या आधीचे लेखः
साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ..
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
साकिया (३) - "टकिला सनराईज"
साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी"
सकिया (५) - "चॉकलेट बनाना" (लहान मुलांसाठी खास)
सकिया (६) - स्पायसी मार्गारिटा
===============================================================
स्कूप युअर लक
मंडळी सर्वप्रथम या वेळेस बरेच दिवस कॉकटेल मिपावर टंकू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. या वेळेस जे कॉकटेल देत आहे ते प्यायचे नसून खायचे आहे, हा संपुर्ण पणे नवीन प्रकार आहे. पार्टीसाठी अतिशय उत्तम. आपल्याला माहित असेल की लिक्यूर असलेले चॉकलेटस प्रसिध्द आहेत. हे चित्र पहा:
अशाच प्रकारचा आणखी एक प्रकार या वेळेस बघणार आहोत.
आपण बर्याच वेळेस लहान मुलांसाठी जेली बनवतो. तसाच जेली बनवायचा आहे फक्त त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मदिरा वापरून.
कृती:
१ जेलोचे पाकीट घ्या. कोणतेही चालेल. अननस, लिंबू, चेरी, स्ट्रॉबेरी, कलिंगड इ. बरेच प्रकार मिळतात. त्याच्या चवीला साजेशी कोणतीही मदिरा घ्या. उदा. अननसा बरोबर रम चांगली लागते, चेरी बरोबर स्कॉच व्हिस्की, लिंबू किंवा कलिंगडा बरोबर व्होडका अथवा टकिला, स्ट्रॉबेरी बरोबर जिन इ. इ. इ. मी ट्रॉपीकल फ्यूजन आणि रम वापरले.
एका मोठ्या भांड्यात २ कप पाणी गरम करा. उकळले नाही तरी चालेल पण कोमट नको. त्यात जेलोची पावडर टाकून ते चांगले ढवळा. मिश्रण थंड होई पर्यंत थांबा. थंड झाल्यावर त्यात एक कप भरून मदिरा टाका. मिश्रण चांगले ढवळा. बर्फाच्या किंवा जेली बनवण्यासाठी जे साचे मिळतात त्यात मिश्रण ओता आणि फ्रिजमध्ये ठेवा.
साधारणतः ३ तासांनी जेलो छान तयार होईल, एका काचेच्या बोल मध्ये हलकेच काढून घ्या. एका वेळेस जर दोन तिन प्रकारच्या जेली बनवल्यात तर पार्टीसाठी फार सुंदर दिसतात.
काही फोटो:
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
- नाटक्या
प्रतिक्रिया
11 Nov 2009 - 12:28 pm | नंदन
साकियाचे जोरदार पुनरागमन! रेसिपी मस्तच. ट्राय करून पहायला हवा हा प्रकार.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Nov 2009 - 12:29 pm | सहज
इंटरेस्टींग पण तहान ती तहान हो गुरुवर्य .......
:-)
11 Nov 2009 - 7:28 pm | नाटक्या
सहजराव,
खरं आहे तुम्ही म्हणता ते पण कधीमधी बर्फाचा खडा टाकतोचना तोंडात आपण तसंच.. एकदा करून तर पहा काय मजा आहे ती...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
11 Nov 2009 - 12:31 pm | पर्नल नेने मराठे
मी रेक्सची जेली घरी करते, तुम्ही त्यात काही बाही :S अजुन घातलय ते नाही घालत मात्र.
बाकि दिसायला छान!!! 8>
चुचु
11 Nov 2009 - 12:33 pm | परिकथेतील राजकुमार
गुरुदेव ___/\___
वा र लो !!
फोटु बघुनच आत्मा मुक्त झाला आमचा. पुन्हा एकदा मद्यानंदी टाळी लागली.
गुरुदेव गच्च गच्च !!
मदिरा भक्त परायण नाटक्याबुवा कॉकटेलवाले यांचा शिष्य
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Nov 2009 - 12:38 pm | सुनील
जेवायला जाण्याआधी कोणताही पाकृचा धागा उघडायचा नाही, हा निश्चय पुन्हा एकवार करतो!
प्रकार दिसतोय छान. हवामानदेखिल अनुकूल आहे, तेव्हा..
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Nov 2009 - 12:58 pm | गणपा
मस्त रे नाटक्याभौ,
मदिरेला सोबत मदिरेच्याच चखन्याची व्हट एन आयडिया सरजी..;)
11 Nov 2009 - 1:27 pm | बबनराव
दिसायला फारच छान पण शेवटी सुरापान
11 Nov 2009 - 2:06 pm | घाटावरचे भट
!
11 Nov 2009 - 2:32 pm | छोटा डॉन
नेहमीप्रमाणे फोटो पाहुनच टल्ली झालो.
जबर्या आणि शिंपल पाककॄती, लै आवडली.
नाटक्याशेठचे जोरदार पुनरागमन.
अवांतर :
एक शंका आहे शेठ. च्यायला २ कप गरम पाण्यात चक्क "१ कप" जर मदिरा ओतली तर पेग भलताच स्ट्रांऽऽऽग होणार नाही का ?
जेलीच्या २ तुकड्यातच घोडे फरार होतील ना खाणार्यांचे ... ;)
( बाकी मिपावरच्या इतर "ऑन दी रॉक्स" वाल्यांनी हा स्वतःचा वैयक्तिक अपान समजुन रादेबाजीवर उतरु नये ही विनंती ) ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
11 Nov 2009 - 6:40 pm | स्वाती२
>>जेलीच्या २ तुकड्यातच घोडे फरार होतील ना खाणार्यांचे ...
बहूतेक वेळा जेलीचे तुकडे पंच मधे टाकतात.
11 Nov 2009 - 6:51 pm | गणपा
हं.... अस हे जेलोवाल पंच इंग्रजी सिनेमांत आणि सिरियल्स मध्ये पाहिलय बरेच वेळा.
11 Nov 2009 - 4:51 pm | स्वाती२
इथल्या पार्टी करणार्या पोरांची आवडती रेसिपी. त्यामुळे जेलो बघितलं की आईबाप सावध!
11 Nov 2009 - 7:25 pm | नाटक्या
स्वाती ताई,
हा जेलो बघीतला तर आता पोरं सावध होतील. या नंतर आई-बाबाला सांभाळायचे आहे म्हणून ;-)
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
11 Nov 2009 - 8:47 pm | धनंजय
सुरेख आहे दिसायला!
11 Nov 2009 - 8:55 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री नाटक्या, मस्तच दिसतेय, धन्यवाद. 'कॅप्टन मॉर्गन प्रायवेट स्टॉक' ही उत्तम प्रतीची रम वापरल्यास अधिकच बहार येईल असे वाटते.
11 Nov 2009 - 10:17 pm | प्रभो
मस्तच...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
12 Nov 2009 - 1:22 am | पिवळा डांबिस
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
चालेल, पण कधी बोलावता?
:)
12 Nov 2009 - 2:59 am | नाटक्या
तुम्ही फक्त सांगा कधी येताय ते.. आम्ही हजर आहोत सेवेला... ;-)
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
12 Nov 2009 - 1:29 am | चतुरंग
नाटक्याशेठ, आमच्या सारख्या 'असुरां'ना ह्यात मदिरेऐवजी कोणता ज्यूस वगैरे चालू शकेल का?
(माजी दारुवाला)चतुरंग
12 Nov 2009 - 3:00 am | नाटक्या
फळाचीच जेली असल्यावर त्यात आणखी फळाचा रस कशाला?
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
12 Nov 2009 - 8:00 am | निमीत्त मात्र
मस्त! आम्ही अशीच 'बनाना फॉस्टर' म्हणून डीश बनवतो. केळी साखर आणि ब्रॅंडी घालून शिजवलेली. त्याची रेसीपीपण द्या.
बाकी फोटो छान आले आहेत, काचेवरचे डाग ओल्या फडक्याने पुसुन घेतले असते अजून छान आले असते (उदा. शेवटचा फोटो).
12 Nov 2009 - 11:35 pm | एक
नुसत्या जेलीचा थोडा नॉशिया आहे.. पण ह्या पद्धतीची जेली नक्कीच आवडेल. ;)
या विकेंड ला करून बघतो..
फोटो झकासच आले आहेत..फोटोसाठी लाल रंगाच्या जेलीची निवड आवडली. एकदम व्हायब्रंट दिसते आहे..
(फोटोत नक्की काय बघावं याची बुद्धी अजून शाबूत आहे, हे किती छान!!)
13 Nov 2009 - 1:18 am | दिपाली पाटिल
अरे व्वा...छान आहे...हे मी वेगासला खाल्लं होतं. टकिला जेलो शॉट होता बहुतेक... तसंही छान लागतं...हेही छानच लागत असेल...
दिपाली :)
21 Nov 2009 - 5:18 am | बबलु
त्रिवार बेष्ट दिसतंय नवं क्वाकटेल.
ऐश करा लेको !!!!! :)
....बबलु
(बाय द वे:- सुरुवातीचे बाटल्यांचे फोटो खासंच)
21 Nov 2009 - 8:25 am | निमीत्त मात्र
मलाही तो सुरुवातीचा बाटल्यांचा फोटो फारच आवडला. असे सुंदर फोटो काढण्याविषयीही नाटक्या ह्यांनी मार्गदर्शन केले तर वाचायला आवडेल.
21 Nov 2009 - 8:13 am | विसोबा खेचर
क्या केहेने!
तात्या.