साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"

नाटक्या's picture
नाटक्या in पाककृती
31 Mar 2009 - 1:30 pm

या आधीचे लेखः

साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ...

==========================================================

मॅडम आय ऍम युअर ऍडम

या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "मॅडम आय ऍम युअर ऍडम" (Madam I am your Adam)

साहित्य:

- १ औंस ट्रिपल-सेक (Tripple Sec)
- २ औंस व्होडका
- १ औंस क्रॅनबेरीचा रस
- १ औंस ग्रेपफ्रुटचा रस
- १ स्ट्रॉबेरी
- १/२ औंस अननसाचा रस
- लिंबाची साल
- बर्फ

कृती:
शेकर मध्ये मध्ये ५-६ बर्फाचे खडे घ्या त्यात व्होडका, ट्रिपल-सेक, क्रॅनबेरीचा रस आणि ग्रेपफ्रुटचा रस टाका. शेकरचे झाकण घट्ट बंद करून १५-२० सेकंद हलवून घ्या. शेकरमध्ये तयार झालेले कॉकटेल गाळून ग्लासमध्ये ओता आणि बर्फ फेकून द्या. आता अननसाचा रस शेकरमध्ये घेऊन त्यात १-२ बर्फाचे खडे टाका आणि परत झाकण बंद करून १०-१५ सेकंद जोरात हलवा, अननसाच्या रसाला फेस येईल, तो अलगदपणे कॉकटेलवर सोडा. एक स्ट्रॉबेरीला खालून थोडी खाच पाडा आणि ग्लासच्या कडेला सजावटीसाठी लावा. लिंबाची साल लांबट कापून घ्या आणि ती देखील सजावटीसाठी स्ट्रॉच्या आधाराने स्ट्रॉबेरीमध्ये सजावटी साठी अडकवा.

तुमचे कॉकटेल तयार आहे (सजावटी सकट).

यात जर व्होडका आणि ट्रिपल-सेक नाही टाकले आणि त्या ऐवजी ३ औंस संत्र्याचा रस वापरला तर नॉन-अल्कोहोलिक कॉकटेल बनेल.

डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.

धन्यवाद...

- नाटक्या

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

31 Mar 2009 - 1:46 pm | परिकथेतील राजकुमार

आ हा हा गुरुवर्य अजुन एक अनमोल प्रवचन......
पुन्हा एकदा मद्यानंदी टाळी.
आता कधी एकदा घरचे गावाला जातायत आणी हे सगळे धंदे करतोय असे झाले आहे ;)

अवांतर :- हे कॉकटेल पीताना संजय दत्तचे 'हॅलो मॅडम आय एम युअर ऍडम' हे गाणे बघितल्यास काहि वेगळा प्रभाव पडेल का ?

मदिरा भक्त परायण नाटक्याबुवा कॉकटेलवाले यांचा शिष्य
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

2 Apr 2009 - 6:44 am | अनिल हटेला

सहीच !!!

अवांतरः- घरचा अभ्यास सुरु करावा म्हणतोये प्रात्यक्षीकाचा !! ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दशानन's picture

31 Mar 2009 - 1:54 pm | दशानन

ज ळ वा ग रि बा ला !

:S

लेखमाला वाचून आम्हाला येड लागायची वेळ आली !

8}

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Mar 2009 - 1:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वावा, झकास!

आता तीन प्रश्नः
१. वाईनची बाटली उघडली की ती (फारतर) एक-दोन दिवसांत संपवावी तसं काही व्होडकाच्या बाबतीत आहे का?
२. कोणती व्होडका चांगली, तुमच्या मताप्रमाणे? माझं मत पोलिश किंवा फिनीश व्होडकांना!
३. या कॉकटेलचं नाव असं का आहे?

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

दशानन's picture

31 Mar 2009 - 1:58 pm | दशानन

>>१. वाईनची बाटली उघडली की ती (फारतर) एक-दोन दिवसांत संपवावी तसं काही व्होडकाच्या बाबतीत आहे का?

=))

बसल्या बैठकीला संपवावी ;)

जोक आहे, माहीत नाही मला पण.
आम्ही ढक्क्कण उघडले की संपवूनच बाटलीचे ढक्कण लावावे ह्या मंत्रावर जास्त लक्ष देतो =))

नाटक्या's picture

31 Mar 2009 - 2:07 pm | नाटक्या

१. आमच्यात कोनतीबी बाटली संपल्याबिगर ठेवत नाही.
२. मी आत्ता पर्यंत ५-७ प्रकारच्या व्होडका घेतल्यात. Stoli Elit (Russian) माझी सगळ्यात आवडती.
३. कॉकटेलची नावं अशीच असतात. शाळेत सरांना आणि मॅडमना वेगवेगळी नावं असतात ती कश्यामुळे? काही कॉकटेल्सची नावं मला ईथे लिहीता येणार नाहीत इतकी XXX आहेत.

और कुछ???

सुनील's picture

31 Mar 2009 - 2:07 pm | सुनील

वाईनची बाटली उघडली की ती (फारतर) एक-दोन दिवसांत संपवावी
(फारतर) एक-दोन तासांत संपवावी! ;)

तसं काही व्होडकाच्या बाबतीत आहे का?
नाही. पण ती ही (फारतर) एक-दोन दिवसात संपवावी!!

मुख्य फरक आहे तो असा की, वाइन ही फर्मेन्टेड असते त्यामुळे ती फार काळ उघडी ठेवता येत नाही, खराब होऊ शकते. वोड्का (व्हिस्की, रम, जीन देखिल) हे डिस्टिल्ड असते. ती अशी खराब होत नाही.

कोणती व्होडका चांगली, तुमच्या मताप्रमाणे? माझं मत पोलिश किंवा फिनीश व्होडकांना!
तुम्हाला फिनलॅन्डिया वोड्का म्हणायचे आहे का? अतिउत्तम. पण भारतात मिळते का ते ठाउक नाही. भारतात मिळणार्‍या वोड्कांत स्मिरनॉफ उत्तम, हे माझे मत!

बाकी, हे कॉकटेल दिसतेय सुंदर. एकदा चाखायलाच पाहिजे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Mar 2009 - 2:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुख्य फरक आहे तो असा की, वाइन ही फर्मेन्टेड असते त्यामुळे ती फार काळ उघडी ठेवता येत नाही, खराब होऊ शकते. वोड्का (व्हिस्की, रम, जीन देखिल) हे डिस्टिल्ड असते. ती अशी खराब होत नाही.
धन्यवाद सुनील. अनेक अल्कोहोल्स चाखून पाहिल्यावर शेवटी मी वाईनला चिकटले पण या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं.

फिनीश म्हणजे बर्‍याचशा फिनलंडमधल्या व्होडका, फिनलंडीया मी एकदाच चाखलेली आहे, पण त्यात संत्र्याचा रसही असल्यामुळे तिची चव नीट कळलीच नाही.

(सुला आणि शेटू इंडाजच्या अर्थव्यवस्थेत भर टाकणारी) अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

नंदन's picture

31 Mar 2009 - 2:28 pm | नंदन

बाबत सहमत आहे. फिनलँडिया + क्रॅनबेरी ऍपल ज्यूस + लाईम हे काँबो एकदा ट्राय करून पहा :)

बाकी लेख मस्तच. पुढचा कट्टा कधी आहे हो बे एरियात? :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

नाटक्या's picture

31 Mar 2009 - 2:33 pm | नाटक्या

४ एप्रिलला करतो आहोत कट्टा.. माझ्या घरी, कॉकटेल्स सह!!! बघा विचार करा...

अरुण वडुलेकर's picture

31 Mar 2009 - 2:01 pm | अरुण वडुलेकर

असेंच म्हणावेसे वाटते.
आम्ही घाटी मंडळी अजून ब्लडी मेरी, स्क्रू ड्रायव्हर सारख्या बिगारीतच आहोत, याची जरा (!) वाटतेच.
आपण मात्र यातले भिष्माचार्य किंवा शुक्राचार्य आहात असें दिसते. एक विनंती,
इथे आमच्या नाशिकला द्राक्षे चांगली आणि मुबलक होतात. त्याचेही असे कांही करता येईल कां ते पहा.

विसोबा खेचर's picture

31 Mar 2009 - 2:03 pm | विसोबा खेचर

साला नाटक्या, मिपा तुझ्या नावावर करून टाकू का रे? :)

अरे किती सुंदर लिहिलं आहेस! छ्या..,काय साला फोटू आहे!

त्या लिंबाच्या सालीची इव्ह त्या ग्लासरुपी ऍडमला काय सुंदर बिलगली आहे! वा वा!

आपला,
(अनुष्काचा ऍडम) तात्या.

चिरोटा's picture

31 Mar 2009 - 2:18 pm | चिरोटा

या कॉकटेलचं नाव असं का आहे

बहुदा नाव Madam I'm Adam असावे.उलटे वाचले तरी तेच.

नरेश_'s picture

31 Mar 2009 - 2:37 pm | नरेश_

वा वा भेन्डीबाजारजी, मान गये उस्ताद.
आजपासून तुम्ही माझे गुरु.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

बबलु's picture

1 Apr 2009 - 1:56 pm | बबलु

हे कॉकटेल रापचिक आहे. फोटू तर लैच भारी.

लेखमाला उत्तम चालू आहे. आजकाल नवीन रेसीपी ची वाट पाहतो !!

....बबलु

rupali chaudhary's picture

1 Apr 2009 - 5:01 pm | rupali chaudhary

YAKAM BHARIIIIII
MASTACH

किट्टु's picture

1 Apr 2009 - 6:33 pm | किट्टु

झक्कास....काय तो ग्लास... =P~ याच्याशी कोणता 'चकणा' छान लागेल? =P~

मला कोणी तरी 'Brandy' चे कॉकटेल सांगु शकेल का? घरात खुप उरली आहे.

रामदास's picture

1 Apr 2009 - 6:54 pm | रामदास

असू द्या घर म्हणून .
बाकी ब्रँडी मी नेहेमी अडीअडचणीला कामास येते.
बाकीच्या दारवा संपल्या तर दर्भाचा कावळा करतात तशी एखाद दिवस घरातली ब्रँडी पण पितो.

किट्टु's picture

1 Apr 2009 - 7:33 pm | किट्टु

>>दर्भाचा कावळा करतात तशी एखाद दिवस घरातली ब्रँडी पण पितो.

=)) पण कशी पितात...नुसतीच का? (जशी सर्दी झाली की पितो तशी)

सुनील's picture

1 Apr 2009 - 8:33 pm | सुनील

गंमत सोडा पण ब्रॅन्डी ही नुसतीच पितात. तरच त्यात मजा आहे. विशेषतः कोन्याक म्हणून ब्रॅन्डीचा एक प्रकार आहे (जसा स्कॉच हा व्हिस्कीचा आहे) तो तर नुसताच घुटक्या-घुटक्याने घ्यावा!!!!अहाहा!!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ's picture

1 Apr 2009 - 6:55 pm | लिखाळ

तिन्ही भाग छान आणि माहितीपूर्ण आहेत. कॉकटेलं बनवून पाहायची इच्छा होत आहे :)

या भागातला फोटो तर अफलातून.. फार भारी !!
पुढल्या भागांची वाट पाहतो आहे.
-- लिखाळ.

संदीप चित्रे's picture

1 Apr 2009 - 7:49 pm | संदीप चित्रे

फोटो आणि कृती एकदम टेम्प्टिंग आहे.
मस्तच एकदम !!

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

नयनसुख!

हे नाव "मॅडम आय्म ऍडम" असे असावे का? हा एक प्रसिद्ध पॅलिन्ड्रोम आहे - उलटसुलट वाचले तरी अक्षरांचा क्रम तोच असतो.
---------------->
Madam I'm Adam
<----------------

चतुरंग's picture

1 Apr 2009 - 8:04 pm | चतुरंग

नयनमनोहर! कसला फोटू टाकला आहेस खतरनाक!! B)
तू मला बहुतेक शेवटच्या भागापर्यंतही थांबू देणार नाहीयेस त्याआधीच मी प्यायला सुरुवात करेन असे दिसते!! ;)

चतुरंग

नाटक्या's picture

1 Apr 2009 - 8:52 pm | नाटक्या

या मालीकेला शेवटचा भाग नसेल!!! त्यामुळे तुम्ही कधीही सुरुवात केली तरी फारसा फरक पडणार नाही :-) तेव्हा "शुभस्य शिघ्रम"

- नाटक्या

पिवळा डांबिस's picture

2 Apr 2009 - 2:35 am | पिवळा डांबिस

...त्याआधीच मी प्यायला सुरुवात करेन असे दिसते!!
आधीच याची ही तर्‍हा....
मग प्यायला लागला तर मग बघायलाच नको!!!:)
'मधुशाला'चं विडंबन वाचायला मिळणार बहुतेक!!

बाकी नाटक्याशेठ, ही रेसेपी पण उत्तम!! मार्टिनीज चालू झाल्या की उठवा आम्हाला!!:)
एक सूचना: क्रॅनबेरी ज्यूस आणि ग्रेपफ्रूट ज्यूस वगैरे गोष्टींना आपल्या भारतात सहज उपलब्ध होणारे पर्याय सुचवा ना मंडळींना!

एक's picture

1 Apr 2009 - 9:16 pm | एक

मस्त रेसिपी आहे!
करून तर नक्कीच बघेन!

तो फोटो झकास आहे. ईव्हीनींग गाऊन मधली ब्युटीक्वीन दिसते आहे..!

भाग्यश्री's picture

1 Apr 2009 - 9:17 pm | भाग्यश्री

वाह... फारच सुंदर आहे फोटो!!! लग्गेच हे तयार करून प्यावंसं वाटेल इतका सुंदर !! :)
ही मालिका आवडली बुआ.. बरीच माहीती कळतीय !!!

http://bhagyashreee.blogspot.com/

ऋषिकेश's picture

1 Apr 2009 - 9:21 pm | ऋषिकेश

वा ! मस्त फोटु! अजून येऊ द्या

बाकी हे औंस कसे मोजणार?.. प्रमाणे घरच्या घरी मोजता येतील अशी द्याल का?

-ऋषिकेश

नाटक्या's picture

1 Apr 2009 - 10:29 pm | नाटक्या

एक औंस म्हणजे साधारणत: ३० मिलीलिटर. आपल्या घरचा कप बहुतेकदा ५ (१५० मिली) औंसाचा असतो पण भारतातले कप लहान असतात आणि ते बर्‍याचादा ३ औंसाचे (९० मिली) असतात. तुमच्या कडे असलेली एखादी ५०० मिलीची बाटली घ्या आणि त्यात किती कप पाणी बसते ते पाहून कपाचा अंदाज घ्या. अधीक माहीती साठी: http://www.howtotipsandtricks.com/2008/07/cocktail-measurements-oz-ml-sh...

- नाटक्या

बेसनलाडू's picture

1 Apr 2009 - 11:30 pm | बेसनलाडू

फारच छान दिसते आहे. ४ तारखेला मिळणार का?
(आस्वादक)बेसनलाडू