सकिया (६) - स्पायसी मार्गारिटा

नाटक्या's picture
नाटक्या in पाककृती
3 Jun 2009 - 10:46 am

या आधीचे लेखः

साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ...
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
साकिया (३) - "टकिला सनराईज"
साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी"
सकिया (५) - "चॉकलेट बनाना" (लहान मुलांसाठी खास)
===============================================================

स्पायसी मार्गारिटा

मंडळी सर्वप्रथम या वेळेस बरेच दिवस कॉकटेल मिपावर टंकू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. बर्‍याच लोकांना थोडेसे तिखट-आंबट पेय आवडते. ह्याची चव तिखट आंबट आणि थोडीशी कडू यांचे मिश्रण आहे. हे कॉकटेल मी आमच्या बे एरियाच्या मागच्या कट्ट्याला (धनंजयराव आले होते) केले होते.

साहित्य:

- १ औंस ट्रिपल-सेक (Tripple Sec)
- १ औंस टकिला (Tequila)
- १ औंस लिंबाचा रस
- १ अ‍ॅलेपिनो मिरची (मेक्सीकन मिरची नसल्यास आपल्याकडची जाड मिरची (भोपळी नव्हे) वापरू शकता)
- ३-४ थेंब टॅबेस्को सौस (http://en.wikipedia.org/wiki/Tabasco_sauce)
- चिमूटभर मीठ आणि लाल तिखट
- बर्फ

कृती:
शेकर मध्ये ५-६ बर्फाचे खडे घ्या त्यात लिंबाचा रस, ट्रिपल-सेक, टकिला, ३-४ थेंब टॅबेस्को सौस आणि पातळ काप केलेल्या मिरच्या टाका. ३०-४५ सेकंद शेकर व्यवस्थीत शेक करून घ्या. उरलेले लिंबू रिकाम्या कॉकटेल ग्लासच्या कडेला चोळा आणि एक बशीत मीठ आणि लाल तिखट पसरून त्यात ग्लास उपडा करा. आता ग्लासच्या कडेला तिखट-मीठाचे फ्रॉस्टींग होईल. त्यात शेकरमध्ये तयार झालेली मार्गारीटा ओता. मिरचीचा कापेला थोडी खाच पाडा आणि ग्लासच्या कडेला सजावटीसाठी लावा.

मार्गारिटा तयार आहे, सर्व करा. (किंवा स्वतःच पिऊन टाका ;-) )

डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.

धन्यवाद...

- नाटक्या

प्रतिक्रिया

दशानन's picture

3 Jun 2009 - 10:50 am | दशानन

हाय मार डाला ;)

मी तर सोडली यार.... खुप लेट आला सहावा भाग :D

थोडेसं नवीन !

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jun 2009 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार

गुरुवर्य काळजानी ठाव सोडला हो हे जिवघेणे कॉकटेल बघुन.

मदिरा भक्त परायण नाटक्याबुवा कॉकटेलवाले यांचा शिष्य
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सहज's picture

3 Jun 2009 - 11:11 am | सहज

मंदीमधे खर्च वाढवताय की राव :-( हरकत नाही प्यायल्यावर काही काळ विसर पडेल. :-)

जे काही दाखवले आहे ते हुच्च आहे त्यात वाद नाही. मस्त!!!!!!!

प्राजु's picture

3 Jun 2009 - 7:42 pm | प्राजु

झक्कास फोटो.. :)
तुमच्या साकियाचे फोटोच जीवघेणे असतात फार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

3 Jun 2009 - 7:59 pm | श्रावण मोडक

काय प्रतिसाद द्यायचा? पुढचाही भाग येणार आहे हे ठाऊक आहे. त्याच्याही पुढचा येणार आहे. त्याच्याही पुढचा...
चालू राहू द्या. आम्ही चित्रे पाहतो. मजकूर वाचतो. स्वप्नं रंगवत राहतो. चुकून हेच द्रव्य पित असल्याच्या आभासात रमून जातो. शेवटी हे सगळं आभासी विश्व!!!

अनिल हटेला's picture

3 Jun 2009 - 8:21 pm | अनिल हटेला

>>आम्ही चित्रे पाहतो. मजकूर वाचतो. स्वप्नं रंगवत राहतो. चुकून हेच द्रव्य पित असल्याच्या आभासात रमून जातो. शेवटी हे सगळं आभासी विश्व!!!

असेच म्हणतो.....:-(

चारच दिवसापूर्वी स्क्रू ड्रायव्हर नावाची कॉकटेल चाखली ,मजा आलेली.......

(डोक्याचे स्क्रू आवळलेला....)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

धनंजय's picture

3 Jun 2009 - 10:22 pm | धनंजय

नाटक्या यांच्या हाताने बनवलेले हे पेय उत्कृष्ट. आता स्वतःच्या हाताने करून बघतो.

अवांतर : आंबट-गोड-तिखट स्पायसी मार्गारीता वरून उगाच हे दुसरे कडू-गोड-तिखट पेय आठवले : हॉट चॉकलेट मध्ये अगदी थोड्या कळे-नकळे प्रमाणात मिरची टाकून बघावी. हा प्रकार अनपेक्षित असला तरी मस्त लागतो.

संदीप चित्रे's picture

3 Jun 2009 - 10:24 pm | संदीप चित्रे

बाहेर तापतं ऊन आणि पोटात थंडगार मार्गारिटा .... सुख म्हणजे सुख नुसतं :)
कृती आणि फोटो झक्कासच
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

चतुरंग's picture

3 Jun 2009 - 10:31 pm | चतुरंग

पहिल्या छायाचित्रातली कॉकटेल त्या कमनीय पेल्यात बघून जीव उसासला! ;)

एक सूचना -प्रत्येक कॉकटेलात नॉन-अल्कोहॉलिक बदल कसा करावा ह्याचीही एक तळटीप असेल तर आमच्यासारख्या लोकांची सोय केल्याचे पुण्य मिळेल! :D

(नॉनअल्कोहॉलिक)चतुरंग

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2009 - 11:50 pm | पिवळा डांबिस

प्रत्येक कॉकटेलात नॉन-अल्कोहॉलिक बदल कसा करावा ह्याचीही एक तळटीप असेल तर आमच्यासारख्या लोकांची सोय केल्याचे पुण्य मिळेल!
त्यात अल्कोहोल ऐवजी तितक्याच प्रमाणात डिस्टिल्ड वॉटर घालावे. नाहीतरी कुठलीही मदिरा म्हणजे २/३ पाणीच असतं...
-परोपकारी डांबिस

सुचवणीबद्दल धन्यवाद! :)

(खुद के साथ बातां : रंगा, 'परोपकारी डांबिस' हे 'परोपकारी गंपू' सारखं का वाटतंय? :? )
चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jun 2009 - 12:49 am | बिपिन कार्यकर्ते

रोमांचकारक!!!

बाकी, श्रावणशी सहमत. कधी प्यायला मिळणार कोणास ठाऊक? :(

बिपिन कार्यकर्ते

बबलु's picture

4 Jun 2009 - 2:26 am | बबलु

अहाहा !!!

यापुढे शब्द नाहीत.

....बबलु

विसोबा खेचर's picture

6 Jun 2009 - 1:08 am | विसोबा खेचर

केवळ देखणी लेखमाला आणि तेवढीच संग्राह्य!

नाटक्या, लेका भरून पावलो रे. मिपा काढल्याचं सार्थक झालं! :)

तात्या.

श्रीयुत संतोष जोशी's picture

6 Jun 2009 - 8:58 am | श्रीयुत संतोष जोशी

च्या मारी !!!!!!!!!!!!
श्रावण अगदी तोंडावर असताना हे असलं म्हणजे...........
पण हरकत नाही पटापट प्यायला हवं.

{ आतल्या आत ::: आता हा श्रावण कोण बरं ?????? } [:o]

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.