साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी"

नाटक्या's picture
नाटक्या in पाककृती
21 Apr 2009 - 11:00 pm

या आधीचे लेखः

साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ...
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
साकिया (३) - "टकिला सनराईज"
==========================================================

स्ट्रॉबेरी डायक्युरी

या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "स्ट्रॉबेरी डायक्युरी" (Strawberry Diaquiri). पिडाकाकांनी केलेला कट्टा आणि तिथल्या स्ट्रॉबेरीज बघून मला आमच्या ४ एप्रिलला केलेल्या या कॉकटेलची पाककृती टाकण्याचा मोह आवरला नाही.

साहित्य:

- २ औंस व्हाईट रम
- ४-५ स्ट्रॉबेरीज
- १/२ औंस लिंबाचा रस
- १ चमचा साखर
- १/२ स्ट्रॉबेरी (सजावटी साठी)
- बर्फ

कृती:

मिक्सर मध्ये मध्ये ५-६ बर्फाचे खडे घ्या त्यात स्ट्रॉबेरिज, साखर, लिंबाचा रस आणि रम टाका. मिक्सर चालू करून सगळ्या स्ट्रॉबेरीज द्रावणात एकजीव होई पर्यंत ग्राईंड करा. तयार झालेले द्रावण २-३ बर्फाचे खडे असलेल्या ग्लासमध्ये ओता. एक स्ट्रॉबेरी कापून कडेला सजावटी साठी लावा. (मी एक छोटी छत्री पण सजावटी करता वापरली होती. भारतात मिळते का हे ठावूक नाही.)

तुमचे कॉकटेल तयार आहे (सजावटी सकट).

आणि हे कॉकटेल पिणारी मिपाकर मंडळी (डावीकडून एक, बेसनलाडू आणि बबलू)

डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.

धन्यवाद...

- नाटक्या

प्रतिक्रिया

दिपाली पाटिल's picture

21 Apr 2009 - 11:07 pm | दिपाली पाटिल

मस्त दिसतंय कॉकटेल.... :)

संदीप चित्रे's picture

21 Apr 2009 - 11:09 pm | संदीप चित्रे

ना एक त्रासच आहेस यार...
सरळ न्यू जर्सीचं तिकीट काढ आता :)

विसोबा खेचर's picture

21 Apr 2009 - 11:24 pm | विसोबा खेचर

----- !

नि:शब्द...!

साकिया ही मराठी आंतरजालावरची सर्वात उत्तम लेखमलिका! असं मी सुरवातीलाच म्हटलं होतं ते आता खरं होऊ पाहात आहे! :)

ज ब रा...!

आपला,
(नाटक्याचा जबरदस्त फ्यॅन) रम-रमी-रमणीप्रेमी -तात्या.

अनिल हटेला's picture

22 Apr 2009 - 7:41 am | अनिल हटेला

अगदी सहमत !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विकास's picture

21 Apr 2009 - 11:55 pm | विकास

नाटक्या कुठे आहे?

अडाणि's picture

22 Apr 2009 - 12:17 am | अडाणि

कर्ता करवीता कुठे आहे ?

-
अफाट जगातील एक अडाणि.

पिवळा डांबिस's picture

22 Apr 2009 - 2:23 am | पिवळा डांबिस

तरीच म्हणत होतो आमच्याकडे मी काय विसरलो? त्या साल्या छोट्या छत्र्या आणायच्या राहिल्या....
अर्थात आमची पिणारी मंडळी फक्त ग्लासातील द्रव्याशी मतलब ठेवणारी असल्याने कुणी मनावर घेतलं नाही म्हणा...
:)
एक, बबलू आणि विशेषतः बेसनलाडूंचे दर्शन घेऊन धन्य झालो!!!!:)
बाकी नांवांची उलटापालट तर नाही ना केली? कारण 'एक' हा 'बबलू'सारखा आणि 'बबलू' हा 'एक'सारखा दिसतोय!! ह. घ्या...
-पिडां

घाटावरचे भट's picture

22 Apr 2009 - 9:54 am | घाटावरचे भट

>>अर्थात आमची पिणारी मंडळी फक्त ग्लासातील द्रव्याशी मतलब ठेवणारी असल्याने कुणी मनावर घेतलं नाही म्हणा...

कसं बोल्लात... :)

बाकी संयुक्त कट्ट्याची कल्पना उत्तम आहे.

बबलु's picture

22 Apr 2009 - 2:23 am | बबलु

"स्ट्रॉबेरी डायक्युरी" मस्तच आहे. लगे रहो नाटक्याभाई !!!

४ एप्रिलच्या कट्ट्यात डायक्युरी प्यायल्यानंतर --- "नाटक्या ला १०० वर्ष आयुष्य मिळो" असा वर दिल्याचंही थोडं थोडं आठवतंय :)

....बबलु

बबलु's picture

22 Apr 2009 - 2:31 am | बबलु

बाकी.... डांबिसकाका आणि साउथ कॅलिफोर्निया मधील मिपाकरांना (नंदन, भाग्यश्री, भट) यांना सानफ्रांसिस्को बे एरियात येण्याचं आग्रहाचं निमंत्रण.
एकदा याच की इकडे... दणदणीत धमाल करू.

"संयुक्त दक्षिण-उत्तर कॅलिफोर्निया" चा विजय असो. :) :)

....बबलु

दशानन's picture

22 Apr 2009 - 6:17 am | दशानन

मार डाला, अल्ला मार डाला ;)

खतरनाक !

थोडेसं नवीन !

पण मद्य घेत नसल्यामुळे काहिच उपयोग होत नाही. तरी देखिल कॉकटेल बद्दल इतकी माहिती कधीच मिळाली नव्हती. माहिती बद्दल धन्यवाद. पुढिल भागाची वाट पहात आहे.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

22 Apr 2009 - 11:16 am | परिकथेतील राजकुमार

जय हो ! जय हो !

मदिरा भक्त परायण नाटक्याबुवा कॉकटेलवाले यांचा शिष्य
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

ठकू's picture

22 Apr 2009 - 11:23 am | ठकू

अशा रेसिपीज नेहमी पोस्ट करत जा रे मित्रांनो. कॉकटेलचे नुसते फोटो पाहूनसुद्धा कित्ती बरं वाटलं! 8>
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

काजुकतली's picture

22 Apr 2009 - 11:32 am | काजुकतली

छान आहेत सगळ्या रेसिपीज.. दारुचे असेही कायतरी करतात हे माहितच नव्हते.....

नंदन's picture

22 Apr 2009 - 12:55 pm | नंदन

स्ट्रॉबेरी डायक्युरीची परवाच आठवण काढली होती, खरं तर. (स्ट्रॉबेरी मार्गारिटा बनवताना बर्फ अंमळ जास्त पडल्याने हे प्रकरण डायक्युरी म्हणून खपवता येईल काय अशा आळशी विचाराने :).)

संयुक्त कट्ट्याची कल्पना उत्तम आहे. सॅन लुई ओबिस्पोसारख्या मधल्या ठिकाणी जमल्यास आम्हा तळकॅलिफोर्नियाकरांना बरे पडेल, पण शक्य होत नसल्यास बे एरियातही जमू शकेल. (कॉकटेल्ससाठी आयडाहोसुद्धा चालेल ;).)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

पण आम्ही मद्यपान न करीत असल्याने थोडे फार बदल ...
हम बिना शराब के स्ट्रॉबेरी डायक्युरी बना देंगे .
शराब दालना जरूरी तो नहीं :-) मदहोश नहीं हो जायेंगे ईतनाही फर्क !!
बाकी ... पिने वालोंको पिने का बहाना चाहीये :-)
नाटक्या तुम्हाला साष्टांग नमस्कार तुम्ही so called उत्तम सुगरणींना सोल्लीड Competition दिली .. And gone far ahead !!
मान गये उस्ताद !!
~ वाहीदा
कह रहा है दरीयां से समंदर का सुकुत (शांतता)
जिसमें जितना दफ्त (गहराई) है ... उतना ही वो खामोश है !!

नाटक्या's picture

22 Apr 2009 - 8:36 pm | नाटक्या

हम बिना शराब के स्ट्रॉबेरी डायक्युरी बना देंगे .

जर असं करायचं असेल तर साखरे ऐवजी २ चमचे मध वापरा चव वेगळी येते पण छान लागते...

वाहीदा's picture

23 Apr 2009 - 1:56 pm | वाहीदा

क्या बात है ... लाजवाब !! बाकी च्या रेसीपे च्या बाबतीत ही काही छान टिप्स असतील तर जरूर सांगाव्या !!
~ वाहीदा
कह रहा है दरीयां से समंदर का सुकुत (शांतता)
जिसमें जितना दफ्त (गहराई) है ... उतना ही वो खामोश है !!

आवडाबाई's picture

25 Apr 2009 - 10:07 pm | आवडाबाई

सुंदर मालिका !
आमच्या सारख्या न पिणार्‍यांनाही मोह पडावा अशाच आहेत पाकृ
फोटोजमुळे प्रेझेंटेशन चं महत्त्व अधोरेखित होतंय, प्रत्येक पाकृची न पिणार्‍यांसाठीची वेरिएशन असल्यास लेखातच देत जाल का प्लीज ?
येऊ द्या अजून, नेहेमीच प्रतिक्रिया नाही दिली तरी वाचत आहोत

गोर्‍या गोर्‍या हरणाचे काळे काळे पाय ..
गोर्‍या गोर्‍या हरणाचे काळे काळे पाय ..
नाटक्या कुठे दिसत नाही .... कुठे पिऊन पडला कि काय ?? :O
~वाहीदा

नाटक्या's picture

27 Apr 2009 - 4:18 am | नाटक्या

हेच आपल्या गदिमांच्या शब्दात सांगता येईलः

या वस्त्राते विणतो कोण?
एक सारखे नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात या
हात त्या विणकराचे॥

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

अभिज्ञ's picture

25 Apr 2009 - 11:58 pm | अभिज्ञ

झकास कॉकटेल.

उच्च फोटो.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

श्रावण मोडक's picture

26 Apr 2009 - 12:50 am | श्रावण मोडक

नीलकांता, तू कुठे आहेस? तुला सांगितलं होतं, हे धागे बंद करायला. किंवा ते ब्लॉक करता येतील अशा सुविधा पुरवायला....
नाटक्या : आत्ता या क्षणी ऐकतोय... तेच ते. मेरा तेरा मनवा...