गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वरा :
गुरु: साक्षात परब्रह्म
तस्मै श्रीगुरुवे नम: ॥
हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जिवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे, अपने लिये, हम को सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशिष दे, जो सोचनेका फर्ज है ll हम हो पुजारी तत्व के,गुरुदेव के आदेशके सच प्रेम के नित नेम के , सद्धर्म के , सत्कर्म केहो चिढ झुठी शहकी, अन्यायकी अभिमानकी,सेवा कर्म को दासी की, परवाह नही हो जानकी ll छोटे न हो हम बुद्धी से , हे विश्वमय से ईशमय , हो राममय और कृष्णमय् , जगदेवमे जगदीशमे हर ईंद्रियोंपर ताप कर , हम वीर हो अतिधीर हो , उज्ज्वल रहे सरसे सदा , निजधर्मरत खंबीर हो ll अतिशुद्ध हो आचारसे , तन-मन हमारा सर्वदा ,अध्यात्म की शक्ती हमे , पलभी नही करदे जुदा , इस अमर आत्मा का हमे हर श्वास भरमे गम रहे , अगर मौत भी आ गई , सुख दु:ख हमसे सम रहे l हे गुरुदेव हम सबको सदबुद्धी दे l सत्कर्तव्य करने की प्रवृत्ती दे l सच बोलनेका अभ्यास दे l सत स्वरुप का ग्यान दे l
llशिष्यादिच्छत्पराजयम..ll
विवेकानंदांना घडवणारे...
जेव्हा नवीन कळी उमलते तेंव्हा त्याचा आनंद कोणत्या शब्दांत वर्णावा ! तीच कळी अस्तित्वात येउन तिच फलांत रुपांतर करण्यासाठी त्याला लागणारं पोषक वातावरण उपलब्ध करण्यास सहाय्य ठरणारे गुरु.. जन्माला आल्यापासुन त्यावर संस्कार करण्याचे कार्य पार पाडत असलेले माता-पिता हे प्रथम गुरु..
शिक्षण हा कधीही न संपणारा शोधच असतो. विद्यार्थ्याची रुची- कल जाणुन त्याना योग्य मार्गदर्शन देणारा हाच गुरु..खरे तर अशीही म्हण प्रचलीत आहे की 'अनुभवासारखा श्रेष्ठ दुसरा गुरु नाही' ,'ग्रंथ हेच गुरु', पण सर्जनशीलता, स्वयंविचार,स्वयंअनुभव, निरिक्षणशक्तीचे एकत्रिकरण कर्ण्यास गरज भासते ती मानवी गुरुची...
आपल्याला असलेले अनुभव वाचायला उत्सुक....
प्रतिक्रिया
25 Jul 2010 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आतापर्यंतच्या आयुष्यात एकच गुरु लाभलाय असे काही होत नाही. असा गुरु मिळणे कठीण आहे. ज्ञान देणारा गुरु, जीवनात मार्गदर्शन करणारा गुरु, असे अनेक गुरु असू शकतील. पण अशा गुरुंचे पुजन झालेच पाहिजे. आयुष्यात अनेकप्रसंगी मार्गक्रमण करण्यासाठी अशा गुरुंची गरज असतेच.
आतापर्यंतच्या आयुष्यात ज्या ज्या गुरुंनी घडविले त्यांना मात्र वंदन आहेच. गुरु-पुजन म्हणजे अनुभवांचे पुजन आहे. आदर्शवत मार्ग दाखविणार्या मार्गावरुन जाणे म्हणजे गुरु-पुजन ठरावे असे वाटते.
-दिलीप बिरुटे
25 Jul 2010 - 1:31 pm | पांथस्थ
१००% सहमत.
आजवर आयुष्यात कळत-नकळत ज्यांनी ज्ञान/संस्कार दिले अशा सर्व गुरुंना शि.सा. नमस्कार. _/\_
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
25 Jul 2010 - 1:49 pm | बिपिन कार्यकर्ते
नशिब थोर की गुरूभेट खूप लवकर झाली. खूप काही शिकलो. खरंच उपकार असतात गुरूचे... न फिटणारे.
माझाही आज या निमित्ताने गुरूतत्वाला साष्टांग प्रणिपात.
बिपिन कार्यकर्ते
25 Jul 2010 - 1:52 pm | अप्पा जोगळेकर
हल्ली तर बर्याचदा असंही होतं की शिष्यामुळे गुरुच फावतं.
जस सचिन तेंडुलकर या महान खेळाडूमुळे रमाकांत आचरेकर यांच फावलंय.
25 Jul 2010 - 1:58 pm | बिपिन कार्यकर्ते
एक तर माझा सचिन तेंडुलकर आणि त्याचे गुरू या विषयावर अभ्यास अजिबात नाही. त्यामुळे सचिनमुळे त्यांचं काय फावलंय ते कळायला मार्ग नाही. शिवाय हा प्रतिसाद माझ्या प्रतिसादावर उपप्रतिसाद म्हणून येण्याचे प्रयोजन कळले नाही. असो.
तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या भावना कमी होत नाहीत.
बिपिन कार्यकर्ते
26 Jul 2010 - 1:21 pm | आगाऊ कार्टा
सचिन तेंडुलकर या महान खेळाडूमुळे रमाकांत आचरेकर यांच फावलंय.
या आपल्या म्हणण्याला काय आधार आहे हे कृपया स्पष्ट केलेत तर बरे होईल.
मान्य आहे की सचिन मुळे त्यांना प्रसिद्धि मिळाली, पण जेव्हा सचिन कोणीच नव्हता, तेव्हा त्यांनी त्याच्यावर घेतलेले कष्ट तर आपण नाकारु शकतच नाही.
आणि सचिने मुळे मिळालेल्या प्रसिद्धिचा त्यांनी काय गैरफायदा घेतला ते तर सांगा.
25 Jul 2010 - 2:15 pm | दत्ता काळे
आतापर्यंतच्या आयुष्यात ज्या ज्या गुरुंनी घडविले त्यांना मात्र वंदन आहेच. गुरु-पुजन म्हणजे अनुभवांचे पुजन आहे. आदर्शवत मार्ग दाखविणार्या मार्गावरुन जाणे म्हणजे गुरु-पुजन ठरावे असे वाटते.
.. अगदी बरोबर. सर्व ज्ञात / अज्ञात गुरुंना वंदन
26 Jul 2010 - 2:01 am | पुष्करिणी
+१ , असेच म्हण्ते. ग्रंथरूपी गुरूंनाही वंदन
27 Jul 2010 - 10:28 pm | डावखुरा
विद्येअंगी व्हावा विनय l विद्या करी स्वतंत्र निर्भय l
शिक्षणाने वाढवावा निश्चय l जिवन जय करावया ll