॅगलाइन खूप गाजली.. खरं तर ग्रेट क्रिएटिव्ह काही नसतानाही..
लाईम अँड लेमोनी लिम्का.. ही जुनी लाइन तर आजही नव्यानं जागी झाली आहे..
"ये नोकझोंक शरारतें" वाल्या फ्रेश अॅडसोबत तो परत आलाय..!!
मला लिम्का "प्यायला" फार आवडायचा नाही. पण त्याच्या बुचाच्या आत रबरी स्टिकर मिळायचा..डिस्ने चा..
आई बाबांसोबत कुठल्या भारी हॉटेलात गेलो तरी मी भिकारडेपणासदृश वर्तन करून, तिथल्या स्टाफकडे फेकलेली लिम्काची बुचं मागायचो..मी लाज सोडायचो आणि आई बाबाना लाज आणायचो..
कधी चुकून कोल्ड्रिंक पिण्याची ऑफर मोठ्यांकडून झालीच तर लिम्का मागवायचा...दोन घोट पिऊन निर्लज्जपणे टाकून द्यायचा (म्हणजे बिचार्या आईला प्यायला लावायचा..आई हे देवाचं रूप..!!)
..आणि (मुद्द्याचं..!!) बूच मिळवायचं..
नजर भंगारवाल्यासारखी सदैव होटेलातल्या खाली पडलेल्या बुचांच्या ढिगावर..लाल बुचात स्टिकर नसतो.. हिरव्या बुचातच असतो हे मी लवकरच शोधून काढलं होतं.. माझी बोटं आणि नखं पत्र्याची बुचं खरवडून खरवडून कुरतडल्यागत दिसायची..
डोनाल्ड डक मला जाम आवडायचा...मऊ मऊ रबरावर छापलेले रंगीत मिकी, डोनाल्ड, स्क्रूज, लुई, ह्युई, ड्युई..त्यांची मऊ थप्पी बोटांत दाबून भाव मारायचा मित्रांमधे.... त्या स्टिकर्सची एक्सचेंज व्हैल्यूही खूप होती..चार पाच स्टिकर्सच्या "बदली" एखादं मॅग्नेट (त्या वेळच्या पोरांच्या भाषेत "लवचिंबक") सुद्धा मिळू शकायचं..कोण म्हणतं की वस्तुविनिमय फार जुना झाला.. आमच्या शाळेत तर त्याचं "कमोडिटी एक्सचेंज" होतं..
अमुक एक इतके स्टिकर्स जमा केले की काहीतरी बक्षीस मिळतं अशीही एक बोलवा होती.. पण मी कधीच माझे स्टिकर द्यायला तयार झालो नसतो..
............
कॅडबरीजचं "डबल डेकर" हे माझं अगदी पहिलं प्रेम..थोडं कुरकुरीत..खुटखुटीत आणि बरंच बरंच टेस्टी..हे जर कोणाला आठवत असेल तर मला खूप ग्वाड वाटेल.
..त्याचं जाणं मला खूप धक्का देऊन गेलं..मिलिंद बोकिलांच्या "शाळा" मधल्या शिरोडकरच्या जाण्यासारखं..
पण आयुष्य पुढं जात राहातं.. (.. फिर हमारे मोहल्ले में हेमा आयी...!!!)
..तसंच मग कधीतरी कॅम्पको चॉकलेट आलं.. कॅडबरीजच्या जगात काही नाही तरी फक्त एक चेंज म्हणून ते सॉलिड आवडलं..
कुठे गेलं ते काय माहिती..शोधतोय शोधतोय.. मग काही वर्षांनी नाद सोडून दिला..
.....
डबल कोला.. हे एक पेय .. आणि रोला कोला नावाच्या गोळ्या..
रोला कोला..रोला कोला..इसमें कोला का मजा अलबेला..!! रोला कोला...कोला का गोला.. !!
बघा अजूनही जिंगल आठवतेय मला...
साल्या या जिंगल्स ही गायब झाल्या..नवीन विजुअल अॅड्सच्या तंत्रामधे..
...
नोगा जाम.. मस्ती भरा स्वाद खरा..
...
लाईफबॉय है जहां, तंदुरुस्ती है वहां..
...
माल्टोवा मम..
...
दातों को सडने से बचाता है कोलगेट..
पेस्ट आहे पण जिंगल गेली.
...
सुधा सुधा सॉफ्ट ड्रिंक काँन्सेन्ट्रेट
अड़तीस गिलास एक पैकेट से बने..
तेरा तरह के स्वाद नये नये..
...
शार्प नावाचं पेन...रेनोल्ड्स ०.४५ फाईन कार्ब्युअर ..
न्युट्रामूल..अंकल चिप्स..(बोले मेरे लिप्स..आय लव्ह अंकल चिप्स..).लॅक्टो किंग..
"O.K. च्युईंग गम".."डबल बबल गम"..
एक्स्ट्राँग गुलाबी पेपरमिंट..पॉपिन्स.. रावळगाव..
हे सर्व ब्रँड एकतर संपले..किंवा त्यांचा चार्म तरी गेला..
अनब्रँडेड चिजा तर मोजण्यापलिकडच्या..
मनोज पान शॉपच्या बरणीतल्या लाल गोळ्या..किंवा पांढर्या दूधगोळ्या..
लिमलेट्च्या संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या गोळ्या (५ पैसे..!!)..
चंदा आईस्क्रीम नावाच्या ढकलगाडीतली गार गार लाल कांडी..
कालाखट्टावाला पेप्सीकोला..खारट बर्फाळ प्लॅस्टिकच्या पिशवीचं टोक दातांनी तोडून गार गोड थेंब जिभेवर चोखायचे..
प्रत्येक brand कड़े स्वत:चं काही ख़ास होतं..आहे..!!
प्रत्येक brand कड़े स्वत:ची काही बात होती.. आहे..!!
आणि आपल्यातही ...
कुछ ख़ास है हम सभी में..
कुछ बात है हम सभी में..
बात है..ख़ास है..
क्या स्वाद है जिन्दगी में..!!
...
वाचने
31079
वाचनखूण
प्रतिक्रिया
116
पानगोळ्या
In reply to पानगोळ्या by कवितानागेश
तुम्ही लाल लाल पानगोळ्या
In reply to पानगोळ्या by कवितानागेश
गिरगावला
पार्ले
In reply to पार्ले by चिरोटा
डबल कोला
जाहिरात
चन्दा आइसक्रिम
In reply to चन्दा आइसक्रिम by विशाखा राऊत
ho..
"किस मी" चोकलेट
झकास
"आई बाबांसोबत कुठल्या भारी हॉटेलात गेलो तरी मी भिकारडेपणासदृश ..
In reply to "आई बाबांसोबत कुठल्या भारी हॉटेलात गेलो तरी मी भिकारडेपणासदृश .. by एक
ही उपमा मस्त..
In reply to "आई बाबांसोबत कुठल्या भारी हॉटेलात गेलो तरी मी भिकारडेपणासदृश .. by एक
अगदी सहमत!!!
In reply to अगदी सहमत!!! by बेसनलाडू
+१
In reply to अगदी सहमत!!! by बेसनलाडू
+१
In reply to अगदी सहमत!!! by बेसनलाडू
+१
In reply to अगदी सहमत!!! by बेसनलाडू
+१
कॅम्पा कोला
In reply to कॅम्पा कोला by प्रियाली
प्रियालीजी..
पहिली व्हिस्की ग्रीन लेबल...
In reply to पहिली व्हिस्की ग्रीन लेबल... by इंटरनेटस्नेही
then..
In reply to then.. by गवि
हम्म
In reply to हम्म by मी-सौरभ
एलपी मधे गायबली होती. आता
In reply to एलपी मधे गायबली होती. आता by गवि
एलपी मिळायचे हमखास ठिकाण...
अरे वा!! म्हणजे असा
In reply to अरे वा!! म्हणजे असा by रेवती
हॉटेलात मागवलेला मसाला डोसा..
In reply to हॉटेलात मागवलेला मसाला डोसा.. by एक
मलाही नाही जमलं. चक्क
In reply to मलाही नाही जमलं. चक्क by रेवती
+१
उन्हाळा सुरू झाला हे रसना,
आठवते अजुनि
In reply to आठवते अजुनि by मुक्तसुनीत
बनारस सिल्क हाऊस,रूप संगम,रंगोली,ई सी ई बल्ब,कालनिर्णय,बीटेक्स
In reply to बनारस सिल्क हाऊस,रूप संगम,रंगोली,ई सी ई बल्ब,कालनिर्णय,बीटेक्स by बेसनलाडू
भूल न जाना ई सी ई बल्ब लाना ब
In reply to भूल न जाना ई सी ई बल्ब लाना ब by गवि
ईसीई बल्ब और ईसीई ट्यूब आणि बजाज, चल मेरी लुना
In reply to बनारस सिल्क हाऊस,रूप संगम,रंगोली,ई सी ई बल्ब,कालनिर्णय,बीटेक्स by बेसनलाडू
बेसनलाडूजी गुरूजी, ती एक अॅड
In reply to बेसनलाडूजी गुरूजी, ती एक अॅड by गवि
कुठलेतरी राष्ट्रीय बचत सर्टीफिकेट होतं.
In reply to कुठलेतरी राष्ट्रीय बचत सर्टीफिकेट होतं. by अर्धवटराव
अयला...
In reply to आठवते अजुनि by मुक्तसुनीत
लाईफबॉय
In reply to लाईफबॉय by प्रदीप
"मिले सूर मेरा तुम्हारा" ही
In reply to "मिले सूर मेरा तुम्हारा" ही by विश्वनाथ मेहेंदळे
दोघांचाही सहभाग
In reply to आठवते अजुनि by मुक्तसुनीत
ओके..
In reply to ओके.. by मैत्र
पँथर मोपेड... बडे बडे पहियो
In reply to पँथर मोपेड... बडे बडे पहियो by गवि
अरे अवंती !!!
In reply to आठवते अजुनि by मुक्तसुनीत
मस्तं !
In reply to आठवते अजुनि by मुक्तसुनीत
एका इंग्रजी ब्लॉगवर
khoop mast athavani
टाटा का ओके धुलाई का साबुन
लिज्जत पापड, निर्मा आणि झिंग थिंग्ज
In reply to लिज्जत पापड, निर्मा आणि झिंग थिंग्ज by बेसनलाडू
Nirma. hee ajoonahee chaaloo
बेसनलाडूजी,"ओके"ची जिंगल पुढे
In reply to बेसनलाडूजी,"ओके"ची जिंगल पुढे by गवि
क्या बात
In reply to बेसनलाडूजी,"ओके"ची जिंगल पुढे by गवि
विको टर्मरिक क्रीम
In reply to विको टर्मरिक क्रीम by बेसनलाडू
विकोच्या जाहिरातीत संगिता
In reply to विकोच्या जाहिरातीत संगिता by रेवती
होय तसे दिसतेय खरे
किराये की बुल्डोझर पे
In reply to किराये की बुल्डोझर पे by स्पंदना
थोडं करेक्शनः भाडे के
In reply to थोडं करेक्शनः भाडे के by मी ऋचा
अपर्णातै, मी-रुचा---
संदर्भ लागत नाही
In reply to संदर्भ लागत नाही by गवि
कोणत्यातरी चहाची जाहिरात होती
१. जरास्सा उफ्फ... जरासा आह..
In reply to १. जरास्सा उफ्फ... जरासा आह.. by मस्त कलंदर
एक कुठल्या तरी क्वायरची अॅड
जुन्या जाहिरातींचा आपला एक
खरच जुना काळ आठवला तेव्हाच्या
In reply to खरच जुना काळ आठवला तेव्हाच्या by जोशी 'ले'
मस्तच अॅडिशन्स..
अमृत मलम त्वचेचे
In reply to अमृत मलम त्वचेचे by मी ऋचा
अमृत मलम तर हिट होतीच्..पण
सिन्कारा...
In reply to सिन्कारा... by satish kulkarni
ये बेचारा काम के बोझ का मारा.
In reply to ये बेचारा काम के बोझ का मारा. by गवि
तो तरूण, जावेद जाफरी होता
मॉन्टे कार्लो आणि बॉम्बे डाईंग
In reply to मॉन्टे कार्लो आणि बॉम्बे डाईंग by महानगरी
एका ठराविक किराणा मालाच्या
In reply to एका ठराविक किराणा मालाच्या by गवि
नाही नाही
In reply to नाही नाही by महानगरी
पारदर्शक म्हणजे वडी नव्हे.
In reply to पारदर्शक म्हणजे वडी नव्हे. by गवि
बरोब्बर ..
In reply to पारदर्शक म्हणजे वडी नव्हे. by गवि
तो फक्त कागद असायचा सोनेरी..
In reply to नाही नाही by महानगरी
मिळते अजून ती... देसाई बंधू
In reply to मॉन्टे कार्लो आणि बॉम्बे डाईंग by महानगरी
चौकोनी गुलाबी काजुकंद वडी
मार्लेक्स आणि एमआर काफि
In reply to मार्लेक्स आणि एमआर काफि by अनुराग
एम आर कॉफी डीटेल्स न देता
अजुन एक........जो बिबी से
मस्त धागा!
In reply to मस्त धागा! by स्वाती दिनेश
बिल्ला...
सूप्परडूप्पर हिट्ट है
In reply to सूप्परडूप्पर हिट्ट है by धमाल मुलगा
धन्स..
गगनविहारी यांची पोतडी....!!
In reply to गगनविहारी यांची पोतडी....!! by इन्द्र्राज पवार
>>"शादी और तुमसे..? कब्बी
In reply to >>"शादी और तुमसे..? कब्बी by मस्त कलंदर
पान पसंदची सीरीजच होती.
In reply to गगनविहारी यांची पोतडी....!! by इन्द्र्राज पवार
प्रतिसाद बघून मलाही खूप आनंद
ख्ल्लास
आठवत असलेले काही दुवे....
In reply to आठवत असलेले काही दुवे.... by योगप्रभू
निघाली निघाली...दातात अडकलेली