काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्या कोतार्या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे.
http://www.saamana.com/2010/July/13/Link/Main1.htm
http://72.78.249.124/esakal/20100712/4667969515589123216.htm
http://epaper.pudhari.com/epapermain.aspx
http://epaper.prahaar.in/
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6161109.cms
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=853...
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/MainEditio...
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 9:20 am | शिल्पा ब
बातमीची काही लिंक वगैरे आहे का? असेल तर द्या.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 Jul 2010 - 10:25 pm | विकि
आमच्या मराठी बांधवांवर अमानुष अत्याचार करणा-या जुलमी कानडि सरकार,कन्नड रक्षण वेदिका आणि बघ्याची भुमिका घेणा-या केंद्रसरकारचा जाहीर निषेध,निषेध,निषेध.
यानिमित्ताने केंद्राचा महाराष्ट्र द्वेष पुन्हा दिसला.सीमा भागात काल काढलेल्या मोर्च्यात अबाल वृध्द ही सुटले नाहीत.कानडि पोलीस दिसेल त्याला मारत सुटले.स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ चाललेला हा लढा आता अंतिम टप्प्यावर आला आहे.
काल कन्नड ऱक्षण(भक्षण)वाल्यानी आमची एसटी पेटवली.याआधी बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांना अमानुष मारहाण केली.कित्येक जण या चळवळीत हुतात्मे झाले.तरी केंद्राने महाराष्ट्रात काँग्रेस चे सरकार असताना कानड्यांच्या बाजूने न्याय का द्यावा.
संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे नव्हे मिळालाच पाहिजे.
13 Jul 2010 - 10:28 pm | विकि
अधिक माहितीसाठी सीमा प्रश्नी लढणारे
बेळगाव तरूण भारत हे वृत्तपत्र वाचा.
13 Jul 2010 - 10:44 pm | विकि
चला संकल्प करू -सीमा लढा सुटेपर्यंत उडप्यांची हॉटेल,शेट्टींचे बार आणी महाराष्ट्रात म्हैसूर मधून येणारे शहाळ्याचे पाणी,कानडी लोकांचे पानाचे ठेले त्यावरील सिगारेट घेणे बंद
13 Jul 2010 - 10:47 pm | क्रेमर
इन्फोसिस ही कानडी लोकांची (निलेकानी, मुर्ती वगैरे) कंपनी आहे. त्या कंपनीत काम करणार्यांनी नोकरी सोडावी. आणखी कुठल्या कानडी कंपन्या असल्यास त्यावर बहिष्कार टाकावा.
13 Jul 2010 - 10:50 pm | विकि
कोणीही सीमाप्रश्नाची मस्करी करू नये हा मराठी भाषिकांचा भावनिक लढा आहे.कट्टर मराठीवादी मिपासंपादक मंडळाने याबाबत कारवाई करावी.
13 Jul 2010 - 10:52 pm | क्रेमर
मस्करी करणार्यांची संपादकांनी नोंद घ्यावी.
13 Jul 2010 - 10:51 pm | चिरोटा
कॅनरा बँक्,सिंडिकेट बँकेत ज्यांचे खाते आहे त्यांनी पैसे काढून घ्यावेत. किंग फिशर एयर लाइन्सने प्रवास टाळावा.
बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
14 Jul 2010 - 10:52 pm | विकि
मुंबईत दोन चार अनधिकृतपणे धंदा करणार्या भय्यांच्या कानाखाली आवाज काढला गेला तरहिंदी इलेक्ट्रोनिक माध्यमांनी किती आवाज उठवला.दिल्ली पासून गल्लीपर्यंत सारे नेते धावून आले.आणि सीमाभागात जो अबालवृध्दांवर लाठीमार झाला,खोट्या केसेस टाकल्या गेल्या ते कोणालाही दिसले नाहीत.एकही इलेक्ट्रोनिक प्रसारमाध्यम कन्नड रक्षण वेदिके वा कानडी पोलीसांना गुंड वा कर्नाटकका गुंडाराज(मनसे च्या वेळी हेच म्हणाले होते राज का गुंडाराज) हे म्हणण्यासाठी पुढे आले नाही.पहा मराठी विरोध कसा आहे या हिंदी माध्यमाचा.
13 Jul 2010 - 11:44 pm | अडगळ
कानडा विठ्ठलु कर्नाटकु
14 Jul 2010 - 4:55 am | पाषाणभेद
चला, पुन्हा मराठी मनाची खिल्ली उडवीणारे प्रतिसाद सुरू झालेत. कोणती गोष्ट हलकी घ्यायची अन कोणती नाही हे मराठी माणसाकडून शिकावे. अन्य लोक असे करत नाही. विषाद वाटला एकूणच.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
13 Jul 2010 - 10:07 am | चिरोटा
मारण्याचा अधिकार नसताना विधानसभेत मराठी बोलत नाही म्हणून कानफटात मारलेली चालते पण दुसर्या राज्यात जावून भलत्याच राज्याचा झेंडा सरकारी ईमारतीवर लावला तर पोलिसांनी आंदोलकांना मिठाई भरवायची का?
P = NP
13 Jul 2010 - 10:29 am | शिल्पा ब
दुसर्या राज्यात जाऊन? हा भाग प्रांतरचनेच्या वेळीच कर्नाटकात गेला आहे...मराठी लोक आधीपासूनच इथे आहेत...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 Jul 2010 - 2:32 pm | प्रशु
अबुच्या कानखाली काढलेला जाळ अजुन चुरचुर्तोय वाटतो...
13 Jul 2010 - 3:32 pm | समंजस
चला या न्यायाने का होईना विधानसभेतल्या कानफटीत मारलेल्या घटनेचं तुम्ही समर्थन केलंच तर :)
13 Jul 2010 - 10:38 am | पाषाणभेद
सदरहू धागा कदाचित पुढल्या पिढीने खोदकाम केल तर आपले मराठी संस्थळावरील बांधवांचे सीमाभागातील लोकांप्रती काय मत आहे हे वाचल्यास शरमेने मान खाली न घालावी लागू नये म्हणून या धाग्यात झाली तशी चर्चा अपेक्षीत नाही. ज्यांना पाठींबा द्यायचा असेल त्यांनीच येथे पाठींब्याचे मत नोंदवावे. अन्यथा त्यांनी "पाठींबा नसल्याचा" वेगळा धागा काढावा.
वैयक्तिक घेवू नये.
जय महाराष्ट्र!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
13 Jul 2010 - 2:16 pm | मितभाषी
@पाभे ,
पाठींबा द्यायचे म्हणजे काय करायचे आणि त्याने काय फरक पडणार आहे.??
13 Jul 2010 - 10:41 am | नितिन थत्ते
धागा स्पेसिफिक आणिबाणी आहे वाटतं....
नितिन थत्ते
13 Jul 2010 - 11:38 am | निखिलराव
बेळगाव, हुबळी,धारवाड सह संयुक्त महाराष्ट्र झालाचं पाहिजे..........
जय महाराष्ट्र!
13 Jul 2010 - 1:12 pm | अवलिया
सीमाभागातील मराठी बांधवांना माझा पाठिंबा आहे. त्यांच्या लढ्याला यश येवो ही प्रार्थना.
--अवलिया
13 Jul 2010 - 1:21 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे.
बिपिन कार्यकर्ते
13 Jul 2010 - 7:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
13 Jul 2010 - 2:30 pm | प्रशु
पाषाणभेद, जरा थोडा वेळ थांबा, 'काय फरक पडतो' वाला कंपु तुटुन पडेल तुमच्या वर....
13 Jul 2010 - 4:02 pm | ज्ञानेश...
"काय फरक पडतो"या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असेल अशी आशा करतो.
बेळगाव आणि परिसरातील मराठी बांधवांना माझाही पाठिंबा !
जय महाराष्ट्र.
13 Jul 2010 - 4:10 pm | परिकथेतील राजकुमार
छान आहे पाठिंबा.
आता जमल्यास ह्या धाग्याच्या प्रती तिकडे वाटून सुद्धा या :) त्यांना कळायला नको तुम्ही पाठिंबा दिलाय ते ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Jul 2010 - 4:31 pm | ज्ञानेश...
मुंबईवरील अतिरेकी हल्ले, काश्मिर खोर्यात घडलेले हिंसाचार, इराकवर हल्ला, नक्षलवाद्यांचे थैमान- झालंच तर जेम्स लेन यांचाही आपण निषेध करतो.
हा निषेध त्यांच्यापर्यंत पोचत असावा बहुतेक.
असो.
निषेध करणे/पाठिंबा दर्शवणे... थोडक्यात ज्याला 'लोकभावना' म्हणतात ती व्यक्त करणे हा उद्देश. आता हे कुठे पोचते किंवा पोचत नाही, याने- काय फरक पडतो? ;)
13 Jul 2010 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार
+१ सहमत आहे.
ह्याच उद्देशाने मी वरची प्रतिक्रीया लिहिली होती ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Jul 2010 - 7:17 pm | पाषाणभेद
जे काही येथे येतात त्यांना मराठी समजते. त्यांना त्यांना मराठी बांधवांची कणव असली पाहीजे. केवळ कर्नाटकात वीज आहे, सोई आहेत म्हणून तेथील काही बांधव जरी "कर्नाटकच ठिक आहे" असे म्हणत असतील अन येथील काही बांधव "काय फरक पडतो" असे उदासवाणे विचार लेखी लिहीत असतील तर सीमाबांधवांच्या भावनांना खुपच मोठा तडा दिल्यासारखे होत आहे.
केवळ चार दोन लोक तसे बोलले तर ती पुर्ण समाजाची प्रतिक्रिया नाही हे कालच्याच बेळगावच्या लढ्यात लक्षात आले. एक लक्षात घ्या की कन्नडीगांनी मराठी माणसांना कन्नडमध्ये 'बाटवण्याचे' व्यवस्थीत प्रयत्न केले आहेत.
एक उदाहरण सांगतो. माझ्या संपुर्ण अभ्यासक्रमात लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा काहीच उल्लेख नव्हता. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल पायाभुत माहितीही नाही. पुढील काळात काही वाचलेही गेले नाही. त्यामुळे एक मोठा इतिहासाला मी मुकलो असे वाटते. त्यांची राजकिय कारकिर्द इंदिरा गांधींच्या विरूद्ध होती. न जाणो त्यामुळेच संपुर्ण अभ्यासक्रमात त्यांची एकही ओळ आली नाही. असलेच प्रकार सीमाभागातील बांधवांसोबत होत आहे. मराठी लोकांची संख्या जाणीवपुर्वक कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
(असलाच गाळीव इतिहास शिवाजी महाराजांप्रती अंतर्राष्ट्रीय स्तरावर लिहीला जातोय अन भारत सरकार ते सहन करते.)
मी इतिहास तर लिहू शकत नाही. कधी काळी हा धागा एखाद्या पुढच्या पिढीतील सीमाभागातील कन्नड झालेल्या मराठी मुलाने वाचला तर त्याला पुर्वीच्या सध्याच्या मराठी संकेतस्थळावरील लोकांच्या मनस्थितीचा अंदाज येईल.
अन केवळ धागा काढण्याने त्यांच्यापर्यंत भावना पोहचत नाही असे होत नाही. घाग्याच्या प्रती अश्या प्रकारे कोणी वाटत नाही अन ते कोणी घेतही नाही. असे केल्यानेच जनमत तयार होते. अन मुख्य म्हणजे आपण मराठी संस्थळावर आहोत. आपण "काय फरक पडतो" असा विचार करतो. असलाच विचार कन्नडीगा पण करतात काय? करत असतील तर आतापर्यंत का नाही आपला भुभाग दिला नाही परत?
वरील धागा अन त्यातील ही प्रतिक्रिया देण्याचे हेच प्रयोजन आहे. ते लढताहेत पण मी सुरक्षीत आहे तर 'मला काय त्याचे' असे म्हणू नका.
जय महाराष्ट्र!
img src="http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png" alt="The universal symbol for diabetes" />
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
13 Jul 2010 - 7:19 pm | अवलिया
सहमत आहे रे पाभे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
--अवलिया
13 Jul 2010 - 7:24 pm | परिकथेतील राजकुमार
पाभे एक शंका आहे.
तुम्ही म्हणता की :-
केवळ चार दोन लोक तसे बोलले तर ती पुर्ण समाजाची प्रतिक्रिया नाही हे कालच्याच बेळगावच्या लढ्यात लक्षात आले.
आणि पुन्हा तुम्हीच म्हणता की :-
कधी काळी हा धागा एखाद्या पुढच्या पिढीतील सीमाभागातील कन्नड झालेल्या मराठी मुलाने वाचला तर त्याला पुर्वीच्या सध्याच्या मराठी संकेतस्थळावरील लोकांच्या मनस्थितीचा अंदाज येईल.
म्हणजे तुमच्या एकट्याचा धागा म्हणजे मराठी संकेतस्थळावरील लोकांच्या (किती ते कल्पना नाही ) मनस्थीतीचा अंदाज ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Jul 2010 - 7:27 pm | चिरोटा
आपली चिंता समजण्यासारखी आहे पण-
माझी 'त्या' धाग्यातील प्रतिक्रिया पहा. असे खरोखरच प्रयत्न झाले असते तर बेळगावात किर्लोस्कर रोड्/टिळकवाडी/शिवाजींचा पुतळा/मराठा मंडळ दिसले नसते.फक्त मराठी पाट्या असलेली अनेक दुकाने निपाणी/बेळगावात बरीच आहेत.मी सीमाभागात गेले २५ वर्षे जात आहे.मराठी विसरला आणि कोणी कन्नडची कास धरली अशी कोणतीही मराठी व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही.
15 Jul 2010 - 12:59 pm | भाऊ पाटील
>>मराठी विसरला आणि कोणी कन्नडची कास धरली अशी कोणतीही मराठी व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही.
अश्या किमान ३ व्यक्ति मी पहिल्या आहेत. त्यातले २ जण माझे रुममेट्स होते. परंतु, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता.
अर्थात कन्नड रक्षण वेदिके हि संघटना बर्यापैकी जोर-जबरदस्ती करते आणि बरेचसे कन्नडिगा त्याला पाठिंबा देतात, हा माझा अनुभव आहे.
13 Jul 2010 - 7:42 pm | पाषाणभेद
हा धागा अन यातील प्रतिक्रिया कोणीही वैयक्तिक घेवू नका. कृपा करून समजून घ्या. परा अन भेंडीबाजार तुम्हीही. ज्या माणसांनी मराठीत आपले आयुष्य घालवले, ज्यांचे नातेवाईक मराठी आहेत अन त्यांची पुढची पिढी कन्नड बोलते, कन्नड चालते त्यांच्या मनाला काय वाटेल? उगाचच शब्दांचा किस न काढता सीमावासीयांना पाठींब्यासाठी हा धागा आहे हे कृपया लक्षात घ्या.
बेळगाव कारवार निप्पाणी भाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे!
जय महाराष्ट्र!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
13 Jul 2010 - 7:59 pm | चिरोटा
गेले १००-१५० वर्षे रहाणारी अनेक मराठी कुटुंबे तिकडे आहेत्.त्यांची आताची पिढी कन्नड माध्यमात जावूनही स्पष्ट मराठी घरी बोलते.(मुंबईतच लहानाचे मोठे झालेले अनेक अमराठी त्यांची मातृभाषा बोलतातच ना घरी?)
दूर देशी अमेरिकेत राहून जर मराठी टिकू शकते तर ५०० किमी.च्या त्रिज्येत काय प्रॉब्लेम येणार आहे?
सीमावासियांना पाठिंबा वगैरे ठीक पण गैरसमज पसरवून त्यात दुसर्या समाजाला अप्रत्यक्षरित्या टार्गेट करणे चूक आहे.
बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
13 Jul 2010 - 8:12 pm | क्रेमर
वरील प्रतिसादात मांडलेल्या मताशी सहमत आहे.
बेळगावमधील मराठी लोकांशी वैयक्तिक परिचय आहे. मराठीशी असलेले नाते कुठेही तुटलेले नाही. पुढच्या पिढीतील सर्व लहान-थोर मराठीत बोलतात. उगाच फार मोठा अन्याय होतो आहे असा बाऊ करण्याचे प्रयोजन समजत नाही. गेली अनेक दशके हा प्रश्न आहे तसाच आहे. दरवर्षी काही कारणाने महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रात बातम्या येतात. एखाद-दुसरे संपादकीय लिहिले जाते. मग फारसे काही घडत नाही.
13 Jul 2010 - 11:31 pm | ऋषिकेश
धाग्याला प्रतिसाद देणार नव्हतो पण पुढील वाक्य वाचलं आणि रहावलं नाहि
अहो पण, ज्या माणसांनी मराठीत आपले आयुष्य घालवले, ज्यांचे नातेवाईक मराठी आहेत, महाराष्ट्रातच रहातात अगदी पुण्यामुंबईत त्यांची पुढची पिढी कितपत मराठी बोलते?
महाराष्ट्रात याहून महत्त्वाचे प्रश्न असताना, ह्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रवण असणार्या प्रश्नावर तेढ वाढवून फुकटच्या केल्या जाणार्या राजकारणास मा़झे अजिबात समर्थन नाहि.
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
14 Jul 2010 - 3:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि महाराष्ट्राबाहेरचंच बोलायचं तर भारताबाहेर रहाणार्या किती मराठी लोकांची पुढची पिढी/ढ्या मराठी बोलतात, लिहीतात, वाचतात?
अदिती
14 Jul 2010 - 8:10 pm | शिल्पा ब
भारताबाहेर राहणार असू तर मराठी फार फार तर घरात आणि मित्रमंडळीमध्ये बोलले जाईल...पुढच्या पिढीचा मराठीत कितपत संबध येणार आहे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 Jul 2010 - 8:27 pm | अडगळ
ह्ये सुक्काळिचे दर ४-५ महीन्यांत काय तर बोंब करतात . उगी च महाराष्ट्राच्या / कर्नाटकाच्या एष्ट्या फोडतात.
पुण्यावरनं आमच्या कोल्हापूरला जायला कर्नाटक ची गाडी बरी (स्वस्त) पडती . पण आता दंग्याच्या टायमाला गाडी बाहेरच्या बाहेर न्हेतात. आधीच म्हागाई , त्यात आणि ह्यो खर्च.
भांडून मरत्यात रां**
शिवप्पा मळिदगे.
बुगटे आलूर
13 Jul 2010 - 8:28 pm | क्रेमर
गाड्या फोडतात हे विसरलो होतो.
13 Jul 2010 - 8:56 pm | प्रशु
कालच्या प्रकारत पहीली गाडी कोणी फोडली????
13 Jul 2010 - 8:57 pm | क्रेमर
दोन्ही बाजूंना सार्वजनिक मालमत्तेची हाणी करणारे लोक आहेत. कोणा एकाला वेठीस धरता येणार नाही.
13 Jul 2010 - 9:26 pm | अडगळ
आता आमची पोरगी संकेश्वर ला हाय डिप्लोमाला. आमी र्हातोय बड्याच्या वाडीला. कामाला जातोय निप्पानिला. नवसाला मी जातोय बाळेकुंद्रीला आन ही जातीया आप्पाच्या वाडीला.आमच्या लग्नात मांडं बी केल्तं आन जिलबी बी केलती. आमी कुठली एष्टी फोडू?
29 Jul 2010 - 12:02 pm | Nile
मांड्याची आठवण आली अन भुक लागली. आमची मामी बेळगावची तिच्या कडे गेलो की चंगळ असते राव.
बाकी पुणे ते बंगलोर प्रवास आम्ही लाल यष्टी आणि केएसआरटी अश्या दोन्हीतुन आळीपाळीने करायचो. साला भेदभाव नाय पायजेल. दोन्ही बससेवेंनी एकेकदा ऑलमोस्ट संपवला मला. तिथेही भेदभाव नाही. असो.
14 Jul 2010 - 10:36 pm | अशोक पतिल
सीमा प्रश्नावर वान्झोत्या चर्चा करण्यापेक्शा महाराष्ट्रा चे पोलिसदल बेळगाव ला पाटवुन आपल्या मराठी लोकांची सुरक्षअ करावी व कोर्टाचा निर्णय जर योग्य असेल तरच डोक्यावर घ्यावा अन्यथा पायद्ळी तुळवावा. ( शिवाजी महाराजाची निती ).
15 Jul 2010 - 8:38 am | अप्पा जोगळेकर
भाषावार प्रांतरचना मान्य केली तर बेळगाव महाराष्ट्रात आलं पाहिजे.
मी ऐकलंय की महाराष्ट्रातली पूर्व सीमेवरची काही गावं तेल्गु भाषिक आहेत. तसं असेल तर त्यांनाही आंध्र मधे जाउ दिलं पाहिजे.
- कानडी यष्ट्या फोडणार्यांना पाठिंबा आहे. वडाचं तेल वांग्यावर निघतंच बर्याचदा. खरंतर बेळगावात जाउन तोडफोड केली पाहिजे. कानड्यांना धुतलं पाहिजे. दोन्ही षेणा काय करतायत ?
- (बघ्या) अप्पा
-
15 Jul 2010 - 12:27 pm | हरकाम्या
#o अहो भाषावार रचना केली तर आमची " मुंबई " कोणत्या प्रांतात जाईल ?
15 Jul 2010 - 9:05 am | अविनाशकुलकर्णी
बेळगाव ने महाराष्ट्रात येवु नये..एक नेता व त्याचा कंपु सारी जमीन हडपतिल.....
15 Jul 2010 - 12:16 pm | मृत्युन्जय
त्यांनी देश हडपला आहे आधीच बेळगावचे काय घेउन बसता? मरत पण नाहीत लेकाचे ७ पिढ्या पुरतील एवढा पैसा कमावुन झाल्यावर पण
15 Jul 2010 - 12:27 pm | मृत्युन्जय
बेळगाव बद्दलच्या भावना कळतात. पण मग इथे मराठी माणुसच कुठेतरी मागे पडतो ना? केंद्राने कर्नाटकाची बाजु घ्यावी पण महाराष्ट्राची घेऊ नये असे का होते? म्हणजे कुठेतरी आपण आपली बाजु नीट मांडत नाही हेच खरे.
शिवाय बेळगाव - निप्पाणी घ्यायचे म्हणजे सोलापुर सोडुन द्यावे लागेल (भाषावर प्रांतरचनेनुसार). ती पण आपली तयारी नाही. तुझे ते माझे आणि माझे ते पण माझेच हे कसे चालेल?
भाषावर प्रांतरचनेनुसार मुंबई आपल्याकडे आली. काय तारे तोडले आपण तिथे? काय आहे मराठीची स्थिती मुंबईमध्ये? बेळगाव महाराष्ट्रात घेऊन नक्की काय करणार आहोत आपण? बेळगाव महाराष्ट्रात असले काय किंवा कर्नाटकात असले काय यावर केंद्राला काहीच फरक पडत नसताना केंद्राने कर्नाटकाची बाजु का घेतली?
आपल्याला फरक पडत नाही असे मला म्हणायचे नाही आहे. प्रश्न भाषिक अस्मितेचा नक्किच आहे. पण मग ही अस्मिता मुंबैच्या बाबतीत कुठे शेण खायला जाते? त्यासाठी आपण काहीच करत नसताना आणि या पुर्वीही कधी केलेले नसताना उगाच बेळगावचा आग्रह धरण्यात काय अर्थ आहे?
15 Jul 2010 - 2:55 pm | चिरोटा
महाराष्ट्रातल्या लोकांना फरक पडतो का ह्यापेक्षा सीमावासियांना फरक पडतो का ह्याचे उत्तर शोधणे महत्वाचे आहे.वर म्हंटल्याप्रमाणे सोलापूर,अक्कलकोट द्यायची तयारी आहे का?केंद्रात कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी ह्याबाबतीत ते काहीच करु शकत नाहीत कारण ह्यावर निर्णय झालेला आहे आणि आवडो वा न आवडो तो कर्नाटकच्या बाजुने पूर्वीच लागला आहे.आजपर्यंत मराठी पुढारी सीमाप्रश्नाच्या नावावर फक्त धंदा करत आले आहेत्.एक महिना तरी हा प्रश्न कुठच्या पुढार्याने तग लावून धरला का? नाही, कारण अगदी आमरण उपोषणाला बसले तरी काही फरक पडणार नाही हे त्यांना माहित आहे.
कोचीन,मदुराई पर्यंत मराठी माणसे पसरली आहेत. ती व्यवस्थित स्थानिक भाषा बोलतात आणि घरी मराठी बोलतात. सीमावासिय पण बाहेर कन्नड आणि घरी मराठीच बोलतात.केवळ मराठी आहेत म्हणून कुठला हक्क नाकारला गेला का?(कर्नाटक कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष रघुनाथ देशपांडे मराठीच आहेत. http://www.karnatakapcc.com/kpcc-organization/president.html )
राजकिय पक्षानी तरुणांना भडकावून हुल्लडबाजी करण्यापेक्षा १० मराठी गुंतवणूकदारांना सीमाभागात गुंतवणूक करायला प्रवृत्त केले तर सर्वांच्या फायद्याचे होईल.
---------
बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
29 Jul 2010 - 10:23 am | मितभाषी
केंद्रात कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी ह्याबाबतीत ते काहीच करु शकत नाहीत कारण ह्यावर निर्णय झालेला आहे आणि आवडो वा न आवडो तो कर्नाटकच्या बाजुने पूर्वीच लागला आहे.आजपर्यंत मराठी पुढारी सीमाप्रश्नाच्या नावावर फक्त धंदा करत आले आहेत्.
१०००००००००००००००० % सहमत.
तात्पर्य : आपण धागे काढुन/अंबाड्या वळुन काहीही फायदा नाही. उगं आपलं सर्व्हरला भार.